फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

गविंचा खालचा विनोद गांभिर्याने घेऊन 'बरे'.

हाहाहा. एका दगडात दोन आय डी तसेच आयडीयाज Smile

फुसके बार – २० फेब्रुवारी २०१६

१) वाघाटी या वाघाच्या पिलाप्रमाणे दिसणा-या प्राण्याचा महाबळेश्वमधील वेण्णा लेकच्या रस्त्यावर वाहनाची धडक बसल्यामुळे मृत्यु झाल्याची बातमी पाहिली. या प्राण्याचे नाव प्रथमच ऐकण्यात अले. त्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

२) राजदीप सरदेसाईचा खोडसाळपणा – पुन्हा एकदा

सुमारे २३,००० लोकांकडून केलेल्या सर्व्हेमध्ये काढलेला निष्कर्ष. ४०% लोकांना मोदी हे आपले नेते वाटतात. तर २२% लोकांना पप्पू हवा आहे. पण राजदीप सरदेसाईला आनंदी व्हायला - हा आनंद त्याच्या चेह-यावरून निथळत होता - मुद्दा काय मिळाला तर अगदी काही आठवड्यांपूर्वीच केवळ ८% लोकांना पप्पू हवा होता. त्यातही त्याच्या उत्साहाला भरते कशामुळे आले तर पप्पू, सोनिया आणि प्रियांका यांच्यात मिळून ५०%पेक्षा अधिक लोकांनी कल दिला आहे. त्यामुळे तर तो आणखीच खुश झाला होता. त्यामुळे पुढची लढाई थेट मोदी व कॉंग्रेसमध्येच लढाई होईल इथपर्यंत वल्गना करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आता बेशुद्ध व्हायला तयार व्हा. हा सर्व्हे कशासाठी आहे, तर २०१९मध्ये मोदींना पंतप्रधानपदासाठी लढत देण्यास कोण लायक उमेदवार आहे? हो तुम्ही चुकीचे वाचले नाहीत, २०१९मधल्या निवडणुकांसाठी. २०१६ आता कोठे सुरू झाले हो.

राजदीप सरदेसाई, देशात लाळेचे पाट कोठे वाहिले असतील हे आज सहज कळले.

३) उत्तर प्रदेशमधली रानटी संस्कृती

उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यात कुठल्याशा विजयोत्सव वा तत्सम कारणांमुळे केलेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यु झाला आहे. मागे एका लहान मुलाचा, त्या नंतर एका प्रौढाचा तर काल लग्नसमारंभाच्यावेळी झालेल्या अशा गोळीबारात तर चक्क नवरामुलगाच ठार झाला.

उत्तरप्रदेशात अराजक चालू आहे याचे यापेक्षाही अनेक दाखले देता येतील. कोणी अशा गोळीबारात मारले गेले न गेले, तरी मुळात भर रस्त्यावर असा गोळीबार करण्यास परवानगी असणे, मुळात अशा प्रकारे शस्त्रे बाळगणे हेच किती भयानक आहे याची आपल्याला कल्पना येत नाही का? तिकडे पेशावरमध्ये रस्त्या-रस्त्यावर असे चालते असे ऐकण्यात येते. इतके भयानक प्रकार चालू असूनही अखिलेश, त्याचा दळभद्री व भुईला भार असलेला बाप, तेवढाच भुईला भार असलेला त्याचा काका आणि आझम खान नावाचा त्यांनी पाळलेला दैत्य (कधी कधी यांच्यापैकी कोण कोणाच्या आधारावर तगत अहे हेच कळत नाही हे वेगळे) यांच्यापैकी कोणालाही त्यामध्ये काही वावगे वाटत नाही यातच सारे काही आले.

मुलायमकडून मधूनमधून संसदेमध्ये मिळत असलेल्या सहकार्याच्या बदल्यात केन्द्र सरकारदेखील उप्र सरकारविरूद्ध काही कारवाई करताना दिसत नाही. एकूण सगळे कसे आलबेल असल्यासारखे चित्र आहे.

४) बिहारमधील मृत्युंची काहीच किंमत नाही?

श्रीकृष्ण उमरीकर यांनी त्यांच्या पोस्टद्वारे नजरेस आणून दिलेली घटना.

काल बिहारच्या गोखलापूरमधील एका आश्रमशाळेत पाचवीतल्या मुलीने जेवणाच्या वेळी अधिक अन्न मागितले तेव्हा तिला वाढप्याने मारले. त्यावरून त्या मुलीचे वडील तक्रार करायला गेले, तर त्या वडलांना लाथ मारली गेली व त्यात त्यांचा मृत्यु झाला.

पोहोचली का हो ही बातमी आपल्यापर्यत? आता पुढे वाचा. तो बाप मुस्लिम होता.

एका मुस्लिमाच्या मुलीने अन्न कमी पडले म्हणून थोडे अधिक द्या म्हणून विनंती केली तर त्यावरून तिला मारले गेले, एवढेच नव्हे तर त्याबद्दल तक्रार करणा-या तिच्या वडलांना ठार मारले गेले ही बातमी खरे तर किती करूण. पण हेच जर महाराष्ट्रात व तेही फ़डणवीस सरकारच्या कारकिर्दीत झाले असते, तर या लोकांनी या बातमीवरून काय काय केले असते याची कल्पना येते का हो?

तर यापुढे नीतिश-लालूच्या राज्यातील गुन्हे हे केवल गुन्हेच. कायदा गुन्हेगारांचे काय करायचे ते ठरवेल. फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रात असे काही झाले तर मात्र असंवेदनशील सरकार, सामाजिक अन्याय वगैरे कारणांवरून बोंब ठोकायची.

५) सतिनाथ सारंगी – देशद्रोह्यांचे प्यादे?

टीव्हीवरील चर्चांमधून काही जणांचे पितळ उघडे पडते. आज टाइम्स नाऊ वरील चर्चेमध्ये अर्णबने एक प्रश्न विचारला की माओइस्ट हिंसाचार आणि काश्मिरी दहशतवाद यांच्यात काय समान सूत्र आहे? त्याआधी मारूफ रझा यांनीही देशाला अस्थिर करण्यामागचे कारस्थान व्यवस्थित समजावून सांगितले.

अर्णबने हा प्रश्न विचारल्यावर हा सारंगी इतका बिथरला की सनातन संस्था, मोदी, वगैरें असंबद्ध मुद्द्यांवरून वरून तारे तोडू लागला. हाच सारंगी भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात अग्रेसर होता. त्यामुळे त्याचे असे विचित्र वागणे केवळ संशयाला वाव देणारे होते.

त्याचे बिथरणे पहाण्यासाठी तरी आजचा हा कार्यक्रम पहा. भरपूर आरडाओरडा असला तरीही.

६) हे फटकारणे?

मुंबई भाजपच्या आशीष शेलार यांना बेकायदेशीरपणे होर्डिंग लावण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारले अशी बातमी वाचली. त्यांना तब्बल २५,००० रूपयांचा दंड करून ती रक्कम नाम फाउंडेशनला देण्यात यावी असा आदेश दिला.

२५,००० रूपयांचा दंड करण्याला फटकारणे म्हणायचे काय?

मागेही एका गणपती मंडळाला उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड करून ती रक्कम अशीच शेतक-यांना मदत म्हणून द्यावी असा आदेश दिला होता. अशा प्रकारे कायदेभंग करणा-यांना दंडाच्या रकमेची भीती वाटत नाही इतके ते निर्ढावलेले आहेत.

अडथळा होऊ नये असे मांडव घालू नयेत असा उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असतानाही केवळ एक लाख रूपयांचा, पंचवीस हजार रूपयांचा दंड करण्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणा-यांना पुन्हा तसेच करण्यास फूस मिळण्याचीच शक्यता आहे.

हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही तर पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमध्येच नाही तर पूर्ण राज्यासाठी लागू आहे. सरळसरळ कायदेभंग करणा-या कार्यकर्त्यांवर अनेकदा कसलीही कारवाई केली जात नाही, ज्यांच्यावर केली जाते, त्यांच्यावरील खटलेही कालांतराने काढून घेतले जातात. या प्रकारांमुळे या लोकांची भीड चेपते आणि कोणीही सत्ताधारी असला तरी जनतेला होणारा उपद्रव बंद होत नाही.

त्यामुळे उच्च न्यायालयाची ही कारवाई केवळ नावालाच आहे व अशी बेशिस्त वाढण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

यापुढे असा कायदेभंग करणा-यांना तुरूंगात टाकायला हवे.

#फुसके_बार

#Phusake_Bar

#सर्व्हे2

1) फनि
2) जचुआ
3) जचुआ
4) जचुआ
5) जचुआ
6) जचुआ

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जचुआ म्हणजे काय?
जनरलायझेशन चुकीचे आहे की
जबरदस्त चुकीचे आहे?

की 'जल्लां चुकलेला असां!'

जरा चुकीचे आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फुसके बार – २१ फेब्रुवारी २०१६ - पप्पूच्या रक्तातील देशद्रोह व बिनडोकपणा, जाट संघटनांचे आव्हान व चहावरची साय

१) पप्पू, तुझ्या रक्तात असलाच तर देशद्रोह व बिनडोकपणा. देशभक्ती नाही.

पप्पू काल म्हणाला की माझ्या रक्तात देशभक्ती आहे. माझ्या कुटुंबातील दोघे मेले (मरे). अतिरेक्यांनी त्यांना मारले. तर यामुळे पप्पूच्या रक्तातच देशभक्ती आहे म्हणे.

पप्पू, तुझ्या आजीने या देशाचे जेवढे भले केले त्यापेक्षा कितीतरीपट वाटोळे केले. राजकीय स्वार्थासाठी पूर्वोत्तर राज्यांमधल्या बांगला देशी निर्वासितांचा व नंतरच्या घुसखोरीचा प्रश्न मुद्दाम सोडवला नाही, झालेच तर त्याला खतपाणी दिले. राजकीय स्वार्थासाठी देशात आणीबाणी पुकारली. जनता पक्षाचे पंतप्रधान व मंत्री पुचाट निघाले म्हणून, अन्यथा काहीही कारण नसताना पुकारलेली आणीबाणी हा देशद्रोहच होता व त्यासाठी तुझी आजी फासावर गेली नसती तरी आयुष्यभर तुरूंगात तरी नक्कीच राहिली असती इतका गंभीर गुन्हा होता तो. तेव्हा तुझ्या रक्तात काही असलेच तर देशद्रोह आहे हे लक्षात ठेव. आज आणीबाणी हा शब्द उगाळलेल्या दगडासारखा बोथट झाला आहे म्हणून; अन्यथा त्यावेळी आजीने व तुझ्या काकाने जे अक्षरश: थैमान घातले होते, त्याची तीव्रता भयानक होती. अर्थात आज सगळेच ते विसरलेले आहेत असे दिसते.

तशाच राजकीय स्वार्थापोटी अकालींना शह देण्यासाठी तुझ्या आजीने पंजाबमध्ये भिंदरावालेला प्रोत्साहन दिले, तो हाताबाहेर जाऊन त्याचा राक्षस झाल्यावर मग सुवर्णमंदिरावर कारवाई करावी लागली. त्यातून त्या मारल्या गेल्या. स्वत:च प्रश्न निर्माण करून त्यात मारले गेले, तर त्याला देशभक्ती म्हणत नाहीत, हुतात्मा म्हणत नाहीत. उलट राजकीय स्वार्थापोटी तेथे दहशतवादाला जन्म देण्यास जबाबदार असणे हा देशद्रोह आहे. शिवाय त्यांच्या वैयक्तिक प्राणहानीपलीकडे देशाचेही जे अपरिमित नुकसान झाले याची तुला कल्पना तरी आहे का पप्पू? पुढच्यावेळी असले भंपक उद्गार पप्पूने काढले तर त्याला हे कोणीतरी ऐकवले पाहिजे.

तुझे वडील राजकारणात नवखे होते तरी देशाच्या डोक्यावर बसवले गेले. कारण एकच तुझ्या आजीचा मुलगा. गादीचा वारसदार. शाहबानो प्रकरणी कायदा बदलून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात न आणून मुस्लिम महिलांवर अन्याय करण्याचा पराक्रम त्यांनी केलाच होता. भारत देशापेक्षा अगदी छोट्या असलेल्या श्रीलंकेचे चतुर अध्यक्ष जयवर्धने यांनी राजकारणात बच्चा असलेल्या तुझ्या वडलांना अक्षरश: मूर्ख बनवले आणि त्यांच्या धूर्त चालीला बळी पडत तुझ्या वडलांनी तिथल्या तमीळ दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी आपले म्हणजे भारतीय सैन्यच खर्ची पाडले. त्यातूनच ते पुढे मारले गेले. तेव्हा त्यांनी देशरक्षणासाठी काही केले म्हणून व त्यातून त्यांचा मृत्यु झाला यामुळे त्यांना हुतात्मा म्हणावे अशी स्थिती अजिबात नाही. तुझी आजी काय किंवा वडील काय, त्यांच्या अशा प्रकारचे मारले जाण्याचे दु:ख मलाही आहेत, पण त्यातून तू तुझ्या रक्तातच देशभक्ती आहे असे म्हणतोस तो तुझा मूर्खपणा आहे हे सांगत अहे. तुमच्या गांधी घराण्याशिवाय देशाचे काही होणार नाही असा तुमचा जो माज आहे त्यातून ही तुमच्या रक्तातच देशभक्ती आहे वगैरे डायलॉगबाजी जन्माला येते.

मागे तुझ्या मातोश्रींनीही मी माझ्या सासूचा रक्ताळलेला देह माझ्या मांडीवर घेतला होता, माझ्या पतीनेही बलिदान केले अशी नाटकबाजी मते मिळवण्यासाठी केलेल्या भाषणात केली होती. तेव्हा लोक भुलले होते, आता तसे होणार नाही, याची खात्री बाळग.

एवढेही सांगतो, की तू तर तुझ्या आजीपेक्षा, वडलांपेक्षाही बदतर आहेस. वडील नवखे होते, पण बुद्दू नव्हते. तू तर बुद्दू आहेस, बिनडोक आहेस. तुझ्या पक्षात तुझ्यापेक्षा चांगले व अनुभवी असलेले कितीतरी नेते आहेत, पण तरीही त्यांच्याऐवजी तुझे बोबडे बोल रोज ऐकणे आमच्या नशिबी आहे. काल मनरेगाच्या मजुरांसमोर म्हणालास, की मोदी म्हणतात की गरीबांना काम मिळायला नको. हेही तुझे बोबडे बोलच. हे बोबडे बोल खरोखर एखाद्या बाळाचे असते तरी हरकत नव्हती. पण तू तर तुझ्या रक्तात देशभक्ती असल्याचे बरळत आहेस.

म्हणून हे सांगावे लागले पप्पू.

२) जाट संघटनांचा माज व सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आव्हान

हरयानातील जाटा संघटनांनी आरक्षणावरून फारच हिंसक आंदोलन सुरू केले आहे. हॉस्पिटल्स, शाळा जाळण्याचे प्रकार झाले आहेत. राजधानी दिल्लीचा पाणीपुरवठा रोखण्यात आल्याचे कळते.

एकूण आरक्षण ५० टक्क्यापेक्षा वाढू शकत नाही हे घटनात्मक कारणामुळे वास्तव आहे. शिवाय अगदी सर्वोच्च न्यायालयाने मुळात जाट समाज मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही असा निवाडा दिला आहे. तरीही अशा प्रकारचे हिंसक आंदोलन चालू करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्यासारखे आहे. हे आंदोलन कठोरपणे मोडून काढणे आवश्यक आहे.

त्यामुळे अशी आंदोलने देशविरोधी आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.

महाराष्ट्रातही मराठा आरक्षणावरून आरपारची लढाई लढण्याचे संकेत गुंड राणे पिता-पुत्रांनी दिले आहेत. मुळात गुंड राणे यांच्या अध्यक्षतेखाली अशी आरक्षणासंबंधीची समिती नेमणे हाच विनोद होता. एकापाठोपाठ निवडणुका हरल्यामुळे राणे यांचे राजकीय भविष्य सध्या अंधारमय आहे. शिवाय राज्यातल्या निवडणुकांना आणखी बराच अवधी आहे. तेव्हा स्वत:चे राजकीय पुनर्वसन करून घेण्यासाठी राणे या नादाला लागलेले असण्याची शक्यता आहे.

कारणे काहीही असोत, यापुढे कोणालाही नव्याने आरक्षण मिळणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जाट आंदोलनाची स्वत: दखल घेऊन द्यावा. त्याशिवाय स्वत:च्या राजकीय लाभासाठी देशाला वेठीला धरण्याचे देशाच्या विविध भागात यावरून घडणारे प्रकार बंद होणार नाहीत. शिवाय अशा आंदोलनांना फूस देण्यात कोणाचा काय हेतु असेल याचा नेम नसतो. त्यामुळे हे प्रकार बंद व्हायलाच हवेत.

बाकी भाजप असो, कॉंग्रेस असो वा आप असो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आरक्षण मिळणार नाही असे हे बेकायदेशीर आंदोलन करणा-या जाट संघटनांना स्पष्टपणे सांगताना दिसते आहे का हो? त्यामुळेही अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वाढलेली आहे.

३) कन्हैयाकुमारचे वकीलच त्याला जामीन न मिळण्यास जबाबदार?

परवा सर्वोच्च न्यायालयात जाताना कन्हैयाला मारहाण झाली, या कारणाने त्याच्या वकिलांनी तेथेच त्याच्यासाठी जामीन मागितला. दिल्ली पोलिसांनी त्याला जामीन देण्यास त्यांची हरकत नसल्याचे सांगूनही केवळ उच्च न्यायालयात जामीन न मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी घेऊनही त्यांना परत उच्च न्यायालयातच जाण्यास सांगितले. याबाबतीत उशीर झाल्यामुळे आता कन्हैया कुमारच्या जामीनाची सुनावणी थेट पुढच्या आठवड्यातच होईल. मात्र जेव्हा ती होईल त्यावेळी त्याची जामीनावर सुटका होण्यात अडथळा येणार नाही असे दिसते.

४) अंनिसच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांना मोकळे रान?

गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात काढलेल्या मोर्चामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही दिसले. पुण्यात दाभोळकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने पानसरेंचीही आठवण काढली गेली होती. पण त्या निमित्ताने ‘लाल सलाम’च्या घोषणा दिल्या जातात, हे अंनिसला मान्य आहे का?

मागे पुण्यातल्या अंनिसच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या हुसेन दलवाईंनीही यापुढे बहुजन समाजातल्या जवानांचे बळी सीमेवर पडलेले खपवून घेतले जाणार नाही (म्हणजे तेथे कोणाचे बळी पडावेत, असे त्यांचे म्हणणे होते हे वाचकांनी लक्षात घ्यावे) असे तद्दन मूर्खपणाचे विधान केले होते. तेव्हा अंनिसच्या कार्यक्रमामध्ये राजकारणीदेखील आपले हात धुवून घेत असताना दिसतात, हे अंनिसला मान्य आहे का?

गोविद पानसरे ही चांगली व्यक्ती होती, मग त्यांची जी विचारसरणी होती तिच्या अनुषंगाने लाल सलामच्या घोषणा दिल्या तर बिघडले काय, असे कोणालाही वाटेल. मात्र आज जेएनयुमध्ये फुटीरतावादी व डावे यांच्यात असलेले उघड संबंध, केरळमध्ये रा.स्व. संघ व कॉंग्रेस यांच्यात राजकीय हत्या करणारे कम्युनिस्ट, आपल्या राजवटीदरम्यान कम्युनिस्टांनी बरबाद केलेला बंगाल हे सगळेच त्यामुळे पावन होते. आता केरळमध्ये रा.स्व. संघाकडूनही कम्युनिस्टांच्या हत्या झालेल्या आहेत असे कोणाचे म्हणणे असेल तर तेथे या हत्यांना सुरूवात कशातून झाली हे पहावे व हिंसाचारातून क्रांती हीच कम्युनिस्टांच्या विचारधारा आहे हे लक्षात घ्यावे आणि केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्वच राजकीय हिंसाचारावर अवलंबून आहे हे लक्षात घ्यावे. वैयक्तिक पातळीवर माझा कोणत्याही हत्यांना विरोधच आहे.

अंनिसने यापुढे कम्युनिस्टच नव्हे, सर्वच राजकीय विचारधारांना बाजूला ठेवावे. दाभोळकर हे आधुनिक संत होते, म्हणजे इतक्या उच्च विचारांचे होते असे मी मानतो, त्यांच्या चळवळीला राजकीय वळण लागू नये असे वाटते.

५) बंगळुरूमध्ये शंकर बेलगावी ही वयाच्या चार वर्षांपासूनच अंधत्व आलेली व्यक्ती लिंगायत समाजाच्या जवळजवळ २०० शैक्षणिक संस्थांचे उपाध्यक्ष आहेत. लहानपणी त्यांच्या आईने त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला तर नंतर पत्नीची अमूल्य साथ. त्यांना चार मुली आहेत. त्यांना दररोजची वर्तमानपत्रे वाचून दाखवली जातात. त्यांच्या आविर्भावावरून शंकाही येत नाही की त्यांना अजिबात दिसत नाही.

काल टीव्हीवर याबाबतची बातमी ऐकताना त्यांचे आडनाव नीटसे कळले नाही.

६) चहावरची साय

ज्यांना पहिल्या वाफेचा चहा पिण्याची सवय नसते त्यांनी तो पिण्यास सुरूवात करेपर्यंत किंवा चहा आणण्यासच थोडा उशीर झालेला असेल तर त्यावर साय जमते. दूध कितीही कमी दर्जाचे असले तरी सायीचा हलकासा थर जमतोच जमतो. असा चहा पिताना काही जणांची धांदल उडते. तेही इतरांसमोर असताना. काही जण सरळ दोन बोटांनी माशी पकडावी तसा हा थर बाजुला सरकवतात. त्यावेळी आपली बोटे स्वच्छ आहेत का हेही पाहिले जात नाही. काही जण फू-फू करून त्या थराला मागे सरकवण्याचा प्रयत्न करतात. झुपकेदार मिशा असतील तर मात्र हा थर मिशीत अडकलाच समजा. हा प्रकार म्हणजे पाहुण्यांची छोटीसी परीक्षा घेण्यासारखा प्रकार असतो.

पूर्वी जावयाची परीक्षा घेण्यासाठी जेवायला पक्वान्न म्हणून शेवयाची खीर बनवत. ही खीर खायची तीदेखील चमच्याने. म्हणजे चमचा तोंडात पोहोचेपर्यंत ती हमखास खाली सांडणार व जावई परीक्षेत अनुत्तीर्ण होणार. त्यापेक्षा खिरीची वाटीच तोंडाला लावणारा जावई हुशार समजला जाई. चहावरच्या सायीच्या थराचा प्रश्न यामानाने किरकोळ असतो.

ज्यांना पहिल्या वाफेचा चहा पिण्याची सवय नसते त्यांनी तो पिण्यास सुरूवात करेपर्यंत किंवा चहा आणण्यासच थोडा उशीर झालेला असेल तर त्यावर साय जमते. दूध कितीही कमी दर्जाचे असले तरी सायीचा हलकासा थर जमतोच जमतो. असा चहा पिताना काही जणांची धांदल उडते. तेही इतरांसमोर असताना. काही जण सरळ दोन बोटांनी माशी पकडावी तसा हा थर बाजुला सरकवतात. त्यावेळी आपली बोटे स्वच्छ आहेत का हेही पाहिले जात नाही. काही जण फू-फू करून त्या थराला मागे सरकवण्याचा प्रयत्न करतात. झुपकेदार मिशा असतील तर मात्र हा थर मिशीत अडकलाच समजा. हा प्रकार म्हणजे पाहुण्यांची छोटीसी परीक्षा घेण्यासारखा प्रकार असतो.

त्यासाठी चहा पिताना एखादे बिस्कीट जवळ असू द्यावे. म्हणजे बिस्कीटाने अलगद साय काढून खाता येते. चहा पिण्याचा प्रसंग वारंवार येत असल्याने मी पारले जी बिस्किटांचा एक छोटा पुडा नेहमी जवळ बाळगतो. त्यामुळे परीक्षेत कायम पास झालो आहे.

रोम जळत होते तेव्हा निरो फिडेल वाजवत होता - येबात अलग है लेकिन जब दुनिया घुमोगे तब सोशल साइट पे फालतु लिखना बंद करोगे.

फुसके बार – २३ फेब्रुवारी २०१६
.

१) बिर्लाचे केमिकल प्लॅट प्रोजेक्ट आणि वास्तुशास्त्र

बिर्ला कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत असताना हमखास येणारा अनुभव. प्रोजेक्टचे काम कितीही पुढे गेलेले असले की कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर हळूच एक पिल्लू सोडून देणार. पूर्ण प्लॅंटचा लेआऊट बदलण्याचे.

या सगळ्याबदलांमागे कारण काय, तर वास्तुशास्त्र. कंपनीने कोणत्या तरी वास्तुतज्ज्ञाला गाठून ‘तोडफोड न करता वास्तुशास्त्र’ किंवा ‘अमुक अमुक बदल केले नाहीत तर या वास्तुमध्ये तुमच्यापैकी कोणीतरी हमखास मरेल’ अशी धमकी देणारे या दोन्हीपैकी कुठल्यातरी प्रकारचे बदल करायला सांगणे. बहुतेक वेळा ते बदल दुस-या स्वरूपाचेच असत. झाले. आधीच प्रोजेक्टच्या इंजिनियरिंगचे काम बरेच पुढे गेलेले. त्यात वास्तुशास्त्राच्या आधारावर आमुलाग्र बदल करायचे म्हणजे तोपर्यंत केलेले बरेचसे काम वाया जाणार. शिवाय जे बदल करायचे त्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होण्यास उशीर होणार. पण काहीही असो, हे बदल करण्याची ऑर्डर अगदी वरून आलेली असल्याने कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचे हातही बांधलेले.

या कंपनीचा प्रोजेक्ट असेल तर प्लॅंटलेआऊटवरील चर्चेमध्ये कंपनीच्या कंपनी व कंसल्टंटच्या इंजिनियर्सबरोवर कंपनीच्या वास्तुतज्ज्ञालाही बोलवा असे उपहासाने बोलले जायचे.

अमेरिका-योरपमध्ये असली थेरे न करताही त्यांचे प्लॅंट दशकानुदशके व्यवस्थित चालू असतात, तेथेही अपघात होतात, येथेही तुम्ही प्लॅंटची वास्तुपरीक्षा केलीत तरी त्यात अपघात होणारच. मग हा भलताच व तर्काच्या पलीकडे काहीतरी भलतेच करायला लावणारा सोपस्कार कशाना हा प्रश्न त्या कंपनीच्या सुशिक्षित वरिष्ठांना विचारूनही हे करावे लागायचेच. किंबहुना हा प्रश्न विचारण्याचा प्रश्नच नसे.

२) लातूर जिल्ह्यातल्या पानगावमध्ये शिवजयंतीला भगवा झेंडा फडकवण्यावरून वाद झाला. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या एका भागात भगवा झेंडा फडकवण्याला पोलिसांनी विरोध केला. जमावाने पोलिसांविरूद्ध घोषणा दिल्या व पोलिसांना मारहाण केली. त्यातला एक हवालदार ५५-५६वर्षीय मुस्लिम अहे. त्याच्याबरोबरीने आणखी एका हवालदारालाही मारहाण केली गेली.

आता तो जखमी झालेला मुस्लिम हवालदार सांगतोय की लोकांनी त्याला मारहाण करताना त्याच्या हातात जबरदस्तीने भगवा झेंडा धरायला लावला. एमआयएमचा आमदार तेथे जाऊन याला धार्मिक रंग देऊ पहात आहे. ते खरे आहे की नाही कल्पना नाही, तरीही पोलिसांना मारहाण होणे हेदेखील अतिशय धक्कादायक आहे.

लातूर जिल्ह्यात सध्या २०-२५ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याचे वाचले. शिवजयांती करताकरता हे असले धंदे करणा-यांच्या आया किंवा बायका पाण्यासाठी दाही दिशा फिरत असतील, पण या रिकामटेकड्यांना व मुर्खांना ते दिसत नसणार याची खात्री आहे.

३) कन्हैय्याकुमारला अटक झाली पण उमर खलीद फरारी झाला होता. त्याच्यासाठी व इतर चौघांसाठी पोलिसांसाठी लुकआउट नोटीसही काढली गेली होती.त्याचे वडील पूर्वी सिमी या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित होते हे तो बेपत्ता असतानाच्या काळात स्पष्ट झाले होतेच.. आता त्याचे वडील गळा काढत आहेत की ते सिमीशी संबंधित असण्यामुळे त्यांच्या मुलावर कारवाई होत असेल तर तसे करू नका. ते मुस्लिम असल्यानेही त्यांच्या मुलावर कारवाई होत असल्याचा कांगावा करायला त्यांनी कमी केलेले नाही.

त्यांच्या दिवट्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेदेखील त्यासाठी शिफारस करणा-या जेएनयुच्या एका प्राध्यापकाची दिशाभूल करून. अमुक ेक कार्यक्रम करायचा यासाठी शिफारसपत्र मिळवून प्रत्यक्षात भलताच कार्यक्रम आयोजित केला. आता हे प्राध्यापकही मुस्लिमच आहेत बरे का – माफ करा – कोणाच्या जातीचा-धर्माचा उल्लेख करणे मला आवडत नाही. पण या दिवट्याच्या व त्याच्या वडलांच्या धर्मावर उतरण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे हे सांगावे लागतेय. हे घोषणाबाजीचे प्रकरण झाल्यावर या प्राध्यापकांनीच त्यांची या उमरकडून फसवणूक झाली होती व त्यांनी असे उद्योग करण्यासाठी उमरला शिफारसपत्र दिले नसल्याचे त्याला ऐकवल्याचे टीव्हीवरही पाहिले होते.

फरारी झाल्यानंतर उमर काल पुन्हा विद्यापीठात परतला आणि बरीच डायलॉगबाजी केली. माझे नाव उमर खलिद आहे आणि मी टेररिस्ट नाही. म्हणजे यांच्य वडलांनी तो परत विद्यापीठात जाण्यापूर्वी मुस्लिम असल्याचे जे भांडवल केले, त्याचीच पुनरावृत्ती केली. याचा अर्थ फरारी असताना कोणत्या प्रकारे प्रतिवाद करायचा हे या बापबेट्याने आधी ठरवून घेतले होते.

या डायलॉगबाजीच्या दरम्यान त्याने विद्यार्थीमित्रांचे आभार मानून झाल्यानंतर ‘जितने कॉम्रेड्स फॅकल्टी में हैं’, उन को भी थॅंक्यु करना चाहता हूं’’ असेही म्हटले. एरवी जेएनयु विद्यापीठात कम्युनिस्ट प्राध्यापकांचा शिरकाव झालेला आहे असा कोणी आरोप केला, तर त्याचा लगेच इन्कार केला जातो. शिवाय या विद्यापीठातले हे कम्युनिस्ट जेव्हा भाजप-रास्व संघावर टीका करतात, तेव्हा मात्र ते गरीब बिचारे विद्यार्थी असतात. तेव्हा खरे तर हा सामना पूर्णपणे राजकीय आहे आणि त्यात कम्युनिस्ट नेते हे या विद्यार्थ्यांना उघडपणे समर्थन देताना दिसत आहेत. सगळेच विद्यापीठ नसेल तरी येथे कम्युनिस्टांची मोठी फॅक्टरी आहे हे आता कोणी नाकारणार नाही.

देशविरोधी घोषणांमधून जे काही निष्पन्न व्हायचे ते होवो, जेएनयुतल्या एका मोठ्या उघड गुपिताचा भांडाफोड झाला.

४) पम्पोर घटनेमध्ये लष्कराची व त्यातही अधिका-यांची झालेली प्राणहानी पाहता अशा घटनांमध्ये उठसूट आर्मीकडेच दहशतवादाशी संबंधित घटनांची जबाबदारी सोपवण्याच्या पद्धतीमुळेच सर्वोच्च दर्जाचे कौशल्य कमावलेल्या आर्मीच्या अधिका-यांची व जवानांची प्राणहानी होत आहे असे निरिक्षण मारूफ रझा यांनी मांडले. लष्कराशिवाय इतरही जी सशस्त्र सुरक्षादले आहेत, त्यांनाही अशा कारवायांमध्ये सामील करावे असे ते म्हणाले.

त्यादृष्टीने घटनेच्या गांभिर्याप्रमाणे कोणाकडे कारवाईसंबंधीची जबाबदारी सोपवावी याबद्दल ताबडतोब निर्णय घेता येण्याची यंत्रणा उभारावी असे ते म्हणाले.

ही सूचना फार मौल्यवान आहे असे वाटते.

५) सिनेमा सिनेमा

नीरजा – सोनम कपूरचे लाडे-लाडे दिसणे काही केल्या लपत नाही. जुही चावला कशी गुलाबगॅंगमध्ये व्हिलन वाटलीच नाही, तसेच. बाकी नीरजाचे पात्र व विमान अपहरणाची घटना यापलीकडे या सिनेमाचे अपहरणानंतरच्या वास्तवाशी फार काही संबंध नसल्याचे कळते. त्यामुळे फार काही सांगण्यासारखे नाही.

पोष्टरगर्ल – सिनेमा चांगला आहे. एकाच वेळी खूप गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या विषयाला थोडे गंमतीदार प्रकारे सादर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. काही वर्षांपूर्वी ‘मातृभुमी – द नेशन’ अशा नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता. त्यात मुलगी दिसायलाही कोठे नसल्याने गावाकडचे पुरूषी वळु ख-या प्राण्याबरोबर सेक्स करण्याकडे कसे वळतात हे वास्तव मांडल्याचे आठवते. मग लग्नाच्या मुलीने स्वयंवराच्या पद्धतीने खेड्यातील निरूद्योगी तरूणांना शेतीच्या माध्यमातून श्रम करण्याची शिस्त लावण्याचा प्रकार दाखवला आहे. शहरी प्रेक्षकांना हा भाग कंटाळवाणा वाटू शकतो, पण एकूण सिनेमा छान आहे. सिनेमातली लावणीही विषयाच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. दिग्दर्शनात सफाईपणा आहे हे महत्त्वाचे. अखेर नायिका ज्याच्याशी लग्न करण्याचे ठरवते, त्याला आणखी थोडा अभिनय करता यायला हरकत नव्हती. तो पुरेसा देखणा असला तरी.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी स्त्री-पुरूष प्रमाण फारच विषम असलेल्या देशस्तरावरील जिल्ह्यांमध्ये आता पुणे जिल्ह्याचाही नंबर लागला आहे, म्हणजेच हे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे, याची जाणीव करून दिली.

गिरिश लाड हे रायजिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन ही संस्था चालवतात. त्याद्वारे ते स्त्रीभ्रूणहत्येविरोधातही काम करतात. काही वधुवर मेळाव्यांमध्ये फक्त मुलेच आलेली दिसतात, विविध कारणांनी मुली येतच नाहीत हे वास्तवही त्यांनी सांगितले. त्यांनी या सिनेमासा एक खास शो आयोजित केला होता.

६) भारताचा शून्याचा शोध

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या फेबुवॉलवरील अमोल बनकर यांच्या पोस्टप्रमाणे शून्य या भारतीय संकल्पनेचा सर्वात जुना पुरावा आता सापडतो तो मात्र कंबोडियामध्ये. तिथल्या एका शीलालेखामध्ये ६०५ या संख्येमध्ये शून्य हा आकडा वापरलेला दिसतो. सदर लेख प्राचीन ख्मेर भाषेतला आहे. यासंदर्भातला एक फोटो येथे दिला आहे. यासंबंधीच्या सविस्तार बातमीची लिंक दिली आहे.
http://www.smithsonianmag.com/history/origin-number-zero-180953392/

#फुसके_बार

#Phusake_Bar

पाने