उत्क्रांती

अजुन जीवसृष्टीही अस्तित्वात आली नव्हती, पृथ्वीवर एका टप्प्यावरती अचानक जलचर जीव निर्माण होऊ लागले होते, Paleozoic time, पृथ्वी एका मोठ्या स्थित्यंतरातून चालली होती, मी मासा होतो, आणि तू बेडुकमासा होतीस, आठवतं तुला, शेवाळ्यावर पहुडलेले, चिखलात लडबडलेले, टपाटप उड्या घेत आपण एकमेकांवर बुद्धीहीन प्रेम करत होतो. निव्वळ अस्तित्वात येणं हाच तेव्हा साजरा करण्याच मोठा प्रसंग होता, अशा पृथ्वीच्या शैशवकाळीही, तू आणि मी एकमेकांच्या जोडीने बुद्धीहीन पण आनंदमय जीवन जगत असताना मृत्यु पावलो.
.
उत्क्रांती! पृथ्वीवरचा लाव्हा थंड होत होता, आणि मातीत उगवल्याप्रमाणे, खवल्याखवल्याचे असे, वाळूत, चिखलात सरपटणारे उभयचर बनुन आपण अस्तित्वात आलो, पायाच्या ३ नख्यांनी वाळूवर, चिखलावर एक अनाम भाषा चितारु लागलो, मंदगतीने सरपटत होतो, जेव्हा आपण प्रेताच्या थंडगार स्पर्शासारखे शीत् रक्ताचे प्राणी होतो, तेव्हाही अंधारात चाचपडत, आशेचा, सूर्याचा किरणही नसताना, एकमेकांवर प्रेमच करत होतो, एकमेकांना लपेटून प्रेम उपभोगत होतो. असेच दोघे मृत्यु पावलो,..
.
परत उत्क्रांती! पक्षी बनुन आकाशात झेप घेताना, डहाळ्याडहाळ्यांवरुन उड्या घेत, पिसारा पंख फुलवत तुला मी लुभावत होतो, तेव्हाही हे सखे आपण चोचीत चोच घालून एकमेकांच्या प्रेमातच आकंठ डुंबत होतो, आठवतं तुला? चमचमणार्‍या नदीच्या पात्रावर मोठ्ठा केशरी चंद्र आठवतो तुला?
.
उ-त्क्रां-ती! मला अणकुचिदार सुळे होते, तू केसांनी नखशिखांत मढलेली अतिशय सुंदर अशी मला भासत होतीस, जेव्हा आगटीचा शोधही लागला नव्हता आणि आपल्या गुहेच्या अंधारात चाचपडत, मेलेल्या प्राण्यांची हाडे किणकिणत, खणखणत असताना आपले प्रेम भरास येत होते तेव्हाही आपण एकमेकांचेच होतो. मी दगडाला धार लावुन, पाणवठ्यावर आलेल्या महाकाय मॅमथचि शिकार करते वेळी आणि नंतर छाती पिटत, आरोळी ठोकुन, अन्य भाईबंदांना, तुला बोलवताना, कच्च्या मांसाचे लचके तोडत जेव्हा तू माझ्याकडे कृतज्ञतेने पहात होतीस तेव्हाही तू माझी प्रेयसी होतीस.
.
आज, आपण दोघेच कँडल-लिट डिनरडेटवर भेटलो आहोत. खाण्याकडे लक्ष कमीच आहे, कधी एकमेकांशी गप्पा मारण्यात आपण दंग आहोत, तर कधी एखाद्या क्षणी कुठे एकमेकांच्या डोळ्यात पहात, मूक साद घालत, एकमेकांवर तेच उत्कट प्रेम करत आहोत. आणि म्हणुनच प्रिये, आज ते आपले सारे जन्म आठवु यात, मी होतो मासा आणि तू बेडुकमासा. हा पेला त्या आठवणीकरता, आपल्या तेव्हापासूनच्या आदिम आकर्षणाकरता, उत्कट प्रेमाकरता.

संदर्भ - Evolution -By Langdon Smith
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सगळ्या जन्मात पुरूषाला आपण पुरूषच असणार याची खात्रीच असते नै! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविकल्पना है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हे प्रथमपुरुषी ( पहा मराठी व्याकरणवाल्यांनी पुरुषच घेतलाय ऋ०, first person नाहीच ) प्रकटन फारच भावले.
ते सारखंसारखं विकिपिडियाछापच का बरं लिहितात लोकं?आणि किती तो अट्टाहास असतो संदर्भासहीत विदा द्यायचा? का नाही बेडुकमाशांसारखे बुद्धिहीन का काय तो विचार करू शकत?असा एखादा लेख आणि त्यावरची त्यावेळी दिलेली लेखवजा प्रतिक्रिया सापडेपर्यंत फक्त डराँव डराँव डराँव डराँवलं आहे हे सांगून मी बुडी मारत्ये, माझा मित्र वाट पाहतोय शेवाळ्याच्या आडोशाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तिमांचा पालीचा लेख होता असा. अशा टाइप.
ज्या लेखात नबंनी पहीली ऐतिहासिक, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशी घोषणा केली - पालींची बदनामी थांबवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"थांबवा" च्या पुढे पाच का कायशीशी उद्गारचिन्हे असायला हवीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येस्स्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म मला तरी ती खाली संदर्भासाठी दिलेली कविता प्रचंड आवडते. वन ऑफ इट्स काईंड.
खूप इंग्रजी प्रेमकविता वाचल्या पण अशी हीच एक वाचली. अन्य असतील तर वाचनात तरी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0