निरागस सत्य

रोजच होते पहात मी
गर्द हिरवे झाड ते

दिसते त्यावर एक दिवस
छोटेसे घरटे पक्ष्याचे

कोणाचे बरे ते घरटे?
कुतुहल माझे चाळवते

ठेवुनी होते लक्ष दुरुनी
पक्षी येती नजर चुकवुनी

अचानक दिसते पिल्लू ते
हळुच बाहेर डोकावताना

इवली चोच उघडताना
कावरे बावरे होताना

आणि खरच सांगते
सत्य मला जे उमगते

'कावळा' असला म्हणुन काय झाले
'पिल्लू' असते कायम गोजिरवाणे

- उल्का कडले

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गाढवाचं पिल्लू जगात सर्वाधिक गोड दिसतं - हे खरोखर सत्य आहे Smile

http://www.acuteaday.com/blog/wp-content/uploads/2012/03/baby-donkey-with-mother.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो खरंच आहे न! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का