मडके आणि चंद्र

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQeOyoZ2fnOz4Zc3h9_LZFgC3-1jCIpDXRsVt8zR_dtHhWkK093
एक कुंभार असतो. त्याचा धंदा असतो मडकी बनविण्याचा. ओल्या मातीला वेगवेगळे आकार देऊन, उन्हात वाळवुन रंग देण्याचा. तर त्याच्या आवारात ही सर्व घडवलेली मडकी जमा होत. मडकी तरी कशी कोणी पसरट, जास्त धान्य साठवू शकणारं, कोणी चिंचोळ्या चंबूगत. जरा भरलं न भरलं तोच उतू जाणारं. एखादं इतकं विशाल की नेहमी असमाधानी, तर एखादं इवलसं आटोपशीर अंथरुण पाहून पाय पसरणारं. काही गेरुच्या रंगानी मढलेली तर काहींवर नाजूक नक्षी. काही भाव खाऊन जाणारी तर काही अगदीच कोपर्‍यात अंग चोरुन ऊभी रहाणारी.
.
आता या मडक्यांचा उद्देश्य पाहू. मुख्य उद्देश्य हाच की धान्य, पाणी, मद्य, ताक साठवणं, विविध वस्तूंची साठवण करणं. उदा - मद्याकरता सुरईच्या आकाराचं चंबूसम मडकं, तर पाण्याकरता गडू. ध्यान्याकरता घमेल्यासारखं साखर मीठाकरता उभट डब्यासारखं असो.
पण या विविधतेतही एक एकता होती. ती होती कच्चे-पक्केपणाची. काही मडकी अर्धीकच्ची तर काही पक्की. कच्ची मडकी होती ओली. त्यांच्यात द्रव पदार्थ टाकला की एकतर झिरपून तरी जाई किंवा कोरडं धान्य टाकलं तर बुरशी लागे.
मात्र पक्की मडकी उन्हात तापून तापून लाल लाल आणि खापरासारखी कडक असत. त्यांच्यावर हवेतील दमटपणाचा , ओलाव्याचा परीणाम शून्य होई. याउलट अर्धकच्च्या मडक्यांवर ताबडतोब अनावस्था प्रसंग ओढवे. असो.
.
अर्धीकच्ची मडकी उथळ पाण्याला खळखळाट फार न्यायाने, डुगडुगाट करत,आपणच तोंडघशी पडून फुटुन जात. पक्की मात्र शांत अनेक पावसाळे पाहीलेली. ती या कच्च्यांना कधीच नावं ठेवत नसत हां अनुभवाचे ४ बोल ऐकवत. परत ते ऐकावेच असा आग्रहही नसे. ऐकले तर ऐकले, नाही ऐकले तर जो ऐकत नाही त्याचा तोटा.नवी मडकी स्वप्नाळू असत. ती स्वप्न रंगवीत, की पक्की झाल्यावर त्यांच्यात कोणती वस्तू भरली जाणार याउलट पक्क्या मडक्यांना त्यांच्यात आधीच धान्य, मदिरा भरलेले असल्याने, ते या कुतूहलपूर्ण खेळात भागच घेत नसत.
.
अशीच एका रात्री सगळीजण गप्पा मारत होती, आयुष्याच्या अनिश्चिततेचं सुख-दु:ख वाटून घेत होती. तेव्हा एका शहाण्या मडक्याला अचानक शोध लागला की त्याच्यात चंद्र पडला आहे. चक्क चंद्र त्याच्यात उतरलेला आहे. तो एकदम आनंदीत झाला, उत्तेजित झाला, नाचू गाऊ लागला. त्याबरोबर सर्व मडक्यात खळबळ माजली. धान्य भरलेली मडकी म्हणाली "हॅ, चंद्र आकाशातून कधीच उतरत नाही." काही वयस्क मडकी म्हणू लागली "उतरतो. बर्‍याच पूर्वी एकदा त्यांच्या एका पूर्वजांत चंद्र उतरला आहे. काही मडकी म्हणू लागली, "साठी बुद्धी नाठी झालीये त्या मडक्याची म्हणून चंद्र त्याच्यात उतरल्याचा भास होतोय त्याला." अशा गलबल्यातच ती संस्मरणीय रात्र विरुन गेली.
.
पहाटे सूर्य उगवला आणि कुंभाराने ती सर्व मडकी घरात आडोशाला नेऊन ठेवली. आत ठेवल्याने नंतर परत कोणाच्यातही चंद्र उतरला नाही हां मात्र जुन्या व बाहेर ठेवलेल्या नवीन मडक्यांत ही अफवा पसरत राहीली की चंद्रही त्यांच्यात उतरु शकतो,असे होणे शक्य आहे. अगदीच अशक्य कोटीतील गोष्ट नाही. पण मग काही प्रॅक्टिकल मडकी तो प्रसंग विसरुनही गेली.याउलट काही स्वप्नाळू मडकी स्वप्न पहात राहीली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे खरोखरच छोट्यांसाठी आहे का शुचि?

पण छान आहे.

Smile अनु मी उमर खय्यमची रुबायत एक १० वी १२ वीत वाचली होती त्यात अशा मडक्यांचा उल्लेख होता.

कथा आवडली

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

वा वा.

छोट्यांना 'मद्याकरता सुरईच्या आकाराचं चंबूसम मडकं' याची इतक्या लहान वयात ओळख करुण दिल्याबद्द्ल लेखकाचा त्रीवार निषेद !!!

लेखिका आहेत हो त्या युधिष्टीर साहेब.

आजकाल सगळे स्त्री पुरुष कलाकार स्वतःला अ‍ॅक्टर म्हणून घेतात, म्हणून थोडा रिस्पेक्ट दिला. बाकी काय नाय.

अहो हा लेख घरका ना घाटका झालाय Smile तो मोठ्या पण मनाने छोट्यांसाठी आहे.

मनाने छोट्यांसाठी आहे.

म्हणजे स्मॉल माईंडेड ( कोत्या मनाच्या ) लोकांसाठी का? Smile ( मला माहीती आहे तुला काय म्हणायचे ते )

Smile

सर्व प्रतिसादकांना व वाचकांना धन्यवाद.

मस्त आहे गोष्ट

थँक्स Smile