आत्मनिवेदन

संमोहित मनाच्या दुखर्याा
गाभा-याला स्पर्श
करून सांगतो
हे आत्मनिवेदन सत्य
आहे !

पहाटे उमलुन
पहिल्या प्रकाश किरणात
कोमेजणा-या बकुळफुलांच्या
संचिताच्या शापासारखं
हे जगणं
अन् क्लेश
नवसाचं रूपं
देवीच्या उंबरठ्यावर
ठोकावं असं
पूर्व परंपरेने चालत आलेलं !

संध्याकाळी मी जेव्हा
डोळ्यावाटे रक्त वाहतो
तेव्हा
तुझे परसदार
लालभडक होते
पसरलेले लाल
अन्
येणारे कृष्णमय
ह्याच्या संगमाने जे काही
क्षिताजावर उमटते
त्याला शब्द नसतात
त्याच अवस्थेत
मी असतो
ह्यासाठी पाहिजेतर
मी माझ्या पहिल्या
कवितेच्या गर्भपाताची
शपथ घेतो !

शेवरीच्या कापसात
विधवेची रात्र गुंडाळून
विरह आग आग
होऊन
रात्र जाळतो
मग झोप परागंदा
होते
अन्
मी नागव्याने
पिंपळपाराकडे
वळतो
पूर्वजन्मीच्या पापापासून
मुक्त होण्यासाठी
अनंत प्रदक्षिणेच्या शोधात !

विजयकुमार.......................

23 / 02 / 2009

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जे काही आहे ते इन्टेन्स आहे. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही कळले नाही. ह्या गाण्याचा नी कवितेचा सम्बन्ध काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ती सही आहे माझी. प्रत्येक प्रतिसादाबरोबर दिसणार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0