गॉसिप

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.
पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे.
नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत.
पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!!
आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो
--------------------------------------------------------------------------------------------
बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला,
माझ्या एका disigner मित्राने , मला एके दिवशी एक internation ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही.
काहीतरी inertnational लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत
१० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला
आणि खालील काही स्केचेस फायनल झाली.
हा साईट चा प्लान
१.

२.

३.

४.

५.

६.

लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता...
चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळाही देता येत नव्हता.
पण हळू हळू काम जमायला लागलं. ३द सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल.

७.

८.

९.

मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ...
पण प्रयत्न सोडले नाहीत .
हे मी केलेले 3DViews

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघयला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित )

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती....
काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे Biggrin

२२.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सुंदर! अभिनंदन.
फारच क्रिएटीव्ह क्षेत्र आहे की. पहील्यांदा मला हे कळते आहे. स्पा खूप छान वाटले तुमचे काम.
अमेरीकेत अशी दुकाने इतकी पाहीली आहेत पण यामागे अशी "कन्सेप्ट" असते हे माहीत नव्हते. खरोखर "आंतरराष्ट्रीय" गुणवत्तेचे काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिझाइनच्या इमेजेस आणि तयार दुकानाचे फोटो बघून 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असंच वाटलं. (अर्थात त्यात साध्या कॅमेराचा भाग आहे हे लक्षात येतं...) पण व्हिज्युअलायझेशनमध्ये किती बारकावे पकडता येतात हे पाहून थक्क व्हायला झालं. काचेच्या स्टेप डिस्प्लेतले ठोकळे हुबेहुब काचेचे वाटतात. जमिनीचा पोत, आसपासच्या दुकांनांचा प्रकाश यामुळे सगळं जिवंत वाटतं.

एका अनोख्या क्षेत्राची झलक दाखवल्याबद्दल धन्यवाद.

एक सूचना. गेल्या वीसेक वर्षांत अगदी बेसिक कॅड कॅम पासून इथपर्यंत ऍनिमेशनची प्रगती झालेली आहे. त्यालाच समांतर व्हिडियो गेम्समधलं ऍनिमेशनदेखील हुबेहुब व्हायला लागलं आहे. ऍनिमेशनने या वेगवेगळ्या ठिकाणी अचाट प्रगती केलेली आहे. त्यातल्या एकेका क्षेत्रात कसा कसा बदल होत गेला, कुठची तंत्रज्ञानं कारणीभूत ठरली यावर एक भन्नाट लेखमाला होऊन जाऊ देत. म्हणजे व्हिडियो गेम्समधला कार रेसचा गेम घेतला तर वीस, पंधरा, दहा, पाच वर्षांपूर्वीची टॉप ऍनिमेशन्स एकाशेजारी एक ठेवली तर काय काय फरक दिसतात हे समजावून घ्यायला मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारीका आणि राजेश यांच्याशी सहमत. आपले स्वप्न साकार झालेले पाहण्याच्या आनंदाला तोड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो ! मनःपूर्वक अभिनंदन.

आणखी अशीच माहिती येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कॅड कॅम आणि सीएई मॅन्युफॅक्चरींगसाठी कणा बनलेले आहेत. कन्सेप्चुअल डिजाईन्स बनवणं. वेगवेगळी डिझाईन्स (आर्किटेक्चरल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इ. इ.) एकत्र करणं त्याचा इंटरफरंस वगैरे काढणं आणि मग त्याचा फिजीबिलीटी अ‍ॅनालिसीस करणं ही आता नित्याची प्रक्रिया झालेली आहे. अ‍ॅक्चुअल मॉडेल आणी वास्तवातल्या कंस्ट्रक्शनमध्ये आता प्रचंड अ‍ॅक्युरसीही आलेली आहे.

कॅड प्रोग्राम्स शिकणं खुप सोपं असलं तरी चांगली मॉडेल्स करणं कौशल्याचं काम आहे, पाच पाच वर्ष एका सॉफ्टवेअरवर काम करूनही लोक त्या सॉफ्टवेअरचा मी मास्टर आहे असं म्हणायला धजत नाहीत.

गुर्जींच्या सुचनेला अपेंड. सुरुवात ऑटोकॅडपासून करा. एकदम रिअल लाईफ रेंडरींग देणारी सॉफ्टवेअर्स आली तरी ऑटोकॅड अजून मजबूत चालू आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

१०-१५ क्रमांकांचे "फोटो" इमॅजिनरी प्लेनमधले आहेत हे मान्य करणं कठीणच आहे.

खासगी संवादात म्हटल्याप्रमाणे या क्षेत्राबद्दल मला काहीही कल्पना नाही. तेव्हा गुर्जींच्या सूचनेस अनुमोदन देत आहे. अ‍ॅनिमेशनबद्दल एक लेखमालाच लिही.

अवांतर: या दुकानातली बरीचशी बुटं हाय हिलची दिसतात रे! जरा सांभाळून रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वॉव!
सिंपली ग्रेट!
नव्या तंत्रज्ञानानी काहि पारंपारीक व्यवसाय कमी होत असतील पण त्याच बरोबर काहि नव्या क्षेत्राची दालनं उघडत आहेत. हा ही अश्याच एका अनवट वाटेवरून केलेला प्रवास सुंदर, रोचक आहे. याबद्दल लेखमाला येऊच दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

लेखमाला लिहायचा विचार आहेच.. पण विषय खूप अफाट आहे ..
कुठून सुरुवात करायची ते समजणं अवघड आहे
माझा अभ्यासही खूप कमी आहे

तरीही हळू हळू माहिती गोळा करण सुरु आहे, लवकरच लिहायला सुरुवात करेन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त डिझाईन आहे.

- सूर्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0