यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.

केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग. काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच. सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे, रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.

या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती. श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते. कचर्याने भरलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली. पण प्रत्यक्ष राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).

शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल. असो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"काहीही, हां, श्री, श्री, श्री"
"यमुनाजळी खेळू खेळ, कन्हैया, का लाजता?" [हा कन्हैया कोणत्या युगातील हे ज्याने-त्याने आपापल्या अ/सहिष्णुतेनुसार आपल्यापुरते ठरवावे.]

बाकी, त्या टवळ्या शांती आणि आराधना यांचा तो शिंचा "दैवीय अनुभव" आम्हाला कधी अनुभवयाला मिळणार कोणास ठाऊक. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा घटनेत, धर्मनिरपेक्ष असे कबूल केल्यावर, कुठल्याही केंद्र वा राज्यसरकारने, कुठल्याही धार्मिक समारंभात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाग घेणे चुकीचे आहे. तसेच कुठल्याही प्रकल्पाची सुरवात करताना, भूमिपूजन, पंढरपूरला मुखमंत्र्यांनी सपत्निक पूजा करणे वगैरे वगैरे प्रकार करणे, म्हणजेच घटनेशी प्रतारणा करणे आहे. पण लोकानुनय हाच धर्म असलेल्या सर्व राजकारण्यांनी या अनिष्ठ प्रथा पाडल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्रात् रूढि: बलीयसी असे आपल्या पूर्वजांनीच ठरवून दिलेय, अर्थात ते आपल्या रक्तात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यमुनेत आपल्या शांतीप्रेमाचे अश्रू मिसळून पूरच आला आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती', 'दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे.'
हे काय आहे? तुम्हाला 'बुद्धिमंत' म्हणायचे असावे. 'बुद्धिमंद' आणि 'बुद्धिमंत' ह्यांचे अर्थ परस्परविरोधी आहेत.

'दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति.'
काय सांगताय - जमलेल्या मुल्ला-मौलवी-अयातुल्लांनी देखील हा वेदमन्त्र उच्चारला?

आणि ते 'श्रीश्री' कोण? त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे बारसे करून त्यांना काही नाव दिलेच असेल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा श्रीश्री १-२ वर्षापूर्वी पिंचिं च्या भागात गोल्डन मॅन म्हणुन प्रसिद्ध असलेल्या एका व्य्क्ती कडे उतरला होता. हे वाचायच्या आधी, "हा माणुस (आपल्याला न पटणारे का होइना पण )काहीतरी करतो आहे, ठीक आहे" असा अ‍ॅप्रोच होता माझा.
ही बातमी वाचल्यापासुन तर त्याला आतच ठेवले पाहिजे असे मत झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला 'बुद्धिमंत' म्हणायचे असावे

नाही "बुद्धिमंद" हा शब्द निधर्मांध कॅटॅगरीत पडलेली भर आहे.
श्रीश्रींच्या प्रेमाच्या आणि शांतीच्या संदेशाने प्रेरीत होउन त्यांनी तो शब्द वापरला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहिष्णूता बाकी टायपो असावा. की त्यातही काही खोच आहे?? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बुद्धिमंद' आणि 'बुद्धिमंत' ह्यांचे अर्थ परस्परविरोधी आहेत

इथे तसे नसावे.

लेखक दिल्लीस्थित आहेत. सबब त्यांच्या भाषेवर हिंदी/उर्दूची झाक दिसते. "मंद" हा फारसी (की अरबी?) उपसर्ग "युक्त" अशा अर्थाने वापरला असावा. म्हणजे, अकलमंद (बुद्धीवान)म्हणजेच बुद्धीमंद.

ख खो पटाईत काका सांगीतलंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही उगाचच बेनिफीट ऑफ डाउट देताय पटाइत काकांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, >>>

हा हा हा. जर ईश्वर एकच आहे आहे तर सर्वधर्म संमेलनाला अर्थच काय राहिला ?

सगळ्याचा बिझनेस झालाय आणी लोक आंधळे आहेत.

लहरि राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति

सर्व विद्वान एकच गोष्ट सांगतात याचाच अर्थ हे सर्व विद्वान विशेष काहीच सांगत नाहीत असे प्रतिपादन कुरुंदकरांनी केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. <<

जरा हेसुद्धा वाचा -

Artistes call it a nightmarish experience

संभाव्य आक्षेप - हा तर चिल्लर खुर्दा होता. बडे बडे एव्हेंट्स मे छोटे छोटे हादसे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे वा रिटार्मेंट घेतलेली दिसतेय! अभिनंदन!
थेट नावे घेऊन लेख लिहिलाहेत त्यावरून अंदाज केला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दैवीय शांती संमेलन

ते तर कल्चरल फेस्टिव्ह्ल म्हणतायत..

बाकी ८-१० हजार गायक-वादक-नर्तक एकदम परफॉर्म करत होते मग शांती कशी लाभणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी ८-१० हजार गायक-वादक-नर्तक एकदम परफॉर्म करत होते मग शांती कशी लाभणार

अहो, तिथे जमलेल्यांना नाही, त्या गायक, वादक नर्तक यांच्या घरच्यांना शांती लाभली असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0