मी? म्हातारा??

ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली.

का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे..

"मी.. ?? म्हातारा ???"

ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे..

........................

मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध..

जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो. मग रवंथ किंवा अ‍ॅसिडिटीसारख्या त्या वर येतात.

माझ्या लहानपणच्या ब्रँड्सच्या आठवणी त्या काळातल्या मुलींइतक्याच येतात..

गोल्ड स्पॉट, कॅडबरीज् डबल डेकर , कॅम्पको चॉकलेट, लँब्रेटा स्कूटर..

Lamb

हो.. किस्मी टॉफी अजून ही आहे..पण आता आमचं इतकं प्रेम राहिलं नाही. तुमच्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी सर्वानी मरायलाच हवं असं नाही..

Kismi

आणि मग अचानक मी घाबरतो ... कारण हे ऐकून माझी बायको आनंदाने म्हणणार:"..तू म्हातारा झालायस.."

मी कुठेतरी मधेच लटकलोय.. माझी पिढी..अजूनही सुमारे किंवा जवळजवळ यौवनात असावी. (म्हणायला हरकत नाही.. बायकोची नसेल तर.) कपाट उघडल्यावर एकदम धडाड धूम करत सामान अंगावर कोसळावं तश्या खूप नव्या नव्या "चिजा" आमच्यावर कोसळल्या.. धुळीसकट..

मी एकांतात (बायको नसताना..!!) स्वत:ला खूप पटवत बसतो.. पण विश्वास बसत नाही की माझ्या सुरुवातीच्या खूप वर्षात मला टीव्ही माहीत नव्हता.

नाही.. मी मादागास्कर मधे राहात नाही.. फक्त ३२ वर्षाचा आहे आणि याच जन्मा बद्दल बोलतोय..
लठ्ठ काळा गोल लोखंडी डायल वाला फोन.. प्रत्येक आकडयाला टरर्र टक टक टक टक .... टरर्र टक टक टक टक असा मस्त आवाज करणारा.. ९ डायल करताना तर फारच मस्त..

Blackphone

असा फोन एखाद्याच्या घरात असणं ही प्रतिष्ठेची "नोन अप्पर लिमिट" होती..

मला अशी वाक्यं आठवतात: " त्यांना काय कमी आहे बाबा..तुला माहीत आहे, त्यांच्याकडे फोन आहे.." ..आमच्या कडे नव्हता.. बाय द वे ..

मग माझ्या याच (तरुण..!!) आयुष्यात पेजर्स आले..बघता बघता केरात ही गेले.. मग खूप मोबाइल फोन्स आले. पूर्वी त्याला "सेल" म्हणायचे आता नुसतं "फोन" म्हणजेच सेलफोन.. फोनसाठी "लँडलाईन" असं वेगळं सांगावं लागतं.

आणि आता ?..

थ्रीजी, टेन मेगापिक्सेल, २० जीबी, प्लेस्टेशन, वॉकमन फोन,ब्लॅकबेरी, पुशमेल विथ एमपीथ्री प्लेअर अँड मल्टिबँड रेडिओ अँड ऑल द किंग्ज हॉर्सेस डोंट फिल द डिझायर..

आता मी वाट बघतोय टी.व्ही.वाला सेल फोन लाँच होण्याची..

माझ्या गावात टी. व्ही. चा ट्रान्समीटर नव्हताच.. ऐकण्यातसुद्धा नव्हता आणि त्यामुळे अस्तित्वात सुद्धा..

म्हणूनच टी. व्ही. घेण्यात अर्थ नव्हता. टीव्ही घेऊन त्यावर नुसत्या मुंग्या बघायच्या, तर कोकणात मुंग्या भरपूर होत्याच..

मग आम्ही चक्क खेळायचो वगैरे.. क्रिकेट, विटी दांडू..ओढ्यातले (त्या वेळच्या "पर्‍ह्या"मधले) बारके बारके मासे पकडून पिशवीत भरणं..सायकल हाणत गावभर बोंबलणं..बदा बदा पडणं..आंबे बोरांच्या झाडांना आणि स्वत: ला खोका पाडून घेणं.. हेच आमचे जगण्याचे (आणि मरण्याचे) उद्योग होते..

एखाद्या दिवशी रानात साप (कोकणात "जनावर" म्हणायचे..) निघाला तर मग सगळा दिवस सत्कारणी लागायचा. ..

आजच्या तारखेला किती अवास्तव वाटतंय हे सगळं.. पण नाही.. मी म्हातारा नाही..

मला आता वर्षाचा (एक वर्ष या अर्थाने..!! ) छोटासा मुलगा आहे.. तो या ३-जी जगाशी खेळत असतो..

मी बघत बसतो.. "व्हॉट्स नेक्स्ट??"

मी कसला म्हातारा .. ए बायको..!! .. मी तर पुन्हा एक वर्षाचा झालोय.. आणि माझ्या बाळाचं बोट धरून त्याच्याच मोठमोठ्या भोकरासारख्या "एंजल आईज" मधून बघत बघत आता मी परत मोठ्ठा होईन..

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

प्रतिक्रिया

टिव्ही नसलेलं घर, बाजूची छोटी चाके नसतांना शिकलेली सायकल, शिकवणी नसतांना केलेला अभ्यास अशा कितीतरी गोष्टी जुन्या काळात घेवून जातात. ती रावळगाची चॉकलेटं पण आलीत यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण..

वा, स्मृतीरंजनात्मक लेखन आपल्या लेखनाबाबतच्या स्मृतीरंजनाने करणं हा छान टच आहे.

माझ्या याच (तरुण..!!) आयुष्यात पेजर्स आले..बघता बघता केरात ही गेले.. मग खूप मोबाइल फोन्स आले.

'माझ्या आयुष्यात खूप मुली येऊन गेल्या' स्टाइलमध्ये फोन-पेजरविषयी बोलणं गमतीदार.

मला आता वर्षाचा (एक वर्ष या अर्थाने..!! ) छोटासा मुलगा आहे

Smile त्या वर्षाविषयीही लिहा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या वर्षाविषयीही लिहा

हॅ हॅ हॅ... कशाला उगाच चालू अन भरल्या संसारात संशयकल्लोळ...?!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहा हो गवि

तुमचे अर्धाग आंजापासून दूर आहे ना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

गविँची लिखाणशैली ही कोणत्याही विषयाचं सोनं करते

लेख उगागच उसासे टाकत लिहीलाय अस वाटत नाही
सहजतेने खेळकरपणे विषय मांडलेला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

शहरात राहूनही पर्‍ह्यातले मासे पकडणं आणि जनावराची भीती या दोन गोष्टी आजोळ असल्यामुळे माहित आहेत.

बिल्डींगमधल्या लँब्रेटा स्कूटर चालवण्यार्‍याने एम८० घेतली तेव्हा त्याचं काय कौतुक वाटलं होतं. शिवाय बिल्डींगीत फक्त शेजार्‍यांकडे फोन होता. सगळ्यांचे फोन शेजारी सोहोनीकाकांकडे यायचे. मग सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या एकाने त्यांच्या फोनशेजारी एक बेलचं बटण लावलं. हाकाट्या करायला नकोत म्हणून! त्याचंही आम्हां बाळगोपाळांना चिक्कार कौतुक होतं.

आता मी सोहोनीकाकांना फोन केला की मला बिल फार येईल म्हणून ते मला "'स्काईप'वर ये" असं सुचवतात. भारतात फोन करणं फार महाग नाही हे त्यांना गेल्या आठ-दहा वर्षांत पटलेलं नाही याचं आश्चर्य व्यक्त करावं का साठी उलटल्यानंतर त्यांनी हौसेने इमेल, स्काईप, इंटरनेट बँकींग, ऑनलाईन शेअर ट्रेडींग या गोष्टींची माहिती आपणहून मिळवली याचं, हे मला समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद खूप आवडला. विशेषतः - बेलचं लहान मुलांना असणारं कौतुक Smile
आणि सोहोनी काकांनी साठीतही सर्व गोष्टींची माहीती मिळवली आहे याचे महत्त्व तुझ्या लक्षात येणं यामागे त्यांच्यावरचं प्रेमच दिसतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले. वाढत्या वयाबरोबर नजर मागे जाणे अपरिहार्य. वर्तमानाशी सांधा जुळवलेला ठेवणेही अपरिहार्य. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
१९७५ ते १९९५ च्या दरम्यानची आमची पिढी अशीच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात सांधे बदलले. प्रत्येक पिढीला कुठल्या ना कुठल्या बदलाला सामोरे जावेच लागते, मात्र हा बदल सामाजिक तर होताच मात्र आर्थिक, वैचारीक, राजकीय वगैरेही होता. त्या बदलाचा वेग इतका प्रचंड होता की साधारण ९५ नंतरच्या जन्मलेल्या मुलांना रेशनिंग, दुधाची कार्डे,टिव्ही, फोन नसणे, कंप्युटर तर ऐकीवातही नसणे, रेडीयोची भक्ती, रामायण लागल्यावर टिव्हीची होणारी पुजा वगैरे गोष्टींचे अतीव आश्चर्य वाटावे.

हा बदल+ हुरहुर+ ओढ+ आधुनिकतेचे कौतुक या सार्‍यांना एकत्र गुंफलेले हे स्मरणरंजन आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लँब्रेटाचा फटू पाहून लहानपणी शेजारच्या देशपांडेकाकांची निळीपांढरी लँब्रेटा आठवली.
मावशीच्या गावी एक-दोनदा ओढ्यात मासे पकडले आहेत पण नेहमी मात्र नगरच्या सातभाई मळ्यातल्या गटारीतलेच पिटुकले मासे पकडायचो :-). क्रिकेट खेळताना स्पंजचा बॉल सारखा गटारीत जायचा मग हातानेच काढावा लागायचा त्यामुळे नंतर नंतर काहीच वाटेनासे झाले आणि गटारीत मासे असतात हेही कळले. शिवाय गाळात भरलेल्या स्पंजच्या बॉलने बॉडीलाईन बॉलिंग करायची मजा वेगळीच.
माझ्या आईच्या मामांकडे तेव्हा असाच पण निळा फोन होता. त्यांच्या घरी गेल्यावर एकदा मी आणि धाकट्या भावाने रँडम नंबर फिरवले आणि पलीकडून फोन उचलून कोणी हॅलो म्हटले की इकडून माझा भाऊ आलो आलो म्हणायचा. मग फोन ठेऊन द्यायचा आणि दहा मिनिटे नाक लाल होईपर्यंत खिदळत बसायचो.
किस्मि कधी फार खाल्ली नाही. नगरला एक राजमलई का असंच काहीतरी नाव असलेली घरगुती फजची टॉफी मिळायची ती मात्र फार खाल्ली.
अजूनही हे सगळं मी करू शकतो त्यामुळे मी म्हातारा असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे लेख एकदम पटलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लठ्ठ काळा गोल लोखंडी डायल वाला फोन.. प्रत्येक आकडयाला टरर्र टक टक टक टक .... टरर्र टक टक टक टक असा मस्त आवाज करणारा.. ९ डायल करताना तर फारच मस्त..

यात आणखी एक गंमत अशी होती, की डायल न वापरतासुद्धा फोन लावण्याची एक ट्रिक या फोनबरोबर चालत असे. जो आकडा फिरवायचा आहे, तितक्या वेळा, डायल रिलीज़ करताना जितक्या गतीने 'टक टक टक टक' होत असे, साधारणत: तितक्याच गतीने जर क्रेडलस्विचवर टॅप केले, तरी नंबर लागत असे. (पल्स मोड डायलिंग?) येनकेनप्रकारेण जो नंबर फिरवायचा आहे तितक्या वेळा एका विशिष्ट गतीने सर्किट ब्रेक झाल्याशी कारण - मग ते डायलने असो की क्रेडलस्विचने. (मुळात डायल ही ते सर्किटब्रेकिंग ऑटोमेट करण्याची सोय होती, म्हणा ना.) पुढे हा फोन जाऊन जे पुश-बटन टेलिफोन आयटीआयने बाजारात आणले, त्यातही बहुधा सुरुवातीच्या काळात फक्त पल्समोड डायलिंग असे. (तशीही टचटोन हाताळू शकणारी एक्स्चेंजेसुद्धा सुरुवातीसुरुवातीला भारतात फारशी नसावीत बहुधा.) त्यांत मला वाटते हेच सर्किटब्रेकिंग इलेक्ट्रॉनिकली अमलात आणले जात असावे. (तज्ज्ञांनी खुलासा करावा.)

(अतिअवांतर: टचटोनमध्येसुद्धा अशीच समांतर ट्रिक वापरता येते. बटन दाबल्यावर जो टोन निर्माण होतो, तोच टोन एखाद्या डिवाइसद्वारे निर्माण केला, आणि असा डिवाइस जर माउथपीसपाशी ठेवला, तरीही नंबर लावता येतो. सुरुवातीच्या काळात असे अनेक नंबर लक्षात ठेवून हवा तो नंबर स्पीकरद्वारे वाजवणारा एक डिजिटल डायरीवजा 'टेलिफोन डायलर' डिवाइस अमेरिकेत पाहिलेला आहे. (खुद्द माझ्याकडे असा एक सेकंडहँड, गराज सेलमधून उचललेला डिवाइस एके काळी होता. पुढे तो कचर्‍यात गेला. तर ते एक असो.))

याशिवाय, अतिशय लहान गावांत मॅन्युअल एक्स्चेंजे असत, असेही आठवते. यात फोन स्वतः डायल करण्याची सोय नसे. किंबहुना अशा ठिकाणी पुरवण्यात येणार्‍या टेलिफोनला डायलही नसे. (असे फोन बहुधा याशिवाय अनेक कार्यालयांत अंतर्गत एक्स्चेंज/इंटरकॉम/पार्टीलाइनसारखेही वापरले जात, असे वाटते.) फोन करायचा असेल, तर फोन उचलायचा आणि ऑपरेटरला हवा तो नंबर जोडून द्यायला सांगायचे. मग ऑपरेटर तो स्वतः हाताने जोडून देणार. अशा टेलिफोनना अनेकदा एक गोल फिरवायचे हँडलही असे, असे आठवते. बहुधा फोन उचलल्यावर ऑपरेटरचे म्हणा, किंवा अंतर्गत एक्स्चेंज/इंटरकॉम/पार्टीलाइनच्या बाबतीत पलीकडच्या माणसाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हँडल फिरवले, की पलीकडे घंटी वाजत असावी. नक्की खात्री नाही. कोणाला आठवत असल्यास भर घालावी. (असे फोन पाहिलेले आहेत; नेमके कसे चालत याबद्दल थोडा संदेह आहे.)

किंबहुना, एकंदर दळणवळणाची अवस्था अत्यंत प्राथमिक होती. बाहेरगावी फोन लावायचा झाला, तर बहुधा ट्रंक कॉल बुक करून वाट पाहत बसण्यापलीकडे फारसा पर्याय नसे. एसटीडीची सुविधा असलीच, तर अत्यंत मर्यादित प्रमाणात होती. (मला आठवते, त्याप्रमाणे मी लहान असताना पुण्याहून तब्बल आठ की नऊ ठिकाणी एसटीडी लावता येत असे. लहानसहान ठिकाणची तर बातच सोडा.) आंतरराष्ट्रीय डायरेक्ट डायलिंग तर विसरायचेच. (वर्तमानपत्रांत प्रथम जेव्हा फक्त लंडनला - आणि तेही फक्त मुंबईहून - थेट कॉल लावण्याची सोय झाल्याचे वाचले, तेव्हा 'भारताने प्रगतिपथावर मोठी उडी' वगैरे मारल्याची भावना झाली होती. म्हणजे साधारणतः, 'यस्स! वी डिड इट!' असे आजच्या भाषेत म्हणता येईल, तद्वत. अर्थात, तेव्हा आंतरराष्ट्रीय कॉल लावण्याची गरज पडण्याइतकी आमच्या उभ्या खानदानात किंवा आजूबाजूच्या समाजात कोणाचीच 'पोच' नव्हती, हा भाग अलाहिदा.) पुढे १९८०च्या दशकाच्या शेवटाकडे कधीतरी दळणवळणसुविधा एकदम झपाट्याने फोफावली, असे वाटते.

काळ्या लठ्ठ टेलिफोनचा कोणीतरी केलेला असा साधा उल्लेख असा नॉस्टाल्जिक करतो, नि थेट त्या काळात घेऊन जातो. आता वास्तविक त्या काळातल्या त्या व्यवस्थेत 'प्रिविलेजेस' जर कोणाला असतीलच, जे आजच्या व्यवस्थेमुळे नष्ट झाले असे म्हणता येईल, तर ते फक्त टेलिफोन ऑपरेटरला. ('अडला हरी' या न्यायाने.) पण का कोण जाणे, आज या आठवणी रम्य, गोग्गोड वाटतात खर्‍या. (अगदी पुढे पुण्याहून मुंबईला नोकरीनिमित्ताने आल्यावर घरी फोन लावण्याकरिता नेमाने पब्लिक बूथवर रांगेत उभे राहून एसटीडीवर केलेला पैशाचा धूर* डोळ्यात जाताना लक्षात घेतला, तरीही.) तरी बरे, माझ्या उभ्या खानदानात कोणीही टेलिफोन ऑपरेटर नाही. (नाही म्हणायला माझी एक सावत्रमावसबहीण मुंबई टेलिफोन्समध्ये नोकरीला होती खरी. पुढे तिथूनच रिटायर झाली. पण ती मुंबईला, मी पुण्यात. आणि तसेही माझे तिचे संबंध थोडे दुरूनच होते. म्हणजे तिचे 'प्रिविलेजेस' माझ्यापर्यंत पोहोचण्याची सुतराम् म्हणतात, तशीही शक्यता नव्हती. मग आज त्या काळ्या टेलिफोनच्या साध्या उल्लेखाने इतकेही नॉस्टाल्जिक का वाटावे, कळत नाही.)


* (अतिअवांतरः पूर्वीच्या काळची विनिमयपद्धती लक्षात घेता, पूर्वीच्या काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे म्हणतात, तो असाच निघत असावा काय?)
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखापेक्षा मोठा प्रतिसाद लेखाप्रमाणे आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा मस्त प्रतिसाद!
बाकी,

जे आजच्या व्यवस्थेमुळे नष्ट झाले असे म्हणता येईल, तर ते फक्त टेलिफोन ऑपरेटरला. ('अडला हरी' या न्यायाने.) पण का कोण जाणे, आज या आठवणी रम्य, गोग्गोड वाटतात खर्‍या.

+१ असेच अनेकदा वाटते. आणि ते का वाटावे हे ही समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक प्रश्न आहे. मला याचं उत्तर असं वाटतं की त्या काळाशी त्या फोनसोबतच अ‍ॅटॅच झालेल्या इतर गोड गोष्टींच्या अदृश्य आठवणीही एकत्रित होऊन त्या फोन अन लँब्रेटासोबत येत असाव्यात.

म्हणजे लँब्रेटाच्या पुढे उभं राहून बाबांसोबत केलेला प्रवास.. त्यावेळी समोर दिसणारी ती डायल आणि एक हिरवी आर्क शेपची रेष. मग त्या भटकंतीतले सुशेगाद क्षण.. वगैरे..

तसंच त्या टीव्हीच्या छायागीतासाठी लवकर लवकर घरी पोचण्यातली हुरहूर किंवा तत्सम काही..

अशा अनेक गोष्टी जोडल्या गेल्याने एकूण इफेक्ट असा होत असावा..

त्याच गोष्टीशी अत्यंत कटू स्मृती जोडल्या गेल्या असतील तर तो नॉस्टाल्जिया म्हणून गोड वाटणारच नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंच्या लिखाणाची ही बाळपावले. म्हणूनच असेल कदाचीत, पण त्यांच्या इतर लिखाणापेक्षा लेख थोडा विस्कळीत वाटला, तरीही आवाडला.

'न'व्या बाजूचा प्रतिसादही आवडला. वडीलांच्या नोकरीमुळे टेलिफोन एक्स्चेंज मधे नेहेमी येणे जाणे होते. काळा फोन जन्मापासून होताच घरी, त्यामुळे त्याचे काही विशेष वाटले नाही. पण एक्स्चेंजमधे एक पारदर्शी फोन असायचा. ट्रेनींगसाठी वापरण्यात यायचा. त्याचे खूप अप्रूप वाटायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान लेख! परवाच वाचला होता (आणि श्रेणीवाटप केलेल ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
काही लोकांना मिळालेल्या श्रेण्या अभ्यासत होतो. त्यातच दिसला हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गवि
तुम्ही केलेल आयुष्याच सिंहावलोकन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोतो दिसत नाहीयेत !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या बाबतीत शीर्षक थोडं बदलून 'मी? म्हातारा!' असं करावं लागेल असं आमचे बरेच मित्र म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मी ? म्हाताररा !!
असं आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक की मार्मिक या दुग्ध्यात अडकल्याने विनोदी दिली झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं