पोळपाटाचे एर्गोनॉमिक्स आणि इतर "पकाऊ गोष्टी"

लग्नाआधी आई-आजींनी भरपूर मागे लागून पाहिले, कि बये, आता तरी थोडा स्वयंपाक शिकून घे. पण मुळातली नावड, आणि नावडीतून निर्माण झालेली भीती, ह्या दोन गोष्टींमुळे माझी स्वयंपाकाची "भट्टी" कधी जमत नव्हती. तरीही, एक दिवस मारून मुटकून मला "पोळ्यांच्या" कामाला जुंपण्यात आले. तुळशी बागेतून मावशांसह खरेदी (हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल) करतांना, आईने त्याकाळी नवीन निघालेला प्लॅस्टिकचा पोळपाट (अय्या काय छान आहे!, धुवायला सोप्पा, हलका, दिसतोही स्वच्छ पांढरा! वगैरे वगैरे कारणमिमांसा देऊन) घरी आणला होता. त्यावर काय जमतंय बघू, असं म्हणून मी लाटणे हातात घ्यायची खोटी, कि मला पोळ्या चक्क जमूच लागल्या!

आजी म्हणाली, "पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा!" (ह्या म्हणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, सानेगुरूजींचे श्यामची आई वाचणे. माहिती नको असल्यासही, श्यामची आई जरूरच वाचणे.)
एरवीपण शाळेत असतांना, बहुतांश पोरांना न जमणाऱ्या/आवडणाऱ्या गोष्टींकडेच माझं जास्त लक्ष असायचं. उदा: विज्ञान किंवा गणित हे माझे scoring subjects नसून, इंग्रजी/मराठी हे होते! बहुतांश लोकांना नावडणाऱ्या कामाची, भाज्या चिरायची पण मला फाSSSर आवड, पण फोडणीला घालणे, त्यात वेगवेगळी मसाल्यांची कॉम्बिनेशन्स, शिजवण्याची कसरत, हे येवढे डोकेखाऊ काम कोण करेल? कोथिंबीर, पालक, मेथी तर मी अश्शी बारीक चिरायची, की काड्या घेतल्या असतील तरी कळणार नाही. कलिंगडाच्या एकसारख्या चौकोनी फोडी, पावभाजीवर घ्यायचे लोणी- अगदी कशा-कशाचीही कापाकापी मला आवडते.

मग काय, माझ्या पोळ्यांचंही, माझ्या कवितांइतकच कौतुक होऊ लागलं! "काय सुरेख हलक्या हाताने लाटते! अजून एकसारखे आकार येत नाहीत, पण प्रत्येक पोळी पातळ आहे, गोलच आहे, आणि फुगतेही आहे! मुख्य म्हणजे, त्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर घरातल्या इतर कोणाचाच हात (आणि जीव) बसला नव्हता, तरी मला तो आवडू लागला. लग्नानंतर आई म्हणाली, "तसंही प्लॅस्टिकचा पोळपाट मी वापरणार नाहिये, तुला न्यायचा असेल, तर तोच ने. २३किलो वजनातही बसेल सहज."

अमेरिकेत आल्याआल्या, चांगल्या पोळपाटाखेरिजही, पोळ्या नीट व्हायला काहितरी आवश्यक असतं, हे ताबडतोब लक्षात आलं, "कणीक"! गोल्डन टेंपल, सुजाता, नेचर्स बेस्ट, वाट्टेल ते पुडे आणले, तरी सकाळची पोळी संध्याकाळी खायच्या लायकीची उरत नाही, म्हटल्यावर मास्टर्ससाठी युनिव्हर्सिटीज शोधायच्या सोडून, आधी त्याच संशोधनाकडे मोर्चा वळवला. मग लक्षात आलं, पोळी तव्यावर फार पटकन कोरडी पडत्येय. अर्ध्या मिनिटाच्या वर एकीकडे ठेवली, कि गेलीच वाया. सासू-सासरे प्रथम आले, तेंव्हा, सासूबाईंनी उत्साहाने, "मी पोळ्या करते", म्हटल्यावर माझा चेहरा बघण्यासारखा झाला! दाखवण्यासारखा एक गुण, तोही दाखवायची संधी मिळणार नाही का काय? पण कणकेने वाचवले. पहिले काही दिवस तरी, त्यांनाच पोळ्या जमेनात, मग माझं फावलं.

तर नव्याची नवलाई संपली, पोळ्या करायची हौसही भागली, तरी, त्यात एक तंद्री लागली की मला बऱ्यापैकी मन:शांती मिळते, म्हणून मी रोज पोळ्या करतेच. तर नवरा एकदा म्हणाला, "तुलाच पोळ्यांची हौस आहे. रोज दोन दोन तास (अर्थातच हे त्याचं exaggeration!) त्यात घालवतेस, त्यापेक्षा पोळ्या विकत आणूया. मला काही फरक पडत नाही." ऑ????
माझा मोठ्ठा ऑ झाला, कारण हे म्हणजे, मी त्याला, "तू नोकरी कशाला करतोस?" म्हणण्यासारखं होतं.
तरीपण मी पोराचं, पैशाचं, पोटाचं, अशी कारणं काढत दहा वर्ष पोळ्या करतच राहिले. ("बदडणे" हा शब्दप्रयोग मला लागू होत नाही, ह्याचा मला किती अभिमान!) नवीन लग्न झालेल्या कोणीही बहिणी/मैत्रिणींनी पोळ्या-प्रताप ऐकवले, कि तो आणखीनच वाढतो, हे ही सांगूनच टाकते. "मला बाई आधीपासूनच............." मी लगेच पुराण लावते.

अशी दहा वर्ष, पोळपाट-लाटण्यासह, कणकेच्या गोळ्यासारखी गोल गोल फिरत, पोळीइतकं नाही, तरी बऱ्यापैकी "फुगत-फुगत", स्वयंपाकाच्या रिंगणात मजेने झिम्मा घालत गेली. आणि एक दिवस, माझ्या पाठीराख्या प्लॅस्टिकच्या पोळपाटावर- मीच- गरम डाव ठेवला. तिथे प्लॅस्टिक वितळून खोक पडली. पुढची पोळी अडली. आणि नवीन पोळपाटाच्या शोधात असतांनाच मला माझ्या पोळपाटाचं वैशिष्ट्य कळलं. पूर्वी, लाकडी पोळपाट सुद्धा, मधे फुगीर असायचे. तसाच हा ही होता. त्यामुळे पोळी कडेकडेने लाटणं जास्त सोपं जायचं. शिवाय, लाकडी पोळपाटाला नव्हता, तसा ह्याला, सूक्ष्म खरखरीतपणा होता (बाथरूममधे घसरून पडायला नको, म्हणून टाईल्सला जसा ठेवतात, तसा) त्यामुळे, पोळी चिकटण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. आणि शेवटचा फरक असा, की हा पोळपाट नेहमीच्या पोळपाटांपेक्षा, निदान २ इंच तरी जास्त उंच होता.

मग मी भारतात, अमेरिकेत किती शोधलं, तरी तसा पोळपाट काही मला सापडला नाही. पण मनात विचार आला, कार, फोन असल्या नित्योपयोगी वस्तूंच्या ergonomics चा भरपूर विचार केला जातो, तसा स्वयंपाकातल्या सुऱ्यांव्यतिरिक्त फार कशाचा होतांना दिसत नाही. विशेषत: पोळपाट, डबे-बरण्या, पाण्याचे ग्लास-वाट्या. नवीन पोळपाटावरही मला पोळ्या करायची सवय झालीच, पण तो पोळपाट "पुन्हा होणे नाही" असं का???

त.टी.: ergonomics = कामातिल कौशल्य/कार्यक्षमतेचा अभ्यास (the study of people's efficiency in their working environment)
त.टी. २: ergonomics चा मी वाक्यात नक्कीच चुकीचा प्रयोग केलेला आहे, पण सूज्ञ वाचकहो, कृपया भा.पो. करून घ्या Smile
त.टी. ३: कॉईलवर पोळ्या करायच्या असल्यास एक स्टँड असलेली उंच जाळी सहसा देसी दुकानांत मिळते, ती पोळ्या फुगवायला अनिवार्य आहे. शिवाय, ४-५ पोळ्या आधी लाटून ठेवून मग तवा तापवल्यास, पोळ्या लाटणे, व शेकणे, ह्या दोन्हीची चांगली सांगड घालता येते, कारण कॉईलवर, पोळी शेकायला अगदी कमी वेळ लागतो, पण आपल्या लाटण्याचा वेग त्या मानाने फारच कमी असतो.
त.टी. ४: कणकेचे वेगवेगळे प्रकार वापरून निष्कर्ष असा, की आशिर्वाद/नेचर्स बेस्ट/सुजाता हे प्रकार त्यातल्या त्यात उत्तम आहेत. कणीक जुनी असेल, तर मात्र वाईटच, कारण तिची लवचिकता कमी झालेली असते. शक्यतोवर छोटे पुडे आणल्यास, कणीक फार जुनी होण्याआधी वापरली जाते. अजून एक युक्ती अशी, की २ कप कणकेत १/२ कप Bob's Red Mill ची Whole Wheat Flour मिसळणे. ही महाग आहे, पण अतिशय शुद्ध कणकेप्रमाणे लालसर दिसते, व लवचिक असते, त्यामुळे पोळ्या मऊ राहतात.
त.टी. ५: माझी मावशी उवाच, "बाहेरच्या जगात इतके गड सर करणाऱ्या तुम्हा मुलींना, पोळ्या नाही जमल्या तर काही मोठेसे वाटून घ्यायला नको! Roti Maker घेऊन टाका सरळ, किंवा गुज्जू आंटी शोधा‍ Smile Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

पहिल्या वर्षी कवानच्या पोळ्या खूप खाल्ल्या, आता त्यांच्या वासाने पण मळमळ होते .
पोळ्यांपेक्षा फुलके सोप्पे असतात करायला . कणिक मळणे अन पोळ्या लाटणे हे नवऱ्याच डिपार्ट्मेण्ट . पण तरीही कणिक मळताना १ कपाला ४ चमचे जवसाचं पीठ (flaxseed meal ) घातलं की फुलके मऊ राहतात (जवस तब्येतीला चांगलं हा फायदा वेगळाच).

हल्लीच एकांच्या घरी फुलका फ्रेश हा प्रकार खाण्यात आला . बऱ्यापैकी चांगला वाटला , खरोखरीच फ्रेश चव ; फ्रोझन वास अजिबात नवता ; अडी-अडचणीला आणायला हरकत नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

जवसाचं पीठ कुठे मिळेल? देसी किराण्यात शोधते आता. शिवाय, फुलका फ्रेश कोणत्या कंपनीचा असतो? कवानच्या पोळ्यांचा आता मलाही कंटाळाच येऊ लागला आहे पण तरी, वेळी(अवेळी) गरज पडली तर म्हणून फ्रीजरमधे ठेवलेल्या असतात. किंवा एखाद दुसरीच कमी पडल्यास....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवसाचं पीठ -ट्रेडर जो किंवा होल फूड्स किंवा स्प्राउट्स वगैरे मध्ये मिळतं flaxseed meal ह्या नावाने .

फुलका फ्रेश चे डीटेल्स आठवत नाही पण हे फ्रोझन नसतात , पाकिटावर कोपऱ्यात फुलका फ्रेश असं लिहिलेलं असतं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

जवसाचं पीठ कुठे मिळेल? देसी किराण्यात शोधते आता. शिवाय, फुलका फ्रेश कोणत्या कंपनीचा असतो? कवानच्या पोळ्यांचा आता मलाही कंटाळाच येऊ लागला आहे पण तरी, वेळी(अवेळी) गरज पडली तर म्हणून फ्रीजरमधे ठेवलेल्या असतात. किंवा एखाद दुसरीच कमी पडल्यास....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोळ्यापुराण आवडलं.

स्वयंपाक हा माझा मोठा शत्रू आहे असं मी एकटी राहत होते तोवर मानत आले होते. बरा अर्धा घरी राहायला आल्यावर मतपरिवर्तन व्हायला सुरुवात झाली, कारण कामांची विभागणी. सगळ्यांनाच सगळी कामं येतात म्हटल्यावर आपला तोरा मिरवायला काहीतरी असलं पाहिजे ना! मला पोळ्या करता येतात, त्याला झेपत नाहीत. स्पेशल स्किलच्या जोरावर त्याला घरातली इतर बरीच कामं करायला भाग पाडत असे.

मग अमेरिकेत आल्यावर काही काळातच रुचीने गव्हाच्या पावाची पाककृती दिली. मलाही पोळ्या लाटायचा कंटाळा आला होता; बरा अर्धाही म्हणे, "कुठे रोज त्यात वेळ घालवायचा!" त्यामागचं राजकारण आता समजतंय. माझा माज कमी करण्याचा हा प्रयत्न होता. पण पावाची कणीकही मळायला लागते म्हटल्यावर त्याचा प्रयत्न साफ फसला. कारण अमेरिकेत आल्यावर, आजूबाजूच्या जनतेचा जरा जास्तच परिणाम होऊन बऱ्या अर्ध्याला, हात खराब न करण्याची ओसीडी जडली आहे. जो जेवताना पावाला हात लावत नाही, (ह्याच कारणामुळे संत्री सोलायचं काम माझ्या गळ्यात येतं) तो पावाची कणीक काय मळणार!

थोडक्यात अदिती १, बरा अर्धा ०.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.

तुम्ही म्हणताय तसा डिट्टो प्लास्टिक पोळपाट वापरूनही मी कधी पोळ्या लाटल्या तर हमखास चिकटतात. त्यातून एकदा माझा ढाई किलो का हात जास्त जोरात पडून बिचारा एका पायाने अधू झाला आहे.

-----
एका उपकरणात दुसरी कॉम्पलिमेंटरी सोय असणं हेही एर्गोनॉमिकसमध्ये येतं का? उदा. लिंबू पिळण्याच्या यंत्राच्या टोकाशी बॉटल ओपनर असणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी म्हणते तो पोळपाट सुमारे १० वर्षांपूर्वीचा आहे.आजकाल काही प्लॅस्टिक पोळपाट बघितले, पण ते वेगळे होते.
माझा वाला असा दिसतो:

बॉटल ओपनर आणि लिंबूयंत्र एकात असले तर एर्गोनॉमिक्स होईल का काय? हा प्रश्न चांगला आहे, पण मला उत्तर देता येणार नाही. असलेल्या यंत्राचा, असलेल्या उपयोगाच्या दृष्टीने, उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने करता येण्यासाठी एर्गोनॉमिक्स वापरता येते असा माझा समज आहे,त्यात नवीन कार्यक्षमता घालणे अपेक्षित नसावे.उदा: पाणी पिण्याच्या भांड्याचा कुठला आकार जास्त सोयीस्कर आहे? आपली मराठी भांडी उंची-रुंदीच्या प्रमाणामुळे लवकर लवंडत नाहीत. पेले जास्त पाण्यासाठी बरोबर, पण हमखास लवंडतात. व्हिस्कीच्या ग्लासप्रमाणे दणदणीत बुडाची मोठी भांडी पाण्यास वापरणे बरे पडेल असं मला वाटतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
अमेरिकेत आल्यावर सुरुवातीचे काही आठवडे अगदी हौसेने पोळ्या करायचो. आपण स्वतः केलेल्या पोळ्या खाण्यायोग्य होतात, कधीकधी चक्क फुगतातही ह्याचे भलतेच अप्रूप होते. पण ते माझ्या कूर्मगतीने व्हायला फार वेळ लागायला लागला आणि पिठाची सांडलवंड आवरण्यात आणखीनच वेळ जाऊ लागला. आता फ्रोजन पोळ्या आणून तव्यावर गरम करून खाणे ह्यातच समाधान मानतो हल्ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

अवांतर: एक जोक आठवला, पोळ्या लाटताना काम शून्य होते, कारण displacement is perpendicular to the direction of force.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या स्वयंपाकीय कारकिर्दीत पोळ्या काय त्या ठसठसणारं गळू आहेत.. काहीही करा नीट जमतच नाहीत Sad

तरी माझ्या बर्‍या अर्धीच्या मदतीने साध्या पोळ्या - गोल नाही तरी - खाणेबल होऊ लागल्यात. घडीच्या वगैरे पोळ्यांची स्वप्ने बघितली तर त्याला वेट ड्रिम्स म्हणावे लागेल Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पोळीचा आणि माझं छत्तीसचा आकडा नसला तरी आळस माझा मित्र असल्याने मी फुलकेच करते .ते सोपे पडतात करायला . पण टम्म फुगलेल्या घडीच्या पोळीची सर कशालाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख भारी आहेच. पण पोळ्या... त्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच. त्याकरता सुगरणीला बोलवावं लागेल. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आम्हा कोंकण्यांचं एक बरं आहे, महिनो न महिने पोळी खायला मिळाली नाही तरी अडत नाही.
निदान माझे तरी.
तरी मला छान नाजूक पोळ्या/पुर्‍या/पराठे इत्यादी सगळे करता येते (हल्ली).
पण सध्या करायची वेळ सहसा येत नाही.

एखाद दिवस नवर्‍याच्या आवडीची भाजी असेल तर मी थोडी तिंबलेली कणिक कामवाल्या बाईंना तशीच ठेवायला सांगते आणि मध्यरात्री नवरा येतो तेव्हा गरमागरम पोळ्या करून वाढते.पण फारच क्वचित.
तसेही दररोज सकाळी त्याला तव्यावरून ताटात पोळी मिळतेच.

मला मात्र पोळ्या खाण्याचा फार वैताग असल्याने आठवडेच्या आठवडे पोळ्या खात नाही.

भात कसा जगात कुठेही शिजवू शकतो. सुट्टा झाला तर फळफळीत म्हणून, मऊ झाला तर मऊभात म्हणून, कधी पेज म्हणून, कधी खिमट म्हणून खाऊ शकतो.
Wink
मी नुसता तिखट मीठ भात खाऊनही तीन चार दिवस सलग आरामात काढते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
पो ळ्या. पा हि जे म्ह ण जे पा हि जे त च. Blum 3

नवरा डब्यात भात नेतो, त्यामुळे त्याला रात्री पुन्हा भात नको. तशी मी भातप्रिय आहे, तरी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला पण त्यामुळे जुन्या जखमा जाग्या झाल्या. आमचं दुखणं सातीच्या नेमकं उलटं आहे, नवरा महिनोन् महिने आनंदाने भातावर जगू शकतो आणि त्याला स्वयंपाक कर म्हटलं की भात लावून मोकळा होतो. पोळी (एकूणच ब्रेडप्रकार) वाचून अडतं ते आमचंच त्यामुळे ते काम आमच्याच गळ्यात! बरं जेवढ्या पोळ्या खायला आवडतात तेवढाच मला त्या करायचा कंटाळा आहे, म्हणजे एकदा करायला घेतल्या की काम पटकन होतं आणि चांगलं जमतंही पण त्या एवढ्या पोळ्या लाटायच्या कल्पनेनेच कंटाळा येतो. बरं आमचं नाक कायम वर; त्यामुळे पोळ्या अशाच पाहिजेत, तशाच पाहिजेत, घरी दळलेल्या पिठाच्या पाहिजेत, ताज्याच पाहिजेत, फुगल्याच पाहिजेत, पातळच पाहिजेत वगैरे. सासूबाई घरी येतात तेंव्हा त्या पोळ्या करायचं काम आवडीने अंगावर घेतात पण तरी आमचं तोंड वाकडंच कारण त्यांच्या हातच्या पोळ्या आवडत नाहीत. एकूण काय तर चोचले पाहिजेत तर त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी पाहिजे! बरं मूर्खपणाने पोरटीलापण असले चोचले शिकवलेत त्यामुळे ती गूळ लावत "तूच जगातली सर्वोत्तम स्वयंपाकी आहेस" वगैरे मखलाशी करते आणि मग मी बसते पोळ्या लाटत!

पण पोळ्या लाटायला पोळपाटच लागत नाही मला, एक चांगला भरभक्कम मोठा लाकडी चॉपिंग बोर्ड आहे माझ्याकडे त्याच्यावरच करते. जुन्या पोळपाटाच्या तीन पायांपैकी एक तुटला तेंव्हापासून चॉपिंग बोर्डवरच लाटत आलेय, लाटणं मात्र मला हल़कं आणि पातळ आवडतं. एकदा सुट्टीवर असताना मला पोळ्या खायची लहर आली, तेंव्हा पोळ्या (स्पेल्ट्च्या पीठाच्या) किचन काउंटरवर वाईनच्या बाटलीने लाटल्या होत्या, चांगल्या झाल्या, इच्छा तिथे मार्ग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मुलीला तुम्ही कसं बिघडवलं आहेत हे बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.

आईची बहुतेकशी कारकीर्द १९९० पूर्व काळातली; बाहेर नुकत्याच पोळ्या मिळायला लागल्या होत्या आणि स्वयंपाकाला बाई ठेवणं तिच्या पर्सला परवडणारं असलं तरी बुद्धीला परवडत नव्हतं. आम्ही भावंडं मोठी होत होतो, तिचं प्रमोशन झाल्यामुळे ती कामंही वाढली होती. ती तरुण होत नव्हती आणि आमची शिंगं चांगलीच वाढलेली होती. एकदा तक्रार करत म्हणाली, "तुमचे दोघांचे फार नखरे आहेत. त्या अमक्यांकडे बघा, एकदाच पोळ्या बनतात. त्या घरातले कोणी तक्रार करत नाहीत." तेव्हा मी तशी हुशार होते, लगेच चटपटीत उत्तरं सुचायची, "आई, सकाळ-संध्याकाळ ताज्या पोळ्या खायची सवय आम्हाला लावली कोणी?"

तशी आईसुद्धा आमचीच आई असल्यामुळे हा विषय पुन्हा निघणार नाही किंवा निघालाच तर आणखी वर काही सवाल-जवाब होतील अशी माझी अपेक्षा होती. पण हा, असाच संवाद दोन-तीनदा झाला. कधीतरी घरी आलेल्या पाहुण्यांसमोर 'मुलीचं कौतुक' नावाखाली हे लोकांना सांगूनही झालं. आता वाटतं, आई बहुदा आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाबांवर गोळ्या झाडत होती. बाबांनी 'मुलीची हुशारी' या सदराखाली पोळ्यांची चर्चा पाहुण्यांसमोर केली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चॉपिंग बोर्डवर चपाती? रोचक काँबो इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी मनोगतावर शोभेल असा खरपूस विनोदी लेख. बाकी अर्गोनॅामिक्स ( हातवळणी ) गंडल्याकडे दुर्लक्ष कारण लेख शास्त्रीय गोलाईने जाणारा नाहीये.प्रतिसादही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जिव्हा'ळ्याचा विषय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख रोचक आहे.

मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेव्हा कवान/रोटीलॅन्ड वैग्रे काही मिळत नव्ह्ते. घरी पोळ्या करण्याची हिंमत तर नव्हतीच!

माझ्या धमन्यांतूनही कोकणी रक्तच वाहत असल्यामुळे, वर सातींनी म्हटल्याप्रमाणे, नुसत्या भातावर राहणे मला शक्य होते. पण रूममेटना नव्हते.

तेव्हा एकच पर्याय होता तो म्हणजे मकई दी रोटी अर्थात टोर्टिया!!! पण हा फक्त आणि फक्त गरमच बरा लागत असल्याने केवळ रात्रीच शेकला जाई.

त्यानंतर बरेच पदार्थ करायला शिकलो परंतु पोळी काही कधीच जमली नाही. आजही घरी जेवणात इतर सर्व पदार्थ मी बनवले तरी गरमा-गरम पोळी मात्र इतरांकडूनच येते!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यभागी फुगीर असलेला पोळपाट चांगला, हा विचार फार पूर्वीच माझ्याही मनात आला होता.

अस्फेरिक कर्व्हेचर ज्याला म्हणतात, (साधारणतः छत्रीचे असते तसे कर्व्हेचर.) त्या प्रकारचा पोळपाट सुंदर पोळी लाटायला मदत करतो, असे माझे निरिक्षण आहे. याचे दुसरे कारण, म्हणजे लाटणेही अस्फेरिक असते, हे असावे, असे वाटते. लाटणे फक्त सिलिंड्रिकल अर्थात वृत्तचिती आकाराचे असेल, तर पोळपाट म्हणून चॉपिंग बोर्ड चालूनही जाईल, पण मग ती पोळी वेगाने होत नाही, असे माझे मत.

विंजिनेर व पोळीपारंगत लोकांनी अधिक प्रकाश टाकला तर बरे.

माणूस हत्यारे (पक्षी टूल्स) वापरणारा प्राणी आहे. अनेकानेक वर्षांपासून विकसित झालेल्या अनुभवसिद्ध टूल्सबद्दल आपण जास्त विचार न करता ती वापरत राहतो, असे वाटते. या लेखानिमित्ताने हा विचार सुरू झाला तरी छानच होईल. काहीच नाही, तर करमणूक तरी नक्कीच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अस्फेरिक कर्व्हेचर ज्याला म्हणतात, (साधारणतः छत्रीचे असते तसे कर्व्हेचर.) त्या प्रकारचा पोळपाट सुंदर पोळी लाटायला मदत करतो

मी कायमच संगमरवरी पोळपाट वापरले, त्यांचा पृष्ठभाग सपाटच होता/आहे. संगमरवराची सवय झाल्यामुळे लाकडी किंवा इतर काही पदार्थाचा, कमी वजनाचा आणि/किंवा उंच पायांचा पोळपाट असला की तो कलंडेल अशी भीती वाटते. मला खाण्यापिण्याचं फारसं कौतुक नाही, त्यामुळे सकाळी केलेल्या पोळ्या दुपारी जेवताना मऊ राहिल्या की काम झालं, असं माझं मत. त्या सगळीकडे व्यवस्थित शिजलेल्या/भाजलेल्या आणि साधारण समान जाडीच्या, तरीही पातळ असलेल्या मला पुरतात. चार वेळा पोळ्या केल्या, त्यात काय चुका झाल्या याची मनात नोंद केली; मग दोन-चारदा चांगल्या पोळ्या करणाऱ्यांकडे बारीक लक्ष ठेवलं. मग मला पोळ्या जमल्या. पोळ्या करताना पोळपाट आणि लाटण्यांचे आकार, महाराष्ट्रात साधारण असतात तसे कसेही असले तरी मला फार फरक पडत नाही. पण कणीक कशी आहे, गव्हाची जात, कणकेचा पोत, आणि कशी भिजवली आहे, खूप पातळ आहे का घट्ट यामुळे मला पोळ्या लाटताना फरक पडतो. बरेच दिवसांनी पोळ्या करायला गेले तर हमखास कणीक सैल भिजते आणि पोळ्या लाटताना फार त्रास होतो. केल्याच तर मी घडीच्या पोळ्या करते; त्या चतकोराचं वर्तुळ लाटताना मला अजूनही गंमत वाटते.

सरासरीपेक्षा बरा स्वयंपाक करण्यात फार काही कौशल्य लागत नाही. ("मला फक्त चहाच बनवता येतो", किंवा जेवण झाल्यावर स्वतःचं ताट न उचलण्याइतपत पाककला-अडाणी लोक आजूबाजूला दिसल्यामुळे ही सरासरी फार फार खालची आहे याबद्दल खात्री आहे.) म्हणजे ७५-८०% मार्क मिळवायला अडचण नसते. त्यापुढचे मार्क मिळवायला बरीच मेहेनत करावी लागते आणि मला त्यात रस नाही. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या बारकाव्यांची उत्तरं द्यायला मी पात्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस्फेरिक कर्व्हेचर ज्याला म्हणतात, (साधारणतः छत्रीचे असते तसे कर्व्हेचर.) त्या प्रकारचा पोळपाट सुंदर पोळी लाटायला मदत करतो,

शक्य आहे पण मला वाटते की प्रत्येकाची पोळी लाटायची शैली थोडी वेगळी असते किंवा प्रत्येकजण आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनांप्रमाणे (आणि मुख्यतः तंत्र शिकताना उपलब्ध साधनांप्रमाणे) ही शैली आत्मसात करत असतो. त्यामुळे एकदा आपला हात एखाद्या उपकरणावर बसला की मग दुसर्या पद्धतीची उपकरणे वापरणे गैरसोईचे वाटते. अदिती वर म्हणते तसे माझ्यासाठी बिल्कूल न हालणारा सपाट पृष्ठभागाचा पोळपाट महत्वाचा असतो पण थेट कट्ट्यावर लाटणे आवडत नाही कारण लाटताना हात पृष्ठभागापासून दूर किंचित हवेत असावे लागतात. पोळी पोळपाटावरून किंचित सरकत राहिली पाहिजे ही साधारण फुलके लाटण्यासारखी पद्धत मी वापरते जी मला या साधनांप्रमाणे सोईची वाटते.

यावरून आठवले की एकदा माझ्या एका युरोपियन मैत्रिणीला पोळी कशी लाटतात ते शिकायचे होते. ही मैत्रिण पाव-पाय-टार्ट्स वगैरे बरंच बेकिंग करते त्यामुळे पीठ मळणे, रोलिंग पिनने लाटणे वगैरे प्रकारांची तिला चांगली सवय आहे. तिला मी लाटण्याच्या सहाय्याने फिरवत फुलका लाटायचे तंत्र दाखविले तर तिला ते अगदी लगेच जमले, फुलका बर्यापैकी गोल झाला आणि चांगला फुललाही. तिचे सर्वात पहिले मत असे पडले की रोलिंग पिनपेक्षा या तंत्रासाठी लाटणेच अतिशय उपयुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"शक्य आहे पण मला वाटते की प्रत्येकाची पोळी लाटायची शैली थोडी वेगळी असते किंवा प्रत्येकजण आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनांप्रमाणे (आणि मुख्यतः तंत्र शिकताना उपलब्ध साधनांप्रमाणे) ही शैली आत्मसात करत असतो." सवय कशाचीही होते, हे खरं असलं, तरी कुठल्याही साधनाच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करायला हवाच की. म्हणजे, साधारण कमी धारेच्या सुरीनेही बर्‍यापैकी तुकडे होतात, पण चांगली सुरी मिळाली तर कापाकापी करायला काय मज्जा येते! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याबबातीत मी फार उपयोगाची नसले तरी बोलायची सवय कशी सुटणार!

सुरीचं उदाहरण पुरेसं चपखल आहे असं वाटत नाही. धार असलेलीच सुरी, पण करवती सुरी टोमॅटोसाठी आणि सलग धार असलेली कोथिंबीरीसाठी अधिक उपयोगी पडतात, ही तुलनाही फार उपयुक्त वाटत नाही.

मी पोळ्या लाटताना कायमच सपाट पृष्ठभागावर लाटल्या. (रुचीसारखंच, ओट्यावर जमत नाहीत.) त्यामुळे बाहेरची बाजू, कड जाड न राहण्याकडे लक्ष द्यायचं अशी सवय हाताला झाली. त्यामुळे कधी पोळीच्या केंद्राजवळच जाडसर राहील का काय, असं पोळ्या लाटताना नेहेमी वाटतं; झाल्याचं मला तरी सापडलेलं नाही. जसं पोळीच्या केंद्रापासून बाहेरच्या बाजूला येऊ तसं क्षेत्रफळ वाढत जाणार. त्रिज्जा = १ सेमी यापेक्षा त्रिज्जा = ५ सेमी असणारा भाग अधिक. म्हणजे सगळ्या कडांकडे अधिक लक्ष द्यावं लागणार/बल वापरावं लागणार. तसं थोडं दुर्लक्ष होऊ देण्यासाठी तू म्हणतेस तसा पोळपाट अधिक उपयुक्त ठरू शकेल. किंवा ज्यांना पोळ्यांच्या कडा जाड राहतात अशी अडचण आहे त्यांना तसा पोळपाट अधिक उपयोगाचा वाटतोय. पोळ्या लाटत असतानाचे वेगवेगळ्या लोकांचे व्हीडीओ बघितले तर कदाचित काहीतरी सुधरू शकेल.

मला साधारण मराठी धाटणीची कोणतीही पोळपाट-लाटणी चालतात, पण लोकांच्या घरच्या सुऱ्या झेपत नाहीत. एकतर कापाकापी करायला फार आवडत नाही, ते काम नेहेमीच बरा अर्धा करतो आणि त्यात धार जराही कमी असेल तर मग कंटाळाच येतो. आमच्या घरीच चिक्कार सुऱ्या आहेत. त्यांतल्या भाज्या, कलिंगड, पपईसारखी फळं यांसाठी मला दोनच आवडतात. बाकीच्या सुऱ्या उकडलेलं बीट, अव्होकाडो, कंपोस्टात टाकायचा कचरा वगैरे गोष्टी चिरण्यासाठी किंवा हिंगाच्या डबीला भोक पाडण्यासाठी. पण अजूनही एखादी सुरी फक्त बघून ती आवडेल का नाही, हे वापरेस्तोवर समजत नाही.

छ्या, या सगळ्या गप्पांमुळे एखाद्या छानशा पिकलेल्या पपईवर सुरी चालवताना एकीकडे निम्मा पपई तोंडात टाकायची फार इच्छा व्हायला लागल्ये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरं सांगायचं झालं पोळपाट हा चुकीचा शोध आहे.लाटणं बहुउपयोगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोळ्या करायला आवडतात. याचा अर्थ त्या इतरांना खायला आवडतातच असे नाही Wink
पण सर्वात अधिक काही आवडत असेल तर पोळी बटर लावून चहाबरोबर हादडणे Biggrin
___
बाय द वे पोळीला चपाती कोण कोण म्हणतं? आमच्याकडे (माझ्या माहेरी. होय इतक्या वर्षांनंतरही माहेर = आमचं , सासर=त्यांचं हाच शब्दप्रयोग ;)) आम्ही चपातीच म्हणत असू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0