डोसा ऑम्लेट

बीजे मेडीकल कॉलेजात असताना एकंदर ४ ऑफिशियल अन एक अनॉफिशियल कँटीन्स होती. होस्टेल कँटीन अन कॉलेज कँपसच्या दरम्यान सेंट्रल बिल्डिंगच्या कॉर्नरला जे आहे (अजूनही असेल कदाचित. तिथे पादचारी पूल झालाय रस्ता ओलांडायला) ते अनऑफिशियल सेंट्रल कँटीन. हे नुस्तंच टिपिकल इराणी हॉटेल होतं, पण आमची इतकं पोरं पडीक असत, की जणू कँटीनच असावं.

कॉलेज कँपसमधे मेन बिल्डिंगमधे जे ऑफिशियल कँटीन आहे (हे सिंहासन सिनेमात दाखवलंय), त्याला म्हणायचे "अँटिरियर" कँटीन. पीजी होस्टेलमधे सेकंड फ्लोअरवर होते ते "सुपिरियर" अन ससूनच्या मुख्य बिल्डिंगच्या मागे, जे आजकाल पेशंटच्या नातेवाईकांसाठी राखीव समजले जाते, व बरेच घाणेरडे झालेंय, ते "पोस्टिरियर" कँटीन.

या सर्व कँटीन्समधे आमचा मुक्त वावर असायचा, अन प्रत्येकाच्या काही खासियत डीशेस असत. अँटिरियरला अर्थातच पडीक असणे होई. तिथले ऑम्लेट करण्याची पद्धत म्हणजे सुमारे ५० कपात अंडी फोडून ठेवलेली, अन तिथला घामट शेट्टी, आली ऑर्डर की टाक त्यात मूठभर मिर्च्या, कांदे अन थोडं मीठ, अन ओत समोरच्या मोठ्या पत्र्यासारख्या डोसा तव्यावर, या पद्धतीने अर्धेकच्चे ऑम्लेट करून ते बनमधे सारून तिसर्‍या मिन्टाला टेबलावर सादर करी. ते आलं, की बन उघडून ओघवत्या आम्लेटातून त्या मिरच्या वेचत, "मा****चे ऑम्लेटात इतक्या मिर्च्या कशाला घालतात" हा प्रश्न वेटरला विचारत ते गट्टम करणे हा रोजचा ब्रेकफास्टिय नाईलाज असे.

पोस्टेरियर कँटीनच्या डेलिकेट डोसा ऑम्लेटचा शोध पीजी करताना लागला.

तिथल्या शेट्टीची ही डिलिशियस स्पेशालिटी. पोळीला ऑम्लेट लावून खातो तसं डोशाला लावून नाही खायचं. तर ते एकत्रच बनवायचं.

तर पाककृती.

लागणारे साहित्यः

डोश्याचे तयार बॅटर. (घरी केले की विकत आणले फरक पडत नाही)
बाऽरीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिर्ची.
हवं तर तिखट, मीठ.
तेल. हवं तर बटर.
अंडी.

क्रमवार पाककृती:

आधी मोठ्या भांड्यात अंडी, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, मिर्ची एकत्र करावे. चमचाभर पाणी घालून मस्त फेटून घ्यावे.

तव्यावर डोसा घालावा. पिठाचा रंग बदलून शिजतंय असं दिसलं, की चमच्याने त्यावर ऑम्लेट मिश्रण ओतावे.

झाकण ठेवावे.

थोड्यावेळाने झाकण काढून पहावे. डोश्याच्या कडा सुटायला लागल्यात असे दिसेल. मग ऑम्लेटवर दोन थेंब तेल सोडावे. नाजुकपणे डोसा उलटावा. थोडा वेळ शिजू द्यावे.

हा रिझल्ट येतो :

one

two

वाढणी/प्रमाण

भूक किती व खाणारे किती त्यावर.

अधिक टीपा:

सोबत कालच केलेलं घरच्याच कैरीचं ताजं लोणचं आहे.

डोसे मला छान करता येतात. मीच केलेत. काकूंची कारागिरी माझ्या नावावर खपवलेली नाही.

या जेवायला!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

डोसे मला छान करता येतात. मीच केलेत. काकूंची कारागिरी माझ्या नावावर खपवलेली नाही.

Biggrin

दिसतायत मस्तच. डोसे मलाही जमतात. या प्रकरणाची चव चांगली लागते असं म्हणत असाल तर बनवण्याचा प्रयत्न करेन. डोक्यात काही कल्पना येत नाहीये कसं लागेल याची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कैरीचं ताजं लोणचं तेवढं माझी आठवण काढत खा.
Smile

ऑम्लेट डोसा मस्तं दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेवा! मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भन्नाट लागतं हे डोसा omlet प्रकरण . एकच खाऊन पोट आणि मन भरतंय .होस्टेलला खूप वेळा करायचो . डोस्याच्या पसरत तव्यापेक्षा कडा असलेल्या pan मध्ये अजून छान होतं असा अनुभव . .

असंच maggy आणि भुर्जी एकत्र पण छान लागतं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला रवा डोसा छान येतो. तेव्हा त्यावर आम्लेट-साहित्य टाकून कसं लागतं ते बघीन पुढच्यावेळी.

बाकी आता बीजे मेडिकल आणि तिथलं कॅंटीन वगैरे विषय निघालाच आहे, तर तुमची ती डॉक्टर बनण्याची लेखमाला थोडी पुढे सरकवा की. प्लीज प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवाडोशाच पीठ पातळ असतं .. त्यावर अंड घातलं तर ते पसरवणे कठीण जाइल.. थोडं रिस्की वाटतय ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पसरवायला त्रास होईलसं वाटत नाही. कृतीनुसार डोसा आधीच पसरवायचा, अर्धा शिजवायचा आणि मग अंडं त्यावर पसरवायचं. मला शंका आहे ती रवा डोसा पातळ असतो, ते पीठ शिजायला अंड्याएवढाच वेळ लागेल, मग शिजण्याचं तंत्र बिनसेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पीठही पातळ डोसाही पातळ आणि त्यात खूप भोकं असलेला.. त्यामुळे शंका वाटते.. कदाचित जास्तच एकरूप होईल डोश्यात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवा डोसा एका बाजूला शिजायला अडीच मिनिटं लागतात. आणि उलटून साधारण पंचेचाळीस सेकंद. त्यामुळे साधारण मिनिटाभराने पीठ जरा एकसंध झाल्यावर थोडंसं अंडं टाकलं तर ते शिजून निघावं. पातळ थर, आम्लेटसारखा जाड नाही. मी करतो त्या डोश्याला खूप भोकं असतात - डोसा कमी आणि रिकामी जागा जास्त (ही थोडी अतिशयोक्ती झाली...) त्यामुळे अंड्याचा काही भाग तरी तव्यावरच शिजून निघेल. शिवाय उलटणं आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. आमच्या गावी एका दाक्षिणात्य खानावळीत चेट्टीनाड चिकन किंवा मटन पोळीऐवजी दोशाबरोबर देतात तसं हे दोसाम्लेट असावं.
२. मॅगी करण्याच्या पद्धतींचा एक वेगळा धागा असावा असं प्रकर्षाने वाटतंय.
३. मस्त मस्त प्रकारांची नुस्ती नाव कशाला काढता हो...नेमकी आमच्या कडे दुधीभोपळ्याची भाजी असतांना Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधीभोपळ्याला असं बदनाम नका हो करू. त्याची भाजी कांदाटोम्याटो व आलेलसूणपेस्ट घालून केली तर फर्मास लागते. त्यात डाळबीळ टाकण्याचा मूर्खपणा तेवढा करू नये मात्र. शिवाय सांबारात न्हायलेल्या दुधीभोपळ्याच्या लांबुळक्या फोडी काय कातिल लागतात, अरे व्व्व्वाह......नुसत्या आठवणीनेच तोंडात कारंजी उडू लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शतप्रतिशत सहमत. दुधीभोपळ्याची भाजी आवडणारी आणखी कोणीतरी व्यक्ती आहे हे पाहून अत्यंत आनंद झाला. शिवाय सांबारातही मस्टच. कांदा घालून केलेली भाजी खाल्ल्या गेली नाही अद्याप मात्र. बघितले पाहिजे.

कोणाला पटेल न पटेल पण काकडीची भाजीही चक्क आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए मी पण मी पण... मला ही दुधीभोपळ्याची भाजी आवडते.
आमच्याकडे सहसा दाण्याच कुट घालून भाजी (रादर बर्याच भाज्या) करतात, फोडी फार न शिवजवता, थोडं तेल जास्त आणि भरपूर मसला/तिखट नी बेताचा गुळ. अशी भाजी मला फार आवडते. आमटी-भाता बरोबर तोंडी लावायला अशी भाजी असेल तर कमालच मजा Smile बाकी गोडात, दुधी-हलवा तर आवड्तोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधी केवळ हलव्यासाठी निर्माण झाला आहे असे माझे स्पष्ट मत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधी केवळ हलव्यासाठी निर्माण झाला आहे असे माझे स्पष्ट मत आहे

यावरुन सहजच "एक रुपयात मनसोक्त दुधी हलवा" अशी पाटी आणि पैसे देऊन आत गेल्यावर दोरीला टांगलेला एक दुधी, जो तुम्हाला हवा तितका हलवून दुसर्‍या दाराने बाहेर पडा.. असा एक बालपणीचा पीजे आठवून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकडीची भाजी कधी केली नाही. कोशिंबीर केलीय पण तितपतच. पाहिली पाहिजे करून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थोड्याश्या जून काकडीची दाणकूट घालून साधारण दुधीच्याच प्रकारची दिसणारी भाजी करतात किंवा तिची रस्साभाजीही उत्तम लागते. मुख्यतः दुधीभोपळा आणि काकडी या दोन्हींचा यूएसपी म्हणजे त्यांचा ज्यूसीपणा. सेम विथ गिलक्याची (घोसाळ्याची) भजी आणि वांग्याचे काप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक, पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस.काकडीची भाजी मलाही आवडते ..पेरूची पण ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेरुची भाजी म्हणजेच पिकलेल्या "पेरुचा कायरस" हा प्रकार असेल तर त्या भागापुरती नाक दाबून धरुन असहमती. टेबलवरही नकोसा वाटणारा प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कधी ऐकलेसुद्धा नव्हते. छान पेरवाची कोशिंबीर करायची सोडून काय नसते प्रकार करतात लोकं, अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे...........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेरूचा कायरस नाही ..भाजीच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फूलनामशिरोमणी! मला तुझ्याबद्दल आदर होता. तो आता आणखीनच वाढला आहे. दुधीभोपळा विकत आणून, त्याची भाजी करण्याचे मासोकीस्ट प्रयोग करतेस म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाफिसातून फटु दिसत नव्हता म्हणुन खास या धाग्यासाठी घरून लॉगिन झालो आहे त्याचे सार्थक झाले.

बादवे, जाहिरपणे काकु! त्या ऐसीवर लॉगिन करत नाहित बहुदा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऑम्लेटला अंड्याचा दोसा किंवा बैदादोसा का म्हणू नये? तेही सफेद असतं, त्यालाही जाळी असते, त्याचाही कांदा वगैरे घालून उतप्प करता येतो, गुंडाळी करून त्यात बटाटाभाजी भरता येते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्लेटमध्ये बटाटा भाजी?? हा अन वरचा दुधी भोपळ्याचा प्रतिसाद वाचून तुमच्याविषयीचा आदर चमचाभर कमी झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वेज ऑम्लेट खायचं असेल तर त्यात आतमध्ये खिम्याऐवजी बटाटाभाजी करून गुंडाळी करता येईल की.
(अंडं वेजच असतं किंवा अलीकडे त्याचा नॉन्वेजपणा गळून पडला आहे हे गृहीतक.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तामिळनाडूतले खाद्यदिवस आठवले. तिथे स्ट्रीटफूडमधे हा शिजत्या डोशावर अंडे फोडून टाकण्याचा प्रकार बर्‍यापैकी ष्टांडर्ड आहे. पाकृ उत्तम.

डाळीच्या पिठात (बेसनाची धिरडी) चक्क अंडं त्यातच फेटून मिश्रणाचं धिरडंही मस्त बनतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तामिळनाडूतले खाद्यदिवस आठवले. तिथे स्ट्रीटफूडमधे हा शिजत्या डोशावर अंडे फोडून टाकण्याचा प्रकार बर्‍यापैकी ष्टांडर्ड आहे. पाकृ उत्तम

+१. पण तो प्रकार डोसा + हाफ फ्राय असा असतो. ठीकच लागतो. त्यापेक्षा मी स्वतः चांगला डोसा + स्वतः बनवलेला हाफ फ्राय हे खाणं पसंत करीन.

बाकी डागदर, तुम्ही प्लास्टीक सर्जन काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हे बरोबरच आहे. कारण डोश्यावर टाकल्याने ते हाप्फ्राय थेट तव्यावरच्याप्रमाणे चुरचुरीत खमंग बनत नाही. त्यामुळे डोसा वेगळा आणि हाप्फ्राय वेगळं हे नक्कीच चांगलं.

तामिळनाडून घरगुती जेवणातला /मेसवरचा डोसा म्हणजे जाडसर आणि लहान आकाराचा असून तसे दोनतीन डोसे एकावर एक प्लेटेत, प्रेफरेबली वाडग्यात ठेवून त्यावर तिकडच्याच पद्धतीचा मटनरस्सा ओतून पाचदहा मिनिटांमधे गरमागरमच ओरपणे हा अद्वितीय आनंदप्रकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी ट्राय नै केले. वाचूनच खूळ लागलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बुडवलेल्या डोशाचाच अजून एक प्रकार..

सांगलीच्या "हनुमान डोसा"त पूर्ण आकाराच्या ताटामधे एक विशिष्ट प्रकारचा सेमी खुसखुशीत पण जाड डोसा ठेवून त्याला खास हनुमानच्याच सांबाराने सचैल स्नान घालून पूर्ण सांबारात बुडवलेला आणि त्यावर लोण्याचा विरघळलेला तवंग, सोबत लाल आणि हिरव्या टोमॅटो - नारळ चटण्यांचे वाडगे, असा गुंटूर डोसा खाल्ला आहेस का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि..टाका अजून असले प्रकार.. करा वर्णन ..तेव्हाच टाका जेव्हा आम्ही नशिबाला पुजलेली इडली गिळत असताना.. कुठे फेडाल हे पाप?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला...कधीच नाय खाल्ला. रादर तिकडे कधी गेलोच नाही. जिथे स्वतःचे घर असते तिथे असे एक्स्प्लोरेशन शक्यतोवर होत नाही. तुम्ही सांगितलेत ते उत्तम केलेत, आता जाऊन पाहतो एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

t

t

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर, अप्रतिम, लाळावलो, जळवल्याबद्दल निषेध, इ.इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सखी काय कातिल बनवलाय डोसा. मी आअत्ताच बनवला पण इतका छान दिसला नाही. लागला मात्र झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचि .

चव एक नंबर होती डोश्याची हे नक्की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तूच माझी खरी मैत्रीण सखी गं बाई!

कसला झब्बू दिला आहे, सुपर्ब. धन्यवाद.

*

अचानक ३०+ प्रतिसाद माझ्या पाकृला दिसले म्हणून धागा पाहिला. सर्वांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-