चिंकीचे ना (आवडते) सूप)

कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले. तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली. आता काय उत्तर देणार, तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला विचारले, चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग....... . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात. पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर दरवर्षीच्या बजेटमध्ये नेहमीच मुंबईकरांना मूर्ख बनवितातच.

संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे मूर्ख बनविता येईल याची आयडिया आली.

दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो. थोडे भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकला.
भाज्या

कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले. एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले.

सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून उपमा वाढला. पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले. अश्या रीतीने अस्मादिकांनी चिंकीच्या सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.
सूप
मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप ताटात वाढलेली दुधीची भाजी संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लालसुर्ख हा शब्द आवडला, माहीत नव्हता.

...सुर्ख म्हणजे लाल, हे बहुधा सामान्यज्ञान असावे. (तीच गत 'पिवळाजर्द'ची.)

---------

बोले तो, माझ्यासारख्या फारसी-अडाण्यालासुद्धा१अ माहीत असलेले, असे.

१अ याला जबाबदार कोण? नि:संशयपणे शिवाजीमहाराज आणि सावरकर.

आठवा: 'सुर्ख आँचल को दबा कर जो निचोड़ा उसने'२अ किंवा 'सुर्ख होठां'चा कोठलाही उल्लेख.

२अ उरल्यासुरल्या फारसी ज्ञानाची आता जुनी हिंदी चित्रगीते हीच काय ती तारणहार आहेत. आता त्यांचेही ज़ाफ़रानीकरण - आपले, भगवीकरण - होऊ लागले, तर मात्र कठीण आहे.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

ऐकावं ते नवलच!

'सुर्ख आँचल को दबा कर जो निचोड़ा उसने'

आँचल दबा कर निचोडण्याचं कारण म्हणजे तो ओला झाला असावा असं वाटून सुर्ख म्हणजे ओला असा अंदाज लावला होता. भाभूला लाल आँचल दिसल्यावर तो पिळावासा वाटण्याचं फेटिश असेल हे काही सुचलं नाही मला.

*********
आलं का आलं आलं?

ती बरसात की रात होती, बोले तो आँचल ओला होताच, आणि म्हणूनच तिने तो निचोड़ला. हा भाग बरोबरच आहे. परंतु त्याचबरोबर, तो आँचल इन्सिडेंटली सुर्खसुद्धा होता. आता या अवांतर बाबीचा ज़िक्र भाभूला का करावासा वाटला असेल, ते त्याचे त्यालाच माहीत.

(पण लाल आँचल पिळावासा वाटण्याचे फेटिश भाभूला कसे? आँचल तर 'उस'ने निचोड़ला होता ना?)

----------------------------------------------------------------------------

गेस हू'ज़ टॉकिंग!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

नव्हतं बुवा हे सामान्यज्ञान मला!
लालचुटुक, लालभडक, लालेलाल, तांबडालाल हे शब्द ऐकले होते. लालसुर्ख नव्हता ऐकलेला आणि त्याचा अर्थही माहीत नव्हता.

सुर्ख म्हणजे लाल हे सामान्य असलेले ज्ञान मलापण १०-१५ वर्षांपूर्वीच झाले . त्या आधी सुर्ख म्हणजे सुरकुतलेल्या ओठांचे कुणाला का अप्रूप वाटावे असे वाटत असे.

आवडला लेख.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

>>तो आँचल इन्सिडेंटली सुर्खसुद्धा होता. आता या अवांतर बाबीचा ज़िक्र भाभूला का करावासा वाटला असेल

ब्ल्याक अ‍ॅण्ड व्हाइट सिनेमा असल्याने ......... लाल कपडे सेक्शी असतात असा काहीतरी फंडा असतो म्हणून आपण चाळवले गेल्याचं जष्टिफिकेशण देणे हा हेतू असावा.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

छान लिहिलय.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हमामवडीछाप गरीब बेचारा भाभू चाळवला गेलाय हे प्रेक्षकांना कळायला काहीच मार्ग नसे ना.

मला सुर्ख म्हण्जे कोरडं वाटायचं

सुर्ख़ = लाल हे सामान्यज्ञान मलाही ४-५ वर्षांपूर्वीच झाले, त्याअगोदर माहिती नव्हते. पिवळाजर्द (ज़र्द इन वरिजिनल फ़ारसी) चीही तीच गत. झालंच तर स्याह = काळा,
सफ़ेद = पांढरा, सब्ज़ = हिरवा हेही तेव्हाच कळाले. त्यामुळे हरी सब्ज़ी ही कशी द्विरुक्ती आहे हेही लक्षात आले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अच्छा. बंगाली शोबूज म्हणजे हिरवा होय.

*********
आलं का आलं आलं?

येस्सार. कुणा शोबूज चट्टोपाध्याय नामक प्राण्याचे नाव कधीतरी ऐकल्याचे आठवते.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

Smile मस्त

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सफ़ेद = पांढरा,

हे तुला ४-५ वर्षापूर्वी कळले बॅट्या?

सॉरी. हे अगोदर माहिती होते, मात्र अन्य शब्दांसोबत हा शब्दही फारसी मुळाचा आहे हे ४-५ वर्षांपूर्वी समजले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आपले ज्ञान सामान्य आहे हा विनय म्हणायचा का... असो Wink
जर्द, सुर्ख-बद्द्ल मला या धाग्यावरच कळले!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद वाचता वाचता, हसून पोट दुखू लागले. बाकी लाल सुर्ख टमाटरला काय वाटले असेल, काही सांगणे अशक्य. आत्ताच सौ. ने प्रतिसाद वाचले. तिची प्रतिक्रिया इथे लिहू शकत नाही.....

दुधीचे सूप आवडले .नक्की करून बघेल .

लेखाचे शिर्षक घाईत 'चिक्कीचे सूप' असे वाचले. आणि आमच्या लाडक्या चिक्कीतै आठवल्या ROFL

बाकी चालू द्या.

आमच्या लाडक्या चिक्कीतै आठवल्या

?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

चिक्कीतै मालूम नै आपको? कहा रहते हो मिंयाऑ?

दुधीच्या प्युरेत मिरी आणि किंचित मीठ असंही छान लागतं. आणखी हौस असेल तर तूप-जिरं-हिंग फोडणी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.