Skip to main content

मदत हवी : मसाजर आणि नुगा थेरपी

मी सुमारे आठ वर्षापूर्वी नुगा थेरपी ने मसाज / उपचार घेत होतो. त्याने गुढगेदुखी / पाठदुखी व इतर समस्यांवर बर्‍यापैकी फायदा /सुधारणा झाली . परंतु आमच्या शहरातील ते नुगा थेरपी चे केंद्र २०१० साली बंद पडले. त्यानंतर मी अनेक ठिकाणी चौकशी केली ,परंतु हे मशीन घरी बसवण्यास सुमारे दीड लाखापर्यंत खर्च येतो असे समजले. तसेच जुनी मशीन्स ओएलएक्स वर द्देखील ६५०००/- ते ८००००/- पर्यन्त उपलब्ध आहेत. परंतु इतकी इन्व्हेस्टमेंट मसाज साठी करणे मनास पटत नाही . परंतु त्या मसाज चा नक्की फायदा होतो हे खरे आहे. तर काय उपाय करावा?
अमेझोन वर काही सीट मसाजर आहेत, ते कितपत उपयोगी आहेत ? व त्यातील कोणता घ्यावा ? यासंबंधी माहिती व चर्चेची अपेक्षा...

*सूचना- माझे वय सध्या ५० च्या पुढे असून मी कोकणात रत्नागिरीत राहतो. धन्यवाद.