तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?

Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -

१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.

२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं

३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.

४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा

५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.

६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला

७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे

८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.

९) मिलो न तुम तो हम घबराए

--

तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी

--
.
.
.
.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

समजा एखाद्या आधुनिक स्त्रीला सबमिसिव्ह फेटिश असेल तर हे गाणे आवडू शकेल की. नै आवडणार म्हणता?

मान्य.

अशी अनेक गाणी असतील ज्यात स्त्रिया सबमिसिव्ह भावनांचा अ‍ॅव्हलँच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आये वो फूलोंके रथ पर, पडी रहूँ मै पिया के पथ पर" Smile
https://www.youtube.com/watch?v=vqrjpiswtdA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुहुकुहु बोले कोयलिया - हे गाणं आवडत नाही असं कोण आहे इथे ? की मी एकटाच आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ई. स. काय या गाण्याचा? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलय की ..

यातील प्रत्येक कडवे वेगळ्या रागातले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मलाही आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं न आवडण्यामागे एक वैयक्तिक कारण आहे.
माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी दर वर्षी कॉलेजातील स्पर्धेत (ते ही सेमी फायनललाच) हेच गाणं गायची. तिची आणि इलेक्ट्रॉनिक्समधल्या तिच्याच गाण्याच्या क्लास मधील दुसरी मुलगी नेहमी सेमी फायनलला हेच्च गाणे गायच्या आणि फायनलला आलटून पालटून जायच्या. त्यांचं काय ऑब्सेशन होतं त्यांनाच माहित (त्या दोघींना कोयलिया सिसटर्स म्हटले जायचे Wink ). पण दरवर्षी त्या स्पर्धांमध्ये ते गाणं ऐकून या गाण्याचा नॉशिया बसला आहे.

===

असेच पुरुषांच्या आवाजातले दर काँपिटिशनला ऐकू येणरे - आणि म्हणूनच नॉशिया बसलेले गाणे म्हणजे "ए अजनबी, तु भी कभी..." वात आणला होता या गाण्याने! जो उठायचा तो हे गाणे गायचा! कानांवर रेप!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१) शहर की लडकी
२) हाय हुपु (की हुकु?) हाय हुपु हाय हाय, ये लडकी मेरे सामने मेरा दिल लिये जाय जाय
३) जहर हैक्के प्यार है तेरा चुम्मा
४) फूलों सा चेहेरा तेरा कलियों सी मुस्कान है (यात व्यंकटेशची मिशी आणि करिश्मा कपूरच्या भुवया एकाच मापाच्या आहेत)
५) शादी तुझ ही से हो मेरी चही शादी के दिन मर जाऊं
६) कहां राजा भोज कहां गंगू तेली
७) ये काली काली आखें (हे गाणं एवढा वेळ झाला कोणाच्या डोक्यात कसं आलं नाही, कळत नाही)
८) इलू इलू (किंबहुना सौदागर सिनेमातली सगळीच गाणी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दमादम मस्त कलंदर, हे गाणे रुना लैलाच्या आवाजात ऐकायला बरे वाटते पण तेच आशा भोसलेच्या आवाजात अगदीच भिक्कार! विशेषतः आशा जेव्हा मधेच किंचाळते ते तर अगदी डोक्यात जाते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केशवा माधवा, हे एरवी ऐकायला ठीकच गाणे. पण लोकलमधील भिकार्‍यांनी त्याची नावड निर्माण करून ठेवलीय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकल मधल्या भिकार्‍यांचंच काय ... घरासमोर येणारे स्ट्रीट सिंगर लोक पण ह्या गाण्याची वाट लावतात.

केशिवा वा वा वा माधिवा वा वा वा ... तुज्या नामात रे गोडिवा वा वा वा - असं काहीतरी त्याचं विडंबन करून गातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे
मेरे मितवा मेरे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आजा तुझको पुकारे मेरे गीत रे - वीट आला त्याचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कभी अलविदा ना कहना' हे गाणं असंच डॉक्यात जातं. कोणत्याही कार्यक्रमात आपल्या जोडीदाराला उद्देशून काही गा असं फर्मावल्यावर, लोक उठून हे गाणं सुरू करत आणि अगदी नको नको होई. का बा तुझं हे गीत याद रख्खायचं कुणी, ऐसी क्या खास बात है तुम्हारे गीत में, असा चिडकट प्रश्न डोक्यात तत्काळ येईल, असं ते लाचार गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'कभी अलविदा ना कहना' जुने आहे आणि नवेदेखिल आहे.

नक्की कुठले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा सिमी ग्रेवालच्या गाण्याविषयी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जुनं - जुनं. त्या गाण्यात पडद्यावर गरेवालबाई आहेत काय? मी आजतागायत एकदाही ते गाणं कसं दिसतं हे पाहिलेलं नाही. ’चलते चलते... मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना’.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके.

फार्फार वर्षांपूर्वी मेलडी मेकर्स नावाचे एक ऑर्केस्ट्रावाले होते. ते त्यांच्या कार्यक्रमाच्या शेवटी (पडदा पडता पडता) हे गाणे वाजवीत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना अशा वेळी (जोडीदाराला उद्देशून) हे गाणं म्हणायची इच्छा का व्हावी याचा विचार करतोय. काही सुधरत नैय्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु - त्याही पेक्षा मला रोचक हे वाटले की असल्या कार्य़क्रमांना मेघना जाते आणि असली ( जोडीदाराला उद्देशुन गाणी म्हणणारी आणि ती सुद्धा असली ) लोक तिला परीचित असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यात जाऊन बाहेर आलेलं गाणं

"आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत, बुलाते हय"

सुतकी चालीमुळे डोक्यात जायचं.

एक सिनियर होता. त्याने रीतसर ऑडिशन वगैरे देऊन ग्यादरिंगमध्ये हे गाणं गाण्यासाठी शिरकाव करून घेतला. त्या वर्षी ग्यादरिंग अभूतपूर्व सडाऊ झालं. आता त्यात रंग भरणे ही त्याला स्वतःची जबाबदारी वाटली किंवा तो आधीच ठरवून आला होता की काय नकळे, पण त्याने या गाण्याच्या यमकाच्या जागी "टोंय" हा शब्द घालून (आणि सजेस्टिव्ह हावभाव करत) संपूर्ण गाणं म्हटलं.

"आ लौट के आजा मेरे टोंय, तुझे मेरे टोंय, बुलाते है. मेरा सुना पडा है टोंयटोंय, तुझे मेरे टोंय..." वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा तुला शिव्या बसणार बघ आता. हसताना लय कण्ट्रोल करावा लागला राव. तो रामदेवबाबा करतो तसा पोटाचा व्यायाम झाला ऑलमोस्ट. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थ्री इडियट्स आठवले की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत उल्लेखिलेली, माझ्या यादीतही बसणारी नावडती गाणी:
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - यात मुकेश मध्येच "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं" करत करत "कुछ और भी" ला स्वरावरून घसरतो, त्या क्षणाच्या भयापेक्षेत हे गाणं ऐकवत नाही.
लताचं "आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे" डोक्यात जातं.
तलत चं "ऐ मेरे दिल कहीं और चल" - "ऐ मेरे सुर कहीं और चल" असायला हवं होतं.
जरा सामने तो आओ छलिये - [का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही - गब्बर]. हो, मलाही.
मिलो न तुम तो हम घबराए - याचं कारण प्रिया राजवंश आणि राजकुमार!
शब्बीरकुमारचं :"तेरी मेहरबानियाँ तेरी कदरदानियाँ" (यातच जॅकी श्रॉफ आणि तो काळा कुत्रा आहेत, ना?)
'शीशा हो या दिल हो ...' कुठेतरी लताबाईंच्या आवाजात एक कर्कश्श, अभी-तो-मैं-जवान-हूं चा अट्टाहास जाणवू लागला. बहुतेक याच काळात, अशा गाण्यातून. या नंतर काही अपवाद वगळता त्यांची गाणी आवडत नाहीत. खासकरून "एक दूजे के लिये" तली "किंचाळगाणी" (काय जबरदस्त शब्द आहे हा!). "मेरे नसीब में", "चल सन्यासी मंदिर में", सगळीच.
गाइड मधलं "गाता रहे मेरा दिल" ठीक आहे, पण मला "आज फिर जीने की तमन्ना" तेवढं आवडत नाही.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या - अगदी अगदी!!! मला "मालवून टाक दीप" खूप आवडतं, पण मधे "दूर दूर तारकात" आवाज जाऊ लागला की धडकीच भरते; "तरुण आहे रात्र अजुनी" मधे आशाबाईंचा "बघ तुला पुसतो...............च आहे" बद्दलही तसेच. "रुके रुके से कदम" तार सप्तकात गेलं की खरंच "बेकरार" व्हायला होतं
आशाबाईंचा नया दौर मधल्या काही गाण्यांमधला गोग्गोड चढा स्वर - "मांग के साथ तुम्हारा", उफ्फ!
फारएण्ड, मला रफीच्या त्या सगळ्या गाण्यांची चिडचिड होते - सध्या धाकट्या मुलाला ईवनिंग इन पॅरिस च्या गाण्यांचं वेड लागलंय, आणि आसमान से आया फरिश्ता बरोबर "दीवानेका नाम तो पूछो" अंगाईगीत म्हणून म्हणावे लागत आहे. खूप त्रास होतो. पण मला शम्मीपेक्षा जॉय मुखर्जीवर चित्रित गाण्यांची जास्त चिडचिड होते.
निंदिया से जागी बहार - येस्स! "नूरी! नूरी!!" याच सदरातलं.

नितिन मुकेश, सधना सरगम वगैरे नव्वदोत्तर भानगडीत मी पडतच नाहीये.
सेम विथ महेंद्र कपूर आणि "ओ ओ ओ ओ ओ ओ ओ " देशभक्तीपर ओरडणे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे ....

माला सिन्हा इतकी आवडते, गाण्याकडे अन विशेषतः धर्मेन्द्रकडे अज्जिबात लक्ष जात नाही माझं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपकी नजरों ने समझा - चा वीट आलाय.

(माला सिन्हा आवडते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का यार नेही लूट लिया घर यार का..
बिचारा किशनकुमार ! आणि सोनू निगम नवा होता तेव्हा त्याच्यावरचा रफीचा प्रभाव गेला नव्हता.
वीट येऊन शेवटी हे गाणं टाळ डोक्यात मृदुंगांच्या आवाजात भजनी ठेक्यावर म्हणायचा विकृत आनंद होऊ लागला. म्हणजे -
अरे अच्छा सिला दियाहा तुने धिन्ना-धिं-धि-ना तिंन्ना-तिंतिना
यार नेही लूट लिया धिं-तां-क धिं-तां-क धिंतिं - धिन्ना धिं धिं ना तिंन्ना तिंतिना....
--
दिले चीर के देख तेरा ही नाम होगा
--
आशिक़ी चित्रपटातल्या गाण्यांत समीरचे सगळे शब्द डोक्यात जातात. नुसत्या 'जान' शब्दावरच किती गाणी पाडलीत या समीरबाबाने कुणास ठाऊक!
जाने जिगर जानेमन....गाण्यात पुन्हा पुढे जानम जानेजाँ जानम जाने जहाँ.... वगैरे
नि नदीम श्रवणने व्हायलीन्स घासून घासून खळवटून काढलीत.
उदा. जाने जिगर जानेमन - तुधुधु धुत्तुदू
मुझको हैं तेरी क़सम... यापुढे गाणे संपतानाचे व्हायलीन्स ४:४५ पासून पुढे ऐका.
https://www.youtube.com/watch?v=2MIr6GuycTI .

जानम - की गेलीच व्हायलीन्स वर तीव्र स्वरात - जानेजाँ - व्हायलीन्स आनखी वर, जानम - अरे ! पुन्हा तीच व्हायलीन्स् ...जाने जहाँ...तेच तेच तेचतेच.. शेवटी वर गेलेली व्हायलीन्स सगळी पंचर झाल्याप्रमाणे खाली येतात तेव्हा गाणे संपते.
--------
सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

इतरही वाईटच पण त्या जे मुळे गाणे थेट समाप्त.

----
ओ.पी. नय्यर यांच्या अनेक गाण्यांत, ज्यात गाण्याच्या पहिल्या ओळी उडत्या चालीत वा पाश्चात्य सुरावटींशी साधर्म्य दाखवणार्‍या पण कडवे सुरू करताना त्या पाश्चात्य सुरावटींतून एखादी ढोलकी आणून गाणं हिन्दुस्थानी असल्याचा साक्षात्कार करून दिला जाई, ती ढोलकी नि ते चालीचे भारतीयीकरण अत्यंत नावडते.
उदा. बाबुजी धीरे चलना, प्यार में ज़रा सँभलना
-----
ऐका सत्यनारायणाची कथा - एका प्रदीर्घ प्रवासात भल्तेच धार्मिक असलेले डायवर रिपीट मोडवर लावून होते.
-----
ग्रॅन्डफिनाले:

गणपतीत ऑर्चेस्ट्रात कायम बडवलं जाणारं -

ले गयीइइ दिल्मेराआ मन्चलीइइ
खलीवल्लीखलीवल्लीखलीवल्ली
नो प्रॉब्लम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ.पी. नय्यर यांच्या अनेक गाण्यांत, ज्यात गाण्याच्या पहिल्या ओळी उडत्या चालीत वा पाश्चात्य सुरावटींशी साधर्म्य दाखवणार्‍या पण कडवे सुरू करताना त्या पाश्चात्य सुरावटींतून एखादी ढोलकी आणून गाणं हिन्दुस्थानी असल्याचा साक्षात्कार करून दिला जाई, ती ढोलकी नि ते चालीचे भारतीयीकरण अत्यंत नावडते.
उदा. बाबुजी धीरे चलना, प्यार में ज़रा सँभलना

ओपी खूप जुने झाले. जतिन-ललितनी फना सिनेमात ते 'चंदा चमके' की कायशाश्या गाण्यात सुरुवातीलाच ढोलकी आणि इलेक्ट्रिक गिटारचा आवाज असा काही एकत्र केलाय की मस्तकात तिडीक जाते. हे म्हणजे बासुंदीत लोणचं घालून पिण्यातला प्रकार आहे. आणि त्यात शेवटी कोरसमध्ये 'वल्ले वल्ले'?? हे म्हणजे बासुंदी अधिक लोणचं अधिक थोडं चिंचगुळाचं वरण असं काँबिनेशन आहे. वाद्यमेळाच्या दृष्टीने इतकं वाईट गाणं मी आजतागायत ऐकलेलं नाही. अर्थात प्रत्येक गाण्यात पंजाबी ढंगाची ढोलकी वापरली नाही तर बहुतेक जतिन-ललितना त्यांच्या बायका जेवू घालत नसाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या बायकांचे माहित नाही पण पंजाबी निर्माते पैका नक्कीच देत नसावेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला तार-खर्ज सुरांचे प्रचंड हेलकावे आणि वेडीवाकडी वळणे असलेली हेच्च्य् मंगेशकरांची गाणी आवडत नाहीत. उदा. तिन्ही सांजा सखे मिळाल्या. यातले 'देई वचन तुला, आजssपासुन जिवे अधीकतुमाझ्या हृदयाला' भयाण.
आणि सगळी 'बेहना'गाणी. सगळी मुन्नी/मुन्ना बर्ड्डे गाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि सगळी 'बेहना'गाणी. सगळी मुन्नी/मुन्ना बर्ड्डे गाणी.

अतिप्रचंड सहमत. अशी गाणी गाणार्‍यांना पेश्शल तिखटाच्या डायटवर ठेवले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'इस राखी का मतलब है प्यार भैया' - वर्षा उसगावकर डोक्यात जाते. अर्थात तिरंगा हा सिनेमा गाण्यांसाठी बघायचा नाहीच्चे मुळी. पण त्यातलं ते एक 'पी ले पी ले ओ मोरे राजा, पी ले पी ले ओ मोरे जानी' हे गाणं म्हणजे टौकार्याची परिसीमा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी सिनेमातील पोरांच्या मुस्काटात भडकवावीशी वाटते.
"पप्पा सांगा कुणाचे .... पप्पा माझ्या मम्मीचे" हे देखील मठ्ठ गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि ते येss रात येss चाँद नीssफिर्कहाँ
अगदी दोन्ही हातांनी पोट आवळून आळकुंथवणी करीत असल्यासारखे. आणि मग सुन्जा दिल्की दाssस्तान. हुश्य. मिळाला रिलीफ एकदाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हवा हवा ऐ हवा खुशबु लूटा दे
कहां खुली हां खुली जुल्फ बता दे....
.
इतकं भिकार गाणं आहे पण ते आठवलं की टीन-एजची पावसाळी संध्याकाळ अन मैत्रिणी आठवतात. काही गाणी ही भिकार असली तरी निगडीत स्मृती फार गोड असतात - त्यापैकी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हवा हवा' गाण्यासाठी आमच्या खरडवहीत डोकवा कधीतरी.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हवा हवा च्या चालीवर एक फेमस बंगाली गाणे आहे- ओ टुनीर मा. बंगालात वर्ल्डफेमस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्म्म. चाल छान आहे. शब्द रद्दड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे खरच की. ऑफीसातून ते गाणं उघडत नाहीये पण घरी जाऊन ऐकतेच.
बाकी "धीरे धीरे बादल .... मेरा बुलबुल सो रहा है... शोर कुल ना मचा" हे एकदम ओरिजिनल गाणं तुमच्या खवत बरेचदा जाऊन ऐकलेले आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी चांगली, प्रसिद्ध , सुंदरसुंदर गाणी तुम्हाला आवडत नाहीत तर जल्ला तुम्हाला आवाडता काय?
हे म्हणजे सामान्यांना आवडणारी गाणी '- तुम तो ठहरे परदेसी, चिक मोत्यांची माळ(चिक म्हणजे लहान का?), मालवून टाक दीप आशा, लता, रफी, बेताबची गाणी , पोपटाची गाणी, शांताबाई असं काही - काही तुम्हाला आवडत नाही म्हणता !

हुच्चभ्रू कुठले!

मग तुम्हाला आशिकी-१/२, मैने प्यार किया, हम आपके है कोन, चांदनी मधली गाणी अज्जिबातच आवडत नसणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

यांना फक्त के यल सैगल आवडत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला फक्त आठ-दहा प्राचीन हिंदी सिनेमागाणी माहीत आहेत. पण ती सर्व आवडतात. म्हणजे आवडली म्हणून माहितीत राहिली. चले पवन की चाल, पनघट पे कन्हय्या आता है, बाबुल मोरा, इक बंगला बने न्यारा, प्रीतम आन मिलो, अंबुवा की डारी डारी चली पवन मतवाली. (यात दर दर दर दरदा अश्या अर्थहीन शब्दांचा हिंदी सिनेमागाण्यात प्रथम वापर केलेला आहे) वगैरे. पण हा धागा नावडत्या गाण्यांविषयी आहे ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दो नैना मतवारे तिहारे
हम पर जुल्म करे....
निव्वळ गोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. हे खूप आवडते. आठवून दिल्याबद्दल धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला आशिकी-१/२, मैने प्यार किया, हम आपके है कोन, चांदनी मधली गाणी अज्जिबातच आवडत नसणार. >>> बहुतांश नाहीच आवडत. एकतर एस पी बालसुब्रह्मण्यम डोक्यात जातो. असेल तो साउथ चा दिग्गज पण त्याची हिन्दी गाणी बोअर आहेत. चाँदनी मधला विनोद राठोड तर विचारूच नका. किशोर च्या आवाजातील चांगले भाग वगळून उरलेला आवाज कॉपी केल्या सारखा गातो तो टायटल साँग मधे. लगी आज सावन की पूर्वी आवडत असे. आता ते ही बोअर होते.

के एल सैगल आवडतो किंवा आवडत नाही या दोन्हीच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हणजे एकदम जुने आपल्याला न झेपणारे काहीतरी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम तो ठेहेर परदेसी तर मस्तं गाणं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मिरजेत मुसलमानांच्या लग्नात हमखास वाजणारं गाणं. असा एखादा रस्ता मांडव टाकून पूर्ण बंदिस्त केलेला असून सोबतच उत्तम बिरियानी सज्ज होत असावी आणि त्याचसोबत लौडस्पीकरमधून ते गाणे गळतेय असा तो एकदम पेटंट सीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेघना "रोज रोज आंखो तले" मधील मंदाकिनीला घोडतोंडी नटी म्हणतेय मग ती श्वेता शेट्टीला जी खरच ..... असो!
https://www.youtube.com/watch?v=oiq_KkEshSg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदाकिनी फक्त धबधब्याखाली आंघोळ करताना जेव्हा "तू जिसकी खोज मे आया है .." आणि "कोहरे की चादर लपेटे हूं" म्हणते तेव्हाच मस्त दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्वेता शेट्टी आणि इला अरुणला नावं ठेवायचं काम नाही. लता-आशा आणि अशा सगळ्या गोग्गोड आवाजांच्या उंच पट्टी बायांपासून सुटका करून द्यायला सुरुवात करून देणाऱ्यांत ह्या दोघी होत्या हे विसरता येत नाही. शिवाय 'दीवाने तो दीवाने है' ह्या गाण्यांत बाईने माज केलेला दाखवलेला आहे. गाण्याच्या सांगितीक मूल्यापेक्षा लैंगिकता मिरवणारी बाई दाखवण्यामुळे मला हे गाणं आवडतं. सिनेमात जिथे सबमिसीव्ह बायका कशा थोर असं दाखवण्याची परंपरा अजूनही बऱ्यापैकी पाळली जाते तिथे म्युझिक व्हीडीओ हा स्वस्त मार्ग वापरून बायकाही जाड्याभरड्या आवाजांच्या असतात, डँबिस असतात, लैंगिकता ही घाबरण्याची गोष्ट समजण्यापेक्षा स्वतःच्या हातात ताबा घेण्याची गोष्ट आहे आणि पुरुषांचंही भरपूर वस्तूकरण हे सगळं दाखवणारे व्हीडीओज मला आवडतात; गेल्या काही वर्षांत आणखी जास्त आवडायला लागले आहेत. श्वेता शेट्टीचं दुसरं गाणं 'मै देखनी की चीज हूं' हे गाणंही त्याच लायनीतलं.

बाकी त्या काळातली 'परी हूं मै', किंवा वरवर टॉमबॉय दिसणारी फाल्गुनी पाठक, मिलिंद सोमण नावाची चीज दाखवूनही आलिशा चिनॉय वगैरे सगळ्या बौर्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin खरच हे गाणं पाहीलं/ऐकलं नव्हतं.
____

लैंगिकता ही घाबरण्याची गोष्ट समजण्यापेक्षा स्वतःच्या हातात ताबा घेण्याची गोष्ट आहे आणि पुरुषांचंही भरपूर वस्तूकरण हे सगळं दाखवणारे व्हीडीओज मला आवडता

Smile सॉल्लिड Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्वेता शेट्टीचं दुसरं गाणं 'मै देखनी की चीज हूं' हे गाणंही त्याच लायनीतलं

चीज म्हंजे वस्तू. यात स्त्रीने स्वतःचे वस्तूकरण केलेले आहे.

हे गाणं तुम्हाला आवडतं ?? काय ओ अदिती बाई ? फेमिनिझम चा रस्ता सोडलात काय ?

असंच एक दुसरं गाणं - तू चीज बडी है मस्त मस्त. - यात सुद्धा तो तिला "तू चीज बडी है मस्त मस्त" म्हणतो आणि ती म्हैस आनंदाने नाचत्ये. २२ वर्षं झाली या गाण्याला. विश्वास ही नही होता. डोक्यात जाणारं गाणं आहे हे वे सां न ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात सुद्धा तो तिला "तू चीज बडी है मस्त मस्त" म्हणतो आणि ती म्हैस आनंदाने नाचत्ये.

म्हणुनच तो म्हणतोय ना -
नही तुझको होश होश
नही तेरा कोइ दोष दोष Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीज म्हंजे वस्तू. यात स्त्रीने स्वतःचे वस्तूकरण केलेले आहे.

तर मग? तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू? Tongue

थोडक्यात, मुक्त बाईने स्वतःला चीज, चीजी, बूर्ज्वा, उन्मुक्त, बुद्धीमती किंवा काहीही म्हणावं/म्हणवून घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. इतरांनी तिला तिच्या परवानगीशिवाय नावं ठेवू नयेत. एखाद्या स्त्रीला इतरांनी चीज म्हणणं हे नावं ठेवणं आहे का गौरवीकरण आहे हे त्या बाईवर अवलंबून आहे. पण जेव्हा बायकांचा उल्लेख फक्त बिनडोक चीज किंवा सबमिसिव्ह वस्तू असाच होतो तेव्हा तो ट्रेंड - एकेक, सुटा प्रयोग नव्हे - आक्षेपार्ह ठरतो. असा ट्रेंड चालू आहे, भरपूर खपतो आहे हे दिसत असतानाही 'दीवाने तो दीवाने है' म्हणणारी, पुरुषांचं भरपूर वस्तुकरण करून वर त्यांनाच उल्लू बनवणारी श्वेता शेट्टी मला आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हान तेजामारी ... पुर्गी आयकत न्हाय आज !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरांनी तिला तिच्या परवानगीशिवाय नावं ठेवू नयेत.

कुणाला नावं ठेवताना परवानगी घ्यायची संकल्पना रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बरोबर. मी अर्धवट लिहिलं. आपल्याला नावं ठेवणाऱ्या इसमाबरोबर प्रेमचाळे करणाऱ्या हिरविणींना, आणि तसली पात्रं लिहिणाऱ्या, दिग्दर्शित करणाऱ्या सगळ्यांना त्या नगरात नेऊन सोडावं; ज्या नगराबाहेर हनुमान बसून भुभूःकार का हुंकार का कायसंसं करायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'चीज बडी है मस्त मस्त' ला काही बोलायचं नाही काय... आधीच सांगतोय! प्रॉपर चलनातला भिमपलास आहे तो... स्वतःला विद्वान म्हणवणारे पंडित लोकही अशी चीज भिमपलासात रचू शकले नाहीयेत, सगळे लेकाचे राम-श्याम, सांस-ननंद यामधेच अडकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे यार. तु चीज बडी है मस्तं काय अप्रतिम गाणं आहे! हे कस्काय नाय आवडत गब्बर तुला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोनशेच्यावर प्रतिक्रिया येऊनही कुणी सर्दट ,शेंबुडल्या उषा मंगेशकर चा उल्लेखही केला नाही त्यामुळे अपार खिन्नता आली आहे."मै तो आरती उतारू रे संतोषी माता की" हे गाण एके काळी जळी,स्थळी ,काष्ठी पाषाणी ऐकू यायचे या डिप्रेसिंग गाण्याने आत्महत्येचे विचार मनात उसळू लागायचे.उषा मंगेशकरचे शेंबुडले स्वरयंत्र निकामी कसे करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे.हेलनला पापक्षालनासाठी मुंगळा गाण्यावर नृत्य करावे लागले. असतं एकेकाचं नशीब ! सुलताssssना अशी किंकाळी फोडून उषाबाई जेंव्हा सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना , मेरे हुस्नी का अंदाज है "नसताना " (मस्ताना) असे गायला लागल्या की मिथुन तिथून नाहीसा व्हायचा !

मजेशीर विषय आणि अतिशय मनोरंजक चर्चा ! गब्बरसिंगचे आभार .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुलताssssना अशी किंकाळी फोडून उषाबाई जेंव्हा सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना , मेरे हुस्नी का अंदाज है "नसताना " (मस्ताना) असे गायला लागल्या की मिथुन तिथून नाहीसा व्हायचा !

तराना हा बोलून-चालून बजेट बॉलीवूड पिक्चर!

मिथून (गरीबांचा जीतेन्द्र), रंजीता (गरीबांची श्रीदेवी) आणि गाणी गायला उषा (गरीबांची लता)!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिथून (गरीबांचा जीतेन्द्र), रंजीता (गरीबांची श्रीदेवी) आणि गाणी गायला उषा (गरीबांची लता)!!

आम्ही नेमक्या ह्याच गप्पा मारायचो. जोडीला - शिरिष कणेकर हे गरिबांचे पुल्देष्पांडे आहेत असा एक डायलॉग आमचे मित्र निवांत पोपट यांनी मारला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि द्वारकानाथ संझगिरी हे गरीबांचे शिरीष्कणेकर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मिथून (गरीबांचा जीतेन्द्र)

मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ असे ऐकले होते. पण गरिबांचा जितेंद्र??? अगागागागा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत गरीबांचा अमिताभ हेच ऐकले होते. आता ही नवी उपाधी.
मुळात जितेंद्र हाच गरीबांचा सर्वकाही होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@उसंतसखू, उषा मंगेशकरांची काही मराठी गाणी वीट येईपर्यंत लावायचे हे सांगली आकाशवाणी वाले - "खेळ कुणाला दैवाचा कळला", "काय बाई सांगू" ही त्यातली एकदोन.

खेळ कुणाला दैवाचा कळला - लागलं की माझा खून खौलत असे.

--

सुलताना वरून आठवलं ....

निसुलताना रे प्यार का मौसम आया - हे एक डोक्यात जाणारं गाणं. पडद्यावर शशीकपूर आहे. पण ऐकताना असह्य होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ कुणाला दैवाचा कळला - लागलं की माझा खून खौलत असे.

नुसतं असं नाही
खेळ कुणाला दैवाचा कळला...
ट्या-ट्या-ट्या-ट्याँव
मी असो
हा असो
तो असो
कुणी असो..
दैवलेख ना कधी कुणा टळला
(पुन्हा)ट्या-ट्या-ट्या-ट्याँव

निसुलताना रे प्यार का मौसम आया

काळजीपूर्वक ऐकलं तर हे एक वेगळ्याच प्रकारचं गाणं आहे.तसा हा सिनेमा खूपच प्रायोगिक आहे.उदा.भारतभूषणच्या तोंडी किशोर कुमार (तुम बिन जाउ कहां...)या गाण्याचं बंगाली वर्जन (किशोरच्याच आवाजात ) आहे. ते अधिक सुंदर आहे...ए दिन पाखी उडे..जेबे जे आकाशे
खडूस विविधभारतीवाले या गाण्याची फर्माईश आली की मुद्दाम रफीच्या किंगर्‍या आवाजातलं(शशी कपूरच्या तोंडी)असलेलं व्हर्जन लावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

खेळ कुणाला दैवाचा कळला - लागलं की माझा खून खौलत असे.

खेळावरुन आठवले. गावसकरांचे एक गाणे आहे " हे जीवन म्हणजे क्रीकेट राजा" डोक्यात जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐकायला आवडते मला पण पडद्यावर सादरीकरण अगदी साफ निराशा करणारे आहे. काहीतरी कॉलेज पिकनिक मधे एकमेकांवर नाच किंवा काहीतरी दाखवून कुरघोडी करताना म्हंटल्यासारखे. एखाद्या हिमालयातील पार्श्वभूमीवर असलेले टीपिकल प्रेमगीत म्हणून सादर केले असेल असे वाटले होते. त्यात शशी कपूर चा तो सेन्टर ऑफ ग्रॅव्हिटी/मास जे काय असेल ते अंगभर फिरत असल्यासारखा नाच. आशा पारेख च्या डान्स पोजेस ही पिकनिक ला ऑड वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट निसुलताना रे हे गाणे मला ऐकायला फार आवडते. दोन वेगवेगळ्या टेंपोमधली आणखी दोन गाणी मला आठवतात आणि आवडतात. १)नैन द्वार से मन में वोह आये तन में आग लगाये..हाय रे कोई छलिया छल के जाये. (सावन). २) रुक्मिणीनारायण दोघे गरुडाच्या पाठी, नवरानवरीच्या बांधा पदराला गाठी.(बाळा जो जो रे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैन द्वार से मन में वोह आये तन में आग लगाये.

काय आठवण काढलीत राही. वा! काय गाणं आहे. खूप आवडतं मला. ऐकते आत्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैन द्वार से मन में वोह आये तन में आग लगाये.

काय आठवण काढलीत राही. वा! काय गाणं आहे. खूप आवडतं मला. ऐकते आत्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट संपता संपेना

जिवाच्या सखीला किती हांक मारु, कुठे साद घालू
यातल्या कुठे साद घालू, या ओळीवर हमखास हंसायचो, आम्ही मित्र.

घनतमी शुक्र बघ राज्य करी

बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी

झिमझिम झरती या अप्रतिम चालीवर , 'श्रावण' या जागेवरचे सुमनताईंचे खिंकाळणे. (ओरिजिनल जागा, मी स्वतः दशरथ पुजारींच्या तोंडून ऐकली आहे)

पंकज भकास, मनहर भकास, अनुप खलबत्ता यांची कुठलीही गाणी.

उषा खन्ना आणि तत्सम दुसर्‍या दर्जाचे,यांना संगीतकार का म्हणावे, हा लहानपणापासून पडलेला प्रश्न.

महेंद्र कपूरच्या कुठल्याही गाण्यांत, त्याचा आवाज आपल्याला चिकटायला येतो आहे, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनतमी शुक्र बघ राज्य करी

हे जरा धक्कादायक आहे माझ्यासाठी.

माझ्या मते अप्रतिम गाणं आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे बरेच धक्कादायक आहे, उषा खन्ना ला एकेकाळी गरीबांची कल्याणजी आनंदजी म्हणायचे.

मनहर उधास चा आवाज मला आवडतो. अभिमान मधे मुकेश सारखा वाटलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनतमीच्या ध्रुवपदाच्या वेळी ते गाणं आकर्षक वाटतं, पण कडव्यांमधे, चमत्कृती करण्याच्या नादात, फार राबवलं आहे सुरांना! अर्थात, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. इतक्या प्रतिक्रियांमधे, नावडती म्हणून उल्लेख झालेली अनेक गाणी, मला आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक अति येडपट गाणे .

जब तक रहेगा सामोसे मै आलू
तेरा रहूंगा ओ मेरी शालू

माझी बुद्द्धी काम करेनाशी होते कवीची हि अफाट प्रतिभा पाहिली कि ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक से बढकर एक,
लाई मै तोहफे अनेक ....

असं काहीतरी भीषण गाणं ऐकल्याचं अंधुकसं आठवतय ROFL
some things simply cannot be undone.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि - असले काहीतरी भारी आहे पुढे

झुल्फोंकी शाम लायी
दिलसे बदनाम लायी

मजा आयेगा मुलाकातका
क्या प्रोग्रॅम है आज रात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरारा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्ती गणेशकी, अंदर दौलत देश की

हे भीषण गाणं पाहिलं आहे का कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे असलं गाणं खरोखर आहे?
नशीब अजून ऐकलं/पाहिलं नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पाने