चांदण्यांच पांघरूण

चांदण्या भरलेलं आकाश सापडेल का हो कुठे?
किती दिवस झाले आता निवांत जगून.
एकदा हे जगण्याचं ओझ उतरवून ठेवायचंय
मला पुन्हा चांदण्यात झोपायचय

होस्टेलवर नाईट मारायची म्हणून गच्चीवर पडीक रहाव
जीएफ की मैत्रीण असले प्रश्न न पडता मी तुझ्याशेजारी पडून रहावं
हे ऐक कसलं भारीये म्हणून तू तुझ्या हेडफोनचं एक टोक माझ्या कानात घालावस
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचय

स्पर्शाची शब्दांची गरज भासू नये इतकं आपलं मौन बोलक असाव
वार्याने उडणार्या माझ्या केसांना तू हलकेचं मागं कराव
मग ते नाही उडाले तरी तू त्यांच्याशी खेळत रहावंस
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचय

बोचर्या थंडीत मी नकळत तुझ्या मिठीत शिराव
माझी झोप लागेपर्यंत तू स्तब्ध पडून रहावं
पहाटे जाग आली की तू पांघरुन गेलेल्या जॅकेटला मला कवटाळयाचय
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचंय

चांदण्या रात्रींची ती आस तुझ्याही मनात जिवंत असावी
बदललेले संदर्भ विसरून गच्चीत तू माझी वाट पहावी
समाजाच्या चौकटींना झुगारुन मला तुला मिठीत घ्यायचय
त्यासाठी तरी मला पुन्हा चांदण्यात झोपायचंय

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

गच्चीत तू माझी वाट पहावी समाजाच्या चौकटींना झुगारुन मला तुला मिठीत घ्यायचय

Wink हां आता जमलय.
___
कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भन्नाट लिहिलेय....हे असे काही अनुभवायची इच्छा अजुनही अपुर्ण आहे....आणि गच्चीऐवजी समुद्रकिनारा असावा...जिथे दुसरे कोणीच नसावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

why not Wink

काही इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत, त्या आठवणीत सतत रुंजी घालतात...

इथेच शब्द अापल्या मदतीला धावून येतात...

हीच तर भाषेची गोडी आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

काही इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत,

काही इच्छा पूर्ण न होणे हेच सुदैव वाटते. थोडक्यात निसटलो. असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भन्नाट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! धन्यवाद मंडळी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गच्चीत बाकी काहीही करा, फक्त मोठ्याने बोंबलून गाणे गाऊ नका.
नाहीतर 'गुंज उठी शहनाई' मधल्या जोडीसारखं होईल.

https://www.youtube.com/watch?v=pq1fAEVtgKE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0