रिकाम्या अपार्टमेंटमधलं मांजर - विस्लावा झिम्बोर्स्का

रिकाम्या अपार्टमेंटमधलं मांजर

मरणं – मांजरीशी तुम्ही असं वागू शकत नाही.
कारण रिकाम्या अपार्टमेंटमध्ये
मांजर काय करू शकणार?
भिंतींवर चढणं?
फर्निचरला अंग घासणं?
इथलं काहीच बदललेलं दिसत नाही
पण काहीच पूर्वीसारखं नाही.
काहीच हलवलं गेलेलं नाही
पण रिकामी जागा वाढलेली आहे.
आणि रात्री दिवे लागत नाहीत.

जिन्यावर पावलं वाजतात
पण ती अनोळखी आहेत.
बशीत मासे ठेवणारा हात
तोसुद्धा वेगळा आहे.

एखादी गोष्ट
वेळेवर चालू होत नाही
एखादी गोष्ट
घडावी तशी घडत नाही.
कुणीतरी नेहमी, नेहमी इथं असायचं
मग अचानक अदृश्य झालं
आणि हट्टानं अदृश्य राहतंय.

सगळी कपाटं शोधून झाली
सगळे कप्पे धुंडाळून झाले
कार्पेटखालच्या उत्खननात काही निष्पन्न झालं नाही.
कटाक्षानं पाळायचा एक नियमसुद्धा मोडला गेला:
कागद इतस्ततः विखुरले.
अजून करायचं बाकी आहे
झोपणं आणि वाट बघणं, एवढंच.

वाटच बघ, तो येईल याची
तो दिसू दे तर खरं
त्याला धडा शिकव
मांजरीशी कसं वागू नये याचा.
त्याच्या दिशेनं सरकायचं
जणू अनिच्छेनं
आणि अगदी सावकाश
उघडपणे दुखावलेल्या पावलांनी
उड्या नाहीत, चित्कार नाहीत... सुरुवातीला तरी.

- विस्लावा झिम्बोर्स्का
(नोबेल पारितोषिक विजेती पोलिश कवयित्री; मृत्यू: १ फेब्रुवारी २०१२)
भाषांतर इंग्रजीवरून. मूळ पोलिश कवितेचं इंग्रजी भाषांतर इथे सापडेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आणि भाषांतर दोन्ही आवडले.
विश्वावा गेली त्या दिवशी एका मित्राकडून तिच्या आणखी एका कवितेचं हिंदी भाषांतर मिळालं. इंग्लिश भाषांतर इथे आहे.

दोहराया कुछ भी नही जाता।
नतीजा ये है के हम बिना अपना संवाद याद किये
मंच पर चले आते है
और अपनी भूमिका मे समाने से पहले ही लौट जाते है
यह भी सब एक ही बार होता है

चाहे कोई कितना जाहिल हो
कितना ही मूर्ख
उसे अगले साल कही दाखिला नही मिलता
यह पढाई फिर से नही की जाती

कल जैसा नही होता कोई आज
कोई दो रातें नही रचती
एक-सा सुख एक से चुम्बनों में

एक दिन किसी ने यू ही
बातों बातों में ले लिया था तुम्हारा नाम
और मुझे लगा कमरे मे गुलाब ही गुलाब खिल उठे हो

अगले दिन तुम मेरे साथ थे
और मेरी नजरें अनायास घडी पर पड रही थी
सारे गुलाब जाने कब पत्थर बन चुके थे,

तो फिर हम बीतते हुए दिनों को
बेवजह दुख और खौफ के साये मे क्यों जिते है
जब की ठहरता कुछ भी नही
आज भी सिर्फ बीता हुआ कल होता है

हम मिलते है अपनी किस्मत के सितारों तले
मुस्कुराईये और चुम्बनों की सौगात लिये
इस के बावजूद भी हम अलग है
पानी की दो बूंदों की तरह

हिंदी भाषांतर: जयंती प्रसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही कविता आवडली. इंग्रजी अनुवाद वाचता आला नाही (साईट डाऊन आहे), पण हिंदी अनुवाद छान वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

नीटशी कळली नाहिये (माझीच मर्यादा).. इंग्रजी व मराठी वाचल्यानंतरही पुन्हा वाचायला लागेल असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(पहिला शब्द सोडला तर) भाषांतरही झकास जमलेलं आहे.

न जाने क्यो, होता है ये जिंदगी के साथ,
अचानक ये मन,
किसी के जाने के बाद
करे फिर उसकी याद
छोटी छोटी सी बात.

विस्लावा झिम्बोर्स्काला श्रद्धांजली. अशी समर्थ कविता वाचून ती गेल्यामुळेही एक पोकळी निर्माण झालेली आहे असं म्या मांजराला वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>(पहिला शब्द सोडला तर) भाषांतरही झकास जमलेलं आहे.<<

पहिल्या शब्दासाठी काही पर्याय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कविता टचींग आहे. वाईट वाटले वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कल्पना आहे.

पहिल्या शब्दासाठी पर्याय : "मरून जाणे".

- - -
रिकाम्या फ्लॅटमधलं मांजर

मरून जायचे? – मांजरीशी असं नये वागू.
कारण रिकाम्या फ्लॅटमध्ये
मांजर काय करू शकणार?
भिंतींवर चढेल?
फर्निचरला अंग घासेल?
इथलं काहीच बदललेलं दिसत नाही
पण काहीच पूर्वीसारखं नाही.
काहीच हलवलं गेलेलं नाही
पण रिकामी जागा वाढली आहे.
आणि रात्री दिवे लागत नाहीत.

जिन्यावर पावलं वाजतात
पण ती अनोळखी आहेत.
बशीत मासे ठेवणारा हात
तोसुद्धा वेगळा आहे.

एखादी गोष्ट
वेळेवर चालू होत नाही
एखादी गोष्ट
घडावी तशी घडत नाही.
कुणीतरी नेहमी, नेहमी इथं असायचं
मग अचानक अदृश्य झालं
आणि हट्टानं अदृश्य राहतंय.

सगळी कपाटं शोधून झाली
सगळे कप्पे धुंडाळून झाले
कार्पेटखालच्या उत्खननात
काही निष्पन्न झालं नाही.
कटाक्षानं पाळायचा एक नियम
तोसुद्धा मोडला गेला:
कागद इतस्ततः विखुरले.
अजून काय करायचं बाकी आहे
झोपणं आणि वाट बघणं, एवढंच.

वाटच बघ, तो येईल याची
तो दिसू दे तर खरं
त्याला धडा शिकव
मांजरीशी कसं वागू नये याचा.
त्याच्या दिशेनं सरकायचं
जणू अनिच्छेनं
आणि अगदी सावकाश
उघडपणे दुखावलेल्या पावलांनी
उड्या नाहीत, चित्कार नाहीत... सुरुवातीला तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवलेले बदल आवडले. विशेषतः

मरून जायचं? – मांजरीशी असं नये वागू.

भिंतींवर चढेल?
फर्निचरला अंग घासेल?

हे माझ्या भाषांतरापेक्षा अधिक सहज वाटतं. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कविता आवडली.

अनेक वर्षांपूर्वी जी ए कुलकर्णींची एक चारपाच ओळींची गोष्ट वाचली त्याची आठवण झाली. एका छोट्या गावात एका मांजराबरोबर रहाणारा एक कारा माणूस. एक दिवस घरी येतो. नेहमीप्रमाणे आल्यावर मांजराला उचलून घेतो नि म्हणतो "बरं का रे मन्या. आपल्याला पाच रुपयांची पगारवाढ मिळाली बर्का , आजपासून."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझी बायको स्वैपाक करताना आमच्या बोक्याशी प्रदीर्घ संवाद करते : "आधी आपल्याला सिंक रिकामं करायला पाहिजे, काय? का कुकर लावून मग ते करूया ?" बोका तिला उत्तम मार्गदर्शन करतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आताच या कवयित्रीच्या कविता वाचत होते. त्यात ही कविता आढळली. तिच्या बर्‍याचशा कविता कळत नाहीत. अगदी क्वचित एखादी कळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. इतर काहींनी म्हटल्याप्रमाणे "Die—you can’t do that to a cat." ह्याचे भाषांतर किंचित असमाधानकारक वाटले. पण तुम्ही केलाहेत त्याहून चांगला पर्यायही सुचत नाही. मरणं काय, मरून जाणं काय, दोन्हीत इंग्रजी "Die—" पूर्णांशाने उतरल्यासारखा वाटत नाही. कोणत्याही भाषांतरात अशा काही तडजोडी अपरिहार्य असतात हेच खरे.

मला "Just wait till he turns up"चे "वाटच बघ, तो येईल याची" हेही जरा खटकले. 'येऊ देत त्याला'मध्ये अध्याहृत असलेले भाव त्यातील भावनांशी जास्त सुसंगत वाटले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

भाषांतराबद्दल धन्यवाद !! वास्तविक शिम्बोर्स्का बाईंच्या कविता अत्यंत आव्हानात्मक आहेत. ही कविता मूळ पोलिश भाषेत मी गेली तीन वर्षे वाचतो आहे आणि ही पहिलीच ओळ - Umrzeć - tego nie robi się kotu- ही इतकी रहस्यमय वाटते की या कवितेचं भाषांतर करण्याचं धाडस होत नाही. मी इंग्रजी फार कमी वाचतो , त्यामुळे मला या इंग्रजी भाषांतराची कल्पना नाही. शिम्बोर्स्का बाईंची आणखी एक आव्हानात्मक कविता आहे - rozmowa z kamieniem - अर्थात खड्याशी संवाद, ही बाई फार उच्च दर्जाची कवयित्री होती आणि अनुवादासाठी अत्यंत आव्हानात्मक अशा कविता आपल्याला देऊन गेली, सुदैवाने मी त्या मूळ भाषेत वाचू शकतो आणि मराठी मध्ये या कविता लोक अनुवादित करत आहेत आणि वाचत आहेत याचा फार आनंद आहे. धन्यवाद पुन्हा एकदा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

खड्याशी संवाद कविता मी वाचलेली आहे. मला आवडली होती. पण अवघडच वाटली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचि ही कविता काय वाइट आहें। उगाच यूरोपियन नाव आहें महान भारी भारी होय। च्यायला पोलिश नहितार फ़्रेंच नावनेच मराठी लिहायल सुरु केला पाहिजे।

http://www.aisiakshare.com/node/2540

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

Title : On Death, Without Exaggeration
---------------------------------------------------------
It can't take a joke,
find a star, make a bridge.
It knows nothing about weaving, mining, farming,
building ships, or baking cakes.
In our planning for tomorrow,
it has the final word,
which is always beside the point.

It can't even get the things done
that are part of its trade:
dig a grave,
make a coffin,
clean up after itself.

Preoccupied with killing,
it does the job awkwardly,
without system or skill.
As though each of us were its first kill.

Oh, it has its triumphs,
but look at its countless defeats,
missed blows,
and repeat attempts!

Sometimes it isn't strong enough
to swat a fly from the air.
Many are the caterpillars
that have outcrawled it.

Ill will won't help
and even our lending a hand with wars and coups d'etat
is so far not enough.

Hearts beat inside eggs.
Babies' skeletons grow.
Seeds, hard at work, sprout their first tiny pair of leaves
and sometimes even tall trees fall away.

Whoever claims that it's omnipotent
is himself living proof
that it's not.

There's no life
that couldn't be immortal
if only for a moment.

Death
always arrives by that very moment too late.

In vain it tugs at the knob
of the invisible door.
As far as you've come
can't be undone.

- Wislawa Szymborska

-------------------
कवितेचं शीर्षक : "मृत्यूबद्दल थोडं - तिखटमीठ न लावतां"
-------------------

त्याला विनोदाचं वावडं आहे,
एखादा ताराही त्याला शोधता येणार नाही, साधा एक पूल बांधता येणार नाही,
काहीही घ्या : विणणं, खाणकाम, शेती, जहाजकाम किंवा अगदी एखादा केक बनवणं.
मात्र आपल्या प्रत्येक उद्याच्या प्रत्येक बेतात
याचा शब्द अखेरचा -
आणि तोही निरर्थक.

बरं किमान याच्या स्वतःच्या कामाचं याला काही जमेल
तर तेही नाहीच :
की बाबा थडगं खणेल,
शवपेटी बनवेल,
काही नाही तर किमान आपलं काम संपलं तर थोडी साफसफाई तरी.

मारून टाकण्याच्या धबडग्यात हा नेहमी इतका व्यग्र की
ते काम कसंतरी करतो
ना त्याला ताळ ना तंत्र.
प्रत्येकाला मारणं म्हणजे जणू पहिलंच काम असल्यासारखं सारं.

हो, अर्थात त्याने बर्‍याचदा मैदान मारलंय,
पण अगणित वेळा कसा हरलाय तेपण पहा ना,
कित्तीदा तरी याचा वार हुकलाय
आणि हज्जारदा एक काम परत परत करावं लागलंय याला.

आणि कधीकधी तर हा इतका दुबळा बनतो की
हवेतली साधी माशीसुद्धा फटका मारतां मरत नाही
आणि साधेसाधे सुरवंटसुद्धा याच्या पकडीतून निसटून जातात.

कित्ती द्वेष करा, उपयोग व्हायचा नाही
आणि आपण केलेली सर्व युद्धं नि केलेले बंडावे
सगळे अपुरे पडतात.

अंड्यांच्या आतल्या जीवांमधे धुगधुगी राहातेच
बाळांची हाडं बळकट होत राहातात
बिया नव्या जोमाने अंकुर धरत राहातात
आणि दुसरीकडे मोठेमोठे वृक्ष उन्मळून पडतात

"हा सर्वशक्तीमान आहे" असं म्हणणाराच
जणू तो तसा नाहीये
याची जितीजागती निशाणी बनलेला असतो.

असा एक जीव या जगात नाही
ज्याने मरणाला जिंकलं नाहीये
भले मग एखाद्या क्षणाकरता का असेना

मृत्यू कितीही अटळ असो
त्या क्षणाने त्याला हुकवलेलंच असतं

आपल्या अदृष्य दाराशी त्याने येऊन
कितीही जरी ते वाजवलं तरी
तुम्ही जिथवर आलाय
ते तर त्याला पुसता येणार नाही कधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला विश्वावा षंबोर्स्काची आणखी एक कविता आवडली. तिचं पोलिशमधून इंग्लिश भाषांतर करणाऱ्यांना सादर प्रणाम. मराठी भाषांतर करून शब्दांची गंमत तशीच ठेवणं मला शक्य नाही, म्हणून फक्त इंग्लिश भाषांतरच.

The onion, now that's something else.
Its innards don't exist.
Nothing but pure onionhood
fills this devout onionist.
Oniony on the inside,
onionesque it appears.
It follows its own daimonion
without our human tears.

Our skin is just a cover-up
for the land where none dare go,
an internal inferno,
the anathema of anatomy.
In an onion there's only onion
from its top to its toe,
onionymous monomania
unanimous omninudity.

At peace, of a piece,
internally at rest.
Inside it, there's a smaller one
of undiminished worth.
The second holds a third one,
the third contains a fourth.
A centripetal fugue.
Polyphony compressed.

Nature's rotundest tummy,
its greatest success story,
the onion drapes itself in its
own aureoles of glory.
We hold veins, nerves, and fat,
secretions' secret sections.
Not for us such idiotic
onionoid perfections.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पोलिश मानसिकता , काव्यात्मता इंग्रजी किंवा मराठी भाषांतरातून आपल्यापर्यंत पोचणे जवळपास अशक्य आहे! "Poetry is that what is lost in translation!". पण ही नोबेल मिळालेली कवियत्री काय प्रकारच्या कविता लिहीत होती हे तरी समजले. सर्व पोस्टरना आणि भाषांतरकारांस धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या कवयित्रीच्या ज्या काही कविता मी वाचल्यात त्यात मला सर्वात आवडलेली - conversation with a stone
नेटवर संपूर्ण सापडत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0