तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद ची आठवण....

‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं...
कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला. चित्रपट होते-‘बेवफा,’ ‘बारिश’ अाणि ‘नवबहार.’ पैकी बारिश मधे एक कव्वाली हाेती, त्यांत तलत देखील एक गायक होता-

‘एक नजर में दिल भरमाए, सूरत हो तो ऐसी हो...’

तसंच ‘नवबहार’ मधे देखील त्याची एकच गझल होती-

‘किसी सूरत लगी दिल की बहल जाए तो अच्छा हो,
तमन्ना एक नए सांचे में ढल जाए तो अच्छा हो...’

पण ‘बेवफा’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होता. त्यातील

‘सर मिला आपके कदमों पे झुकाने के लिए...’

‘दिल मतवाला लाख सम्हाला फिर भी किसी पर आ ही गया...’

‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’

‘तू आए न आए तेरी खुशी हम आस लगाए बैठे हैं...’

ही तलत ने म्हटलेली गीते पुन्हां-पुन्हां ऐकावी अशीच आहेत. छोट्या पडद्यावर ‘बेवफा’ बघतांना मला ते दिवस आठवले, जेव्हां तलतचं एक गीत मिळवण्यासाठी रेडियोला अक्षरश: कान लावून बसावं लागे. मी नववीत असतांना एके दिवशी रेडियोवर (सीलोन) सकाळी साडे सात वाजता ‘पुरानी फिल्मों के गीत’ कार्यक्रमात ‘दिले नादान’ मधील तलत महमूद चं एक गीत ऐकलं-

‘जो खुशी से चोट खाए, वो जिगर कहां से लाऊं,
किसी और को देखे, मैं वो नजर कहां से लाऊं...’

तुला सोडून दुसरयाला बघणारी ‘नजर’ मी कुठून आणूं...?

किती गोड कल्पना आहे...! या शब्दांनी, या कल्पनेनं जाणवलं की या गायकाची बात ही कुछ और है...त्यापूर्वी मी तलतची प्रचलित गीतेच ऐकली होती. पण या ‘जिगर,’ ‘नजर’ या शब्दांनी मनांत कायम घर केलं. आणि मी रेडियो सीलाेनचा नियमित श्रोता झालो. ‘त्या’ कार्यक्रमांत वाजवलं गेलेलं तलतचं एकच गीत एेकून मन आनंदाने भरून जात असे. मग तो अख्खा दिवस कसा छान जायचा. तसंच ज्या दिवशी त्या कार्यक्रमांत तलतचं गीत नसे, त्या दिवशी चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. मुख्य म्हणजे या कार्यक्रमांत तलत ची जी गीते ऐकायला मिळायची, जी सहजासहजी इतरत्र सापडली नाही. याच दरम्यान एके दिवशी ‘एस कुमार्सची फिल्मी मुलाकात’ मधे तलतची मुलाखत ऐकली. त्यांत तलतनी त्याच्या अावडीच्या गीतांमधे ‘तस्वीर बनाता हूं...,’ ‘हमसे आया न गया...’ व ‘मुहब्बत ही न जाे समझे...’ ही गीते ऐकवली होती. या मुलाखातीमुळे देखील तलत खूप जवळचा वाटू लागला.
ते रेडियोचे दिवस, श्रवणभक्ति करण्याचे दिवस होते. त्याकाळी तलतची गीते ऐकतांना, ते शब्द लिहून घेतांना मनाला नेहमी प्रश्न पडायचा की ही इतकं सुंदर काव्य असलेली ही गीते याने कुणासाठी म्हटली असतील व यांचं चित्रण कसं काय झालं असेल...? गीते कोणती बरं...

‘मेरे ख्यालों में आके गले लगा जा मुझे,
कि आज फिर मेरा जी चाहता है रोने को...’
-कुणासाठी रडणार होता हा...?

‘मुहब्बत में कशिश होगी तो इक दिन तुमको पा लेंगे,
उसी सूरत में हम बिगड़ी हुई किस्मत बना लेंगे...’
-हा दृढ विश्वास कुणा करितां होता...?

‘महलों में रहने वाली, घर है गरीब का...’
-कोण तो बिच्चारा नायक आणि ती राणी बनून गेलेली नायिका कोण बरे असेल...?

‘मान करे क्या रंग रुप का, तू कागज का फूल है,
तुझमें खुशबू ढूंढ रही है ये दुनिया की भूल है...’
-बाप रे...! काय घोडं मारलं नायिकेनं याचं की हा इतका रागावला...?

‘दुनिया बहुत बुरी है दुनिया में बसने वालों,
मेरी तरह न रोना कुछ देर हंसने वालों,
रोया हूं जिंदगी भर इक बार मुस्कुरा के...’
-हे कटु सत्य याने कुणाला बरं सांगितलं असेल...?

‘कभी तनहाइयों में इक ऐसी भी घडी आई,
बहुत रोने की कोशिश की मगर फिर भी हंसी आई...’
-एकटेपणांत असा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी येतोच की..., पण याने कुणाला सांगितला असेल हा अनुभव...?,

पण...या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडणं केवळ अशक्य होतं. कारण जरी आमच्या शहरांत नऊ थिएटर होते तरी, त्याकाळी सुद्धा तलतची गीते असलेले चित्रपट त्यांत लागण्याची शक्यता कमीच होती...यावर उपाय एकच होता की जेवढी मिळतील तेवढी तलतची गीते ऐकायची, लिहून ध्यायची, गुणगुणायची व मनमुराद आनंद लुटायचा. त्या गीतांमधे जी शायरी, जे काव्य आहे त्यांत बालिशपणा, उथळपणा नावाला देखील नाही. त्यातील सोपे पण गूढार्थाने भरलेले शब्द...कदाचित म्हणूूनच त्याकाळी तलतचं एक गाणं दिवसभर सोबत असायचं, ते शब्द जणू कानांत घुमत राहायचे...
ते शाळेचे भारावलेले दिवस होते. वाचनाची गोडी कळूं लागली होती, कान तयार होत होते, शास्त्रीय संगीत नुकतंच कुठं आवडूं लागले होते. तसं नाट्य संगीत जवळचं होतं म्हणां पण माणिक ताईंचा ‘भटियार’ अन त्या पाठोपाठ येणारया ‘अकेली मत जइयो राधे जमुना के तीर...’ वरुन जीव आेवाळून टाकावांसा वाटायचं...याच काळांत तलतची गीते कानावर पडली आणि मी त्याचा चाहत्यां मधे सामील झालो...

‘नमक छिडकते हैं ले-ले मजा वही आंसू,
हाय रे वही आंसू,
जो तेरे दर से मिले दिल के जख्म धोने को...’
‘गुनाह’ मधील या गीताचे संगीतकार होते स्नेहल भाटकर. किती सुंदर कल्पना आहे...

‘दरबार’ मधे तो म्हणतो-
‘मैं ऐसी कातिल नजर के सदके कि जिसने मेरा गुरुर तोडा,
जो सर कहीं भी न झुक सका था वो सर झुकाया तेरी गली में...’
-इतका प्रांजळपणा क्वचितच सापडतो...

‘न घबरा आसमां पर छाया है आज अगर बादल,
यही बादल तो चंदा के निकलने की निशानी है...’
-‘वारिस’ मधील हा आशावाद अप्रतिम असाच होता.

चित्रपट गीते म्हटली की त्यांत नायिकेचं वर्णन येणारच की. तलत देखील याला अपवाद नाही. आपण तलत पुरताच मर्यादित विचार केला तर पुन्हां असं जाणवतं की त्याने म्हटलेल्या अशा गीतांमधे देखील एक शालीनता, मर्यादा आहे. त्या वर्णनांत अश्लीलता नाहीं. पण एक मात्र खरं की त्या गीतांमधील कल्पना, त्या अपेक्षा देखील निराळ्याच, इतरत्र कुठेहि न सापाडणारया.

‘सलाम-ए-मुहब्बत’ मधे तो नायिकेची तुलना फुलाशी करतांना म्हणतो-
‘मैं तुझको अगर एक फूल कहूं, तेरे रुतबे की तौहीन है ये,
तेरा हुस्न हमेशा कायम है, दमभर के लिए रंगीन है ये...
दिन-रात महकते रहने की कलियों ने अदा तुझसे पाई,
ये चांद जो घटता-बढता है दरअस्ल है तेरी अंगडाई...’

‘छाया’ मधील गीतांत ती मिळाल्यानंतर मिळालेल्या आनंदाला तो शब्द रूप देतो-
‘आंखों में मस्ती शराब की काली जुल्फों में रातें शवाब की,
जाने आई कहां से टूट के मेरे दामन में पंखडी गुलाब की...’

‘नकाब’ च्या एका गीतामधे नायिकेच्या बेरुखीचा देखील सुंदर वापर होता-
‘वो उनकी परदादारियां वो उनकी बेरुखी,
दिल मेरा लूटने के ये बहाने बन गए...’

वारयाने भुरभुर उडणारया तिच्या केसांकडे बघत तो ‘अनमोल रतन’ मधे म्हणतो-
‘जब किसी के रुख पे जुल्फें आ के लहराने लगीं,
हसरतें उठ-उठ के अरमानों से टकराने लगीं...’

तलत महमूद एका गैर फिल्मी हिंदी गझल मुळे प्रकाशझोतांत आला. ती गझल होती-
‘तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी,
ये तेरी तरह मुझसे तो शरमा न सकेगी...’
तुझा फोटो, छायाचित्र माझ्या काहीच कामाचं नाही...कारण तो फोटो मला बघून तुझ्या सारखा लाजू शकणार नाही ना...

म्हणून असेल कदाचित तसवीर या शब्दाशी तलतचं जवळचं नातं जाणवतं.

‘नादान’ मधे तिच्या तसवीर मधे त्याला आपली तकदीर दिसते-
‘आ तेरी तसवीर बना लूं, मैं अपनी तकदीर बना लूं...
दिल के कोरे कागज पर, उल्फत की लकीर बना लूं...’

‘बारादरी’ मधे तो तसवीर बनवायचा प्रयत्न करतोय,...स्वप्न तर बघितलंय, कैनवास वर त्याला आकार देता येत नाहीये...म्हणून तो अस्वस्थ आहे-
‘तसवीर बनाता हूं, तसवीर नहीं बनती,
इक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती...’

तलतच्या चित्रपट गीतांमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बरेचशा चित्रपटांत त्याच्या वाट्याला फक्त एकच गीत आलंय. गंमत म्हणजे त्या चित्रपटांचं नाव घेतांच सर्वात पहिले आठवतं ते तलतचंच गीत, त्यातील इतर तपशील लगेच आठवत नाहीत. या श्रेणीतील काही चित्रपट आज छोटया पडद्यावर बघतांना जाणवलं की तलतचं ते गीत त्या कथानकांत अगदी चपखल, फिट बसलंय. उदाहरणार्थ-

‘मदहोश’ नाव घेताच आठवते ही गझल-
‘मेरी याद में तुम न आंसू बहाना न जी को जलाना मुझे भूल जाना...’

‘किनारे-किनारे’ म्हणतांच आठवतं हे गीत-
‘देख ली तेरी खुदाई, बस मेरा जी भर गया...’

‘बाज’ म्हणताच आठवते ही गझल-
‘मुझे देखो हसरत की तसवीर हूं मैं...’

‘दायरा’ नाव घेतांच आठवते ही गझल-
‘आंसू तो नहीं हैं आंखों में पहलू में मगर दिल जलता है,
होठों पे लहू है हसरत का आरा सा जिगर पर चलता है...’

चित्रपटाचं नाव घेत चला, तलतचं गीत कानांत घुमूं लागतं-

‘आशियाना’-‘मैं पागल मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे...’
‘छोटे बाबू’-‘दो दिन की मुहब्बत में हमने कुछ खोया है कुछ पाया है...’
‘रेशमी रुमाल’-‘जब छाए कभी सावन की घटा...’
‘टैक्सी ड्राइवर’-‘जाएं तो जाएं कहां समझेगा कौन यहां दर्द भरे दिल की जुबां...’
‘एक साल’-‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’
‘बहाना’-‘बेरहम आसमां, मेरी मंजिल बता है कहां...’
‘यास्मीन’-‘बेचैन नजर बेताब जिगर ये दिल है किसी का दीवाना...’
‘शिकस्त’-‘सपनों की सुहानी दुनिया को आंखों में बसाना मुश्किल है...’
‘एक गांव की कहानी’-‘रात ने क्या-क्या ख्वाब दिखाए...’
‘आराम’-‘शुक्रिया, ऐ प्यार तेरा शुक्रिया...’

सगळीच एकापेक्षा एक अजरामर गीते...

‘अादमी’ चित्रपटांत मुहम्मद रफी सोबत तलतचं एक द्वंद्व गीत होतं-

‘कैसी हसीन आज बहारों की रात है...’

यात तलत महमूदचा स्वर शोकाकुल प्रियकराचा आहे-

‘आई हैं वो बहारें कि नग्मे उबल पडे, ऐसी खुशी मिली है कि आंसू निकल पडे,
होठों पे हैं दुआएं मगर दिल पे हाथ है... अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है...’

या गीताची सिचुएशन आठवून बघा. तिथे तलतचा आवाज अगदी परफेक्ट आहे...पण चित्रपट बघतांना मात्र रसभंग होतो...कारण तिथे तलत ऐवजी हे शब्द महेंद्र कपूरच्या आवाजात आहेत. मला वाटतं अशा प्रयोगांमुळेच भारतीय चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली असावी. कारण याच काळांत चित्रपटांमधे नायकांचं महत्व वाढू लागलं होतं...

तलत महमूद नी काही चित्रपटांमधे अभिनय देखील केला होता. त्यातील ठळकपणे आठवतात ते ‘सोने की चिडिया,’ ‘दिल-ए-नादान,’ व ‘एक गांव की कहानी.’ पैकी ‘सोने की चिडिया’ मधे त्याच्या सोबत नूतन-बलराज साहनी होते. या दोन मातब्बर कलाकारां समोर वेगळं करण्यासारखं तलत जवळ काहीच नव्हतं. पण ‘दिल-ए-नादान’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होतां. यात पीस कंवल नायिका होती. त्यातील

‘मुहब्बत की धुन बेकरारों से पूछो...’
‘ये रात सुहानी रात नहीं ऐ चांद-सितारों सो जाओ...’
‘जो खुशी से चोट खाए मैं वो दिल कहां से लाऊं...’

ही गीते लाजवाब अशीच होती. तरी

‘जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया...’ हे गीत ऐकतांना आज देखील मन हळहळतं... हेच या गीताच्या यशाचं गमक असावं.

गेल्या वीस वर्षांत छोट्या पडद्यावरील निरनिराळया चैनल्समुळे तलतची बरीच गीते ‘त्या’ चित्रपटांतून बघतां आली. त्यात ‘देवदास’ चा ‘मितवा...’ व ‘किसको खबर थी किसको यकीं था ऐसे भी दिन आएंगे...’ होते. तसंच मनहर देसाई-मीना कुमारीच्या ‘मदहोश’ मधील ‘मेरी याद में तुम न आंसू बहाना...’ देखील होतं. ही गीते बघून कानां सोबतच डोळयांचं पारणं फिटलं. तलत माझ्या पीढीचा गायक नाही. तरी देखील त्याने मला वेड लावलं व आपलंसं करून घेतलं. तलतची गीते ऐकतांना वाटतं की तो आपल्याच भावनांना मूर्तरुप देताेय.
सेटमैक्स वर ‘बेपफा’ बघतांना गंमत वाटत होती की एकेकाळी मनाला भुरळ पाडणारया ‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’ या गीतामधे नरगिस चक्क स्वीमिंग सूट घालून वावरली होती. पण रेडियावर पहिल्यांदा हे गीत ऐकलं, तेव्हां नरगिस ध्यानीमनी देखील नव्हती. मन भुललं हाेतं ते त्या आवाजातील सोप्या शब्दांवर, त्या आर्जवावर. किती आर्जव आहे तलतच्या आवाजात...तो म्हणतोय-

‘बात करने के लिए कौन तुम्हें कहता है,
ना कराे हमसे कोई बात, मगर देख तो लो...’
-माझ्याशी बोलावंच लागेल अशी सक्ती नाहीये तुझ्यावर...पण एकदा...फक्त एकदाच माझ्याकडे बघून तर घे...यावर कुणी कसं बरं रूसुं शकेल...

तलत आज नाही...पण त्याने म्हटलेली गीते अजरामर आहेत. त्याच्या गीतांकडे बघतांना शेवटी त्याच्याच शब्दांत म्हणावंसं वाटतं-

‘शुक्रिया, इस मेहरबानी का तुम्हारी शुक्रिया,
जब ख्यालों में बुलाता हूं ताे आ जाते हो तुम...’ (चित्रपट: नाजनीन).

---------------------

हा फक्त योगायोग होता कां...!

दो पहलू वाले गीत, म्हणजेच दोन निरनिराळया गायकांनी म्हटलेलं एकच गीत बरयाच चित्रपटांमधे होते. आपण फक्त तलत महमूद आणि लता मंगेशकर या दोनच गायकांचा विचार केला तर चटकन आठवतात ती ही गीते-
‘दाग’ मधील ‘ऐ मेरे दिल कहीं आैर चल...’
‘टैक्सी ड्राइवर’ मधील ‘जाएं तो जाएं कहां...’
‘एक साल’ मधील ‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’
‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला लाख संभाला फिर भी किसी पर आ ही गया...’

या पैकी ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधील या गीतांमधे एक साम्य आहे. ते म्हणजे लता दीदींनी म्हटलेली ही तिन्हीं गीते सेड मूड मधील आहेत. पण ‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला...’ हे गीत मात्र लता दीदींनी उल्हसित मूड मधे म्हटलंय.
‘बेवफा’ बघितल्या वर मनांत सहज एक विचार आला. वर उल्लेखिलेल्या तिन्हीं चित्रपटांमधे म्हणजेच ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधे लता दीदींनी गायलेली गीते सेड मूड मधे होती पण या चित्रपटांचा शेवट मात्र गाेड होता. उलट ‘बेवफा’ मधे लता दीदींचं गीत उल्हसित मूड मधे होतं पण या चित्रपटाचा शेवट मात्र शोकान्त होता...या चारहि चित्रपटांमधे दो पहलू वाल्या या गीतांचा दुसरा गायक नेमका तलत महमूद होता...

हा फक्त योगायाेग होता कां...!

रवींद्र दत्तात्रय तेलंग.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

नीट अगदी नीट वाचायचा आहे हा लेख. अत्यंत आवडता गायक आहे.... अ-त्यं-त. सुसंस्कृत-मखमली-आवाज.
____

‘जो खुशी से चोट खाए, वो जिगर कहां से लाऊं,
किसी और को देखे, मैं वो नजर कहां से लाऊं...’
तुला सोडून दुसरयाला बघणारी ‘नजर’ मी कुठून आणूं...?
किती गोड कल्पना आहे...!

वा! अशा ओळी वेगळ्या काढून समोर ठेवल्या की वाटतं हीरी कोंडणात सजवुन ठेवला आहे समोर.
___
वाचते. ही आधीची पोच.
____
रवींद्रजी - https://sanjopraav.wordpress.com/2007/02/07/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%...
हा अजुन एक चांगला लेख.
_____

दो पहलू वाले गीत, म्हणजेच दोन निरनिराळया गायकांनी म्हटलेलं एकच गीत बरयाच चित्रपटांमधे होते.

वारीस मधील "राही मतवाले" Smile सुरैय्य ने एकदा , तलतने एकदा, दोघांनी एकदा गायले आहे.
https://www.youtube.com/watch?v=funBs-fw9GE
_____

‘वारिस’ मधील हा आशावाद अप्रतिम असाच होता.

वारीसमध्ये तलतच्या डायलॉग्स मधील आवाज ऐकून माझे पाय लटपटतात, त्राण जातं ............ (रोमँटीक भावनेकरता कदाचित ही विचित्र उपमा आहे. पण असच काहीसं होतं). कसं काम केलं सुरैय्याने? She must be so brave to keep composure.
_____

‘बात करने के लिए कौन तुम्हें कहता है,
ना कराे हमसे कोई बात, मगर देख तो लो...’
-माझ्याशी बोलावंच लागेल अशी सक्ती नाहीये तुझ्यावर...पण एकदा...फक्त एकदाच माझ्याकडे बघून तर घे...यावर कुणी कसं बरं रूसुं शकेल...

Smile __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी फक्त ‘दाग,’ ‘टैक्सी ड्राइवर,’‘एक साल’ व ‘बेवफा’ या चार चित्रपटां पुरताच विचार केलाय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

ओह ओके. Smile
हे सिनेमे यु ट्युबवर पाहीले जातील.
___
अन्य चित्रपटांवरती तलत - पार्ट २ येणार आहे का? सहज विचारते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी नववीत असतांना एके दिवशी रेडियोवर (सीलोन) सकाळी साडे सात वाजता ‘पुरानी फिल्मों के गीत’ ....

बास बास बास !!! यू मेड माय डे.

-

तलत च्या अनेक गाण्यांना असं "टच" करून तुम्ही आठवणींचा एक आख्खा जथ्था जागवलेला आहे. तलत हे असं रसायन होतं की त्याच्या गाण्यांची संख्या मर्यादित असूनही अढळ स्थान होतं. माझी व माझ्या एका मित्राची मैत्रीच मुळी तलत या कॉमन पायावर झालेली आहे. तुम्ही नमूद केलेलं प्रत्येक गाणं व त्याच्यासोबतच्या त्या गप्पा, पार्ट्या, ती मदिरा, ते किस्से, ते खिदळणं, त्या सहली हे सगळं लख्ख समोर आलं आज. आमचे आणखी एक मित्र (त्यांना ह्या धाग्याचा दुवा पाठवलेला आहे) तर तलत ची गायकी या विषयात डॉक्टरेट मिळवतील इतकं धबधब्यासारखं बोलतात. मी शाळेत होतो तेव्हाचा एक किस्सा: तलत चं गाणं "आसूं समझ के क्यू मुझे आंख से तुमने गिरा दिया" लागलेलं आणि मी चटकन तलत चं गाणं असं ओरडलो. माझी एक मावसबहीण ही माझ्यावर इतकी खूश झाली होती की मला कॅडबरी घेऊन दिली होती तिने. तिला तलत चा आवाज ओळखायला जमायचे नाही. का कोण जाणे.

तलत ची दुर्लक्षित गाणी सुद्धा काही कमी नाहियेत. उदा. ओ दिलदार बोलो इकबार. यात राजा गोसावी ला बघून मी उडालोच होतो. "प्यार पर बस तो नही मेरा लेकिन फिर भी" हे सुद्धा विविधभारती व सिलोन वर फार कमी लागायचं. "भरम तेरी वफाओंका मिटा देते तो" हे सुद्धा क्वचितच लागायचं.

तलत च्या द्वंद्वगीतांची तर एक माळ च्या माळ आहे. "कहता है दिल तुम् हो मेरे लिये" ह्यात शम्मीची मिशी बघून करमणूक झाली होती. पण तलत व आशा दोघांनी पडद्यावरच्या शम्मी व मीनाकुमारीला न्याय दिला असं वाटतं. "इतना न मुझसे प्यार बढा", "टिम टिम टिम तारों के दीप जले", "हा हा रिमझिम के ये प्यारे प्यारे", "ये नई नई प्रीत है", "सीने मे सुलगते है अरमान" ही नेहमीच लागायची. एकतर सिलोन वर किंवा विविधभारतीवर. पण "दिल मे समा गये सजन फूल खिले सजन सजन" हे गाणं मात्र सिलोन वाले "ठेवणीतल्या रेशमी कपड्यांसारखं" कधीतरीच काढून लावायचे. या गाण्याची चाल, शायरी वगैरे... तारीफ ... जितनी की जाए कम है.

गाण्याच्या भेंड्या खेळताना सुद्धा तलत ची गाणी कुणी फारशी म्हणायचंच नाही. का कोणजाणे. टीव्हीवर अंताक्षरीत सुद्धा अन्नु कपूर तलत चं गाणं म्हणा असा आग्रह कधी धरायचा नाही किंवा स्वतः कधी गायचा नाही. अन्नु कपूर चांगल्या गात्या गळ्याचा आहे. तलत असा फार कुणाच्या रडार वर नसायचाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम मस्त,

तुमच्या आठवणी खूपच छान आहेत।

खरंय, तलतच्या वाटेला सहसा कुणीच जात नसे।

पण मला मात्र तलत आवडायचा। गाता गळा नसल्यामुळेच असेल कदाचित मला देवाने कान दिले असावे।

मुकेशचं ते देवर मधलं आया है मुझेफिर याद वो जालिम...मला सोपं वाटतं ।

तलतचं मुहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार का जाने... मला लई आवडतं आणि मी छान गातो दे खील म्हणजे आपल्या गळ्याच्या गुणधर्मा प्रमाणे ।

एक घटना, इथे राम मंदिरात कार्यक्रम द्यायला लहान बहिणी च्या मैत्रिणी आल्या होत्या। कार्यक्रमानंतर एक दिवस मुक्काम होता। आम्ही त्यांचं गाणं ऐकत होतो। इतक्यांत मला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला। मी सांगितलं तलतचं गाणं ऐकाल। हो मिहणाले तर मी मुहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार क्या जाने...म्हटलं। सगळ्यांना आवडलं। किती छान गाता तुम्ही, अशी कॉम्प्लीमेंट पण मिळाली।

तलत नी हे गीत तीन वेगवेगळ्या रागांत म्हटलंय।

करो फरियाद सर टकराओ अपनी जान दे डालो,
तडपते दिल की हालत हुस्न की दीवार क्या जाने ।

या कडव्यांत त्याने करुणेचा (वेदनेची) परिसीमाच गाठली आहे, असं मला वाटतं।

खूप नंतर शांताराम बापूंचा परछांई बघितला। शांताराम हे गीत गात असतांना नायिका जयश्री सतार वाजवते।
तिचे रिफ्लेक्सेस खूपच सुरेख आहेत।

असो। मोबाइल बोंबलला लेकाचा।

भेटतो विश्रांती नंतर।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

रवींद्रजी मीटींग चालू असताना नका हो टाकू असे बावनकशी लेख. इथे हे करु का ते असं झालय. वाचू का काम करु? Sad
सोप्प उत्तर आहे - वाचते आहे Wink
_____

शालीनता, मर्यादा

येस्स्स हेच ते शब्द. हीच तलतची ओळख.सु-सं-स्कृ-त!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचू का काम करु? Sad

हा काय प्रश्न झाला? काम डीफर करायचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या रेडिओ सिलोनबद्दल बर्‍याच म्हातार्‍या लोकांकडून कौतिक ऐकलय. हा प्रकार कधी बंद पडला? आणि एवढा छान होता तर बंद का पडला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हातार्‍या लोकांकडून

ROFL मी सकाळी सकाळी ऊठण्याच्या वेळी सिलोन ऐकलय नेहमी. बाबा रोज लावायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि एवढा छान होता तर बंद का पडला?

बंद पडला नाहिये. आऊट ऑफ सर्क्युलेशन झालाय. म्हंजे ते "ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग है, पच्चीस और इकतालीस मिटर बँड पर" असं आजही ऐकू येतं रेडिओ लावलात तर. पण युट्युब्, एफेम वगैरेंनी त्याला झाकोळून टाकले. सिम्पल सब्स्टिट्युशन इफेक्ट. घोडागाड्या गेल्या आणि मोटारगाड्या आल्या. eraksoldies नावाचा एक युजर आजकाल सिलोन चे कार्यक्रम युट्युबवर अपलोड करतो. ऑडिओ फॉर्मॅट मधे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तलत मेहमूद आणि तलत अजीज या दोघांना रेशमी आवाजाची दैवी देणगी आहे.
लेख सुंदर आहे.
तलत मेहमूदचा एक किस्सा सांगतो.

सुरुवातीला तलत मेहमूदने आपल्या विशिष्ठ आवाजाला लाजुन गायनाचे क्षेत्र सोडायचा निर्णय घेतला होता पण संगीत्कार अनिल विश्वास यांनी
त्याला त्याचा असा विशिष्ठ आवाजच कसा सुंदर आणि एकमेवाद्वितिय आहे हे पटवून त्याचा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले.

तलत महमूद यांनी मराठी चित्रपटातही मोजके पण उत्तम गायन केले.

उदा : "हसले आधि कुणी तू का मी तू का मी "

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओम शान्ति ओम

तलत बद्दलची आणखी एक आठवण : सज्जाद हुसेन ने एकदा तलत ला सिगरेट ओढताना पाहिलं. आणि तेव्हापासून सज्जाद तलत ला गलत महमूद म्हणायला लागला. ( ऐकीव ष्टोरी )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे बिलासपुरला एका रिकार्डिंग सेंटर वाल्या कडे तलत ची गीते विचारली तर त्याने लिस्ट दाखवली. त्यांत तलत आणि मुकेश या दोघांनी सोबत म्हटलेली गझल होती.

मी लगेच टेप करुन घेतली.

कालाच्या प्रवाहात टेप रेकार्डर आउट डेटेट झाला आणि ती कैसेट बेकार झाली...

ती गझल कुठेच सापडली नाही..

त्यांत मला आठवतं दाग आणि मीर ची शायरी होती.

मुखडा एक होता. एक शेर याचा तलत नी म्हटलेला तर दूसरा शेर दुसरयाचा मुकेश नी म्हटलेला...

ती गझल आठवली तरी आज मन हळहळतं...

आज तलत वरील लेखावरील इतका उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला तर हा अनुभव शेयर करावासा वाटला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

https://www.youtube.com/watch?v=zkrrlAkw-c4

जस्ट शोधली तर ही सापडली. मात्र अवघड शब्दांमुळे, अ‍ॅप्रिशिएट करता येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थैंक्यू।

हीच गझल होती।

रसग्रहण उद्या करीन। ऑफिसच्या समोर एकटा मीच आहे। बाकीचे गेले घरी।

गुड नाइट एंड अगेन थैंक्स।

खरं म्हणजे तुम्ही दिलेल्या धाग्यावर या दोघांची एक गजल अजून आहे।

पण सकाळी सहा वाजता उठायचंय। पावणे तीन वाजलेत।

काय आहे, सहा वर्षांची छोकरी आहे, रश्मि। ती उठवून देते।

चला गुड नाइट।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

गालिब ची गझल आहे ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तलत, हा माझ्या मनांतला एक हळवा कोपरा आहे. त्याच्या उतारवयांत तो जे कार्यक्रम करायचा, त्यांतील एक मी पुण्याला ऐकला होता. लोकांच्या फर्माईशी गाजलेल्या गाण्यांच्या असायच्या. पण त्यांत, कुणी जाणत्याने एखादे अनवट गाणे म्हणायला सांगितले तेंव्हा तलत खूष झाले, पण नम्रपणे म्हणाले, या गाण्याचा मी रियाझ केला नाहीये. त्यामुळे, आजतरी मी हे गाऊ शकणार नाही.
त्यांची 'बाबुल' चित्रपटांतली गाणी ऐका,
हुस्नवालोंको न दिल दो- आणि या गाण्यावर दिलीपकुमारचा अभिनय
दुनिया बदल गयी
खुशीके साथ दुनियामें, हजारो गम भी होते है
मिलतेही आँखे दिल हुवा परवाना किसीका

तलत-मदनमोहनची गाणी खास. त्यांतच, 'फिर वोही शाम' हे ऐकलं की, अजूनही माझ्या डोळ्यांत पाणी तरळतं. आणि त्यांतला तो कडव्यावर येतानाचा फ्ल्यूटचा अप्रतिम पीस. अनिल विश्वास यांनी तलतच्या आवाजाचे सोने केले.
तलत, ही लेखमालिकाच चालू कराना. अजूनही कित्येक रसिक जागे होऊन त्यावर आपले मन मोकळे करतील.
तुम्ही हा लेख लिहून माझा तो हळवा कोपरा जागा केला आहे.

अवांतरः गब्बरने प्रतिसाद देऊन आमची दांडी उडवली आहे. शुक्रिया, गब्बरसिंग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तलत-मदनमोहनची गाणी खास. त्यांतच, 'फिर वोही शाम' हे ऐकलं की, अजूनही माझ्या डोळ्यांत पाणी तरळतं. आणि त्यांतला तो कडव्यावर येतानाचा फ्ल्यूटचा अप्रतिम पीस.

काय कलेजा-खल्लास गाणं आहे ते !!! त्या जोडीला त्याच चित्रपटातलं "मै तेरी नजर का सुरूर हूं" हे पण ऐकलं असेलच. काय साला नजाकत आहे त्या गाण्याची. हे तलत नं गायलंयच व नंतर लताबाईंनी पण त्यातला मुखडा गायलाय "जब जब तुम्हे भुलाया" च्या सुरुवातीला. नंतर त्याच चित्रपटातलं ते "ए सनम आज ये कसम खाए" हे जरा प्रॉब्लेमेटिक आहे. त्यात लताबाईंचा व तलत चा आवाज वेगवेगळ्या गल्लीतला वाटतो. म्हंजे लताबाई वरच्या गल्लीत व तलत मधल्या आळीत. "तेरी आंख के आसूं पी जाऊ" सुद्धा ठीकठाकच आहे.

( आज घरात कंबख्त वाईन पण नाहीये. मेरे दिल के दाग जलते है. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज घरात कंबख्त वाईन पण नाहीये. मेरे दिल के दाग जलते है.

वा वा, जिंकलत राव!
मेरा प्यार मुझे लौटा दो, मैं जीवनमें उलझ गया हूँ, तुम जीना सिखला दो
या ओळी आपोआप आठवल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

क्या बात है!

मैंने जिसको जीवन समझा,

तुमने उसकी हंसी उड़ाई।

दिखा दिखा फूलों के सपने,

मुझको कांटों की राह बताई।

मेरा अपना गम लौटा दो,

मेरे गीत मुझे लौटा दो,

मेरा प्यार मुझे लौटा दो...।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

हां,

रात्री ते गीत पहिल्यांदा ऐकलं।

दुसरयांदा पुन्हां लावलं त्यावेळी लिहून घेतलं...

या निमित्ताने ३५ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले...

तेव्हां रेडियोला अक्ष्ररश: कान लावून गाणं टीपून ध्यावं लागत असे...

मंगलवारी रात्री पुन्हां याचा प्रत्यय आला...

ऑफिसचा गार्ड अचंबित होऊन बघत होता की बुवा करुन काय राह्यले...

त्या गझल मधे तलत चे शब्द आहेत

जोशे गिरिया से अब आखें अब्रे मैसां हाे गईं,

अब मेरी बेताबियां भी मशहूरे दौरां हो गईं...।

मर गए हम एक इशारे पर निगाहे नाज के,

अाज अपनी मुश्किलें एक पल में आसां हाे गईं...।

वो न आए जब शबे वादा न आई मुझको नींद,

आरजुएं दिल की सब ख्वाबे परीशां हो गईं...।

मुकेश चे शब्द आहेत-

सब कहां कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गईं,

खाक मे क्या सूरतें होंगी कि पिन्हां हो गईं...।

रंज से फू गर हुआ तो मिट जाता है रंज,

मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसां हो गईं...।

नींद उसकी है दिमाग उसका है रातें उसकी है,

तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं...।

किती गूढार्थ असलेले शब्द आहेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

हां,

ते गीत ऐकलं।

दुसरयांदा लावलं त्यावेळी लिहून घेतलं...

या निमित्ताने ३५ वर्षांपूर्वीचा तो काळ आठवला...

रेडियोला अक्ष्ररश: कान लावून गाणं टीपून ध्यावं लागत असे...

काल रात्री पुन्हां याचा प्रत्यय आला...

गार्ड अचंबित होऊन बघत होता की बुवा करुन काय राह्यले...

त्या गझल मधे तलत चे शब्द आहेत

मर गए हम एक इशारे पर निगाहे नाज के,

अाज अपनी मुश्किलें एक पल में आसां हाे गईं...।

वो न आए जब शबे वादा न आई मुझको नींद,

आरजुएं दिल की सब ख्वाबे परीशां हो गईं...।

मुकेश चे शब्द आहेत-

सब कहां कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गईं,

खाक मे क्या सूरतें होंगी कि पिन्हां हो गईं...।

रंज से फू गर हुआ तो मिट जाता है रंज,

मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसां हो गईं...।

नींद उसकी है दिमाग उसका है रातें उसकी है,

तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं...।

किती गूढार्थ असलेले शब्द आहेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

हां,

ते गीत ऐकलं।

दुसरयांदा लावलं त्यावेळी लिहून घेतलं...

या निमित्ताने ३५ वर्षांपूर्वीचा तो काळ आठवला...

रेडियोला अक्ष्ररश: कान लावून गाणं टीपून ध्यावं लागत असे...

काल रात्री पुन्हां याचा प्रत्यय आला...

गार्ड अचंबित होऊन बघत होता की बुवा करुन काय राह्यले...

त्या गझल मधे तलत चे शब्द आहेत

मर गए हम एक इशारे पर निगाहे नाज के,

अाज अपनी मुश्किलें एक पल में आसां हाे गईं...।

वो न आए जब शबे वादा न आई मुझको नींद,

आरजुएं दिल की सब ख्वाबे परीशां हो गईं...।

मुकेश चे शब्द आहेत-

सब कहां कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गईं,

खाक मे क्या सूरतें होंगी कि पिन्हां हो गईं...।

रंज से फू गर हुआ तो मिट जाता है रंज,

मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी कि आसां हो गईं...।

नींद उसकी है दिमाग उसका है रातें उसकी है,

तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं...।

किती गूढार्थ असलेले शब्द आहेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

नींद उसकी है दिमाग उसका है रातें उसकी है,
तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं...

.
फक्त कातिल शब्द!
.
ही उर्दू शायरीतील प्रेयसी इतकी निष्ठुर का असते? आणि प्रियकर किती भावुक!
.
या विषयावरचं एक इंग्रजी गाणं आहे-
https://www.youtube.com/watch?v=BPNiYrUT2f4

a hard headed woman,
a soft hearted man
been the cause of trouble
ever since the world began.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शायर म्हणतोय

नींद उसकी है दिमाग उसका है रातें उसकी है,
तेरी जुल्फें जिसके बाजू पर परीशां हो गईं...

रात्रीची झोप त्या भाग्यवानाच्या नशीबी आहे ज्याच्या खांद्यावर तुझे मोकळे केस विखुरलेले असतील...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

होय रवींद्रजी तो अर्थ बरोबर आहे. मला इन जनरल म्हणायचे होते की प्रेयसी निष्ठुर व प्रियकर भावुक
किंवा
मग प्रियकर सय्याद आणि प्रेयसी बुलबुल Smile

एकंदर यिन-यांग फार प्रखर आहे उर्दू शायरीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता शायरी म्हटली की वर्णनंच येणार की...

मनातली घुसमट कशी बाहेर येणार तर ती कागदावर येते...

प्रेयसी म्हटली की ती कायम निष्ठुर एक समीकरण ठरलेलं आहे...

शांताराम बापूंचा नवरंग एकदाच अवतरतो...

नाही कां...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

होय नवरंगमधील संध्या सतत कामात व्यग्र आणि व्यवहारी, किंचीत रुक्षच म्हणा ना .. ती कन्या राशीची आहे. आधी कामधाम मग प्रणय Smile काम पूर्ण होत नाही तोवर मनास शांती नाही.

झैरात - कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

a hard headed woman,
a soft hearted man
been the cause of trouble
ever since the world began.

हे तर शाश्वत सत्य आहे...

याला कुणीच नकारू शकत नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

पुण्यात टिळक स्मारक मंदिराकडून पेरूगेटकडे जायला लागलं की डाव्या हाताला फ्रेंड्स म्युझिक नावाचं एक दुकान होतं. आता आहे की नाही माहिती नाही.
त्यांच्याकडे जुन्या/नव्या गाण्यांचं मोठं कलेक्षन होतं आणि ते कॅसेट्वर ती टेप करून देत असत.

११-१२वीत असताना तलत नुकता आवडू लागला होता. त्या फेजमध्ये असताना त्यांच्याकडे असलेल्या गाण्यांच्या जाडजूड बाईंडरमधून तलतची गाणी शोधून काढली होती.
काल अडगळीमध्ये काहीतरी शोधत असताना जुन्या कॅसेट्सचं खोकं आणि त्यातली ती तलतची कॅसेट्पण सापडली. आणि आज हा लेख वाचला.

त्या कॅसेट्वरची गाणी कोणती होती हे सहज बघितलं. बहुतेक सगळी वरती लिहिली आहेत. सगळी आज आवडतातच असं नाही. पण एकत्र यादी राहावी म्हणून इथे लिहितोय.

ये हवा ये रात ये चांदनी - संगदिल
मैं दिल हूं एक अरमानभरा - अनहोनी
शाम ए गम की कसम - फूट्पाथ
मेरी यादमें तुम ना आंसू बहाना - मदहोश
आंसू समझके - छाया
देखली तेरी खुदाई - किनारें किनारें
मैं पागल मेरा मनवा पागल - आशियाना
सब कुछ लुटाके होशमें - इक साल
मुहब्बतही न जो समझे - परछाई
जलते है जिसके लिये - सुजाता
तस्वीर बनाता हूं - बारादरी
इतना ना मुझसे तू प्यार बढा - छाया
ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल - आरझू
जली जो शाखे चमन - तराना
ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग
जिंदगी देने वाले सुन - दिल-ए-नादान
चल दिया कारवां - लैला मजनू
फिर मुझे दीदारे तर - मिर्झा गालिब
जायें तो जायें कहां - टॅक्सी ड्रायव्हर
रात ने क्या क्या ख्वाब दिखाये - एक गांव की कहानी
दो दिनकी मुहब्बत में हमने - छोटे बाबू
अश्कोने जो पाया है - चांदी की दीवार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या कैसेट मधल्या गीतांची सूची नक्कीच बहुमोल आहे...

मला वाटतं त्या कैसेट वर नंबर असेल..., कंपनीचा नंबर असेल किंवा इतर माहिती देखील असूं शकेल...ती या लिस्ट बरोबर यायला हवी...

आपण इतकी तसदी घेतलीच आहे तर हा डिटेल ही देता आला तर पहा...

काय आहे बरेचदा असं होतं ना की कलाकाराचं नाव माहीत असतं, पण कैसेट नंबर मुळे देखील माहिती काढता येते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

ही गाणी फ्रेंड्सचे लोक त्यांच्याकडच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्सवरून एक एक टेपवर रेकॉर्ड करून देत असत.
तुम्हाला हवी ती गाणी आणि हव्या त्या क्रमाने.
ही काही कोणा कंपनीने काढलेली स्टॅंडर्ड कॅसेट नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह। मज जवळचा संच बघीन।

अरे हो, आज याची गरज कुठाय। सगळं काही यू ट्यूब वर आहेच की।

एक मात्र खरं वर तुम्ही दिलेली लिस्ट बघून मजा आली।

कारण...

इतक्यातच मी तलतची

सपनों की सुहानी दुनिया को आंखों में बसाना मुश्किल है..., मोहब्बत ही न जो समझे...ही गीते ऐकली।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आंखों-आंखों की है जा बात, कहां ले जाऊं,

दिल के खामोश इशारात कहां ले जाऊं...।

जिनपे बिखरे हुए जुल्फों की तेरे साये हैं,

वो महकते हुए दिन-रात कहां ले जाऊं...।

याद ने तेरी जलाए हैं जो पलकों पे दिये,

खूबसूरत सी ये सौगात कहां ले जाऊं...।

जिनकी बूंदों ने जलन और बढ़ा दी दिल की,

ये सुलगती हुई बरसात कहां ले जाऊं...।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

सुंदर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी,

ये तेरी तरह मुझसे तो शरमा न सकेगी...।

तसवीर तेरी दिल मेरा...।

मैं बात करुंगा तो ये खामोश रहेगी,

सीने से लगा लूंगा तो ये कुछ न कहेगी

आराम वो क्या देगी जो तड़पा न सकेगी,

तसवीर तेरी दिल मेरा...।

ये आंखें हैं ठहरी हुई चंचल वो निगाहें

ये हाथ हैं सहमे हुए और मस्त वो बाहें,

परछाईं तो इनसान के काम आ न सकेगी...।

तसवीर तेरी दिल मेरा...।

उन होठों को फैयाज मैं कुछ दे न सकूंगा,

इस जुल्फ को मैं हाथ में भी ले न सकूंगा,

उलझी हुई सांसों को ये सुलझा न सकेगी,

तसवीर तेरी दिल मेरा...।

------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

‘आंखों में मस्ती शराब की काली जुल्फों में रातें शवाब की,
जाने आई कहां से टूट के मेरे दामन में पंखडी गुलाब की...’

या ओळींकरता मनात हळवा-मोस्ट कोपरा आहे. भारतवारीत बाबांनी आईची आठवण काढताना या ओळि माझ्याबरोबर शेअर केल्या होत्या. नाही ऐकू शकत ते गाणं आता. पण माझ्यामध्ये कविमनाची रसिकता कुठुन आली त्याचा मात्र शोध त्या भारतवारीत लागला.
________________

अशा गीतांमधे देखील एक शालीनता, मर्यादा आहे. त्या वर्णनांत अश्लीलता नाहीं.

खरे आहे अतिशय सुसंस्कृत आवाज.
___________

मन भुललं हाेतं ते त्या आवाजातील सोप्या शब्दांवर, त्या आर्जवावर. किती आर्जव आहे तलतच्या आवाजात...तो म्हणतोय-

‘बात करने के लिए कौन तुम्हें कहता है,
ना कराे हमसे कोई बात, मगर देख तो लो...’

-माझ्याशी बोलावंच लागेल अशी सक्ती नाहीये तुझ्यावर...पण एकदा...फक्त एकदाच माझ्याकडे बघून तर घे...यावर कुणी कसं बरं रूसुं शकेल...

ओहोहो क्या बात है|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

मुहब्बत ही न जो समझे वो जालिम प्यार का जाने

परत वयानुसार लक्षात आलेला अर्थ - माझी नादान (कदाचित वयाने लहानही असेल, अल्लडपण अजून गेलेले नाही अशी)प्रेयसी जिथे मनातील हळवे भावच जाणत नाही, तिथे ती प्रीतीचा उत्कट इजहार ,प्रकटन कसे समजू शकेल. कशी रिझवु शकेल.
असो.
मला तरी हा अर्थ लागतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको