मेरी अमृता

मनापासूनची नाती कधी संपत नाहीत.... खरंच आहे! अमृताने साहिरवर अगदी मनापासून प्रेम केलेलं....वेडं प्रेम असलं तरी आंधळं प्रेम नव्हे! ते खरं होतं, अगदी सच्चं होतं!! आणि ते खरं असल्यामुळेच जगापासून लपवून ठेवण्याची त्यांना गरज पडलीच नाही. इमरोज़पासून तर तिने काहीच लपवलं नाही त्याला लिहिलेल्या अनेक पत्रांतून अमृता तिच्या आणि साहिरबद्दलच बोलत असे... आणि म्हणूनच साहिर ला इमरोज़ही खुल्या दिलानी, मोकळ्या मनानी भेटत असे... पहिल्यांदा साहिर अमृता आणि इमरोज़ भेटले ते दिल्लीमध्ये, तेव्हा इमरोज़ मोकळा होता पण साहिर कुठल्याश्या गोष्टीमुळे काहिसा उदास होता. त्या रात्री तिघांनी खूप गप्पा मारल्या. आणि एकत्र काही (व्हिस्कीच असावी) प्यायले.... ते तिनही ग्लास साहिरच्या टेबलवर तसेच होते, अमृता आणि इमरोज़ तिथून निघून आल्यानंतरही तसेच होते. त्या रात्री साहिरने एक कविता लिहीली आणि साधारण अकरा बाराच्या दरम्यान अमृताला फोन करून ती कविता ऐकवली आणि सांगितले कि तो त्या ग्लासेस मधून अलटून पालटून व्हिस्की पितोय सतत...ही त्या तिघांची पहीली भेट होती...रात्री फोनवर ऐकवलेली कविता...

" मेरे साथी खाली जाम,
तुम आबाद घरों के वासी,
हम है आवारा बदनाम "

पुढे 'दूज का चाँद' नावाच्या सिनेमात रफीने ही कविता गायली आहे...

पुढं काही काळानी मुंबईमध्ये ते तिघे परत भेटले ती त्यांची दुसरी भेट होती...पण अचानक इमरोज़ला ताप भरला आणि तो वाढतंच गेला... ताबडतोब साहिरने आपल्या डाॅक्टरला अमृता इमरोज़शी जोडून दिलं आणि इमरोज़वर उपचार सुरू झाले... त्या रात्री अमृताने एक कविता लिहीली....

"तुम्हारा अस्तित्व हर फासले से बेनयाज है |
तुम्हारा अस्तित्व राह भी है, मंजिल भी
हकीकत की तरह,
धरती पर एक जगह पर भी खड़ा है,
और कल्पना की तरह,
हर जगह हर पसारे में भी...
इस दुनियामें
मुझे जहां भी जो कुछ अच्छा लग रहा है,
यह सब तुम्हारे अस्तित्व के कारण है...
तुम्हारा अस्तित्व इसकी पृष्ठभूमि है,
तुम्हारा अस्तित्व इसका क्षितिज है..."

हे असं निखळ, निरलस, स्वच्छ, पारदर्शी प्रेम सोबत असतानाही आणि सोबतीच्या क्षणांनंतर दूर गेल्यावरही आपली ताकदच बनतं! आपल्या अस्तित्वाला कुणाच्या आधाराची किंवा कुठल्याही टेकूची गरज नसते पण हे असं पारदर्शी, नितळ, निस्पृह प्रेम किंवा या प्रेमाच्या नुसत्याच आठवणीही सोबत असतील तर आपल्या अस्तित्वाला झळाळी लाभते हे खरंय! .....

~अवंती

5
Your rating: None Average: 5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मला थोडं कठीण जातं अश्या

मला थोडं कठीण जातं अश्या प्रेमकहाण्या वाचणं

समजू शकते, पण अमृता म्हणजे

समजू शकते, पण अमृता म्हणजे फक्त प्रेमकहाण्या नाहीत आणि हे येईल पुढे (स्माईल)

आम्ही अस्सेच आहोत

इमरोज़ स्वभाव सायको डिस ऑर्डर

इमरोज़ स्वभाव सायको डिस ऑर्डर नव्हता, प्रेम कलणं डिसऑर्डर असल्यास तो असू शकेल. प्रितम सिंग शी लग्न फार काळ टिकलं नाही अमृताचं. साहिर हे ते लग्न न टिकण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण होतं. त्यावेळी साहिरपण अमृताच्या प्रेमात होता. दोघे एकत्र राहू शकत नव्हते आपापल्या कामांमुळे. नंतर साहिर च्या आयुष्यात सुधा मल्होत्रा आल्यावर साहिर अमृतापासून लांब गेला किंवा अमृतानेच त्याला लांब केलं असं म्हणता येईल. लांब जरी केलं असलं तरी साहिरवरचं प्रेम कमी नव्हतं झालं. इमरोज़ अमृताचा कम्पॅनियन होता. जोडीदार, साथीदार, मित्र... हो हे खरंय की अमृता साहिरमय झाली होती, इमरोज़ला ती सारंच सांगायची, तो ऐकून घ्यायचा याचा अर्थ ती सायो डिस ऑर्डर होत नाही. चाळीस वर्ष ते दोघे एकत्र राहीले, साहिर अमृता दोघेही तितकेच मनस्वी, अत्यंत मनस्वी माणसं फारकाळ एकत्र राहू शकतात अशी शक्यता जरा कमीच! याबद्दल अजूनी लिहीलय ते ही येईलच हळू हळू पुढे... तूर्तास इतकंच!

आम्ही अस्सेच आहोत

अगदी

इमरोजच्या वागण्याला सायको डिसऑर्डर म्हणणं मलाही मुळीच नाही आवडलेलं .

मुळात प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे त्याचा भूतकाळ , स्वभाव आणि ह्याशिवायही बरेच घटक कारणीभूत असतात . केवळ तुम्हाला त्याच्या वागण्याचं कारण समाजात नाही म्हणजे तो सायको आहे असं नाही .
प्रेम म्हणजे केवळ स्वामित्व नव्हे . आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला प्रेमात , आनंदात पाहणे हे देखील प्रेमच आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे . आणि माझं ते खरं मानणाऱ्या दुराग्रही व्यक्तींना मुळीच पटणार नाही हेही मला माहिती आहे पण परत एकदा , इमरोजच्या वागण्याला सायको डिसऑर्डर म्हणणं मलाही मुळीच नाही आवडलेलं .

-सिद्धि

इमरोज चा स्वभाव हा

इमरोज चा स्वभाव हा सायको-डीस-ऑर्डर म्हणुन समजली जाते का? मला तरी त्याचे वागणे पॅथॅलॉजिकल वाटते.

खरे तर काही बेसिक प्रश्न आहेत, लेखात आधीच ग्लोरीफिकेशन आहे त्यामुळे माझा हा प्रश्न अस्थानी आहे. त्यामुळे हा प्रश्न काढुन फेकुन द्या पटला नाही तर मालक/ संपादक मंडळी.

अस्थानी वगैरे काही नाही.

अस्थानी वगैरे काही नाही. माझ्या ही लेखांवर वेगळ्याच चर्चा झडत असतात. दुसरा अँगल दिसला तर हवाच आहे की. विचार ना प्रश्न. नाहीतर खव/व्यनि त प्लीज दे ... वेळ मिळाल्यास. मला उत्सुकता आहे.
.
बाय द वे, यातील कोण अमृताचा नवरा होता? म्हणजे उरलेला प्रियकर समजेल म्हणुन म्हटले Sad

मला जास्त माहीती नाही पण

मला जास्त माहीती नाही पण माझ्या मते नवरा कोणीच नव्हता. ती इमरोज बरोबर रहात होती, किंवा इमरोज ला तिने ठेवला होता म्हणु.

ती कायम साहीरच्या मागे, साहीर तिला सोडुन दुसर्‍यांच्या मागे. इमरोज तिला चिकटुन बसलेला.
ही इमरोज ला साहीर आणि तिच्या मधल्या प्रेमाचे ( आणि संबंधांचे ) कौतुक सांगणार. इमरोज वा वा म्हणणार.
अरे काय चाललय काय? म्हणुन म्हणले इमरोज च्या वागण्याला काही सायकॉलॉजिकल आजाराचे नाव आहे का?

सॉलिड! अमृता प्रीतमचे नऊ

सॉलिड!
अमृता प्रीतमचे नऊ स्वप्ने, मै तनु फिर मिलुंगी या कविता व https://www.lifepositive.com/visions-of-divinity/ हा लेख एवढच वाचले आहे. मनस्वी आणि अत्यंत निर्मीतीक्षम कवयित्री असावी. बाकी माहीती नाही.

मला पण कोणी इमरोज सारखा

मला पण कोणी इमरोज सारखा मिळाला तर "ठेवायला" आवडेल, तुला?

नाही मला जर लेम आणी अन्य

नाही मला जर लेम आणी अन्य अफेअर चालवुन घेणारा मिळाला तर मला घृणा येइल. माझ्या पुरुषाने संपूर्ण स्वामित्व गाजवावं असे माझे मत आहे. सॉरी अँटाय-फेमिनिस्टच असेल किंवा येड्यागत असेल पण जो है वो....

अग तसं नाहीये शुचि.

अग तसं नाहीये शुचि. आयुष्यातला खरा पुरुष साहीरच ( तत्सम ), हा दुसरा नुस्ता ठेवलेला. तो लेम असला तरी वाईट वाटुन घ्यायचे कारण नाही. त्याला किंम्मत आहे कुठे?

मुळ प्रश्न हा आहे की, सध्याच्या माझ्या साहीर ला मी इमरोज ठेवलेला चालणार नाही. आणि मला साहिर नी कोणा सुधा मल्होत्राच्या मागे लागलेले चालणार नाही.

मला व्यनित बोलायला आवडेल कारण

मला व्यनित बोलायला आवडेल . मी तुला व्यनि करेन.

स्वागत!

खूप छान !
अजून वाचायला आवडेल!

-सिद्धि

लिखाण

लिखाण आवडलं. अधिक लिखाण तुमच्याकडून इथे व्हावं अशी शुभेच्छा.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हृदय लककन हलले. शब्दन शब्द

हृदय लककन हलले. शब्दन शब्द आवडला. प्लीज असेच अजुन लिहा. अन मग ते ४ ओळीचे का असेना, पण लिहा.

प्रयत्न करेनच, थॅन्क्यू.

प्रयत्न करेनच, थॅन्क्यू.

आम्ही अस्सेच आहोत

"हे असं निखळ, निरलस, स्वच्छ,

"हे असं निखळ, निरलस, स्वच्छ, पारदर्शी प्रेम सोबत असतानाही आणि सोबतीच्या क्षणांनंतर दूर गेल्यावरही आपली ताकदच बनतं! आपल्या अस्तित्वाला कुणाच्या आधाराची किंवा कुठल्याही टेकूची गरज नसते पण हे असं पारदर्शी, नितळ, निस्पृह प्रेम किंवा या प्रेमाच्या नुसत्याच आठवणीही सोबत असतील तर आपल्या अस्तित्वाला झळाळी लाभते हे खरंय!"

मस्त लिहिलंय अवंती