मिनि सबरीमाला मंदीर कांजुर मार्ग पश्चिम मूंबई (लाल बहादूर शास्त्री रस्ता)

कान्जुरमार्ग पश्चिम मुम्बई येथे एन सी एच कोलोनी च्या आवारात एका छोट्या टेकडीवर अय्यप्पा सबरीमाला मंदीर आहे. जाण्यासाठी एल बी एस रोडवर हुमा टोकीज ला उतरून तेथून एन सी एच कोलोनीतून आत जाउन अर्ध्या किलोमीटर्नन्तर शंभर एकशेवीस पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिर बऱ्यापैकी घनदाट झाडीत वसले आहे. मी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भल्या सकाळी साडेसहाला या मंदिरात गेलो शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. पायऱ्या चढताना पण आजूबाजूला चांगला निसर्ग आहे. सकाळच्या वेळी एल बी एस रस्त्यावर वाहने कमी असल्यामुळे वर वाहनांचा आवाज जास्त ऐकू येत नव्हता .असे म्हणतात की केरळच्या बाहेरील हे एकच शबरीमाला मंदिर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्वत रांगेत हे मदिर आहे. पायऱ्या चढताना झुडूपात प्लास्टिक चा कचरा मात्र जागोजागी दिसतो

भारतीय नौसेनेची जागा असलेमुळे अतिक्रमणापासून वाचले आहे. मंदिराच्या पायऱ्या चढताना मला पाच वर्षापूर्वी मी भेट दिलेल्या कर्नाटकातील कोलार येथील अंतर गंगे मंदिराची आठवण झाली. परिसर सुन्दरच. एकदा जरूर भेट द्या. काही माहिती हवी असल्यास नि:संकोच विचारा प्रकाशचित्रे खाली देत आहे. मोबाईल वरून घेतलेली

टीप - मुंबई, ठाणे , कल्याण , भिवंडी परिसरातील लोकांना फारशी माहित नसलेली आणि निसर्गसौंदर्याने नटलेली मंदिरे आपणाला माहित असल्यास या धाग्यावर उल्लेख करावा

1

2

3

4

5

6

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अय्यप्पाच्या मूर्तीचा फोटो नाही टाकलात? फोटो सुंदर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. मी गेलो त्यावेळी उत्सव चालू असलेने देवळाच्या आत फोटो काढ्ण्यास परवानगी मिळाली नाही. इतर वेळी देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

ते झाड कसले आहे? त्यावर काय लिहीले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाड कसले आहे माहित नाही.
त्यावर मिनि सबरीमाला असे मल्लयाळम मधुन लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

ओके. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0