बोका : एक धुणे!

पूर्वपक्ष:
बोका चांगला चांगला, खोटा कधी म्हणू नाही,
बायलीच्या मांजराले , सोटा कधी हाणू नाही!

उत्तरपक्ष:
दारी चपला नी बूट, जाला चिखल नी माती,
बोका तयामाझी लोळे , त्याला कशाची ना क्षिती !

बोका मळला मळला , बायलीले मान्य नसे
रंग पांढरा पांढरा, पोट कसे काळे दिसे ?

बोका धुतला धुतला, जेंव्हा हाती सापडला
असा क्रूर अत्याचार, त्याले नाही रे भावला

बोका ओरडे धडपडे, बोका टबासी आदळे
बोका हाता ओचकारी, रक्त त्यामाजी सादळे !

अरे संसार संसार , जसा बोका मांडीवर
नाकी साबणाचे फुगे, तेंव्हा चमके मांजर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0