आता ते घाबरतात

आता ते तुला जराजरा घाबरू लागलेत!
ते घाबरताहेत कारण आता तू घाबरत नाहीयेस...

तू बाहेर पडताना तुला हजार प्रश्न विचारतील,
का? कशासाठी? कुठे? केव्हा?
हे आणि असेच प्रश्न
नंतर प्रश्नच नसतील तर एक प्रकारची
आडकाठीच असेल.
तुझ्या प्रत्येक हास्याचा,
चेहऱ्यावरच्या समाधानाचा
हिशोब तर ठेवलाच जाईल...
तू मैत्रिणिंबरोबर दिसलीस
तरी प्रश्न केलेच जातील
आणि मित्रांबरोबर दिसलीस
तर शंकांना ऊत येईल...
पदोपदी तुझं चरित्र
ते स्वतःच्या शाईनी
लिहीण्याचा प्रयत्न करतील
कारण त्यांना भिती वाटते
की आता तू घाबरत नाहीस....

ते स्वतःचा अनुमान काढतील
आणि ठरवून मोकळे होतील
तुझं पावित्र्य!
ज्याचा तुझ्या विचारांपेक्षा
तुझ्या कर्तृत्वापेक्षाही जास्त
तुझ्या शरिराशी संबंध जोडण्यातच
त्याना महानता वाटते...
कारण आता त्यांना भिती वाटते
की तू घाबरत नाहीस...

ते तुझ्यावर लग्नाची सक्ती करतील,
करतंच आलेत...
मग तू म्हणशील
स्वतंत्र आयुष्य वगैरे काही
पण त्यांना नकोच असेल
तुझं स्वतंत्र असणं...
ते तुलाच सुनावतील चार शब्द
आणि सांगतिल वर
'पुरूषाशिवाय पूर्णत्व नाही
तुझ्या आयुष्याला'...
एक एक करत,
चार माणसं हेच सांगतिल
चाराची आठ आणि
आठाची चौसष्ठ कधी होतील
कळण्याआधीच ती होतील
काही लाख,
आणि एकाच स्वरात
तू अपरिपूर्ण असल्याची
तुला जाणीव करून देतील ...
तुला वरचेवर पुरातन संस्कृतीची
जाण करून देतील,
इथं मात्र त्यांची एकजूट तुला दिसून यईल ...
कारण आता त्यांना भिती वाटते
की तू घाबरत नाहीस...

कधीतरी तू कामावरून,
काॅलेज नाहीतर शाळेतून
परत येत असशील,
किंवा खेळत असशील बागेत,
आपला फ्राॅक सांभाळून
आणि येईल एक काळी सावली
कोणीही असेल तो,
अनोळखी, मित्र म्हणून वावरलेला
तुझाच एखादा काका
किंवा मामाही असेल तो
पण तुला ओरबाडून काढेल,
तुझ्या शरिराचा भोग घेईल
आणि चिंध्या करेल तुझ्या मनाच्या ...
किंवा गाडीवरून जाताना
तेजाब फेकून तुला
संपवण्याचा प्रयत्न करतील...
यानंतर लोकं तुटून पडतील तुझ्यावर
आणि संस्कृतीचे रक्षक
इथं मात्र तुझ्यासाठी काही न करता
तुला म्हणतील तू कशी चुकलीस...
ते सारे असं करतील हे तुला माहीती
असूनही तू 'तू' राहतेस याची त्यांना भिती आहे...

तुला माहिती आहे
तुझ्यासोबत काहीही होऊ शकतं,
त्यांच्यासाठी तुझं असणं हे फक्त शरिर आहे
हे ही तुला माहिती आहे...
तरिही तू न थकता जगत राहशील,
मनापासून, हसशील मोकळं,
स्वतंत्र जगशील, न घाबरता कामावर जाशील...
तू 'तू' म्हणून जगशील फक्त तुझ्यासाठी,
कारण आता तू घाबरत नाहीस
आणि म्हणूनच आता ते घाबरतात....

~अवंती

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

खूप आवडली. विषण्ण करणारी आहे.

तुझ्या प्रत्येक हास्याचा,
चेहऱ्यावरच्या समाधानाचा
हिशोब तर ठेवलाच जाईल...

खरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त! मानतो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मस्त ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता ते तुला जराजरा घाबरू लागलेत!
ते घाबरताहेत कारण आता तू घाबरत नाहीयेस...

ह्या दोन ओळीत एक खास गझलीयत आहे. माझा कुर्निसात.!

पण बाकीची कविता जरी वाचायला चांगली असली तरी एक वृत्तांकन वाटले. म्हणजे पहील्या पंचलाईन मधे "तू आता घाबरत नाहीस" असे म्हटले आहे पण पुढे सगळ्या समस्या आहेत.तिला कस ट्रॅप करता येईल ह्याची जंत्री आहे पण ती का घाबरत नाही ह्याचे उत्तर मात्र नाही.
उदा.
ते तुझ्यावर लग्नाची सक्ती करतील,
करतंच आलेत..
...
...
जाण करून देतील,
इथं मात्र त्यांची एकजूट तुला दिसून यईल ...
कारण आता त्यांना भिती वाटते
की तू घाबरत नाहीस...

पण ती का घाबरत नाही आहे? तिने असे काय उत्तर शोधले आहे कि तिला लग्न हा प्रकारचा चॉईस वाटु लागला आहे.कंपल्शन नाही?
हीच गोष्ट इतर मुद्द्यांबाबत ही म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गहिरे व अर्थगर्भ... मुजरा घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL मोरे! मुजरा की कुर्निसात? ROFL
___
मानाचा मुजरा असतो असतो. तुमचे बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वस्थ करणारी कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या एका धाग्यावर चालू असलेल्या स्त्रीमुक्तीबद्दलच्या उलटसुलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही कविता अधिकच ठाशीव वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0