Skip to main content

..किती लौकरच आज उजाडलं बाई..

..किती लौकरच आज उजाडलं बाई..

सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही
किती लौकरच आज उजाडलं बाई...

सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ
झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ..
झोपमोड त्याची मला करवत नाही..

चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र..
अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र..
वाटे सकाळच कधी उगवणार नाही..!

तसा आहे आज छान रविवार सुस्त..
घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त...
लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई..
सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही...

किती लौकरच आज उजाडलं बाई

+ कानडाऊ योगेशु

अनु राव Fri, 20/05/2016 - 11:49

योगेश काका, तुमच्या अश्या कविता बघितल्या की "पिकल्या पानाचा देठ हिरवा" किंवा "उमर पचपनकी, दिल बचपनका" अश्या फ्रेज आठवतात.

अनु राव Fri, 20/05/2016 - 12:19

In reply to by कानडाऊ योगेशु

काय सांगता, तुम्ही "सिनियर" वयोगटातले आहात असे २ दिवसापूर्वी ऐसीवर कोणीतरी ( नाव घेत नाही ) म्हणत होते.

कानडाऊ योगेशु Fri, 20/05/2016 - 12:26

In reply to by अनु राव

माझं मराठीआंतरजालीय वय तुलनेने जास्त आहे. त्या हिशोबाने सिनियर म्हणत असावेत. पण बाकी अजुन आईच्या पदराने डोके व बायकोच्या पदराने अंग पुसणारा ह्या वयोगटातला व कॅटेगरितला आहे अजुन सुदैवाने.! :D

अनु राव Fri, 20/05/2016 - 12:45

माझं मराठीआंतरजालीय वय तुलनेने जास्त आहे. त्या हिशोबाने सिनियर म्हणत असावेत.

त्या हिशोबानी नाही हो, तितके समजते मला :-)
सिनियर म्ह्णजे तिशीतल्या लोकांनी पण सिनियर म्हणावे इतके सिनियर.

कानडाऊ योगेशु Fri, 20/05/2016 - 12:54

In reply to by अनु राव

सिनियर म्ह्णजे तिशीतल्या लोकांनी पण सिनियर म्हणावे इतके सिनियर.

२ दिवसापूर्वी ऐसीवर कोणीतरी ( नाव घेत नाही ) म्हणत होते.

त्यांची ऐसी कि तिशी.! :D

अनु राव Fri, 20/05/2016 - 13:41

In reply to by कानडाऊ योगेशु

पण तसेही योगेशु, पचपनचे झालात तरी बचपना टिकवुन ठेवा. ( हिरवेपणा कमी करा मात्र ).
इथे तिशीतच पचपनचे झालेले लोक जास्त आहेत विश्वाची चिंता करता करता.