हवा-आणि-सागर-प्रदूषणा विषयी अमेरिकेचा पवित्रा

चायना , इंडिया मोठे,
पण त्यांचे वर्तन खोटे,
काय करावे आता ?
सगळेच तलावात मुता!

शास्त्री सर्व जे फाकडे
खोटे त्यांचे आकडे
फुगवून वाढवून भीती
घालती फुकाच साकडे !

कर्ब वाढू द्या हवेत
प्लास्टिक ने तुम्बवा सागर
सर्व देवाची मर्जी, माझी
रिकामी पापाची घागर!

शंभर वर्षानंतर समजा
न्यूयॉर्क, चेन्नई बुडले
पोरे गेली वाहून, त्याने
माझे आज काय अडले?

उडवा मोठ्या गाड्या
कचरा वाढवा आता
भारत,चीन खोटे, म्हणून
तुम्हीही तलावात मुता !
---

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता आवडली पण आवडली कसे म्हणावे, भिडली इतकेच म्हणता येईल. 'पापाची रिकामी घागर' हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन लोकांना प्रदूषणाविषयी "हे केल्याने तुमचे पैसे वाचतील" एव्हढी एकच भाषा कळते. पण त्या भाषेत सर्व मांडणे शक्य नसते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अमेरिकन लोकांना प्रदूषणाविषयी "हे केल्याने तुमचे पैसे वाचतील" एव्हढी एकच भाषा कळते.

अमेरिकन लोकांना प्रदूषणाच्याच काय पण कोणत्याही बाबतीत 'पैसे वाचवणे' ही संकल्पनाच अजून कळलेली नाही. नाहीतर एव्हढी मोठी क्रेडिट इंडस्ट्री उगाच का निर्माण झाली असती इथे?

बाकी कवितेतली भावना स्तुत्य आहे.
बैलगाड्यांचे काय भाव आहेत हो हल्ली? नाही म्हणजे वापरायला सुरवात करावी म्हणतो!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकन लोकांना पैसे वाचवणे ही कन्सेप्टच समजलेली नाही असं माझं मत आहे. 'पेचेक टू पेचेक' असे जगणारे मध्यमवर्गीय पाहिले की कल्पना येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमेरिकन लोकांचे खरे सेव्हिंग म्हणजे त्यांची महिन्याची मोर्टगेज पेमेंट असते . इक्विटी सगळी घरात असते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

इक्विटी सगळी घरात असते .

पण त्याने प्रदूषणात कशी काय वाढ होते?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी लॅपटॉप, सोफे, गाड्या घोडे पासून घर सगळ्याचे हफ्ते जातात पगारातून. अमेरिकीची सगळी इक्विटी या सगळ्या सुखवस्तूपणात आहे. म्हणूनच प्रदूषण कमी करणे इतके सोपे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमेरिकीची सगळी इक्विटी या सगळ्या सुखवस्तूपणात आहे.

लागतेय, लागतेय चटक निळ्याला 'या सगळ्या सुखवस्तूपणाची'! Smile
अब तेरे बर्नीकाका का क्या होगा रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याउलट "निवासी" भारतीय कसे: "साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ". चंगळवादाचा स्पर्शही नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अहो माझी राहणी अजुनही साधीच आहे हो! अन माझी विचारसरणी.. ते तर तुम्हाला माहित आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आमचं हातावर पोट आहे हो. आमचा क्रेडीट स्कोर रुप्पाया सारखाच कोसळतोय, आम्हाला कशाला कोणी लोन देतंय! बर्नीकाका आले की चाल्लो बघा पुन्हा कालिजात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बैलगाडीऐवजी सायकल, स्कूटर , पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे वापरणे शक्य आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बैलगाडी ऐवजी सायकल, स्कूटर , पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे वापरणे शक्य आहे का ?

डोंगरांत रहातो त्यामुळे सायकल शक्य नाही.
आणि पेट्रोलशिवाय (किंवा फॉसिल फ्युएल वापरून तयार केलेल्या विजेशिवाय) चालणारी स्कूटर/ पब्लिक ट्रान्स्पोर्ट अजूनतरी पहाण्यात आलेली नाही...
तुमच्या पहाण्यात आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणशी एका गाडीपेक्षा माणशी एक स्कूटर वापरल्यास पेट्रोल वापरात प्रचंड बचत होते असे ऐकिवात तरी आहे बाबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बचत हा मुद्दा तुम्ही वर मांडलेलाच नाहीये.
एकतर इंधन वापरायचं किंवा अजिबात नाही हा मुद्दा आहे.
की थोडंसं किरंगळी इतपत मुतलं तलावात तर चालेल पण धबाधबा मुतायचं नाही अशी तुमची भूमिका आहे?
Smile
तसं असेल तर ती फक्त मोठी ब्लॅडर असलेल्या लोकांवषयीची जेलसी आहे.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकतर इंधन वापरायचं किंवा अजिबात नाही ?
जाउ द्या !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ते शक्य नाही हे मलाही कळतंय. पण तुम्ही स्कूटर वगैरेचा अनप्रॅक्टिकल मुद्दा मांडलात म्हणून मी ही तसं म्हंटलं.
एका देशातले उपाय दुसरीकडे लागू पडतीलच असं नाही. तुम्ही म्हणता तशी युरोप, कॅनडा-अमेरिकेतल्या लोकांनी गाड्या काढून स्कूटरी घेतल्या तर मग हिवाळ्यात काय करायचं? तिथे बर्‍याच भागात हिवाळ्यात फ्रीझ होतं, खूप ठिकाणी बर्फ पडतो. तिथे स्कूटर चालवणे सुरक्षित आहे का?
बर्‍याच लोकांना रोजच्या कामासाठी ५०-६० किमीचा प्रवास करावा लागतो, तो स्कूटरवरून करणे कितपत प्रॅक्टिकल आहे?
तीच गोष्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट्ची. जिथे प्रवासाची अंतरं कमी आहेत त्या युरोपात किंवा न्यूयॉर्कसारख्या चिंचोळ्या शहरांत तो अस्तित्वात आहेच की. पण तो सगळीकडेच विशेषतः अमेरिका-कॅनडासारख्या प्रचंड देशांत प्रॅक्टिकल असेलच असं नाही.
आणि फक्त स्कूटर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने प्रदूषण नाहिसं होत असतं तर आज पुण्यासारख्या (केवळ उदाहरणार्थ पुण्याचं नांव; उगाच जाज्वल्यांशी मारामारी नकोय!)शहरात ते बेसुमार प्रदूषण का आहे?

माझं म्हणणं इतकंच की होय, प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. जगातल्या सगळ्या देशांनी एकत्र येऊन तो सोडवायला हवा. आपापल्या देशांतलं प्रदूषण कमी (नाहिसं करणं शक्य नाही) करायला हवं. त्यात विकसनशील देशांना थोडीशी, थोडा काळ सूटही द्यायला हवी. पण तुम्ही कवितेत केल्याप्रमाणे अद्वातद्वा दोषारोप करून काहीही साध्य होणार नाही कारण विकसित देशांवर जबरदस्ती करणारे कोणतेही उपाय आज उर्वरित जगाकडे नाहीत. हा प्रश्न वाटाघाटींनीच सोडवायला हवा. विकसित देशांच्या नांवाने केवळ गळे काढत राहिलं तर ते बोडकीचं रूदन ठरेल. विशेषतः तुम्ही म्हणताय असं दोन मोठे देश प्रदूषण करत असतांना तर ते रूदन नव्हे रूदाली ठरेल. फरक तुम्ही जाणताच.
असो. मला वाटतं माझं म्हणणं मी पुरेसं स्पष्ट केलंय. बघा पटतंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हा प्रतिसाद म्हणजे स्वतःसाठीच गृहपाठ आहे, पण आत्ता करायला वेळ नाही आणि पुढे विसरायला होईल म्हणून लिहून ठेवते.

आणि फक्त स्कूटर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने प्रदूषण नाहिसं होत असतं तर आज पुण्यासारख्या (केवळ उदाहरणार्थ पुण्याचं नांव; उगाच जाज्वल्यांशी मारामारी नकोय!)शहरात ते बेसुमार प्रदूषण का आहे?

पुणं आणि ऑस्टीन ही शहरं आकाराने साधारण सारखीच आहेत. पुण्याची लोकसंख्या ऑस्टिनपेक्षा ४-५ पट अधिक आहे. दोन शहरांमधलं प्रदूषण, गाड्यांची संख्या, अशा प्रकारची तुलना करणारे आकडे शोधले पाहिजेत. (दोन्ही शहरांत जीव नकोसा होईल एवढा उन्हाळा असतो. ऑस्टीनमध्ये उन्हाळा आणि थंडी दोन्ही जरा जास्त असतात.)

या आकड्यांमध्ये लोकांचं जीवनमान आकड्यांत कसं मिळवता येईल हा प्रश्न आहे. उदा. ठरावीक अंतर पार करायला लागणारा वेळ, हा आकडा वापरता येईल. हे आकडे कसे मिळवायचे हा प्रश्न आहे, विशेषतः पुण्यासाठी.

अमेरिकेत होणाऱ्या दरडोई प्रदूषणापेक्षा भारतातलं दरडोई प्रदूषण चिकार कमी आहे याची कल्पना आहेच. तरीही हा अभ्यास स्वतःची हौस म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेत होणाऱ्या दरडोई प्रदूषणापेक्षा भारतातलं दरडोई प्रदूषण सुमारे १२ पटीने कमी आहे. पण भारताने (मोदी सरकार) वीज निर्मिति मध्ये कोळ्शाचा वापर दुप्पट करायचे ठरविले आहे, व भारत दरसाल २० लाख नव्या गाड्या ही रस्त्यावर आणत आहे. दुर्दैवाने याचा पर्यावरणीय तडाखा भारतालाच सर्वाधिक बसणार आहे असे दिसते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आम्ही गरीब बिचारे काय तुमच्या त्या ऑस्टिनात गेलेलो नाही, त्यामुळे तिथे काय आहे ते माहिती नाही. पण पुण्यातलं प्रदूषण स्वतः अनुभवलेलं आहे (मुंबई-दिल्लीतही). आजूबाजूला नाकाला रूमाल-ओढण्या लावलेल्या व्यक्ती दिसल्याने फक्त आम्हालाच प्रदूषणाचा भास झालेला नसावा असं समजणं भाग आहे. अमेरिका-कॅनडा-पश्चिम युरोपीय देशांतल्या शहरांमध्ये अजूनतरी अशी सरसकट नाकेबंद मंडळी पाहिलेली नाहीत, ऑस्टिनातही फारशी नसावीत. बिजिंगमधल्या अशा मंडळींचे फोटो/व्हिडियो पाहिलेल्या आहेत.

बाकी प्रदूषणाच्या बाबतीत दरडोई हे प्रमाण वापरणं हा माझ्या मते अप्रामाणिकपणा आहे. हवेचं प्रदूषण हे प्रगत भागातच जास्त करून होत असतं. भारतात दुर्दैवाने आज अनेक भागात वीजही पोचलेली नाही तिथे प्रदूषण कुठून असणार? पण त्या लोकांचा न वापरला जाणारा कोटा हा शहरातील प्रदूषणासाठी वापरण्याची युक्ति सुचवणं ही स्वतःचीच फसवणूक आहे. करा बापडे!

अवांतरः बाकी काल-परवा आलेली डोंबिवलीची बातमी वाचली असेलच. पूर्वी डोंबिवली हे एक हिरवंगार आणि मोकळ्या हवेचं गाव होतं हे स्वतः अनुभवलेलं आहे. आज त्याच गावचे बिचारे नागरीक प्रदूषणाचे भीषण परिणाम भोगताहेत. Sad

एनिवे, आता आमची इथे लेखनसीमा. कारण कंट्टाळा आला बुवा!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण त्या लोकांचा न वापरला जाणारा कोटा हा शहरातील प्रदूषणासाठी वापरण्याची युक्ति सुचवणं ही स्वतःचीच फसवणूक आहे: पाइन्टाचा मुद्दा अहे खरा!