सारस्वत पाकृ - आंब्याचे सासम/सासव

सध्या विशेषांकाच्या धामधुमीत मी ही पाकृ देते आहे. चालेल ना?
खरे तर सारस्वत पाकृचा धागा काढा असे सुचवले होते. पण माझ्याकडे फोटो नसल्यामुळे वेळ लागतो आहे. पदार्थ बनवुन फोटो काढल्याशिवाय लिहिता येत नाही. जसे पदार्थ घरी बनवेन तसे फोटो काढून मगच इथे लिहिता येइल.

सारस्वत पाकृ - कलिंगडाचे धोडक
________________________________________________________________________________________________

'सासम' ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.

Sasam

साहित्य -

६ रायवळ आंबे
१ वाटी ओले खोबरे
१/२ वाटी किसलेला गूळ
१/२ चमचा लाल मिरची पावडर
१/४ चमचा मोहरी
१/२ चमचा साजूक तूप
चिमूट्भर मीठ.

कृती -

१. आंब्यांचा रस काढून घ्यायचा. बाटे/कोयी तशाच ठेवा. फेकू नका.
२. साजूक तूपात मोहरी मस्त खमंग भाजून घ्यायची. तडतडण्याची गरज नाही. (मोहरीला हो!)
३. मिक्सर मध्ये खोबरे, भाजलेली मोहरी, तिखट, मीठ आणि आंब्याचा रस एकत्र करुन बारिक वाटून घ्यायचं. पाणी शक्यतो घालू नका.
४. आता गूळ घालुन पुन्हा जरासं वाटायचं.
५. मग हे मिश्रण त्या पिळून उरलेल्या, जीव नसलेल्या बाट्यांवर ओतायचं. थोडंसं प्यायचं पाणी मिक्सर मध्ये घालून मिक्सरला चिकटलेलं काढून घ्या. (बिन्धास्त! आपलच घर असतं. घाबरायची/लाजायची गरज नाही.)
६. आता हाताने सर्व एक्जीव करायचं. हाताने केलं की गूळाचा खडा राहीला नाही ना ह्याची खातर्जमा करता येते. (आणि शिवाय तो हात चाटुन घेतला की आपल्या वाट्याला थोडंसं जास्त येतं. असो!)

झालं की सासम तयार! आता चपाती/पोळी बरोबर ताव मारायला तुम्ही मोकळे.

करून बघा आणि आवडलं का ते मला नक्की कळवा बरं...

सूचना -

ही पारंपारिक कृती आहे. तेव्हा दिलेल्या कृतीत बदल/फेरफार करू नये.
उदा. हळद घालणे, गरम करणे, फोडणी देणे इ.
गेल्या कैक वर्षांत मीदेखील तशी हिम्मत केली नाही. तेव्हा तुम्हीही करु नये ही विनंती. Smile

- उल्का कडले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त

यमी!!
ही रेसिपी गणपा यांनी मिपावर टाकली होती. तेव्हापासूनच मनात अतिशय घर करुन आहे. एकदा केले होते. चांगले झाले होते. पण मोहरी कमी पडली होती बहुतेक. Smile
___
खूप छान आहे रेसिपी.

पॉर्न विशेषांकाच्या धुराळ्यात आंब्याचे सासव ही पाककॄतीपण त्या अंकाचाच भाग वाटली सुरुवातीला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सखी, शुचि थँक्स!
@ शुचि, मिपा वर स्नेहाकिताने लिन्क दिली लगेच. ती वाचली. ती रेसिपी वेगळीच आहे. त्यात मोहरी नाही तर जिरे मिरे आहे.
ह्यात मोहरी मी तरी कमीच वापरते. १/२ चमचा सुद्धा चालेल. पण खरा स्वाद रायवळ आंब्यांचा असतो. तुला अमेरिकेत ते आंबे मिळतील का?
@ अनुप, मला पण ती शंका होतीच. खरी ठरली म्हणायची तर! :ड

उल्का

(पाककृतीबद्दल माहीत नाही, परंतु सोबतचे छायाचित्र पाहता, सद्य पॉर्न विशेषांकाचा नाही, परंतु पुढेमागे ऐसीचालककृपेने ऐसीचा स्क्याटालॉजी विशेषांक जर का आला - गोइंग रेटने जाता येईलच म्हणा- तर त्याचा भाग म्हणून गफलत झाल्यास, अशी गफलत होणारास निदान मी तरी दोष देणार नाही.)
..........
आय डेस्परेटली होप द्याट आय ह्याव नॉट गिवन द चालक्स अन आयडिया.१अ

१अत्यात पुन्हा असला विशेषांक निघाल्यास त्यात एकदोन तरी जचि-स्पेशल असणार. नको रे बाबा!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

धागालेखिकेचे आणि प्रतिसादलेखकाचे वास्तव्यस्थान ध्यानी घेता; मर्ढेकरांची 'पैलथडी पिके आंबा, ऐलथडी हे शहारे' ही ओळ निराळ्या संदर्भात आठवून गेली Smile

आय ह्याव नॉट गिवन द चालक्स अन आयडिया.

हा नक्की काय वाक्प्रचार आहे? विंग्रजीमध्ये लिहाल काय? गुगल केलं तरी समजलं नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

चालक या शब्दाचे अनेकवचन = चालक्स, जसे लोकचे लोक्स, इ.इ.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ओह, आयला मला वाटलं काहीतरी विंग्रजी आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.