Skip to main content

कविता महाजन यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

भाषांतरित कथासंग्रह 'रजई' यासाठी कविता महाजन यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. इस्मत चुगतई यांनी लिहीलेल्या कथांचा हा संग्रह आहे.

या कथासंग्रहातली प्रत्येक किंवा एकही कथा वेगळी अशी आता आठवत नाही. पण कथा पकड घेणार्‍या आहेत. तत्कालीन आणि बहुतांशी मुस्लीम, स्त्रीविश्वाची माहिती इस्मत चुगतई यांच्या कथांमधून मिळते. स्त्रियांच्या विश्वाबद्दल एक बुद्धीमान व्यक्ती लिहीते तेव्हा निर्माण होणारं साहित्य हे 'फक्त स्त्रियांसाठी' चालवल्या जाणार्‍या नियतकालिकांपेक्षा खूपच उच्च दर्जाचं होतं. इस्मत यांच्या अतिशय वास्तववादी असणार्‍या या कथा त्या काळात मात्र स्फोटक आणि अश्लील मानल्या गेल्या. या कथासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या काही कथांमुळे इस्मत चुगतई यांना न्यायालयीन संघर्षाही करावा लागला. त्याची 'गोष्ट'ही या कथासंग्रहातच आहे.

त्याच पुस्तकाच्या भाषांतराला आज साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कारासाठी कविता महाजन यांचे अभिनंदन. 'घृतं पीबेत' प्रगती मोजण्याचे एक मानक आहेच, पण समाज म्हणून आपण प्रगती करत आहोत याचं हे आणखी एक उदाहरण. तेव्हा आपलंही अभिनंदनच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/02/2012 - 09:10

कोणाकडे हा कथासंग्रह असल्यास, एखाद्या कथेतला एखादा वेचा किंवा सार टाकता येईल का? मी हे पुस्तक वाचून बरेच दिवस झाल्यामुळे आता स्मरणशक्ती दगा देत आहे.

रोचना Wed, 15/02/2012 - 11:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्याकडे आहे; घरी गेल्यावर प्रयत्न करते.
कविता महाजन यांचे अभिनंदन! इस्मत चुगतई यांची "टेढी लकीर" कादंबरी त्यांनी मराठीत आणावी अशी विनंती! मस्त कादंबरी, खूप आवडली होती.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/02/2012 - 11:19

In reply to by रोचना

मूळ कथा मी अर्थातच वाचलेल्या नाहीत. पण भाषांतरित आहेत असं वाचताना कुठेही जाणवलं नाही. सामान्यतः मराठी लेखनात दिसतो त्यापेक्षा किंचित वेगळा समाज, हे एक वेगळेपण. आणि कथा अतिशय ताकदीने समाजाचं चित्रण करणार्‍या आणि विचारात पाडणार्‍या आहेत हे दुसरं. 'टेढी लकीर' मला माहित नव्हतीच ... पण तरीही आमेन किंवा आजच्या मराठीत +१ म्हणावंसं वाटलं.

माझ्याकडे आहे; घरी गेल्यावर प्रयत्न करते.

:-)

ऋषिकेश Wed, 15/02/2012 - 09:20

कविता महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता हा संग्रह मिळवून वाचायला हवा!

ऋता Wed, 15/02/2012 - 13:31

इस्मत चुगतई यांचं लेखन वाचलेलं नाही पण नसीरउद्दिन शहा नी दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या गोष्टी स्टेजवर पाहिल्या आहेत. अप्रतिम होत्या. त्या मराठीत कशा वाट्तील याबद्द्ल साशंक आहे. पण त्या चांगल्या वाटत आहेत हे वाचून बरं वाटलं.
कविता महाजन यांचे अभिनंदन!

राजेश घासकडवी Wed, 15/02/2012 - 15:59

इस्मत यांच्या शक्तिशाली कथांचं भाषांतर करून त्या मराठीत आणल्याबद्दल कविता महाजनांचं अभिनंदन. आणि त्याची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल साहित्य अकादमीचंही.

धनंजय Wed, 15/02/2012 - 19:30

In reply to by राजेश घासकडवी

माझेही कविता महाजनांना मनःपूर्वक अभिनंदन.

आणि त्याची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल साहित्य अकादमीचंही.

याबाबत विशेष सहमती. कधीकधी साहित्य आकादमी साहित्याकाचा गौरव करायचा खूप उशीर करते - साहित्यिक वृद्ध होईस्तोवर. योग्य वेळी सन्मान केला, तर साहित्यिकाला उमदेपणी उत्साह वाढतो. (हे मत प्रा. अशोक केळकर यांनी मला सांगितले.)

Nile Wed, 15/02/2012 - 22:48

In reply to by धनंजय

दोन्ही बाबतीत सहमत. मनःपूर्वक अभिनंदन.

प्रतिष्ठेचे 'पुरस्कार' करण्यापेक्षा प्रोत्साहनपर (चांगली निवड करूनच, अर्थात) पुरस्कार दिल्यास साहित्यासाठी चांगले आहे असे वाटते.

चिमा Mon, 27/02/2012 - 21:25

In reply to by धनंजय

या वर्षी ग्रेस यांना आजारी व वृद्ध अवस्थेत ज्या तर्‍हेने पुरस्कार स्वीकारावा लागला, ते पाहून वाईट वाटले.
कधीकधी साहित्य आकादमी साहित्याकाचा गौरव करायचा खूप उशीर करते - या सत्यासोबत दुसरे एक सत्य असे आहे की पुरस्कार भलत्याच पुस्तकांना दिले जातात. ग्रेस यांना कवितेचा नाही तर ललित लेखाचा पुरस्कार मिळाला याचि त्यांनी खंत व्यक्त केली होती. तसेच विंदांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा झाले.

रमाबाई कुरसुंदीकर Wed, 22/02/2012 - 14:41

अभिनंदन गो कविते.
ईस्मतबाईंचा गरम हवा हा चित्रपट सुंदर होता. उत्तर हिंदुस्तानातल्या फाळणीविषयी.

अज्ञात Fri, 24/02/2012 - 19:42

पुरस्कारासाठी कविता महाजन यांचे अभिनंदन. 'घृतं पीबेत' प्रगती मोजण्याचे एक मानक आहेच, पण समाज म्हणून आपण प्रगती करत आहोत याचं हे आणखी एक उदाहरण. तेव्हा आपलंही अभिनंदनच.

सहमत.

इस्मत यांच्या शक्तिशाली कथांचं भाषांतर करून त्या मराठीत आणल्याबद्दल कविता महाजनांचं अभिनंदन. आणि त्याची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल साहित्य अकादमीचंही.

याच्याशी सुद्धा सहमत.

अवांतर : अदिती यांनी 'बाईमाणूस' या पुस्तकाचा परिचय करून द्यावा ही विनंती.