पानगळ

रहाट गाडगे चालूच असते: काही पाने
बक्षीसपात्र , दडस , आरोग्यपूर्ण, चांगल्या वर्षातली.
पन्नास वर्षाच्या इतिहासाच्या खुणा नजर
शोधीत जाते: मागचे वर्ष चांगले होते: अनेक पाने
अजून रंग टिकवून आहेत . आणि त्या आधीच्या
वर्षाच्या पानांच्या रेषाही अजून स्पष्ट दिसतात .
त्या आधीच्यांची मात्र माती होऊन आधीच्या मातीला
मिळू लागली आहे : "शेवटी सगळ्यांचं असं होत बघ"
असं मी जेंव्हा डोंगराला म्हणालो तेंव्हा डोंगर म्हणाला की
गेलेल्यांची आठवण सगळेच काढतात पण गेलेले ज्यांची
आठवण काढायचे त्यांचे काय ? ते एका अश्रू -विहीन जागी
पोचले आहेत म्हणायचं . "पण हे सगळंच किती वेगाने
घडतं नाही!" मी म्हणालो तेंव्हा डोंगर म्हणाला की हे बघ, बराचसा काळ
हा जमिनीवरच्या पातळशा थरात सामावलेला आहे, पण तो
सर्व दिसू लागला तर सगळे ओक्साबोक्शी रडू लागतील . मी
मूठभर माती उचलून ती वाऱ्यावर सोडली , डोंगर म्हणाला
बस्स , येत्या वर्षासाठी ही खूप झाली !
---
(आधारित )

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!