तो नुसता ह्ंसायचा

तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा

तसा कधीचाच येऊन बसला होता,माझ्या साठीनंतर

पण, त्याला घाई नव्हती ,कसली मायाही नव्हती

लहानपणी,तरुणपणीही, कधी दिसला होता

पण तेंव्हा मधेच लुप्त झाला होता

बासष्ठीला हॉस्पिटलातही उशाशीच होता, स्तब्ध पहात होता

मी विचारलं तर ,अजून वेळ आहे म्हणून खुणावत होता

पंचाहत्तरी करायची का बाबा, मुलगा विचारत होता

हा मागे मिष्किलपणे डोळे मिचकावत होता

ऐंशीनंतर जरा धुरकट दिसू लागले होते

तरी हा स्वच्छ दिसत होता

कालांतराने ही गेली तेंव्हा दोन दिवस गायब होता

सगळे पाहुणे गेले आणि पुन्हा दिसू लागला होता

नव्वदी गांठल्यावर सगळे शतायुषीचा आग्रह करत होते

तेंव्हाही तो शांतपणे हंसत होता

न्हाणीघरांत तोल गेला आणि सभोवतालचे धूसर झाले

तेंव्हा फक्त्, सेचुरी नशिबांत नाही

असे अस्पष्ट पुटपुटला होता

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Eerie आहे. सत्य आहे.
___

खरं तर त्याच्याबद्दल कुतूहल वाटू लागलं ,
नक्की कधी ते सांगता येणार नाही पण
वाटायचं कोणत्या वर्षी त्याची गाठ पडेल,
कशी गाठ पडेल,
एकदा निसटता पाहिला होता. त्याचे दर्शन
भयावह होते.
वैद्यनाथ स्तोत्र, विष्णू शोडषनाम स्तोत्रांनी त्याला
घाबरवायचा प्रयत्नही केला होती Wink
त्याने ही घाबरल्यासारखे दाखविले व निघून गेला.
त्याला विनंती केली होती
माझं बाळ लहान आहे
तिला जाण येउ देत मग तू मला ने Smile
तसं पहाता आता कधीही भेट झाली
तरी अजिबात हरकत नाही
फक्त झोपेत झाली तर बरं ... असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. मृत्यूबद्दल चिंतन असलेली मराठी आणि कालांतराने इंग्रजीत वाचलेली अनेक लिखाणं आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जबर्दस्त! आवड्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मस्त!!! कविता आवडली. "द्वा सुपर्णा सयुजा सखाया" ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं