कामगार

पूर्वी तिला वेश्या किंवा "तसली बाई"असे नाव होते पण
"सामाजिक दृष्ट्या उचित" संबोधन म्हणून ती नंतर "कामगार"
झाली. तर ती कामाठीपुऱ्यात एक कामगार होती.
पण ती कविता वाचायची आणि नंतर लिहायचीही.
"कामा" साठी पुरुष येत, त्यांचे काम झाल्यानंतर ती त्यांना
कविता वाचून दाखवीत असे, जी ऐकल्यावर
ते पुरुष ओक्साबोक्शी रडू लागत आणि म्हणत
की माझ्या आयुष्यात हेच नव्हते आणि
त्यामुळे आत्तापर्यंत अतिशय टुकार आयुष्य जगत आलो,
पण आता नेहेमी तुझ्याकडे येत जाईन. अशी बाई हा
संस्कृतीला मोठाच धोका ठरू लागला. काही धर्मलंड
तिच्याकडे आले व म्हणाले की तू तुझे काम फक्त कर,
कविता वगैरे भलतीकडेच जाऊ नकोस. त्याने विवाह संस्थेला
मोठा धोका पोचत आहे.ती हसू लागली व म्हणाली या
इतर लाखो "कामगार" बाया नाहीत का धोका?
तर ते म्हणाले, नाही, त्या कविता वगैरे वाचून दाखवीत
नाहीत. त्यामुळे घरंदाज स्त्रियांना त्या चालतात.

तिने कविता वाचून दाखविणे न सोडल्यामुळे पुढे
तिला जन्मठेपेची शिक्षा झाली.
आता ती कैद्यांना कविता वाचून दाखविते असे ऐकतो.
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जबरदस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कवितेचा विषय सर्वस्वी वेगळा आहे. पण कामगार शब्दावरुन प्र.के.अत्र्यांनी थोडा चावट विनोद केला होता त्याची आठवण आली. त्या विनोदाचा व कवितेतील कामगार शब्दाचा काहीही संबंध लावू नये.
गोदाताई परुळेकर व श्यामराव परुळेकर हे एक निस्वार्थी भावनेने काम करणारे आदर्श कॉम्रेड जोडपे होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्यामुळे संध्याकाळच्या बैठकांना श्यामरावांची अनुपस्थिती वाढली होती. कुणीतरी सहज, श्यामराव दिसत नाहीत आजकाल, असे उदगार काढल्यावर अत्र्यांनी लगेचच, ते सध्या 'गोदी कामगार' झालेत असा शेरा मारला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ही कविता कळली नाही.
____
मिलिन्दजी, तुम्ही सांगीतल्यावर फारच आवडली.

१. वेश्येला कविहृदय असू शकते .
२. जे लोक काव्याशिवाय जगतात त्यांना कायम काहीतरी "हुकल्याची" भावना असते .
३. बर्याचशा बायका आपल्या नवऱ्यांना (तेही गद्यच ) ते देऊ शकत नाहीत.
४. काही गरीब स्त्रियांचे वेश्या म्हणून शोषण करण्यास धर्माची सुप्त संमती आणि सहभाग असतो .

विशेषतः कवितेचे, कविमनाचे कौतुक जे की रास्त प्रमाणात आहे. कविता खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी! खूप आवडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !