चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो).

अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत मंचकावर येऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे हावभाव करतात. दर्शक त्यांचे नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात. जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात. आपल्या टीमचा जोश टिकून राहो, या साठी काही चिअर्स सुंदरी देहासोबत आत्मा हि विकायला सदैव तैयार असतात.

पूर्वी आपल्या देश्यात राजे-महाराजे, आंग्ल भाषेत निपुण असे अभिजात्य जन क्रिकेट खेळायचे. दिपाली अश्याच एका अभिजात्य टीमची चिअर्स सुंदरी होती. टीम सोबत विमानाचा प्रवास, उंची हॉटेलात राहणे, सतत उंची उपहारांचा वर्षाव, याची तिला सवयच होती. तीही आपले सर्वस पणाला लाऊन अभिजात्य टीमचा उत्साह वाढवायची. त्या साठी निर्लजपणे देहाचे प्रदर्शन करायला तिला किंचितहि लज्जा कधी वाटली नाही.

पण म्हणतातना, दैव गति अति न्यारी. गिरच्या जंगलातल्या रहिवासिंच्या अडाणी, अशिक्षित टीम ने अभिजात्य टीमचा पार धुव्वा उडविला. विराट आणि गेल ज्याच्या समोर पाणी भरतील असा जंगली टीमचा कप्तान रक्त पिपासू राक्षस म्हणून कुप्रसिद्ध असा चहावाला एकटाच एवढे चौकार आणि षटकार मारायचा की टीमच्या दुसर्या फलंदाजांना मैदानात उतरण्याची गरजच पडायची नाही. गिर टीमच्या पूर्ण कपडे घातलेल्या अडानी, अशिक्षित आंग्ल भाषेच्या गंध नसलेल्या चिअर्स सुन्दरिंच्या जंगली नृत्यावर दर्शक शिट्या आणि टाळ्या का वाजवितात हेच दीपालीला कळत नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून अभिजात्य टीम सतत पहिल्याच राउंड मध्ये पराजित होत असल्यामुळे दीपालीचे विमानात प्रवास करणे, उंची हॉटेलात राहणे, परदेसी दौरे सर्वच बंद झाले. इतक्या वर्षांत भरपूर माया जमविल्यामुळे जीवनयापनाची तिला चिंता नव्हती. पण मंचकावर नाचण्याचा आनंद आणि दर्शकांच्या शिट्या यांना हि ती मुकली.

गिरच्या जंगली टीम कितीही चांगली खेळत असली तरी, पाताळेश्वर बळीराजाच्या देशात तिला जायला मज्जाव होता. अर्थातच अभिजात्य टीमने माझ्या सारख्या चिअर्स सुंदरीनींना हाताशी धरून त्या टीमचे नेतृत्व करणार्या चहावाल्याला नरराक्षस म्हणून सर्वत्र कुप्रसिद्ध मिळवून दिली होती.

पण आता तर हद्दच झाली. पाताळेश्वरने स्वत: गिरच्या जंगली टीमला निमंत्रण दिले. तिथे होणार्या मैत्री सामन्यामध्ये चहावाल्याने एवढे षडकार आणि चौकार मारले कि तिथल्या दर्शकांचे हात टाळ्या वाजविता-वाजविता लाली-लाल झाले. एवढ्या टाळ्या तर माझ्या देह दिखाऊ निर्लज्ज नृत्यावर हि कधी दर्शकांनी वाजविल्या नसतील. स्वाभाविकच आहे, माझ्या अंगाची लाही-लाही झाली. रागाने मी म्हंटले, हा कसला फलंदाज हा तर चिअर्स सुंदरी आहे, आम्हापेक्षा जास्त चांगला नाचतो. याला नाचण्यासाठी १00 पैकी ११० गुण दिल्या जाऊ शकतात. केविलवाणा रडका चेहऱ्याने ती म्हणाली, आता तुम्हीच सांगा यात काय चूक म्हंटले मी. या घटकेला सर्व क्रिकेट प्रेमी मला शिव्या देत माझी निंदा करीत आहे. असे म्हणत तिच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. मनात आले रुमालाने तिचे अश्रू पुसावे, तिला सांत्वना द्यावी, पण विचार केला, विराट कोहलीपेक्षा सरस महान फलंदाजाला, चिअर्स सुंदरी म्हणणार्या या मूर्ख मुलीचे अश्रू मी का म्हणून पुसावे?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या सुंदऱ्या आपले सर्वर्स पणाला लावत होत्या? म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपल्या टीमचा जोश टिकून राहो, या साठी काही चिअर्स सुंदरी देहासोबत आत्मा हि विकायला सदैव तैयार असतात.

त्या साठी निर्लजपणे देहाचे प्रदर्शन करायला तिला किंचितहि लज्जा कधी वाटली नाही.

एवढ्या टाळ्या तर माझ्या देह दिखाऊ निर्लज्ज नृत्यावर हि कधी दर्शकांनी वाजविल्या नसतील.

या सर्व वाक्यांना आक्षेप आहे. चिअर गर्ल्स जे करतात त्यांत लाज वाटण्यासारखे काहीच नाही. बघणार्‍यांना जर लाज वाटत असेल तर तो त्यांचा दोष आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाचा IPL वाल्या चिअर्स सुंदरीची काही एक संबंध नाही.

मला वाटले होते ऐसिवाले त्या सुंदरीचे नाव आणि गाव हि सांगतील. बहुतेक गेल्या दोन दिवस आधीचे समाचार वाहिनीवर ऐकले असते तर लेख निश्चित कळला असता.

हिंट: प्रधानमंत्री विदेश दौर्यावर पत्रकारांना घेऊन जात नाही. आता तरी नाव गाव शोधून काढणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहावाला या उल्लेखामुळे मोदी हे कळले होते पण बाकी न्युज फॉलो करत नाही त्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका, तुम्ही आता रीटायर झालात ना, मग नाव घेऊन लिहायला काय हरकत आहे. हे अर्थ कोण लावत बसणार? मला तर काहीही कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहावाल्याच्या टीमला चिअर करणार्‍या चिअरगर्ल्स पण असतीलच ना? आधीच्या चिअरगर्ल्स विशिष्ट जागी उभे राहून चिअर अप करत असत. चहावाल्याच्या चिअरगर्ल्स प्रेक्षकांतच बसतात आणि तिथूनच चिअर करतात. बर्‍याचदा या चिअरगर्ल्स बॅट्समनने चेंडू नुसता खेळून काढला तर प्रेक्षक टाळ्या वाजवत नाहीत पण प्रेक्षकांतल्या चिअरगर्ल्स मात्र षटकार मारल्यासारख्या चिअर करत असतात.

शिवाय आधीच्या फलंदाजांनी पाया रचल्याने चहावाला नंतरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करू शकतोय हे प्रेक्षकांना कळू नये असा पण प्रयत्न करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.