कॉकटेल लाउंज : गाथा बीयरची

हुतेक मद्यसेवन करणार्‍यांची मद्यसेवनाची सुरुवात ही बीयरनेच होत असावी असा माझा अंदाज आहे, निदान माझीतरी तशीच झाली. 1993 साली डिप्लोमाच्या इंडस्ट्रिअल टूरला जाताना व्हि.टी. स्टेशनवर काही सिनीयर मित्रांनी बीयरचा प्लान बनवला आणि मुंबई ते औरंगाबाद अश्या ट्रेन प्रवासात बीयर पहिल्यांदा ओठी लागली. ती चव आणि तो अनुभव अजूनही जश्याच्या तसा आठवणींच्या कप्प्यात साठवला गेला आहे. त्यानंतर बर्‍याच बीयर्स ट्राय केल्या. खजुराहो, महाराणी, एल्पी, हेवर्ड्स 5000, कॅनन 10000, ओल्ड मॉन्क... अश्या कितीतरी. तेव्हा फक्त एकच मापदंड असायचा, 'किती कडक (Strong) आहे'?

पुढे बर्याच वर्षांनी एकदा कामानिमीत्त अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथे गेलो होतो. त्या प्रोजेक्टचा एक डिझायनर, जॉन बंकर, बोस्टनहून नॉर्थ कॅरोलिनाला आला होता. आमच्या डिझाइन साइन ऑफ नंतर पार्टीला जायचे ठरले. जॉनची आणि माझी तोपर्यंत कामामुळे खुपच गट्टी जमली होती. त्याच्याजवळच बसलो होतो मी. यथावकाश बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,"तुला कोणता एल आवडतो?" माझी बत्तीच गुल झाली, एल बी डब्ल्युच झाला म्हणा ना. 'किती कडक आहे' ह्या एकमेव मापडंदाने पिणार्‍या मला तो प्रश्न काही झेपलाच नाही. पण अंगी असलेल्या हुशारीने मी त्याला प्रती प्रश्न केला, "तुझ्या आवडीचा कुठला?". कट्टर बोस्टनवासी होता तो, त्याने मग बोस्टन एल कसा चवदार असतो, नॉर्थ कॅरोलिनाच्या बीयर कश्या 'पानीकम' हे सांगायला सुरुवात केली. मी आपला सर्व काही समजतयं असा आव आणून ऐकत होतो, झाकली मूठ सव्वा लाखाची हो. मग काहीतरी संधी साधून दुसर्‍या कंपूत पळ काढला.

त्यानंतर एका महिन्यानी त्यांची टीम भारतात आली. अर्थातच जॉनही होता. मग वेलकम पार्टीला पुण्यातल्या मानस रिसोर्टला घेऊन गेलो त्यांना. ह्यावेळी मी पुढे होतो कारण आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच. परत बीयरच्या ऑर्डरी सोडायचे ठरले. जॉनने मला विचारले,"अरे एक इंडिया पेल एल असतो, तो भारतातलाच का? तसे असेल तर तोच मागवू यात." माझ्या पोटात एकदम गोळाच आला. मागच्या वेळी तिकडे अमेरिकेत दुसर्‍या कंपूत पळ काढता आला होता. इथे आमच्या टीम मधला पिणारा मी एकटाच, त्यामुळे पळ काढून फारतर त्या मानस रिसोर्ट्च्या तलावात उडी मारावी लागली असती आणि ते शक्य नव्हते. मग त्याला काहीतरी थातूरमातूर सांगून, पटवून फोस्टर्स आणि किंगफिशर ऑर्डर केल्या. त्या बाटल्या आल्यावर लेबल पाहून जॉन म्हणाला, "अरे ही तर लागर आहे." ते ऐकून माझी अवस्था लागीर झाल्यासारखी झाली होती. ही झाली एवढी फटफजिती पुरे म्हणून त्यानंतर लगेच अभ्यास वाढवायला घेतला.

तशी मी बीयर जास्त आवडीने नाही फार पीत पण बीयरचा जो पहिला घोट घशातून उतरत जातो आणि जे काही काळीज थंड होते ना त्याला तोड नाही, निव्वळ स्वर्गसुख...

चला! नेहमीप्रमाणे नमनाला घडाभर तेल जाळून झाले, आता बीयरच्या गाथेकडे वळूयात.

बीयर बनवायला जास्त काही सामग्री लागत नाही. बीयरसाठी लागणारे महत्वाचे 4 घटक म्हणजे

  1. पाणी
  2. बार्ली (सातू/जव)
  3. हॉप्स
  4. यीस्ट

आता प्रत्येक घटकाची माहिती करून घेवुयात :

1. पाणी

बीयरमधे 90% पाणी असते. आता असे म्हणाल च्यामारी, 90% पाण्यासाठी का एवढे पैसे मोजायचे? पण हे पाणी काही साधेसुधे नसते; ते असते 'मंतरेलेले पाणी' Smile खरंच, जे पाणी बीयर तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरले जाते ते मिनरल वॉटर दगडांतून उगम पावणार्‍या झर्‍याचे किंवा नदीच्या उगमाचे (स्प्रिंग वॉटर) असावे लागते. दगडांमधील रासायनिक घट्क (क्षार) पाण्यात मिसळून एक वेगळी चव आलेली असते त्या पाण्याला. ती चव म्हणजेच ते क्षार फार महत्वाचे असतात.आता सध्याच्या आधुनिक जगात केमिस्ट लॅबोरेटोरी मध्ये जिप्सम किंवा एप्सम क्षार (Gypsum or Epsom Salts) पाण्यात मिसाळून तशी चव कृत्रिमरीत्या आणू शकतात. त्यामुळे बीयरच्या चवीसाठी पाणी हा अत्यावश्यक घटक असतो.
तर आता ते पाणी मंतरलेले कसे हे ही लक्षात आले असेलच Wink

2. मॉल्टेड बार्ली (सातू/जव)

बार्ली म्हणजे सातू किंवा बिहारींचा सत्तू ह्या धान्याला हलके मोड येउ देतात. त्यानंतर भट्टीत (Kiln) ते भाजले जातात. साधारण 30 तास लागतात ह्या भाजण्याच्या प्रक्रियेला. ह्या भाजण्याचा तीव्रतेवर (भट्टीचे तापमान) बीयरची चव अवलंबून असते. हलकेच (कमी तापमान) भाजले तर caramel चव मिळते तर जास्त प्रमाणात (जास्त तापमान) भाजले तर कॉफी किंवा चॉकलेटची चव मिळते बीयरला.बार्ली ऐवजी wheat and rye ही धान्येही वापरली जातात वेगवेगळ्या चवीसाठी.

3. हॉप्स

हॉप्स ही वेलीवर वाढणारी एक प्रकारची फुले असतात. बीयरला खराब करणारे जिवाणू मारण्यासाठी किंवा त्यांची पैदास फर्मेंटेशन प्रक्रियेत होउ नये म्हणून हॉप्सची फुले वापरली गेली सुरुवातीच्या काळात. बीयरला जो एक कडसरपणा असतो तो ह्या हॉप्समुळे येतो. ह्या हॉप्समुळे बीयरला एक विषीष्ट प्रकारचा स्वाद ही मिळतो. तो स्वाद ह्या हॉप्सच्या वापरलेल्या प्रजातीवर अबलंबून असतो. 50 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींची व्यावसायिकरीत्या पैदास केली जाते ज्या देतात बीयरला Citrus, pineapple, green grass, pepper आणि pine असे विवीध स्वाद. बीयरला एक गंधही असतो जो ह्या हॉप्समुळेच येतो.

4 . यीस्ट

शास्त्रिय चित्र व्यावसायिक चित्र
सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यीस्ट. एकपेशीय असलेला हा सूक्ष्म जीव मॉल्टेड बार्लीला आंबवताना आणि त्यातल्या शर्करेला (Carbohydrates) अल्कोहोल आणि कार्बन डाय ऑक्साईड मध्ये रुपांतरीत करतो. ह्या यीस्ट्चे दोन मुख्य प्रकार असतात, एल (Ale) आणि लागर (Lager), जे बीयरची स्टाइल किंवा प्रकार ठरवतात आणि हॉप्सच्या जोडीने बीयरला एक स्पेसिफिक स्वाद प्रदान करतात.

बीयरच्या स्टाइल्स किंवा प्रकार

एल (Ale) लागर (Lager)
Saccharomyces Cerevisiae असे नामाधिमान असलेले हा यीस्टचा प्रकार Aerobicअसते म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता असते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट वरच्या बाजूने (हवेशी संपर्क राखून) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी असल्यामुळे साधारण उबदार/गरम तापमान लागते फर्मेंटेशनसाठी. Saccharomyces Carlsbergensis (Carlsberg ह्या बीयरला तिचे नाव ह्या यीस्टच्या प्रकारावरूनच पडले आहे) असे नामाधिमान असलेले हा यीस्टचा प्रकार Anaerobic असतो म्हणजे ह्या यीस्टला हवेतल्या ऑक्सीजनची आवश्यकता नसते फर्मेंटेशनसाठी. त्यामुळे हे यीस्ट खालच्या बाजूने (हवेशी संपर्क जरूरी नल्याने) मॉल्टेड बार्लीला आंबवते. ह्वेचा संपर्क जरूरी नसल्यामुळे थंड तापमान असले तरीही चालते फर्मेंटेशनसाठी.
एलमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार
  • ब्राउन एल
  • पेल एल
  • इंडिया पेल एल
  • पोर्टर
  • स्कॉटिश एल
  • बोस्ट्न एल
  • स्टॉन्ग एल
  • स्टाउट
लागरमुळे तयार होणार्‍या बीयरचे काही प्रकार
  • अमेरिकन लागर
  • बॉक लागर
  • पिल्सनर
  • व्हीट बीयर
  • व्हियेन्ना लागर

बीयरच्या रंगछटा

बार्ली भाजण्याचे तापमान, यीस्ट्चा प्रकार आणि हॉप्सची प्रजात ह्यानुसार बीयरच्या खालिल चित्रात दाखवल्याप्रमाणे विवीध रंगछटा असतात.

पुण्यात उंद्रीला 'कॉरिंथियन्स क्लब' म्हणून एक क्लब आहे तिथे बीयर लोकली ब्रु केली जाते आणि एल आणि लागर ह्या दोन्ही प्रकारच्या बीयर्स तिथे मिळतात. माझे ते अत्यंत आवडते ठिकाण आहे. जमल्यास तिथे एकदा भेटूयात असे सुचवून ही बीयर गाथा इथे संपवतो Smile

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख अतिशय आवडला. असेच आणखी येऊ देत. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुसुजी,

धन्यवाद!

चुकीची दुरूस्ती केली आहे Smile

- (धांदरट) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. इंडिया पेल एल हे नाव ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांसाठी भारतात इंग्लंडहून निर्यात होणार्‍या एलवरून आले आहे.

पुण्यात उंद्रीला 'कॉरिंथियन्स क्लब' म्हणून एक क्लब आहे तिथे बीयर लोकली ब्रु केली जाते आणि एल आणि लागर ह्या दोन्ही प्रकारच्या बीयर्स तिथे मिळतात. माझे ते अत्यंत आवडते ठिकाण आहे. जमल्यास तिथे एकदा भेटूयात असे सुचवून ही बीयर गाथा इथे संपवतो

--- अनुमोदन! 'दुलाली' ब्रूअरीबद्दलही बरेच ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी सोकाजी, हा ही लेख आवडला, बिअर आवडत नसली तरीही! मी बिअर खूपच उशीरा प्यायली ... घोटभरच घेतली पण अजिबात आवडली नाही. काही फ्रूटी बिअर्स, Hoegaarden (या शब्दाचा उच्चार मला येत नाही, मी 'हूखार्टन'च्या आसपासचा काही उच्चार करते, त्यापुढे 'योग्य' उच्चार मला जमत नाही), Leffe (लेफं) प्यायल्या आणि त्यातल्या त्यात त्या आवडल्या. या दोन्ही एलच. पण बीअरमधे काही जीव रमला नाही. म्हणून काय झालं? माहिती मिळवायला काय?

एलबद्दल बोललात पण यार्ड ऑफ एल कसे काय विसरलात? मी पाहिलेल्या सगळ्या ब्रिटीश पबांमधे यार्ड ऑफ एल दिसली होती. वाढदिवशी या यार्डभर लांबीच्या काचेच्या नळकांड्यातली बिअर न सांडवता आणि न थांबता संपवण्याचा रिवाज आहे. तशीही मी परंपरा (आणि बिअर) विरोधक असल्यामुळे मी हा प्रकार कधीच केलेला नाही. केलेला पाहिलेलाही नाही.

पण ड्रॉट बीअर, गिनेस*सारख्या, त्याबद्दलही काही सांगा की.

*हे नाव गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्समुळे भारतातही घरांघरांत पोहोचलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही बीयर गाथा इथे संपवतो

ये सखत नाइन्साफी हय. आयला, गाथा म्हणजे काहीतरी भरपूर भागवाली लेखमाला येणार असं वाटलं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त घेता येईल. या लेखाच्या खाली कुठेतरी क्रमशः असा दिलासा देणारा शब्द दिसला तर तुमचे सर्व अपराध माफ.

'किती कडक (Strong) आहे'?

कितना देती है? च्या जाहिराती आठवल्या. Smile पण हेवर्ड्स ५००० स्ट्रांग वाटायची पण त्यात १०००० आल्यावर तर काय 'यापेक्षा स्ट्रांग बीअर होणे नाही' या निष्कर्षावर येऊन पोचलो होतो.

'स्साला, हे कधीतरी करून बघायला पायजेलाय' च्या यादीमध्ये 'बीअर बनवून बघणे' कुठेतरी वर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! गाथेचा पुढला भागही येऊ देत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थंडगार लेख!
मझा आला. तोक्योच्या एबिसु उपनगरात पानगळीतल्या एका सोनेरी दुपारी 'असाही बीरु'च्या ब्र्युअरीमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या बीअर्सची चव घेतली होती त्याची आठवण झाली.
तरी अजून युरोपात जाणे न झाल्याने खर्‍या बीअरसंस्कृतीपासून दूरच आहे.

पण ड्रॉट बीअर, गिनेससारख्या, त्याबद्दलही काही सांगा की.

असेच म्हणतो. जपानला असताना असाही नामाबीरु (ड्रॉट बीअर) ज्याम आवडली होती (आणि सुन्तोरी व्हिस्कीसुद्धा (तीच ती 'Lost In Translation' मधली)).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि,
नॉस्टॅल्जिक केलेत एकदम तुम्ही. नामाबीरू आहाहा...
जपानमध्ये साकुराच्या झाडाखाली बीयरच्या साथीने उपभोगलेला "इव्हिनिंग साकुरा" आठावला आणि मन एकदम भूतकाळात गेले...
हे आठवले एकदम.. Smile

- (नॉस्टॅल्जिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. एल आणि लागरच्या चवीत काय फरक असतो याबद्दल थोडं विवेचन कराल तर ते वाचायला आवडेल. भारतीय किंवा अमेरिकन बिअर जेव्हा जेव्हा प्याली तेव्हा ती चवीत कमी पडते असं वाटलं. त्या मानानं जर्मन आणि ब्रिटिश बिअर अधिक चविष्ट वाटल्या त्यामुळे आवडीनं प्याल्या गेल्या. हे मात्र खरं की भारतीय/अमेरिकन बिअर बर्‍याचदा एखाद्या मोठ्या ब्रँडची प्याली गेली होती, तर ब्रिटिश आणि जर्मन बिअर पुष्कळदा स्थानिक छोट्या पातळीवर ब्रू केलेल्या प्याल्या गेल्या होत्या. त्यामुळेही चवीत फरक पडत असेल कदाचित. ते काहीही असो, तळपत्या उन्हासमोर सावलीत बसून जलजीरा/कोकम पिण्यापेक्षा थंडगार बिअरच प्यायला आवडते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाहवा! बीअर हे माझे (व्हिस्कीखालोखाल) आवडते पेय आहे. आता उन्हाळा आलाच. दुपारी घामाघूम होऊन परत आल्यावर पंख्याखाली बसून एक थंड बीअर सावकाश पिणे अशी स्वप्ने पुन्हा बघायला हरकत नाही.
सोकाजीरावांच्या लिखाणातून मधूनमधून मद्याची मादक मजेदार माहिती मिळते आहे . ('पंत पंचगंगेच्या पाचव्या पायरीवरुन पाय पसरुन पाण्यात पडले. पंतांची पिवळी पुणेरी पगडी पोरांनी पळवली. पोलिसांनी पोरांना पुण्यापासून पन्नास पावलावर पकडले. पोलिसांनी पंतांची पिवळी पुणेरी पगडी पंतांना पोस्टाने परत पाठवली' या थाटात!) एक रीपीट येऊ द्या. आमच्या आवडत्या ओल्ड मंक विषयीही लिहा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आमची यक शंकाये! बियर पेनार्‍या लोकांची ढेरी वाढते म्हने! खरं हाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माहितीपूर्ण लेख, तरी माझ्या काही शंका -

१. बियर मधे अल्कोहोलचा टक्का काय असतो?
२. बियर हे नवशांचे पेय असल्याचे भारतात अढळते, वाईन वगैरे हौश्यांचे(उच्चभृंचे) प्रकार असल्याचे ऐकतो तेंव्हा असे का हे सांगू शकाल काय? (पाण्याला पर्याय म्हणून बियर पिणार्‍या एत्तदेशीय आणि युरोपिअन लोकांची उदाहरणे कृपया नकोत)
३. बियर पिण्याने शरीराचे त्वरेने निर्जलीकरण होते का?
४. बियरची चव ही खडिवाल्यांच्या काढ्यासारखी कडूच का असते? गोड/अंबट वगैरे बियर बनविण्याचे काही प्रयोग केले गेले आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोकाजीँच्या खास शैलीतली बीयरगाथा आवडली
पण मद्य वगैरेपासून लांबच राहत असल्याने या माहितीचा उपयोग भावमारु बनण्याकरताच होणार

बाकी बीयरचा उपयोग प्रकृती सुधारण्यासाठी होतो अशी माहिती आँफिसातून मिळाली
खर आहे का

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

अमन्त्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलमनौषधम्।
अयोग्या मदिरा नास्ति योजक: सोत्रिसम दुर्लभ:। Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हेच जे लिहीलं आहेस ते मायीच्या भाशेत लिही पाहू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्च! माझी सुरुवात रमने झाली. ओल्ड माँक. मला बियर आवडत नाही अजिबात आणि बडवाईझर यिक्स आहे. बियरबद्दलचा हा समज खात्रीलायकरित्या बदलवण्याकरता काही सजेशन्स आहेत का?
ओल्ड माँक ही बियर सुद्धा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

मला बियर आवडत नाही अजिबात आणि बडवाईझर यिक्स आहे.

अगदी सहमत. अमेरिकन बडवायजरपेक्षा युरोपियन (रोमेनियन?) बडवायजर जास्त चांगली लागते असं मी ऐकून आहे.

बियरबद्दलचा हा समज खात्रीलायकरित्या बदलवण्याकरता काही सजेशन्स आहेत का?

पण का? तुला असं का करायचं आहे? Wink
फ्रूटी चव (पण शेवटी बिअरच, if you know what I am talking about) चालणार असेल तर मी वर उल्लेख केलेल्या होईजी (हूखार्टन) किंवा लेफं पिऊन पहा. अटलांटीक महासागराच्या "चुकीच्या बाजू"ला ही पेय्यं मिळतात का नाही माहित नाही. बिअरप्रेमी ब्रिटीशांच्या संगतीत असताना कधी चाखावीशी वाटली तर यांपैकीच एखादी, दोन-चार घोट घेऊन पुन्हा उच्चभ्रू वारूणीकडेच वळायचे.

पण या निमित्ताने एका बिअर ब्रुअरीचे फोटो दाखवण्याचा मोह आवरत नाहीये. आता ही ब्रुअरी, ब्रुअरी म्हणून कार्यरत नाही. टूरीस्ट स्पॉट आहे. याचा बराचसा भाग जमिनीखालीच आहे. जवळच, बाजूलाच म्हणावा असा झरा आहे, आणि ब्रुअरी टेकडीवर आहे. उतार आणि वहातं पाणी याचा फायदा या ब्रुअरीमधे करून घेतला होता. अमेरिकेत आलेल्या हेन्री क्राईशं (Kreische) नामक व्यावसायिकाने ही ब्रुअरी बनवली आणि लवकरच ती स्थानिकांमधे प्रिय झाली. टेक्ससमधली व्यावसायिकरित्या सफल असणारी म्हणे ही पहिली ब्रुअरी. खालच्या फोटोंत उजव्या बाजूला ब्रुअरीचं स्कीमॅटीक आहे. (फोटो मीच काढले आहेत.)


(फोटोंवर राईट क्लिक करून व्ह्यू इमेज म्हटल्यास मोठे फोटो दिसतील. फोटो फेसबुकावर आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.