एक डेट

संभाषणाला पर्याय म्हणून
त्याने घातलीय नवी हिरवी टोपी,
गालालगतची दाढी खुलून दिसत आहे.

संभाषणाला पर्याय म्हणून
तिने धारण केले आहे एक
कृतक स्मितहास्य ,
दाबतेय टेबलाची कड स्तनाग्रांनी.

आणि करतायत दोघे
निःशब्द निरीक्षण
प्लेटमधील चिकनच्या तुकड्यांचे
काट्याने हलवीत .
केवळ अद्भुत !
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मिक्स्ड मेसेज अवस्था दिसते आहे.

अपमान-न-करता-करवता लवकरात लवकर डेट कधी संपते म्हणून व्यक्तीकडे नजर न नेता जास्तीत जास्त वेळ अन्नाकडे खिळवण्याचा अनुभव तर मलाही आहे. मग ते कृतक स्मितहास्य, वगैरे, लोकलज्जेकरिता जरुरीचेही असते : हास्य कृतक आहे, परंतु ते दोघांनी एकमेकांचा अपमान टाळण्याकरिता केलेले असते, हे दोघांनाही ठाऊकच असते.

परंतु येथे ती टेबलाच्या कडेवर स्तनाग्रे दाबून मिश्र खुणा करते आहे. हे अद्भुत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महा-मार्मिक!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, शुचि!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद . अमेरिकेतील गोऱ्या कल्चर मध्ये अर्थपूर्ण संभाषण कसे संपुष्टात आले आहे हे दाखविण्याचा एक प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोऱ्या कल्चरबाबत सामान्य निरीक्षण म्हणून पटत नाही.
काही डेट्स बाबत पटू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या "हिरव्या" टोपीमुळे कवितेचा संदर्भ एकदम वेगळाच वाटू लागला. अन मग कळेनासे झाले. ती टोपी पिवळी किंवा जांभळी का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला फक्त गोऱ्या कातडीवर बारीक दाढी जरा हिरवी दिसते या (सुप्त) प्रतिमेकडे निर्देश करायचा होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यग्जाक्टली. दाढीबद्दल बोलायचं असेल तर तसं ते कवितेतून जाणवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन मुके जीव डेटवर गेले आहेत, तिला तो आवडला आहे, पण सुचवायचे कसे (खुणांच्या भाषेत लाजत काही बोलणे अवघड असावे कदाचित), म्हणून मग टेबलाच्या कडेला कातिल स्पर्श.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदभुत की अदुभत ? प्रतिक्रियेमधेही अदुभत पाहून गोंधळलेला

- तिरशिंग

टोपीचा संदर्भ मनांतल्या जातीयतेला चाळवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अद्+भुत = अद्भुत. अंमळ जुनाट फॉण्टमध्ये हे जोडाक्षर दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं