कोळी...

तलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं
मजबूत जाळं विणून
आयुष्याच्या समुद्रात भिरकावलं
माझ्यातल्या विचारवंत कोळ्यानं,
दुःख पकडण्यासाठी...
पण अडकावं कसं माझं शब्दातीत दुःख
शब्दांच्या जाळ्यात?
शब्दांच्या चिमटीतून सतत निसटत
विश्वरुप साकारत गेलंय हे दुःख..
समजलंच नाही माझ्यातल्या विचारवंत कोळ्याला..
हा समुद्रच दुःखाचा आहे..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली. गेल्या वाचनात कळली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं
मजबूत जाळं विणून
आयुष्याच्या समुद्रात भिरकावलं
माझ्यातल्या विचारवंत कोळ्यानं,

हा कोळी बोले तो फिशरमन की स्पायडर?

फिशरमनचे जाळे तलम असत नाही, राठ असते. स्पायडरचे जाळे तलम असते.

फिशरमनचे जाळे कोणत्याही अँगलने आकर्षक वगैरे असत नाही. रादर, रनऑफदमिल असते. स्पायडरचे जाळे कोणाकोणाला आकर्षक वाटू शकते.

पण उलटपक्षी, समुद्रात जाळे भिरकावणारा स्पायडर आजतागायत निदान मी तरी पाहिलेला नाही.

कन्फ्यूजन आहे सगळे. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

ओ तुम्ही कवितेकडे फिरकू नका हो ! *

* कविता म्हणजे काव्य या अर्थी. कविता नावाच्या हाडामासांच्या मनुष्य मादीचा संबंध नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना दु:ख पकडायचय , मासे नाही

आणि कोळी मनातला आहे ... तो सुद्धा विचारवंत
त्यामूळे काहीही होउ शकतं .

कन्फ्यूजन काही नाही.
समझा करो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||