"काळ्या शुक्रवार"ची कथा

गडद अंधारी / उभा वाल-मार्ट
प्रकाशाचे बेट/ झळाळते
दारामाजी उभे/ तीन चार जण
लठ्ठ धटिंगण /पोलिस ते
आशाळभूतांची / आतून बाहेर
रांग दूरवर /पसरे ती
तेलगु -मराठी/ चिनी पाकिस्तानी
सर्वांच्याच मनी/ आय-पॅड
उभा तेथे मीही/ दात काकडत
मुंग्यांच्या रांगेत/ हजाराव्वा
अमेरिके मधली /भयाण ती थंडी
कोणतीही बंडी/ अपुरीच
मरण थंडीत / जन काकडती
शिग्रेटी फुंकिती / भसाभसा
थंडीने भक्त ते/ आले काकुळती
स्वतःलाच देती/ फार शिव्या
(इतका तो मूर्ख / झालो मीही कसा
कोठून औदसा/ आठविली ?
फुफ्फुसात माझ्या /घुसे ब्रोन्कायटीस
रजा माझ्या वीस/ बुडतील!
आय-पॅड मिनी/ नच बनवीले
तर काय साले / मरतील?
)
आतून मग तो/ अवतरे ढग
गोरापान नग/ मॅनेजर
"सज्जन मित्रांनो / गर्दी केली फार
मानतो आभार / वाल-मार्ट
आलेल्या सर्वांना / देतो आश्वासन
सर्वांचाच मान / राखू आम्ही
देऊ आय-पॅड / आलेल्या सर्वांना
नाविन्य भक्तांना/ मान्यवर
काहींना मिळेल/ आजच ते खास
बाकीच्यांना पास / देऊ आम्ही
नवा माल येई/ पंधरा दिसात
पास तो खिशात / सांभाळावा
"
ऐकून ते शब्द/ धन्य जाले जन
काकडले तन / जरी त्यांचे
गोऱ्या साहेबाचे / ऐकून बोलणे
माना डोलावीणे/ क्रमप्राप्त
थंडीत बदक / तोही काकडला
त्याने विचारला / ब्रम्ह-प्रश्न
कोणाची कल्पना/ कोणाचा हा मार्ग,
कोणता हा स्वर्ग/ अवतरे?
नाहीच मिळाले /आय-पॅड सार्थ
जन्म माझा व्यर्थ / धरावा का?

दिक्कालामधून/ आले ते उत्तर
"वाट तू सुधर/ घराकडे"
उबदार घरी / "बदक" पोचले
नको ते चोचले / आय-पॅड
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile हाहाहा

कोणाची कल्पना/ कोणाचा हा मार्ग,
कोणता हा स्वर्ग/ अवतरे?
नाहीच मिळाले /आय-पॅड सार्थ
जन्म माझा व्यर्थ / धरावा का?

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाचे हे घर, हा देह कवणाचा... हे आठवणारच.
मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0