उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!

पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट.

सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर".

चित्रपट पंजाबचे भयाण वास्तव दाखवतो. आलिया भटला अभिनयाची उत्तम जाण आहे. पैशाच्या आणि प्रसिध्धीच्या हव्यासापायी नकळत ड्रग कडे ओढली जाणारी एक खेळाडू तिने वठवली आहे. एक नंबर अभिनय तिचाच. चित्रपटाची पटकथा बंदिस्त आहे व ती कुठेही भरकटत न जाऊ देण्याचे कौशल्य लेखकाने साधले आहे. सर्व भारताला मोठया प्रमाणावर गहू पुरवणारा , लष्करात लक्षणीय सैनिक पाठवणार पंजाब आज ड्रग च्या विळख्यात कसा उद्ध्वस्त होत आहे हे पाहून मन सुन्न होते. भ्रष्ट पोलीस , सर्वच पक्षाचे पुढारी शॉर्ट कटने कोट्यावधी रुपये कमावण्यासाठी कसे दुटप्पीपणे ड्रग च्या व्यवसायात गुंतून पिढ्या पिढया बरबाद करत आहेत हे वास्तव या चित्रपटाने समोर आणले आहे.

शहीद कपूर, करीना आणि दलजित याम्नीही आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. सुरुवातीला इतर पोलिसांप्रमाणेच ड्रग व्यवसायाकडे कानाडोळा करून पैसे खाणारा ते नंतर स्वतः च्याच भावाला या व्यसनाने पोखरल्यानंतर ड्रग विरुद्ध लढा द्यायला तयार झालेला पोलीस अधिकारी दलजित ने सुंदर साकारला आहे. त्याचप्रमाणे ड्रग पायी वाया गेलेल्या तरुणांची शुसरुषा करणारी आणि या पोलीस अधिकाऱ्याला ड्रग विरुद्ध लढा द्यायला उद्युक्त करणारी डॉक्टर करीनाने मस्त साकारली आहे. याशिवाय या व्यसनाची लत लागलेला पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ प्रभज्योत सिंगने छान साकारला आहे. करीनाचे पात्र या व्यसनी तरुणाकडून मारले जाताना पाहून माती गुंग होते. शहीद कपूरचा तर प्रश्नच नाही. व्यसनाच्या राडीने माखलेला रॉकस्टार नंतर आगतिक होऊन आपले आयुष्य वाया कसे गेले हा विचार करून विमनस्क होतो असे हे पात्र अफलातूनपणे शाहिदने उभे केले आहे. चित्रपटात एक संवादात पोलीस अधिकारी करीनाला " या सर्व समाजाच्या घाणीत तू किती स्वच्छ राहिली आहेस " अशा अर्थाचे वाक्य उच्चारतो. या संवादाला अभिनयाने करीनाने उत्तम दाद दिली आहे.

चित्रपटात मला खटकणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे:

१. व्यसनाच्या राडीत आकंठ बुडालेला पॉप स्टार अचानकच पश्चात्तापदग्ध होतो हे स्वप्नरंजन वाटते.
२. चित्रपटात क्षणोक्षणी शिव्या उगाचच पेरल्या आहेत. कथानक आणि दिग्दर्शनाचे कौशल्य असताना सवंग लोकप्रियतेसाठी केलेली ही अतिशयोक्ती वाटते.
३. अनुराग कश्यप सारखा निर्माता ज्याने अग्ली चित्रपटाच्या वेळी उगीचच धूम्रपानाच्या दुष्परिणामाच्या संदेशाबद्दल विनाकारण थयथयाट केला होता .... त्याने चित्रपट हे समाज सुधारण्याचे साधन आहे म्हणणे हे खूप नाटकी वाटते.
माझी अनुराग कश्यप बद्दल अशी अनेक मते आहेत तरीही पूर्वग्रह न ठेवता मी सिनेमा पाहिला.
शेवटी अशी प्रार्थना करूया की हा चित्रपट पाहून ड्रग च्या भयाणते बद्दल सर्वाना कल्पना येऊन ही सवय समाजामधून लवकरात लवकर हद्दपार होऊदे.

कोणत्याही सरकारने , आधीच्या सरकार वर टीका किंवा वादविवाद ना घालता कॉमन अजेंडा ठेवून हे केले पाहिजे. जनजागृतीचे महत्त्व ही तितकेच आहे.

ज्या राज्याचे शेकडो सैनिक मातृभूमी साठी बलिदान देतात तसेच जिथे गुरु नानक गुरु तेग बहादूर यांच्यासारखे थोरात महात्मे झाले त्या राज्यातून ही घाण लवकरच दूर होईल असा सकारात्मक विश्वास व्यक्त करून माझे समीक्षण थांबवतो.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

चांगल्या विषयाचे वाट्टोळे

चांगल्या विषयाचे वाट्टोळे केले आहे या सिनेमात. डोंगर पोखरून उंदीर निघाला. असो.

खरच ?

अनुराग कश्यप सारखा निर्माता ज्याने अग्ली चित्रपटाच्या वेळी उगीचच धूम्रपानाच्या दुष्परिणामाच्या संदेशाबद्दल विनाकारण थयथयाट केला होता .... त्याने चित्रपट हे समाज सुधारण्याचे साधन आहे म्हणणे हे खूप नाटकी वाटते.

खरच ? नाही बहुधा . अनुराग ने संदेशाबद्दल काहीही थयथयाट केलेला नाही . त्याचा मुद्दा सिनेमात जेव्हा जेव्हा कोणी सिगरेट ओढताना दाखवले गेले तेव्हा तेव्हा ती संदेश पट्टी स्क्रीन वर दाखवण्याविरुद्ध होता . तो नक्कीच विनाकारण नाही . प्रत्येक सिनेमा सुरू होण्यापूर्वी आणि आता मध्यंतरानंतरही अॅंटी स्मोकिंग फिल्म दाखवतातच . आणि एक disclaimer सुद्धा . एवढे पुरेसे नाही का ? तुम्ही प्रेक्षकांना लहान मूल समजता का ? एकाच गोष्ट पुन्हा पुन्हा का दाखवली जावी ? अशा स्मोकिंग सीन मध्ये प्रत्येक वेळी अशी पाटी आली की लक्ष विचलित होते . निदान माझे आणि मला माहीत असणार्‍या अनेकांचे .

त्या पाटिने लक्ष विचलीत होते

त्या पाटिने लक्ष विचलीत होते का? तर होय होऊ शकते.

तशी पाटि दाखवणे दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येते का? होय, जर ती पाटी दिग्दर्शकाला मंजूर नसेल तर नक्कीच

सिगारेट ओढणे हानीकारक आहे का? होय नक्कीच. केवळ ओढणार्‍याला नाही तर एकुणच समाजाला.

मग पाटी दाखवावी का? - जोवर समाजाला बहुमताने वाटते आहे की अशी पाटी दाखवल्याने सिगारेट सार्वजनिक जागी पिणारे कमी होण्याची शक्यता आहे तोवर अशी पाटी दाखवावी! मग सार्वजनिक आयोग्यापुढे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा असा बारीकसा संकोच होत असला तरी त्याला इलाज नाही!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सतत पंजाबला चित्रपटात " खेतो

सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो)

रिपब्लिकन्स जसे त्यांच्या कारकिर्दीत इकॉनॉमी सुधारो अथवा न सुधारो पण स्वतःची लाल करुन घेण्यात अग्रेसर असतात तसे हे पंजाबी, वास्तव काही का असेना "माकड म्हणतं माझीच लाल."