गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

अतिशय माहीतीपूर्ण लेख आहे. हे काहीच माहीत नव्हते. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण आहे. अतिशय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डेलॉन् विषयी एक वेगळा पदर दाखवणारी छोटीशी टीप, उद्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाबद्दल आभार.

अनिर्बंध सत्ता, धर्म आणि मूल्यांची झालेली फारकत, व्यक्तिगत आकसापोटी लोकांना धर्माच्या तोंडी देणं, कोणे एके काळी ज्यू लोकांनी ख्रिस्ताला मारलं म्हणून सद्यकालीन ज्यू लोकांशी हिणकस वागणूक, कोणत्याशा मुस्लिमांनी चर्च किंवा पवित्र स्थानं पळवली म्हणून भलत्या मुस्लिमांना शिक्षा ... तपशीलाच्या जंत्रीतून जे व्यापक चित्र दिसतं ते रंगवणारे लोक आजही दिसतात. पात्र बदलली, भूमिका बदलल्या, तपशील काही किंचित बदलले. निदान अनिर्बंध सत्ता कोणा एका संस्था किंवा व्यक्तीच्या हातात नसते हा स्वागतार्ह बदल आहे.

आजच्या दिनवैशिष्ट्यात ही नोंदही दिसत आहे - सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी असल्याचे गॅलिलेओने पोपच्या दबावाखाली कबूल केले. (१६३३)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॅथॉलिक चर्चच्या प्रभावामुळे विज्ञानाची किमान 1000 वर्षांनी पीछेहाट झाली असे मानले जाते ! आजही विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत कॅथॉलिक प्रभाव असलेले देश प्रोटेस्टंट देशांच्या कितीतरी मागे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषयाशी असंबंधित प्र‌तिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माहितीपूर्ण
देलाँ च्या (गोव्यातील इन्किझिसांवबाबत) पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतराचे गूगल पुस्तक सध्या तरी विनामूल्य आहे - ते येथे सापडेल.
https://books.google.ca/books/about/Dellon_s_Account_of_the_Inquisition_...

त्यात बहुतेक गोर्‍या आरोपींबाबत माहिती आहे - हे समजण्यासारखे आहे. काळ्या/स्थानिक लोकांबाबत मला कुतूहल वाटत होते, त्याबाबत दोनच तपशील भराभर चाळताना सापडले :
१. काळ्या आरोपींना फक्त कांजी हेच अन्न मिळत असे,
२. ज्या दिवशी लेखकाची गोव्यापुरती सुटका झाली, त्या दिवशी अन्य खटल्यांत एका काळ्या स्त्रीला आणि एका काळ्या पुरुषाला दोषी ठरवण्यात आले. हे दोघेही ख्रिस्ती होते, परंतु स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्मापासून मागे फिरल्याबाबत (apostasy) आणि चेटूक करण्याबाबत त्यांना दोषी ठरवले गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

ऑफ कोर्स!

फेथ अँड द क्राऊन आर द टू पिलर्स ऑफ द वर्ल्ड. वन कोलॅप्सेस सो डझ द अदर!

कन्फेस्स! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाबद्दल अनेक धन्यवाद सरजी. घरी गेलो की प्रियोळकरांचे पुस्तक पुनरेकवार वाचून गोवास्पेसिफिक तपशील देतो. तूर्तास एका स्त्री कैद्याच्या छळाचे वर्णनच आठवतेय त्यातले. हॉरिबल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम माहितीपूर्ण लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वा! माहितीपूर्ण!
गोव्यातील इन्क्विझिशनबद्दल तपशीलात मराठीतून वाचायला आवडेल.

ते कोणते मराठी पुस्तक म्हणालात त्याचा दुवा आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांनी उल्लेख केलेले पुस्तक मराठीत नाही. ते इंग्रजीत आहे. ललित मध्ये त्याची जाहिरात मी बरेचदा वाचली आहे, आणि नेहमीच त्याबद्दल उत्सुकता वाटली आहे. लेख उत्तम आहे, छान माहिती मिळते. पुस्तक घ्यावे असे वाटू लागले आहे, थोडे महाग आहे.

The Goa Inquisition
Terrible Tribunal for East
Author: A K Priyolkar
Publisher: Rajhuns Sankalpana Pvt Ltd, Panaji, Goa(हे पुण्यातले राजहंस प्रकाशन नव्हे)
Price: INR 695
Website for online order: www.rajhuns.com

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

फर्डिनंड आणि इझाबेला ह्यांच्या काळातील त्यांची अमर्याद सत्ता आणि ऐश्वर्य ह्याची थोडी कल्पना त्यांच्या स्पेनमधील सेगोविआ गावातील अल्कझार ह्या किल्ल्यावरून करता येते. त्याची मी काढलेली काही चित्रे वानगीदाखल येथे दाखवीत आहे.

अल्कझार किल्ला
Alcazar
फर्डिनंड आणि इझाबेला ह्यांचा विवाह
Wedding
सिंहासनाची जागा
Throne Room
त्यांचा पलंग
Royal Bed
सभोवतीचा देखावा
Surrounds
किल्ल्याचा खंदक
Moat
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२००५ ते २०१३ काळात कॅथोलिक चर्चप्रमुख पोप म्हणजे बेनेडिक्ट (क्रमांक १६), पोप होण्यापूर्वी कार्डिनल राट्झिंगर.
कार्डिनल म्हणून Congregation for the Doctrine of the Faith संस्थेचे प्रमुख. त्या निमित्ताने या संस्थेबाबत माहिती माझ्या वाचनात आली.

या संस्थेचे पूर्वीचे नाव (इंग्रजीत) Supreme Sacred Congregation of the Roman and Universal Inquisition असे होते. ही संस्था १५४२ साली पोप पौल (तिसरा) याने स्थापिली, आणि हिचे नाव १९०८ आणि १९६५ साली बदलण्यात आले.
सध्या ही संस्था व्यक्तींना पाखंडाकरिता दंड वगैरे करत नाही. परंतु कॅथलिक धर्माअंतर्गतच्या पंथा-संस्थांची धर्मशुद्धता/पाखंड वगैरे ठरवण्याचे काम अजून याच संस्थेकडे आहे.

उदाहरणार्थ :
Doctrinal Assessment of the Leadership Conference of Women Religious
(पीडीएफ दुवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रा.अनंत काकबा प्रियोळकरांचे Inquisition in Goa हे पुस्तक मला DLI मध्ये सापड‌ले. त्यावरून गोव्यातील इन्क्विझिशनबाबतची ही अधिक माहिती थोडक्यात नोंदवीत आहे.

स्पेनमधील इन्क्विझिशन आणि ज्यू समाजाची हकालपट्टी ह्याचा परिणाम म्हणजे बरेच ज्यू शेजारच्या पोर्तुगालमध्ये स्थलान्तरित झाले. तेथेहि आसपासच्या समाजाच्या ज्यू-द्वेशामुळे बर्‍याच ज्यूंनी ख्रिश्चनधर्म स्वीकारला. कालान्तराने स्पेनच्या दबावाखाली पोर्तुगालमध्ये १५४१ मध्ये इन्क्विझिशनचा प्रवेश झाला. परिणामत: ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या अनेक पूर्व-ज्यू व्यक्तींवर ते गुप्तपणे अजूनहि ज्यू धर्माचेच पालन करतात अशा संशयावरून इन्क्विझिशनची कारवाई होऊ लागली. ह्या वेळापर्यंत पोर्तुगालने दूरदूरचे गोवा, मोझांबिक, मलाक्का असे प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले होते. इन्क्विझिशनची भीति असलेल्या नवख्रिश्चनांनी अशा प्रदेशांमध्ये वसतीला जायला सुरुवात केली. त्यामागोमागच हे नवख्रिश्चन गुप्तपणे अजूनहि ज्यू धर्माचेच पालन करतात हा संशयहि गोव्यात येऊन पोहोचला.

गोव्यामध्ये इन्क्विझिशन लागू करावी अशी पहिली मागणी फ्रान्सिस झेवियर ह्यांनी पोर्तुगालचा राजा जॉन तिसरा ह्याला १५४५ मध्ये पत्र पाठवून केली. अशा मागण्यांचा जोर वाढत गेला आणि १५६० मध्ये इन्क्विझिशन गोव्यामध्ये येऊन पोहोचले आणि पूर्वीच्या आदिलशाही काळातील मुस्लिम गवर्नरच्या वाड्यामध्ये - ज्याला स्थानिक प्रजा Orlem Gor (The Big House) ह्या नावाने ओळखत असे - इन्क्विझिशनचे दमनचक्र सुरू झाले..

प्रारंभी इन्क्विझिशनची झळ अशा ज्यू नवख्रिश्चनांना लागत होती. पण एव्हांना ख्रिश्चन होण्यासाठीच्या आर्थिक प्रलोभनामुळे आणि हिंदुधर्मातील जातीपातींच्या उतरंडीचा उबग आल्यामुळे बरेच हिंदु - विशेषेकरून खालच्या जातींचे - ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करू लागले होते. असे नवख्रिश्चन नावाचे ख्रिश्चन असले तरी त्यांच्या हाडीमाशी खिळलेल्या जुन्या चालीरीती आणि जुने समज त्यांनी पूर्णपणे टाकलेले नसत. शिमग्यासारखे सण साजरे करणे, गावातील दगडधोंड्यामधील वेताळ-मरीआईसमोर कोंबडे कापणे अशा गोष्टी त्यांच्या श्रद्धेमध्ये खोलवर रुतलेल्या होत्या. अशा नव्या ख्रिश्चनांविरुद्ध जुन्या चालीरीती न सोडल्याच्या कारणावरून इन्क्विझिशनची कारवाई होऊ लागली. कालान्तराने हीच अहिष्णुता पोर्तुगीज सत्तेखाली राहणार्‍या हिंदूंच्या कडे वळली. मूर्तिपूजा करणार्‍या आणि अनेक भोळ्या समजुतींच्या अन्धकारामध्ये अडकून पडलेल्या हिंदूंना येशूच्या सच्च्या मार्गाकडे आणणे आणि गोव्यातील हिंदु धर्माचे अस्तित्व उखडून टाकणे हे आपले परमकर्तव्य आहे अशा समजुतीने झपाटलेले ख्रिश्चन राज्यकर्ते आणि धर्मगुरु हिंदूंच्या दैनंदिन जीवनात त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे ठरवू लागले. उदाहरणार्थ हिंदु घरातील विवाह आणि मुंजीसारखे सारखे सोहळे चार भिंतीआड आणि बाहेर आवाज येऊ न देता झाले पाहिजेत, ख्रिश्चन धर्म स्वीकारू पाहणार्‍याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे हा इन्क्विझिशनसमोर खेचले जाण्यायोग्य गुन्हा आहे असले नियम तयार झाले. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला अडचण करू शकतील अशा वहिमावरून पुष्कळ हिंदूंना हद्दपार केले गेले, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि अज्ञ वयाच्या मुलांना ताब्यात घेऊन अनाथालयात पाठविण्यात आले, जेथून ते ख्रिश्चन धर्मात भरती करण्यात आले. इन्क्विझिशनने घालून दिलेले नियम मोडणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई होऊ लागली. इन्क्विझिशनचा असा धुमाकूळ कमी अधिक प्रमाणात १५६० पासून १८१२ साली इंग्रजी दबावाखाली इन्क्विझिशन बंद होईपर्यंत चालत राहिला. ह्याचे उदाहरण म्हणून जानेवारी ३१, १६२० चा पुढील हुकूम पहा:
"In the name of His Majesty I order that as from the date of publication of this order, no Hindu, of whatever nationality or status he may be, can or shall perform marriages in this city of Goa, nor in the Islands or adjacent territories of His Majesty, under pain of fine of 1000 Xerafins one third of which would be paid to the accuser and two thirds applied towards the expenses of His Majesty's navy."

मधूनमधून गोव्याचा एखादा पोर्तुगीज गवर्नर वा पोर्तुगालचा राजा इतरांहून कमी कडवा असे आणि त्याच्या कारकीर्दीत इन्क्विझिशनचा कडकपणा कमी जाणवत असे. (पोर्तुगालचा प्रख्यात उदारमतवादी मुख्य प्रधान मार्क्विस ऑफ पोंबाल ह्याच्या काळामध्ये त्याच्या हुकुमाने १७७२ ते १७७९ ह्या वर्षांमध्ये इन्क्विझिशन बंद पडले होते. मार्क्विस ऑफ पोंबालची स्मृति अद्यापि पोर्तुगालमध्ये टिकून आहे. एका उच्च स्तंभावरचा त्याचा पुतळा लिस्बनच्या मध्यवर्ती चौकामध्ये उभा आहे.)

इन्क्विझिशनने दिलेल्या शिक्षा अमलात आणण्याचा Auto da Fe (Act of Faith) हा विधि मोठ्या गंभीरपणे दर दोन ते तीन वर्षांनी पार पाडला जाई. १६०० ते १७७३ ह्या काळामध्ये ७१ Auto da Fe झाल्याची नोंद आहे. त्यांमध्ये एकूण ४०४६ व्यक्तींना निरनिराळ्या सजा मिळाल्या. त्यामध्ये १०५ पुरुष आणि १६ स्त्रियांना Burning at the Stake ही जिवंत जाळण्याची शिक्षा मिळाली.

सर्वच पोर्तुगीज प्रतिष्ठितांना आणि धर्मगुरूंना हे इन्क्विझिशनचे खूळ मान्य होते असे नाही. इन्क्विझिशनमुळे व्यापारी पोर्तुगीज प्रदेशातून निघून जात आहेत आणि एकूण व्यापार कमीकमी होत आहे अशी भीति अनेकांनी व्यक्त केली आहे. पोर्तुगीज गोव्यामध्ये आले त्यावेळी गोवा हे पश्चिम किनार्‍यावरचे श्रीमंत बंदर होते आणि कापडचोपड, चामड्याच्या वस्तु, सागवान आणि अन्य लाकूड, मसाल्याचे पदार्थ अशा गोष्टी निर्यात करणारे प्रमुख केन्द्र होते. हा व्यापार करणारे हिंदु आणि अरब व्यापारी गोव्यापासून दूर राहू लागल्याने गोवा हळूहळू गरीब होत गेले.

गोव्यातील इन्क्विझिशनशी संबंधित काही चित्रे पुढे दाखवीत आहे:

माद्रिदमधील प्लाझा मायोर येथे इन्क्विझिशनची कारवाई


पाखंडाची कबुली


शिक्षेसाठी चाललेले पाखंडी. सर्वप्रथम डोमिनिकन पाद्री, त्यांच्यामागे दंडित हातात मेणबत्ती धरून आणि दंडिताचा वेष घालून, त्यामागे पूर्वी जाळून मारलेल्यांच्या प्रतिकृति आणि त्यांची हाडे भरलेल्या पेट्या घेऊन चाललेले


समारा Samarra हा पाखंडी ठरलेल्याने शिक्षेसाठी घालायचा वेष.


इन्क्विझिशनचा ध्वज (Standard). त्यावरील शब्द Misericordia et Justitia करुणा आणि न्याय.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी खेळतानाचे नियम आठवले. ज्याचा कॅरम बोर्ड, बॅटबॅाल त्याचेच नियम लागू होत. त्यापेक्षा खेळणेच बंद केले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक आहे डार्क हिस्टरी ऑफ पोप्स मध्ये ह्याचे ओझरते संदर्भ आहेत. तुम्ही म्हणता ते वाचायला हवे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाटील