तंबाखू ,सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप
,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून
मी माझी तल्लफ कंट्रोल करायचो.पुढे माझ्या मनाने सिगरेटचे
व्यसम सोडायचे ठरवले ,परंतू अनेकदा रिलॅप्स होऊन ते परत परत
चालूच राहिले.दरम्यानच्या काळात सरकारने सिगरेटच्या
उत्पादनावर टॅक्स वाढवला व सिगरेट महाग झाली, तशी
काही फुकाड्यांची पाचावर धारण बसली. माझा पगार बरा
असल्याने माझा रोजचा पाच सिगरेटचा कोटा चालूच
राहीला,निकोटीनची ठराविक मात्रा एकदा स्टेबल
झाल्यानंतर आधि बसणारी कीक बसेनाशी होते व शरिर जास्त
निकोटीनची मागणी करु लागते ,माझ्या बाबतीत हा प्रकार
सुरु झाला व अडचणीला सुरवात झाली,घरी तल्लफ आल्यावर
काय करायचे? ...अश्या वेळी फुकाडे मित्र मदतीला येतात
,त्यापैकीच एकाने मला तंबाखू चघळण्याचा सल्ला
दिला.तंबाखु मळणे व नंतर ती चघळणे मला जरी थर्डक्लास
लोकांचे व्यसम वाटत होते तरी एकदा ट्राय करुन बघु म्हणून मी
तंबाखू खायला सुरवात केली .तंबाखूचे पाकीट व चूना खिशात
बाळगता येतो, कधीही कुठेही खाता येते व फारसे कुणाला
समजतही नाही,परिणामतः मी घरात देखील राजरोस तंबाखू
खाउ लागलो.गेली तीन वर्षे मी तंबाखू खात आहे व कधीतरी
सिगारेटही ओढतो.
मागच्या वर्षापासून मला हे व्यसन सोडायचे आहे असे मनाने
घेतले आहे ,पण आता ते सुटता सुटत नाही आहे.तंबाखूची प्रत्येक
पुडी शेवटची असे मी ठरवतो व यांत्रिक पद्धतीने पुड्या घेत
राहतो,मला कँसर झाल्याची स्वप्न देखील पडतात.
मराठी आंतरजालावर अनेक अनुभवी मंडळी आहेत ,पैकी
काहींना सिगरेट तंबाखू व्यसन कधीतरी असेलच व त्यांनी ते
यशस्वीपणे सोडले असेल .माझे काही प्रश्न आहेत,
१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता
आहात?
३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१ . तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
- मी आठवीत असताना आमच्या गावात "मावा" या गोष्टीचे फ्यॅड आले. त्यात दोन प्रकार मिळत - एक तंबाकूयुक्त आणि दुसरा बिन तंबाकूचा बडिशेप मावा.
यातला 'बडिशेप मावा' खाणे ही तंबाकूकडे सुरू केलेली वाटचाल.
अकरावीच्या उन्हाळा सुट्टीत जुहू बीचवर घाबरत घाबरत "चार्म्स" नावाची सिगरेट ओढली. म्हणजे नुस्ता धूर काढला. पुढे सिगरेटचा धूर फुप्फुसात जाऊन तो डोक्यात पोचू लागला.
अनेक प्रकारच्या तंबाकूधूरकांड्या ओढून पाहिल्या - फिल्टर, नॉनफिल्टर, मेंथॉल, गुडांग गरम, बिड्या, सिगार, पाईप वगैरे... अगदी गांजाही एकदा आणला होता, पण तो फुसका निघाला. त्यापुढे गेलो नाही... म्हणजे ड्रग्जकडे.
तंबाकू चघळून बघितली - गाय छाप जर्दा, माणिकचंद जर्दा, खैनी, मावा, ३००-१२०/१६० नवरतन/पंचरतन किवाम घालून बनारस-कलकत्ता- विड्याचे पान, गुटखा, रजनीगंधा + १६० असे सगळे प्रकार.
शेवटी शेवटी - निकोरेट गम्स चघळत होतो.
फक्त तपकीर कधी ओढून पाहिली नाही.

२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
- एक काळ असा होता की तंबाकूचे सगळेच प्रकार एकत्र सुरू होते. वीसेक वर्षे. मग तंबाकू एकदम बंद केली. ३ महिने तळमळत काढले. परत एकदा गुटखा सुरू झाला. पण सिगरेट मात्र बंद झाली. गुटख्याने तोंडाचे त्रास होत. मग गुटखा बंद करून फक्त तंबाकू-चुना / खैनी सुरू ठेवले. ते दोन-तीन वर्षे सुरू होते. मग एकदा ठरवले की तंबाकू कायमची बंद करायची. काही दिवस निकोरेट गम चघळले. `Bupron-SR' नावाच्या गोळ्याची सेल्फ थेरपी घेतली. (हे तसे चुकीचे होते.) एका महिन्यात तंबाकू पूर्ण बंद केली. गेली किती तरी वर्षे तंबाकू बंद आहे. आता तंबाकूची 'किक' आठवतही नाही.

३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
- जितके जास्त दिवस तंबाकू बंद राहिल तितके व्यसन पुन्हा लागण्याची शक्यता कमी होते. हळूहळू सिगरेटच्या धुराची / कपड्यांना येणार्‍या वासाची घृणा येते.
पुन्हा व्यसन लागू नये असे वाटत असेल तर तंबाकूपासून दूर रहा - साधा उपाय.

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?
- निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे प्यॅचेस का? टेंपरवारी उपाय आहे. तंबाकू बंद केली की काही काळ त्रास होतोच! तो सहन करायला हवा. बुप्रोन सारखी औषधे सायक्याट्रिस्टच्याच सल्ल्याने घ्यायला पाहिजेत.

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
- काय की!
तोंडातून लाळ न गळता बोलता येते, पचापचा थुंकावे लागत नाही, कपड्यांना वास मारत नाही, ओठांवरचे काळे डाग जातात, घरच्यांना बरे वाटते, तंबाकू नसली तर अस्वस्थपणा येत नाही, इन्शुरन्सवाला पकडेल ही भीती नाही, आपण तंबाकू सोडली असा मोठेपणा मिरवता येतो, लोकांना अनाहुत सल्ले देता येतात (जो मी आत्ता देतोय!), सध्याच्या काळात पैसे वाचतात हा फायदा यादीत घालता येईल.

(मला तरी उलट तोटेच जास्त झालेले आहेत. पहिले काही दिवस झोपेचे खोबरे होते, चित्त थार्‍यावर रहात नाही. भूक प्रचंड वाढते, वजन वाढते, पोट सुटते...
म्हणजे आता व्यायाम करणे आले... वगैरे Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना, तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तरीही हरकत नाही. पण प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही.

नियमितपणे भेटीगाठी होणाऱ्या मित्रमंडळात कोणी तंबाखू सेवन (गुटखा, सिगरेट, कोणतेही प्रकार) करणारे लोक होते का? असतील तर तंबाखू सोडण्याच्या काळात ह्या लोकांच्या व्यसनाचा तुमच्यावर परिणाम होत असे का? ते टाळण्यासाठी काय केलंत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा बॉसच हापिसात सिगरेट ऑफर करत असे.
त्याला हसून टाळावे लागे. कधीकधी थोडे कडक नकार दिले.
त्याला जसे कळले की हा बधत नाही मग त्यानेही तो प्रकार बंद केला.

आता तुझ्या केबिनमधे सिगरेटचा वास मारतो असेही त्याला अधूनमधून सांगतो.
कदाचित त्याचीही बंद होईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. तुम्हाला सिगरेट ,तंबाखूचे व्यसन कसे लागले?

मोठी स्टोरी आहे.

बैरामजी जिजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर, तिथल्या अनेक भारी प्रथांपैकी एक होती इलेक्शन. म्हणजे इलेक्शन्स प्रत्येक कॉलेजात होत असत, (त्या काळी जीएस वगैरे 'अपॉइंट' करायची सुरुवात झालेली नव्हती) पण आमच्याकडे कँडीडेटचा इंटरव्ह्यू घ्यायची पद्धत होती.

हे इंटरव्ह्यू कॉलेजातली जीसीआर व एलआर, होस्टेलचे सर्व ब्लॉक्स व लेडीज होस्टेलला द्यावे लागत. उमेदवाराने इंटरव्ह्यू "देण्यासाठी" प्रत्येक ठिकाणी फी भरावी लागे, व ही फी, जेण्ट्स होस्टेल व जेण्ट्स कॉमन रूम (जिसीआर्)ला "५ बिस्किट पुडे व फोरस्क्वेअरची ५ पाकिटे" (किंवा त्या-त्या ठिकाणचा फेवरिट ब्रँड) अशी असे. लेडिज इंटरव्ह्यूला ५० गुलाबाची फुले व ५० एक्लेअर्स अशी फी होती. प्रत्येक ब्लॉकचे रेसिडेंट्स होस्टेलला रात्री व कॉलेज कॉमनरूम्सला सिटिलाईट्स सायंकाळी ५ ते ७ मुलाखत घ्यायला जमत असत. रेग्युलर रॅगिंग केल्यागत मुलाखत होई. तू जीएस म्हणून का उभा आहेस? तुला कॉलेजची काय माहिती आहे? बजेट कोणत्या इव्हेंटला किती असतं? ते कुठून उभं करशील? असे असंख्य प्रश्न विचारले जात, व त्या बेसिसवर मतदानही होई. या इंटरव्ह्यूजचे भारी किस्से माझ्या लेखमालेत अ‍ॅड करायचेत पण ते एक असो..

तर, अ‍ॅडमिशन झाल्यानंतरच्या अगदीऽच पहिल्या इंटरव्ह्यूचा क्यांडिडेट लैच गब्रू होता, अन आमच्या नूब गरिबांच्या ई ब्लॉकची ५ चारमिनार पाकिटांची फी मागणी असताना, त्याने रॉथमन्स सिगारेटची पाकिटे आणली. हे इंपोर्टेड सिगारेट काय प्रक्रण आहे, हे कौतुकाने पाहण्याच्या नादात, व त्या एकंदरित वातावरणात मी पहिली सिगारेट ओढली.

ती हळूहळू वाढत गेली. पीजी करताना ओटीच्या कॉमनरूममधेही सिगारेट ओढत असे, व तिथे समोर एचओडी असलेत तरी त्या काळच्या "एटिकेट्स"नुसार सिगारेट ओढायला परवानगी असे. कोणे एके काळी सिगारेट सर्जनसाठी चांगली, अशी समजूत होती, व आमच्या एक ख्यातनाम व प्रतिभावान सर्जन गुरू मेहता मॅडम रेग्युलरली कॅप्स्टन ओढत.

पीजी काळात दिवसाला ३०-४० सिगारेट्स आरामात ओढल्या जात. त्या काळी सिगारेट स्वस्तही होती. व आपकमाई उर्फ पगारही होता. सिगारेटचे जितके ब्रॅंड्स व प्रकार मी केले आहेत, ते किस्से कधीतरी फुर्सतीत सांगेन.

हो. खाण्याचीही तंबाखू सर्व प्रकारची खाल्ली आहे. माणिकचंद, पानपरागपासून गायछाप खैनीपर्यंत.

२.हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?

काय नाय. एक दिवशी बंद करून टाकली. आजही सर्व प्रकारची तंबाखू बंद आहे.

३.पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?

नो आयडिया. आधी सोडा तर खरी! मला तरी इच्छाही होत नाही. उलट सिगारेट सुरू करण्यापूर्वी जी परिस्थिती होती, ती आलिये. त्या काळात एस्टीत एका काकांना तुम्ही सिग्रेट विझवली नाहीत, तर मी तुमच्या अंगावर उल्टी करीण असं सांगितलं होतं, अन ते फिलींग आजकाल धुराच्या वासाने येतं.

सिगारेटवाल्यासोबत बसलो, तरी आपल्या कपड्यांना वास लागतो, अन केव्हा एकदा कपडे बदलतो, असं होऊन जातं.

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते?

शून्य कल्पना. इट्स इन माइंड. तिकडे सांगितलं ना? झटका बसायची वाट पाहू नका. एक लाथ मारायची अन दोन तुकडे करायचे. रिप्लेसमेंट गेली खड्ड्यात. ८ दिवस रजा काढून कुठेतरी गायब व्हा. विपश्यनेला जा. तिथे या गोष्टी करू देत नाहीत.

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?

पेशंट वाढलेत.
आधी काम करताना मधेच जाऊन सिग्रेट मारून यायचो. हॉल्स वा तत्सम काही खाऊन कित्येकदा अगदी माणीकचंद खाऊनही, लोकांना वास येत नसेल, अशी समजूत करून घ्यायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रोचक प्रतिसाद,एकदा तुमच्या अनुभवांची लेखमाला लिहाच,
हो, मी एकदा तंबाखूच्या व्यसनाला पेकाटात लाथ घातली होती,पण आता परत व्यसन लागले,आता जी लाथ घालायचीय ती कायमसाठीच,म्हणुन हा प्रपंच व प्रश्नोत्तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

म्हैलांना शिगरेटी पुरवल्या जात नसत याबद्दल निषेध....

म्हैलांना इक्लेअर्स आणि जेण्ट्सना बिस्किटं? .... बहुत नाइन्साफी !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. तुम्हाला सिगरेट,तंबाखूचे व्यसन कसे लागले ?
मुळात मी सिगरेट का प्यायला लागलो, इथून सुरुवात करावी लागेल. माझे वडील गेले अनेक वर्षे तंबाखू खातात, पण मला ते कधीच आवडले नाही. त्यामुळे चघळायचे प्रकार मी कधीच केले नाहीत म्हणजे पान, तंबाखू-चुना, गुटखा, पानमसाला वगैरे.

माझा असा स्वभाव आहे, की एखादी गोष्ट करावी वाटली की मी ती करतो. मरताना असं वाटायला नको की अरे, आपण हे करायला हवे होते आणि ते केले नाही. निव्वळ त्या कल्पनेतून मी पहिली सिगरेट प्यायलो, अजून आठवतंय VJTI च्या वार्षिक संमेलनात, मित्राबरोबर. मला कधीही, कुणीही सिगरेट पी म्हणून सांगितले नाही, मित्र पित होते तरी त्यांनीपण कधी ऑफर केली नाही, तरीही. पहिली वेळ होती म्हणून मेंथॉलची सिगरेट प्यायलो, घाबरत घाबरत झुरका घेतला, खोकला वगैरे काही आला नाही, अर्ध्या मिनिटात डोके मंद गरगरले (मित्र म्हणाला तुला "किक" बसली). आणि ती आयुष्यातली पहिली चूक झाली. दुसर्‍या दिवशी पानवाल्याकडे जाऊन "पूर्ण" सिगरेट स्वतः प्यायलो आणि मित्रासमोर फुशारकीने सांगितले. ती आयुष्यातली दुसरी चूक झाली. हळूहळू दिवसाला १-२-५ असे प्रमाण वाढत होते. पण तरी वाटायच की हॅ, आपल्याला काही व्यसन नाही, मी कधीही सोडू शकतो. ती आयुष्यातली तिसरी चूक झाली. हळूहळू ते प्रकार वाढत गेले, नोकरीला लागल्यावर स्वतःचा पैसा आला आणि मग all hell broke loose.

२. हे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले वा करता आहात?
खूप केले. सांगतो.

३. पुन्हा व्यसन लागू नये यासाठी काय करता येईल?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरुवातच करू नका. पण जर लागले, तर पाण्याच्या सहवासात रहा. जमले तर रोज पोहायला जा. ते नाही जमले तर दिवसातून दोनदा गार पाण्याने आंघोळ करा. तेपण नाही जमले तर तलफ येईल तेव्हा घोटभर पाणी प्या. जास्त नाही, फक्त १ घोट, केवळ तोंड ओलसर करायला. कारण क्रेविंग आले की तोंडाला कोरड पडते, सिगरेट प्यावीशी वाटते. ते क्रेविंग आपल्याला मारायचे आहे. त्यासाठी तोंड ओले पाहिजे.

४. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी कीती प्रमाणात यशस्वी होते? - माहीत नाही.

५. तंबाखुमुक्त आयुष्याचे तुम्हाला झालेले फायदे काय आहेत?
बरेच आहेत. पैशाची नासाडी होत नाही, आयुष्याचे मातेरे होत नाही, तब्बेत चांगली राहाते, लपूनछपून सिगरेट प्यावी लागत नाही, कपड्यांना वास येत नाही, दात पिवळे होत नाहीत. (मी सिगरेट सोडून जवळपास २० वर्ष झाली पण अजूनही माझे दात पिवळे पडले आहेत. लंग्ज तर मला बघता येत नाहीत तिथे किती वाटोळं झालं आहे ते. एकदा नुकसान झाले की ते कधीच भरून येत नाही.)

जेव्हा तुम्ही १ आठवडा यशस्वी व्हाल, तेव्हा वाचलेल्या पैशातून स्वतःला गिफ्ट द्या (सिनेमा बघा, पुस्तक घ्या, पर्फ्युम घ्या, बायको/प्रेयसी/मुलांसाठी गिफ्ट घ्या वगैरे). मी वाचलेल्या पैशातून एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचो. त्यातून तुमचा हुरूप अजून वाढेल. तुम्ही प्रयत्न करत रहा. तुमचे व्यसन नक्की सुटेल. जर मला जमले तर तुम्हाला पण नक्की जमेल. धीर सोडू नका. Keep trying and marching towards your goal. तुम्हाला शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वाचलेल्या पैशातून एका अनाथ मुलीच्या शिक्षणाचा खर्च करायचो. त्यातून तुमचा हुरूप अजून वाढेल.

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@दगडजी ,धन्यवाद .तंबाखू सोडली आहे ,फारच तल्लफ आली तर सिगरेट पितो,तीपन हळू हळू सोडेन .विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

खूप केले. सांगतो. मी कामानिमित्त वरचेवर दौर्‍यावर जायचो. तिथे घरचे कुणी नसायचे, त्यामुळे कुणाला कळेल, कपड्याना वास येईल ही भिती नसायची. त्यामुळे सिगरेट पिणे खूप वाढले. तेव्हा ऑफिसमध्ये पण सेंट्रलाएज्ड एसी होते, हुद्दा मोठा होता त्यामुळे कुणाला भीक न घालता सिगरेट प्यायचो. दौर्‍यावर असताना एक दिवस मला उठल्या-उठल्या दात घासायच्या आधीच सिगरेट प्यावीशी वाटली आणि तेव्हा पहिल्यांदा साक्षात्कार झाला की आपल्याला व्यसन लागले आहे. ही फार मोठ्ठी गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला हे कळले पाहिजे.

मग मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सगळे म्हणतात तसे कोल्ड टर्कीने सुरुवात केली. १ दिवस बरा गेला मग परत येरे माझ्या मागल्या. मग पाकिट बाळगणे बंद केले. म्हणजे सिगरेट प्यायची तर झक्कत बाहेर जावे लागायचे. त्रास व्हायचा. कमी जायचो, पण तरीपण जायचो. मग खिशात पैसे ठेवणेच बंद केले. पण मग त्यामुळे ऑफिसात इतरांकडे सिगरेट मागायला लागलो. एक दिवस कानावर पडले की "साला, इतना बडा समझता है, लेकिन भिकारी की तरह सिगरेट मांगता है". ते खूपच मनाला लागले आणि मग सिगरेट मागणे पण बंद केले. रादर बंद झाले, पण पूर्ण नाही झाले. बाहेर कधीतरी प्यायचोच, पण २ सिगरेट्च्या दरम्यानचे अंतर वाढले. नंतर मला स्वतःच जाणवले की मी कधीच चालता-चालता सिगरेट पीत नाही. एकाजागी शांत बसून झुरके घ्यायलाच मला आवडते. त्यामुळे सिगरेटची तलफ आली की मी उठून चालू पडायचो, पण पानटपरीपासून दूर. तेव्हा मला अतिशय महत्वाचा शोध लागला. सिगरेट प्याविशी वाटली की तोंड कोरडे पडते. मग मी पाणी प्यायला सुरुवात केली. त्याने खूप फायदा झाला. इतके झाले तरी अजून १००% यश न्हवते. त्याच्यासाठी कोल्ड टर्की लागते. आमच्या ओळखीचे १ गृहस्थ होते (माझी आई त्यांच्या ऑफिसात काम करत असे, मी त्यांना आजोबा म्हणायचो). ते अतिशय श्रीमंत आणि यशस्वी होते. माझी आई सांगायची की ते २२ वर्षे रोज "५५५" चा ५० सिगरेटचा एक डबा (बहुदा त्याकाळी डबे होते, मला माहित नाही) आणि कधीकधी वर अजून १० प्यायचे. त्यांची बोटेपण निकोटिनने पिवळी पडली होती. ते एकदा पावसात घरी चालले होते आणि नेमकी काड्यापेटी संपली. तेव्हा मित्र त्यांना हिणवून काहीतरी बोलला तर त्यांनी तिथल्या तिथे "५५५" चा डबा फेकला आणि म्हणाले की मी आजपासून सिगरेट सोडली. ते आयुष्यात कधीच सिगरेट प्यायले नाहीत. मी तर त्यांना कधीच सिगरेट पिताना बघितले न्हवते, ते एकेकाळी सिगरेट प्यायचे याच्यावर पण माझा विश्वास न्हवता. पण एक हुरूप आला की हा माणूस २२ वर्षांनी जर सिगरेट सोडू शकतो, तर मी पण करू शकतो. नंतर मी जे.आर.डी. टाटा यांच्या एका पुस्तकात वाचले की त्यांनी पण एका दिवशी अशीच सिगरेट थांबवली. शेवटी मी पण एक दिवस कोल्ड टर्कीने सिगरेट थांबवली. कुठलाही विशेष दिवस निवडला नाही, कारण जर रिलॅप्स झाला तर मग पुढचा "विशेष दिवस" दिसला असता आणि मला ते नको होते. तुम्हाला हे सगळे पटकन झाले असे वाटेल, पण ही फार मोठी प्रोसेस होती.

मी एकेकाळी इतका कट्टर व्यसनाधीन होतो, हे माझ्या जवळच्या बर्‍याच लोकांना माहीतही नाही आणि माहीत झाले तरी त्यांचा विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता जवळपास २० वर्ष झाली. आज लिहिताना पण अंगावर काटा आला आहे, इतका तो प्रवास खडतर होता. पण आज मिळणारे समाधान नक्कीच अनमोल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यावरचे तुमचे सर्वच प्रतिसाद एक नंबर आवडले. बायदवे इथे कोल्ड टर्की नामक पदार्थाचा उल्लेख आहे, त्याचा अर्थ काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोल्ड टर्की

व्यसन सोडताना/सोडल्यावर लगेच होणारे मानसिक आणि शारिरीक परिणाम जे त्रासदायक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओह अच्छा, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकिपीडीयाचा विजय असो. Cold turkey

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजून एक लिहायला विसरलो होतो. एकदा रुमाल सिगरेट फिल्टरवर ठेवून त्यातून कश घेतला की रुमालावर निकोटिनचे पिवळे डाग पडतात. रुमाल कितीही धुतला तरी ते डाग जात नाहीत. मी तो रुमाल मुद्दाम वापरायचो, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या फुफुसावरचे ते निकोटिनचे डाग दिसायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय फरक पडत नाही. लै वेळा केलेत हे उद्योग कॉलेजात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दगड यांचे प्रतिसाद फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0