पे कमिशन

गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही. बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी. बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे दिनोंं कि सुरुवात झाली.

कढईतल्या तेलात आज
पकौडे नाही नाचले.

चहाच्या कपबश्या आज
टेबलावर नाही खिदळल्या .

रंगीत बर्फी हि आज
स्वाद हरवून बसली.

बाबूंच्या नशिबी आज
झाली बुरे दिनों कि शुरुवात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नक्की काय झालं असं? पैसे वाढण्याऐवजी कापले गेले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२४% नी पगार वाढणार म्हणत होते ना हो पण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

२४% पगार'वाढ' आहेच पण 'तमाम' बाबूज नाखूष आहेत. कारण :
१. वाढ २४% असली तरी नेट 'तनख़्वाह' म्हणजे हतात पैसे कमीच येताहेत.
२. त्यामूळे झालेली वाढ 'काफी' नाहिये, असं मत आणि त्यामुळेच की हो पकौडे नाचत नाहीयेत ना कप-बश्या खिदळताहेत Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, हाही जुमलाच निघाला तर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाढ २४% असली तरी नेट 'तनख़्वाह' म्हणजे हतात पैसे कमीच येताहेत.

हे कसं काय झालं ब्वॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या बाबूं लोकांची भूक काही शमत नाही. कितीही पगारवाढ दिली तरी यांना कमीच वाटते. एवढी घसघशीत वाढ मिळूनही रडतात. सरकारने सगळा खजिना यांच्यावर रिता करावा की काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

माझी माहिती अशी आहे:
१) १ जानेवारी २०१६ पासूनचा महागाई भत्त्याचा दर + मूळ पगार (बेसिक पे) च्या १२५%. (६वे पे कमिशन)
२) ज्याचा ६व्या पे कमिशनचा मूळ पगार (बेसिक पे) - 'क्ष' रुपये आहे त्याला हातात मिळणारी एकूण रक्कम (क्ष + १.२५क्ष = २.२५क्ष)
३) ७व्या पे कमिशनने सुचविलेले नवे 'फिटमेंट' - ७व्या पे कमिशनच्या अनुसारे मूळ पगार = ६व्या पे कमिशनचा मूळ पगार (बेसिक पे) गुणिले २.५७ = २.५७क्ष
४) ७व्या पे कमिशनची अंमलबजावणी पूर्ण झाली की महागाई भत्ता सुरुवातीस ०% असेल. तदनंतर दर सहा महिन्यांनी महागाई किती वाढली आहे त्या प्रमाणात तो भत्ता मिळू शकेल.

ह्याचा अर्थ ७व्या पे कमिशननुसार हातात पडणारी एकूण रक्कम त्यापूर्वी हातात पडणार्‍या एकूण रक्कमेच्या तुलनेने ०.३७क्ष इतकी अधिक असेल. ह्यापूर्वी ऐकिवात येणार्‍या बातम्यानुसार, तसेच ६व्या पे कमिशनच्या अनुभवाने, ह्यापेक्षा अधिक घसघशीत वाढीची सरकारी कर्मचार्‍यांची अपेक्षा असावी. ती पूर्ण न झाल्यामुळे असंतोष असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, 37% पगारवाढ झाली, पण भत्तारूपात ना होता बेसिकच वाढला. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे?

माझा पगार अचानक 37% वाढला तर गांगुलीसारखा शर्ट वगैरे फिरवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ऐला.... बेसिक वाढला म्हणजे पीएफ ग्रॅच्युइटी बोनस सगळं वाढलं की !!!

रडणारे लोक बौळट आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काल एक चर्चा पाहिली. त्यात तक्रार होती की इन हँड मध्ये फक्त १० % वाढ आहे. PF हा पैसा स्वतःचा नसतो अशा थाटात चर्चा चालू होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बौळट>>>हे स्पेलिंग वाचून रोफलल्या गेले आहे. ROFL ROFL

चुकून तो आपला जनार्दन नारो शिंगणापूरकरच आठवला एकदम. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसेच जन्ते च्या कामाचे काय झाले ? का हे काहीतरी भलतेच ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे विचार वाचले, पहिली गोष्ट सहाव्या वेतन आयोगामुळे गेल्या १० वर्षांत पगार, ३१.१२.२००५ च्या तुलनेत १०-१५% टक्के कमी झाला. (ग्रुप D,C आणि B कर्मचाऱ्यांचा) कारण DA फार्मुला बदलला होता.

तेवढाच पगार ७व्या वेतन आयोगमुळे वाढला आहे.

बाकी कामाच्या वेळेचे म्हणाल तर कधीही नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक, रात्रीच्या वेळी येऊन बघा, अधिकांश खोल्यांचे दिवे चमकताना दिसतील. जनतेचे भले सरकारी नीती निर्धार्नावर अवलंबून असते, तो घेण्याचा अधिकार राजानेत्यांवर असतो. त्यात कर्मचार्यांचा काय दोष. सरकारने निर्णय घेतला. बँक कर्मचार्यांनी एका वर्षात २१ कोटींच्या वर खाते उघडून दिले कि नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

म्हणजे खाजगी क्षेत्रात लोक लै काम करतात असं काही दिसलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
उलट खाजगी कंपन्यातले कर्मचारी कितीतरी अधिक कामचुकारपणा करतात पण तो दिसून येत नाही कारण त्यांचा थेट लोकांशी संबंध नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांचे विचार वाचले, पहिली गोष्ट सहाव्या वेतन आयोगामुळे गेल्या १० वर्षांत पगार, ३१.१२.२००५ च्या तुलनेत १०-१५% टक्के कमी झाला. (ग्रुप D,C आणि B कर्मचाऱ्यांचा) कारण DA फार्मुला बदलला होता.

पटाईत काका, हे पटण्यासारखे नाही.

तुम्ही उदाहरण देऊन सिद्ध करा.

कोणीही नोकर, सरकारी किंवा खाजगी १० वर्षापूर्वीच्या पेक्षाच्या कमी पगारावर काम करणार नाही, केले तर त्याच्या परीस्थिती हलाखीची होईल. कोणा सरकारी नोकराची ( पैसे न खाणार्‍या ) परीस्थिती २००५ पेक्षा ढासळली आहे असे अनुभवास आलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पगार कमी झाला असला तरी DA तर १२५ मिळाला. त्या मुळे मूळ पगारात होणारी हानी दिसत नाही. कारण पगार दुप्पट झाला. आता तुमचा पुढील अपेक्षित प्रश्न जर सरकारी कर्मचार्यांना DA मिळतो तर पे कमिशनची गरज काय??? (यालाच म्हणतात स्वत:च्या पायावर कुल्हाडी मारणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पगार कमी झाला असला तरी DA तर १२५ मिळाला. त्या मुळे मूळ पगारात होणारी हानी दिसत नाही.

मी हातात मिळणार्‍या पैश्याला पगार म्हणते, मुळ पगार आणि डीए ला वेगळे वेगळे समजण्याचा प्रकार कळला नाही.

आता प्रतिसादात तुम्ही फक्त मुळ पगार कमी झाला असे म्हणताय, पण तुमच्या मुळ प्रतिसादात पगार कमी झाला असे होते.

आता तुमचा पुढील अपेक्षित प्रश्न जर सरकारी कर्मचार्यांना DA मिळतो तर पे कमिशनची गरज काय???

असा माझा अजिबात प्रश्न नाहीये, पे कमिशन ला माझा विरोध वगैरे पण नाहीये.
फक्त कुरकुरु नये, पटत नसेल तर नोकरी सोडावी, सरकारनी काही बांधुन ठेवले नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटत नसेल तर नोकरी सोडावी, सरकारनी काही बांधुन ठेवले नाहीये. - एकदम बरोबर, बुल्स आय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त कुरकुरु नये, पटत नसेल तर नोकरी सोडावी, सरकारनी काही बांधुन ठेवले नाहीये.

इथे कुरकूर करण्याचा हेतू वाटत नाही. गेल्या वेळच्या पे कमिशनमुळे जसे खूप पैसे वाढल्याने प्रचंड आनंद दिसत होता, तसा यावेळी दिसत नाही इतकंच म्हणणं आहे. पैसे थोडेसे वाढले, तेव्हा तक्रार नाहीच. पण गेल्यावेळइतके वाढतील अशी अपेक्षा होती ती काही पूर्ण झाली नाही. असं योग्य चित्र मांडल्यावर कुरकुरीचा आरोप का बरं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी. बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे दिनोंं कि सुरुवात झाली.

- याला कुरकुर नाही म्हणणार तर काय पगारवाढीने झालेला हर्षवायू असं म्हणणार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुस्ते बोलुन थांबत नाहीयेत तर संप वगैरे करणार म्हणतायत. आता संप करण्याला पण कुरकुर म्हणायची नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0