मी हिजडा.... मी लक्ष्मी

ठाण्याला माझं घर आहे ते येऊरच्या पायथ्याशी .
घरच्या खिडकीतून येऊरचा डोंगर अगदी कवेत घेता येईल .
इतका जवळ दिसतो .
माझ्या घराची खिडकी आणि हा यांच्या मध्ये
एक छोटीशी टेकडी आहे . हिरवं गवत पांघरून असणारी .
गाई -गुरं नेहमी चरत असतात तिच्यावर . सतत हालचाल असते
...
माझं आयुष्य असच तर आहे ...
सगळ्यांच्यात तरीही एकटी

ही ती कविता ... लक्ष्मीने लिहलेली. पूर्ण ओळी नाहीत ह्या . सुरवात आणि शेवट दिलाय फक्त. शेवटच्या दोन ओळीत अख्ख्या हिजडा जमातीचेच मनोगत मांडणारी ही कविता . ट्रेन मधून जाताना हे हिजडे आत येऊन भीक मागायला लागले की भीतीच जास्त वाटायची . नक्की काय असतो हिजडा म्हणजे हे आता आता पर्यंत कळत नव्हते. "साडी नेसून पुरुषासारखे दिसणारे ,भडक मेकअप आणि टाळ्या वाजवत जबरदस्तीने भीक मागणारे पुरुष", एवढेच काय ते कळत होतं . समलैंगितता ... बाईने बाईशी केलेला सेक्स किंवा पुरुषाने पुरुषाशी केलेला सेक्स ... हे पुढे पुढे कळाले . जोगवा चित्रपट पाहिलेला पण देवाला सोडलेल्या बायका माणसांवर होता ... मागेही एकदा ऋतुपर्ण घोष ,सचिन कुंडलकर अशी नावे ऐकायला मिळाली पण एवढेच . बाकी काही कधी जास्ती माहिती मिळवावी , समजावी अशी गरजही नव्हती आणि इच्छाही नव्हती पण हे पुस्तक हातात पडले आणि बऱ्याच गोष्टी कळल्या . अर्थात अजूनही प्रश्न आहेत पण ...
हिजडा म्हणजे नक्की काय ? लिंग पुरुषाचे आणि लिंग भावना स्त्रिच्या . पुस्तकात दिलेल्या "मी लक्ष्मी च्या निमित्ताने " ह्या डॉ.प्रदीप पाटकर ह्यांच्या लेखात बरीच आणि शेवटच्या भागात बरीचशी शास्त्रीय माहिती, त्याच्यावरचे संशोधन इत्यादी माहिती आहे.

लक्ष्मीनारायण त्रिपाठी ह्या हिजड्याची ही आत्मकथा . त्याची अगदी लहान म्हणजे चौथीत असल्यापासून लोक त्याचा वापर करून घेत होते. तिचे अफेअर्स ज्या मुलांबरोबर झाली ती आता लग्ने करून स्थिर झालीत ,मुलेबाळे झालीत . काहींची लग्ने तिने स्वतःच पुढाकार घेऊन लावून दिलीत .हे सर्व सांगताना ती हळवी होते. कोणत्याही नात्यात आपल्याला कोणीच स्वीकारणार नाही ही जाणीव होते अन मग ती स्वतःच्या शरीराला कोणालाही हात लावून देत नाही . तीच्या अंगातील डान्स करण्याची कला . तिने डान्स क्लास ही काढले . तीची स्टाईल ह्यावर बरेच काही लिहलेय. एका मॉडेल बरोबर तिची ओळख होते . तिथूनच तिची मॉडेल ऑर्डिनेशन करिअर चालू होते . तिने डान्सबार मध्येही काम केले . तिथल्या मुलींची दुःखे तिने जवळून पहिली . "दाई" ह्या संस्थेची सामाजिक कामे , तिथले मदभेद . त्याची लतागुरु ही गुरु . त्यांच्यातले पैशांवरून झालेले मतभेद. तिचे आई वडिलांवर असणारे अतिशय प्रेम .म्हणूनच हिजडा झाल्यावर कित्येक दिवस घरापासून लपवून ठेवले. घरच्यांनी एका मुलीबरोबर लग्नासाठी केलेला आग्रह तिने निकराने परतवून लावला . तरीही आपला मुलगा हिजडा झाला हे समजल्यावर त्याचे आईवडील अत्यंत दुःखी होतात . रडतात ,भांडतात पण नंतर हा अबोला नाहीसा होतो कारण ती तिच्या घरीच राहते , तिकडे हिजडा कम्युनिटीत नाही राहायला जात. तिच्या घरच्यांनी तिला आपले मानले म्हणून ती बरेच विरोध समर्थपणे पेलु शकली . समाजात राहिली.डान्स क्लास चालवले . पैसे कमावले. सामाजिक कार्य केले . खूप साऱ्या ठिकाणी हिजड्यांचे प्रतिनिधित्व केले . बऱ्याच परिषदांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ती देश विदेश फिरली .तिथले वातावरण , त्यांचे प्रश्न,लढा,मित्र मैत्रिणी ह्यावर बरेच काही ती बोलली आहे पण विदेशांच्या दौर्यांबद्दल खूप काय काय आहे ते मात्र वाचायला बोअर होते . कंटाळा येतो.नको इतके पाल्हाळ त्या विदेश दौऱ्यांचा झालय . बिग बॉस , सच का सामना अशा रिऍलिटी शोज मध्ये तिने भाग घेतलेला आहे . अगदी मानलेला मुलगाही आहे तिला .. तिच्या ह्या मनोगतातुन ती हिजड्याचे जग समोर आणते. हे सर्व वाचयला अगदि भयानक वाट्ते. ती शिकलेली असल्यामुळे तिला इंग्लिश खुप छान बोलता येते , त्याचा तिला फार उपयोग झालाय. मिनीस्कर्ट ,पंजाबी , साडी असे सर्व पोशाख तिने लीलया घालून आपण काय घालावे ,कसे राहावे ह्यावर तिला कोणतेही बंधन नको आहे. बाकी खुप सारे पुस्तकातच वाचलेले बरे...

पण माणूस म्हणून ह्या हिजड्यांचे जीवन किती अवघड आहे. समाजाचे सोडा,स्वतःच्या घरचे लोक यांच्याशी कसे वागतात . त्यांचा किती मानसिक कोंडमारा होतो . हे सर्व ह्या पुस्तकातून बाहेर आले आहे . हिजड्यांची वेगळी कम्युनिटी असते . त्यांची घराणी आहेत .त्याचे नियम आहेत .ते अध्यात्मिक पारंपारिक चौकटीत बांधलेले आहेत . गुरु, चेला, त्यांचीही नाती असतात --आई, मुलगी, नात, पणती, मावशी ... असे बरेच काही समजते . हिजडा बनताना करावयाच्या पूजा, रीती, साडी देणे ... लिंग छेद करणे ... असे बरेच काही वाचायला मिळते .

हिजड्याना कोणी कामावर घेत नाही, घरात ठेवून घेत नाही. किबहुना त्याना सर्व मानसिक रोगीच समजतात. सर्वानीच नाकारल्यामुळे त्यांना जीवनाचा हक्कच नाकारल्यासारखा होतो त्यामुळे हिजडे जबरदस्तीने भीक मागून पोट भरतात . त्यांचा आशीर्वाद आणि शाप ह्यावरही बरेच काही आहे .आशीवार्दासाठी हिजडे लागतातच तसेच त्यांच्या शापही खरा होतो म्हणून लोक हिजड्यांना घाबरतात . गुन्हेगारी, शिव्या, वेगळे राहणे ह्यावर खुप काही आहे पण समाज नाकारतो म्हणून त्यांच्यावर ही वेळ येते ह्या मतावर ती ठाम आहे .

आजकाल बरेच हिजडे स्वतःच ब्रेस्ट ट्रान्सप्लांट करतात ,किमान हार्मोन थेरपी करून ब्रेस्टचा आकार स्त्री सारखा करतात .काही प्याड वापरात .काही लिंगही चेंज करून घेत आहेत . काही लग्नेही करत आहेत . बरेच आपले हक्क मिळवण्यासाठी झगडत आहेत . निदान रेशनकार्ड ,कागदपत्रे नीट दिली जावीत ह्यासाठी लढत आहेत .त्यांच्या ह्या मागण्या , मोर्चे , परिषदा , कायदे बदलून घेण्याची लढाई ह्यावर पण ह्या पुस्तकात बरेच भाष्य आहे.

मला न कळलेला मुद्दा ,हिजड्याना पुरुषाचे लिंग असते आणि लैंगिक भावना स्त्रिच्या असतात तरीही त्यांना पुरुषाबरोबर सेक्स कसा करता येत असावा ? एवढेच नव्हे तर काही हिजडे सेक्स वर्कर म्हणून काम करतात . त्यातल्या बऱ्याच हिजड्याना एड्स वैगेरे झालाय ... त्यामुळे त्यांची सामाजिक परिस्थिती आणखीनच बिघडली आहे ..अजून एक प्रश्न मला पडला तो म्हणजे त्यांना स्त्रीसुलभ भावना असतात म्हणून ते साडी नेसणे , स्त्री वेश धारण करणे हे ठीकच पण इतका भडक मेकअप ते का करतात हे काही त्यातून कळले नाही

विदेश दोर्यांबद्दल नको इतके पाल्हाळ लावले नसते तर हे पुस्तक वाचून निदान आपण हिजड्यांकडे एक माणूस म्हणून पाहायला नक्कीच शिकू....

मी हिजडा ... मी लक्ष्मी
लक्ष्मीनारायण त्रिपाठी
शब्दांकन: वैशाली रोडे
मनोविकास प्रकाशन

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चीन च्या हान राजवंशात तृतीयपंथीयांची खूप भूमिका होती असे ऐकलेले आहे. Cai Lun हा "कागदाचा" शोध लावणारा तृतीयपंथीय होता.

मी असं ऐकलंय की पंधराव्या शतकात चीन मधे व्यापार व काही प्रमाणावर चक्क मिलिटरीचे व्यवस्थापन सुद्धा तृतीयपंथीयांकडे होते. ग्लेन हबर्ड यांनी त्यांच्या "बॅलन्स" या पुस्तकात या नोंदी केलेल्या आहेत. तृतीयपंथीयांकडे संख्याबल नसेलही पण १४०५ ते १४३१ या कालात चिनी नौदलाच्या अनेक मोहीमा ह्या झेंग हे नावाच्या एका तृतीयपंथीय अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली घडल्या होत्या. या मोहीमांदरम्यान त्यांनी भारत, इंडोनेशिया, अरेबिया व पूर्व आफ्रिका ह्या प्रदेशांतील बंदरांना भेटी दिल्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या पुस्तकात सुद्धा त्यांचा बराचसा इतिहास डोकावला आहे .त्यांचे मुघल साम्राज्यातले स्थान , महाभारतातले स्थान अशी बरीच माहिती आहे . त्यांचा राजाश्रय गेला आणि त्यांची अधोगती सुरू झाली ह्यावर पण बरेचशी माहिती आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साठ पासष्ट सालापासून निरनिराळ्या मासिकांतून याविषयी लेखन येतच असतं अधुनमधून.राजाश्रय गेला अन यांच्या हालअपेष्ठा सुरू झाल्या हे खरय.जनानखान्याचे रक्षक असत हे मोगलाईत.राणी महालापासून राजाच्या महालापर्यंत मुक्त प्रवेश होता कारण एकच "हे काही करू शकत नाहीत."या गुणासाठीच ते 'पाळले' जायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक वाचले आहे. लक्ष्मीताईंना तीनचार प्रसंगी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. अनाम प्रेम या नावाने काही लोक तृतीयपंथी आणि तत्सम लोकांसाठी खूप काम करीत असतात. त्यांच्या मोहल्ल्यात जातात. त्यांचे मेळावे भरवतात, त्यांना सणासुदिनाच्या दिवशी आपल्या घरी बोलावतात. त्यांनी भीक मागत फिरू नये म्हणून त्यांना काही छोट्या उद्योगांचे प्रशिक्षणही दिले गेले आहे आणि त्यांतली उत्पादने अनाम प्रेमच्या कार्यक्रमांत विक्रीलाही असतात. अशाच एका समारंभात लक्ष्मीताईंनी भाषण केले होते. बोलण्यावावरण्यात आत्मविश्वास ओसंडून वाहात होता. पण वर लेखात म्हटलेय त्याप्रमाणे नेसणे आणि मेक-अप फार भडक असतो. या मागची प्रेरणा कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> त्यांना स्त्रीसुलभ भावना असतात म्हणून ते साडी नेसणे , स्त्री वेश धारण करणे हे ठीकच पण इतका भडक मेकअप ते का करतात हे काही त्यातून कळले नाही <<

Camp (style) इथून उद्धृत -

things with camp appeal may also be described as "cheesy". When the usage appeared in 1909, it denoted ostentatious, exaggerated, affected, theatrical, and/or effeminate behavior, and by the middle of the 1970s, the definition comprised: banality, artifice, mediocrity and ostentation so extreme as to have perversely sophisticated appeal. American writer Susan Sontag's essay "Notes on 'Camp' " (1964) emphasized its key elements as: artifice, frivolity, naive middle-class pretentiousness, and 'shocking' excess.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर सामान्य स्त्रिपुरुषांस एक जगण्याची भावना उद्युक्त करत असते ती असफल राहाते यांना तेच यांचे दु:ख.स्त्रियांपेक्षा दु:खी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तसेच वाटते. सोशल व सेक्श्युअल आयसोलेशन व पर्यायाने प्रेमाचा अभाव. हे दु:ख फार मोठे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> त्यांना स्त्रीसुलभ भावना असतात म्हणून ते साडी नेसणे , स्त्री वेश धारण करणे हे ठीकच पण इतका भडक मेकअप ते का करतात हे काही त्यातून कळले नाही <<

भडक म्हणजे नक्की काय हे थोडं संस्कृतीजन्यही असावं. माझ्या ममव (मराठी मध्यमवर्गीय) नजरेला, बुद्धीला अनेक पंजाबी, उ. प्रदेशी, मराठी-मुस्लिम स्त्रियांच्या साड्या, मेकपसुद्धा भडक वाटतात. अगदी रोजच्या वावरातलेसुद्धा. मग सणसमारंभासाठी केलेला नट्टाफट्टा आणखी निराळा. हीच गोष्ट पाश्चात्य पेहरावात कॉकटेल ड्रेसची. किंवा शाळेतल्या एकेकाळच्या सहाध्यायींच्या समूहात "आता तू कशी दिसतेस" म्हटल्यावर साडी किंवा सूटाबुटातले फोटो लावणं हा मला भडकपणा वाटतो.

जंतूच्या प्रतिसादातल्या उद्धृतात सुझन सोन्टॅग ज्याला 'naive middle-class pretentiousness' म्हणतात ते हेच असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>भडक म्हणजे नक्की काय हे थोडं संस्कृतीजन्यही असावं. माझ्या ममव (मराठी मध्यमवर्गीय) नजरेला<<
माझ्या ममव नजरेला-- भडक मेकअप म्हणजे अतिशय डार्क लिपस्टिक, नको इतका उठून दिसणारा मेकअप( जास्ती गुलाबी कलर लावलेला , गडद रंगाच्या आयशॅडो लावलेला ) असा होतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुघल दरबारात देखील असे लोक असत , त्यांना 'खोजा' असे म्हणत. पण ते सर्व नैसर्गिकरित्या तसे नसत, तर काहीजणांना तसे बनवले जात असे. (नाहीतर इतक्या मोठ्या संख्येने, एकाच ठिकाणी असे लोक कसे असणार?) म्हणजे ते जनानखान्यात काम करण्यास योग्य ठरत .
मुघल दरबारी असा एक विद्वान खोजा होता.. जो बादशहाचा दूधभाऊ होता. आणि त्याला 'तसे ' बनवले होते. बादशहा अनेक प्रसंगी त्याच्या सल्ल्यावर विसंबत असे . त्याने एक ग्र'थही लिहीला आहे.

भारतामध्ये तृतीयपंथीची अवस्था वाईट आहे. परंतु इतर देशात, काही ठिकाणी मी हे लोक, इतरांइतकेच सहजतेने काम करताना पाहिले आहेत. आणि लोक सुद्धा त्यांच्याशी तसेच वागतात.
खर म्हणजे असे असण्यात त्यांचा काहीच दोष नसतो. समाज इतर शारीरीक व्यंगाकडे जसा सहानुभूतीने पाहतो, तसेच यांच्या बाबतीत व्हायला हवे. तरच त्यांची परिस्थिती सुधारेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

एक प्रश्नः हे "खोजा" आणि "ख्वाजा" एकच का? (उदा० ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्फ ख्वाजा गरीब नवाज उर्फ केजीएन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>हे "खोजा" आणि "ख्वाजा" एकच का? (उदा० ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती<<

नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला न कळलेला मुद्दा ,हिजड्याना पुरुषाचे लिंग असते आणि लैंगिक भावना स्त्रिच्या असतात तरीही त्यांना पुरुषाबरोबर सेक्स कसा करता येत असावा ?

https://en.wikipedia.org/wiki/Top,_bottom_and_versatile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकपणाचा विषय ताजा असतानाच The subversive power of​ ​the​ ​black dandy वाचलं. लंडनमधल्या एका छायाचित्रांच्या प्रदर्शनाविषयी त्यात माहिती आहे. त्यातला काही भाग इथेही लागू होईल असं वाटतं -

Dandyism is also about using dress to flout conventional notions of class, taste, gender and sexuality. [...] (छायाचित्रं) also highlight how, for black men, style is a form of radical personal politics. [...] Their (छायाचित्रांमधल्या कृष्णवर्णीय पुरुषांची) style is by turns flamboyant, provocative, arresting, camp, playful and assertive. It is about confounding expectations about how black men should look or carry themselves in order to establish a place of personal freedom: a place beyond the white gaze, where the black body is a site of liberation rather than oppression.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गेल्या महिन्यात एका दुकानात काउंटरवर एक बाई दिसली, तिने सोनेरी रंगाचा शर्ट घातला होता. हा शर्ट हँगरला टांगलेला दिसला असता तर मी त्यावर मनातल्या मनात का होईना, चिक्कार हसले असते. पण त्या कृष्णवर्णीय बाईला तो फारच शोभून दिसत होता आणि तो रंग अनौपचारिक अजिबातच वाटत नव्हता. तिचा फोटो न काढल्याचा लगेच पश्चात्ताप झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.