अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?

सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या.

खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात. खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच. योगाचे म्हणाल तर तो ही नियमितपणे दीर्घकाळ करावा लागतोच. बहुतेक लोकांना हे जमत नाही. त्यांना सौपा उपाय पाहिजे. मग जर कुणी झाड-फूंक, गंडा, ताबीज बांधून किंवा उपाय सांगून आजार बरा करत असेल तर साहजिकच आहे, लोक त्याच्या मागे धावणारच.

सुख प्रत्येकालाच हवे असते. चांगली बायको/नवरा, आज्ञाकारक मुले, घरा बाहेर हि नौकरी- धंद्यात सर्वकाही आपल्या मनासारखे घडावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. पण संसार म्हंटले कि समस्या या येतातच. मुलीचे लग्न ठरत नाही, मुलगा घर सोडून चालला जातो, बायकोचे प्रेम मिळत नाही. नौकरी धंद्यातल्या समस्या, राजनेता असेल तर विरोधकांचे षडयंत्र इत्यादी. कधी-कधी दुसर्याचे सुख पाहून हि माणूस दुखी होतो. आयुष्यातल्या समस्या स्वत: सोडवाव्या लागतात. त्या साठी कधी-कधी स्वत:ला बदलावे लागते. दुसर्यांना समजून घ्यावे लागते. योग्य मार्ग आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे लागते. पण जर कुणी उपाय सांगणारा, ज्योतिषी किंवा तंत्र-मंत्र करणारा बंगाली तांत्रिक तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडविणार असेल तर साहजिकच आहे, तुम्ही त्याच्या मागे धावणारच.

पैसा हि सर्वांना पाहिजेच. पैसा कमविण्यासाठी कुठला तरी रोजगार, शेती इत्यादी करावीच लागते. त्या साठी ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि अविरत परिश्रम हे करावेच लागते. आता जर कुणी पैश्यांचा पाऊस पाडणारा, लॉटरीचा आणि सट्ट्याचा अंक सांगणारा, गुप्त धनाचा ठाव ठिकण्याची माहिती देणारा इत्यादी भेटला तर मेहनत करायची काय गरज. घर बसल्या पैसा भेटेल. ज्योतिषी, तांत्रिक, बाबा लोक अश्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढ्तातच.

स्पष्टच आहे, बिना ज्ञान, परिश्रम करता, माणसाला सुख समृद्धी आणि स्वास्थ्य पाहिजे असेल तर तो सौपा शोधतो. ज्योतिषी, तांत्रिक, बंगाली बाबा इत्यादींचा नादी लागतो. शेवटी आपले सर्वस्व हरवून बसतो.

सौप्या भाषेत सांगायचे तर भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच अंधविश्वास.

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पटाईत काकांचा आयडी घाटपांडे यांनी हॅक केला की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

What's the answer to ninety-nine questions out of a hundred? Money.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोचक समस्यांचे निराकरण भोचकपणा न करता होईल हा पण अंधविश्वास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच अंधविश्वास.

अंधविश्वासाकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही सादर केलेला आहे. 'मला लोकांनी सांगितलेलं आहे की सर्वसाधारण नियमांनुसार अमुक गोष्ट होणं शक्य नाही. पण मला वाटतं नक्की काहीतरी चमत्कार होईल आणि परिस्थिती बदलेल.' याप्रकारे विचार करणं हा अंधविश्वास. मला त्यावरून माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. ती तरुण असताना तिची एक मैत्रीण एका पुरुषाच्या प्रेमात पडली होती. त्या मैत्रिणीला सर्वांनी सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही, तुझ्याशी एकनिष्ठ राहाणार नाही. तू त्याच्याबरोबर फारतर चार दिवस मजा कर, पण लग्न करू नकोस. पण तिचा स्वतःवरती विश्वास होता 'मी याला बदलू शकेन'. तिने लग्न केलं आणि व्हायचं तेच झालं. तिच्या वाट्याला वाईट नातं आलं. तिचा विश्वास हा अंधविश्वास म्हणता येईल.

अंधविश्वासामध्ये एक डिनायलची - सत्य नाकारण्याची - प्रवृत्ती असते.

या विषयावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे, पण तुमची लेखमाला पुढे जाण्याची वाट बघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मैत्रीण एका पुरुषाच्या प्रेमात पडली होती. त्या मैत्रिणीला सर्वांनी सांगितलं होतं की हा माणूस चांगला नाही, तुझ्याशी एकनिष्ठ राहाणार नाही. तू त्याच्याबरोबर फारतर चार दिवस मजा कर, पण लग्न करू नकोस. पण तिचा स्वतःवरती विश्वास होता 'मी याला बदलू शकेन'. तिने लग्न केलं आणि व्हायचं तेच झालं. तिच्या वाट्याला वाईट नातं आलं. तिचा विश्वास हा अंधविश्वास म्हणता येईल

ह्या स्त्री ला जसा त्या पर्टीक्युलर पुरुषाला सुधारण्याचा विश्वास होता तसाच अंध(?)विश्वास काही लोकांना आपण समाजाला अंधश्रद्धे पासुन सोडवु असा असतो. पण त्यांना अंधश्रद्ध म्हणत नाहीत, असे का बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसाच अंध(?)विश्वास काही लोकांना आपण समाजाला अंधश्रद्धे पासुन सोडवु असा असतो. पण त्यांना अंधश्रद्ध म्हणत नाहीत, असे का बरे?

तै, तुम्ही कुठच्या जगात जगता? गेल्या शतक दोन शतकात कित्येक अंधश्रद्धा-अंधविश्वास व्यसन सुटावं तसे सुटलेले आहेत हो. ते असल्याच लोकांच्या प्रयत्नांतून आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंधविश्वासामध्ये एक डिनायलची - सत्य नाकारण्याची - प्रवृत्ती असते.

रोचक सुटसुटीत अन एकतर्फी विधान अल्मोस्ट यशस्वीपणे लादणारी व्याख्या. पण परीपुर्ण अथवा व्यापकतेच्या द्रुश्टीने थोडी दिशाभुल न करणारी अजिबात नाही...! कारण या कसोटीवर आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा अंधविश्वास ठरतो. आणी होप आशावाद वगैरेवगैरे अस्तित्वहीन म्हणुन हिणवले जाउ शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ही व्याख्या नाही. गुणधर्मांचं वर्णन आहे. आत्मविश्वास आणि अंधविश्वास या दोहोंमध्ये विश्वासाचा भाग असतो हे खरंच आहे. पण त्यातून 'सगळेच विश्वास हे अंधविश्वास असतात' असा अर्थ कोणी काढला तर ते योग्य ठरणार नाही. एखादी गोष्ट मर्यादित प्रमाणात असणं आणि अतिरेकी प्रमाणात असणं यात गुणात्मक फरक असतो. हा दगड मला प्रयत्न केला तर उचलता येईल, हा आत्मविश्वास. हा पर्वत मला प्रयत्न केला तर उचलता येईल हा अंधविश्वास. पहिल्यात आपल्या मर्यादेच्या किंचितच पलिकडचं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न असतो, तर दुसऱ्यात अशक्य गोष्ट चमत्काराने साध्य करता येईल असा विश्वास असतो. एका विशिष्ट पातळीपुढे गेला की तो आशावाद राहात नाही, तर डिनायल सुरू होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दगड मला प्रयत्न केला तर उचलता येईल, हा आत्मविश्वास. हा पर्वत मला प्रयत्न केला तर उचलता येईल हा अंधविश्वास.

ठीक आहे. मग याला काय म्हणाल, आत्मविश्वास की अंधविश्वास?

आर्किमिडीजची तरफ

(व्यक्तिश:, मी याला आत्मविश्वासही म्हणणार नाही नि अंधविश्वासही म्हणणार नाही. मी याला शियर अरोगन्स - किंवा सामान्यजनांच्या भाषेत माज - म्हणेन.)

(<गब्बर मोड>पण... पण... पण... माजात वाईट नक्की काय असते?</गब्बर मोड>)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, किती हलवायची हे महत्त्वाचं आहे ना! त्याला पुरेशी मोठी लिव्हर दिली तरी तो पीकोमीटरभरही हलवू शकणार नाही. तसं काय, मी पृथ्वीवर उडी मारली तरीसुद्धा पृथ्वी हलते. आर्किमिडीजला न्यूटनचे नियम माहीत नव्हते म्हणून त्याला लीव्हर फल्क्रम वगैरे बोलावं लागलं. डोंगर आख्खा उचलायचा झाला तर त्यासाठी कृष्णाची करंगळीच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यात आपल्या मर्यादेच्या किंचितच पलिकडचं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न असतो, तर दुसऱ्यात अशक्य गोष्ट चमत्काराने साध्य करता येईल असा विश्वास असतो.

चमत्कार बरीच सापेक्ष गोष्ट आहे म्हणून आपल्याला अभिप्रेत असलेला हां डीनायल मोड "चमत्कार " मधे न आणता स्पश्ट केला तर बरे होइल. अन्यथा चमत्काराने एखादी गोश्ट घडु शकते असे वाटणे इतपत व्याख्या पुरेशी आहे, कारण हा "डीनायल मोड" संदर्भ आपण स्पश्ट करत असलेल्या गुणधर्माला विनाकरण रोचकपणे मजेशीर बनवतोय.

चमत्काराने एखादी गोश्ट घडु शकते असे वाटणे इतपत अंधश्रध्देची व्याख्या पुरेशी नाही काय ? आपण म्हणता की आत्मविश्वास आणि अंधविश्वास या दोहोंमध्ये विश्वासाचा भाग असतो हे खरंच आहे पण हे इथेच थांबत नाही कारंण अंधविश्वास आत्मविश्वास वाढवु शकतो अथवा आत्मविश्वास अंधविश्वास वाढवु शकतो म्हणून यातील "विश्वास" व "डिनायल" हे फॅक्टर फार संयमीतपणे "अंध" शब्दाचा जबाबदारीने वापर करुन गुणात्मक द्रुश्ट्या स्पश्ट होणे आत्यावश्यक आहे. अथवा आपण उदाहरण देता तसे निव्वळ इंटेसीटी हा फॅक्टर आत्मविश्वास अंधविश्वासातला मुलभुत फरक मानणे मुळ मुद्दा अजुन जटील करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मूळ लेखात लेखकाने 'अंधविश्वास म्हणजे काय?' यापेक्षा 'कुठच्या परिस्थितीतून, कुठच्या प्रकारच्या प्रवृत्तींतून अंधविश्वास निर्माण होतो?' यावर भर दिलेला आहे. त्यामुळे अंधविश्वासाच्या व्याख्येपेक्षा अंधविश्वासाच्या गुणधर्मांवर भर आहे. त्यामुळे मीही काही त्रोटक प्रमाणात गुणधर्म मांडण्याचा प्रयत्न केला होता.

आपल्याला अभिप्रेत असलेला हां डीनायल मोड "चमत्कार " मधे न आणता स्पश्ट केला तर बरे होइल.

त्यासाठी जड दगड उचलण्याची क्षमता असण्यावर विश्वास आणि पर्वत उचलू शकण्यावरचा विश्वास हे उदाहरण दिलं होतं. 'काही झालं तरी आपल्याला पर्वत उचलणं शक्य नाही' या सत्यापासून फारकत घेऊन ते नाकारण्याची क्षमता हे अंधविश्वासाचं महत्त्वाचं अंग आहे.

अंधविश्वासाचे इतरही अनेक गुणधर्म आहेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या अंगी भौतिक नियम बदलण्याची किंवा त्यांविपरित घडवून आणण्याची शक्ती असू शकते यावर विश्वास असणं. पण मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पटाईतांनी पुढचे भाग लिहिण्याची वाट पाहातो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0