पाऊस थांबलाय. (कविता)

पाऊस थांबलाय.
काळ्याभिन्न अंधारात,
स्वत:ला कोंडून घेत
पाऊस थांबलाय.

कोसळण्याच्या अनिवार इच्छेला
बांध घालत,
पाऊस थांबलाय.

स्वत:लाच उधळून देणारा
पाऊस,
स्वत:लाच सावरत थांबलाय.

त्यानं शहाणं व्हायचं ठरवलय;
हाऊ टू विन फ्रेन्ड्स अँड इन्फ्ल्युअन्स पीपल
सारखी पुस्तकं वाचून.

फ्रेम हवीच चित्राला
हे उमगून,
जगण्याला चौकट घालत,
पाऊस थांबलाय.

ढगांच्या खिडकीतून बघत,
थोडसंच वाकून,
पाऊस थांबलाय.

मातीतून धडपडत वर येणारा
दुर्दम्य रंग दिसूनही
पाऊस थांबलाय.

त्या रंगाशी कॉम्बिनेशन
कसं दिसेल?
असा विचार करत
पाऊस थांबलाय,

आपलाच रंग विसरून.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हृद्य कल्पना. साजेसे शब्द. आपुलकी वाटावी अशी कविता.
आभार!

अवांतरः उगीच आरती प्रभूंची एक ओळ आठवली : 'पडसादाच्या पल्याडचा शंखनाद माझ्याभोवती दबा धरून गोठलेला'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर !!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप धन्यवाद.

'जमते आहे ढगात पाणी
वीज वाकते करीत उतावीळ
ढळता ढळता सांज सुरंगी
उठे दिशातून वांझ भुतावळ'

एकंदरीत वातावरणामुळे ह्या ओळी मला आठवलेल्या. आरती प्रभूच्याच आहेत की इंदीरा संतांच्या ते आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरती प्रभूच Smile

संपुर्ण कविता :
जमते आहे ढगात पाणी, वीज वाकते करित उताविळ
ढळता ढळता सांज सुरंगी, उठे दिशांतुन वांझ भुतावळ
जमते आहे ढगात पाणी, कळसापाशी पळस पिसाटे
वावटळीने रावुळघंटा, घणघण गाभाऱ्यात घुसमटे
जमते आहे ढगात पाणी, दुखतो फांद्यांमधल्या सांदित-
क्षणाक्षणाने असा काजवा; पाचोळ्याला भोवळ येत
जमते आहे ढगात पाणी, अजुन परंतू ढगचि फुटेना;
आणि विजेचा जराजराही त्या पाण्यांतुन देठ तुटेना

मस्त जमून आली आहे तुमची कविता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! फारच सुरेख कल्पना आहेत.. शब्दयोजनाही नेमकी.. फारच आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!