अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


नकारात्मक लढा

(अंधविश्वास विरुद्ध लढणार्या संस्थांच्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण माझ्या सारख्या सामान्य माणसाला वाटते, समाजाच्या विरुद्ध जाऊन आपण समाजात परिवर्तन घडवून आणू शकत नाही. त्या साठी समाजात अंधविश्वास याची करणे शोधून मूळ समस्या दूर करणे गरजेचे. इथेच या संस्था चुकतात. माझ्या मतांशी सहमत होण्याची आवश्यकता नाही.)

एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते. सुरवातीला त्या महानुभावांनी आपल्या संस्थेचा परिचय दिला. भोंदू बाबांच्या विरोधात चाललेल्या त्यांच्या संस्थेच्या कामांची तपशील दिली. त्यांच्या संस्थेच्या कार्यात येणार्या अनेक संकटांचे विवरण हि दिले. समाजात पसरलेल्या अंधविश्वासांवर बोलताना मात्र ते रस्ता भटकले. थोडक्यात म्हणावे तर त्यांनी सत्यनारायण कथेचा माखौल तर उडविलाच पण अनेक पौराणिक कथांची खिल्ली हि उडविली. तिथे बसलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे. सारांश एवढेच, त्यांची मेहनत फुकट गेली. काय चुकल त्या विद्वान माणसाचे. लोक अंधविश्वासी का बनतात हे त्यांना माहित नव्हते. जर मूळ कारणच (स्वास्थ्य,सुख आणि संपत्ती) माहित नसेल तर तिचे समाधान कसे सांगणार.

समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले. जुन्या काळातल्या पौराणिक कथा, मग त्या देवी देवतांच्या, राक्षस, अप्सरांच्या असो किंवा चान्दोबातल्या, या कथांमध्ये चमत्कार असतात. या चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही.

एक आणखीन मोठी घोडचूक हि ह्या संस्था नेहमीच करतात. प्रत्येक समाजात जन्म ते मृत्य अनेक प्रकारचे संस्कार असतात. धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही. धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत. आपण समाजाचा हिस्सा आहोत, दर्शवण्यासाठी लोक समजासोबत आपले सुख आणि दुख वाटतात. इथे लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा समाज काय म्हणेल यासाठी आपल्या चादरीपेक्षा (क्षमतेपेक्षा) जास्त खर्च करतात. हि मूळ समस्या आहे. मुलाचे नाव ठेवणे असो किंवा श्राद्ध, आपण गाव जेवण हि घालू शकतो किंवा कमीत-कमी खर्चात घरातल्या घरात हि करू शकतो. काही नसेल तर पत्र-पुष्प देवाला वाहून हि आपण सर्व संस्कार करू शकतो. शिवाय सर्व धार्मिक परंपरांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन आपल्या सनातन धर्माने कुठेच घातलेले नाही. समाजाला या दृष्टीकोनातून जागृत करण्याची गरज आहे. संस्कारांचा विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. आज आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. कारण समाजात काळानुसार संस्कार आणि परंपरा बदलत राहतातच. (इथे केक घरी कापायचा कि हॉटेलमध्ये जाऊन, हाही खर्चाचा विषय आहे, अंधविश्वासाचा नाही).

धार्मिक अथवा पारंपारिक संस्कार यांना अंधविश्वासांशी जोडणे मुळातच चुकीचे आहे. ह्या मुळेच लोक या संस्थांना धर्मविरोधी समजतात.

या संस्थांचा दुसरा उद्देश्य भोंदू बाबांविरोधात कार्रवाई करणे. यात संघर्ष हा आलाच. संघर्ष म्हंटला कि संघर्षरत दोन्ही बाजूंचे नुकसान होणारच. पण कधी-कधी निर्दोष लोकांचा बळी हि यात जातोच. जो पर्यंत लोक उपाय सांगणार्या बाबांना स्वखुशीने दक्षिणा द्यायला तैयार आहे, तो पर्यंत भोंदू बाबांचे प्रस्थ कमी होणार नाही. एक आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच. समस्येचे समाधान लोकांना या बाबांकडे जाण्यापासून थांबविणे यात आहे. पण त्या साठी मूळ समस्या माहित असायला पाहिजे ना.

सारांश, अधिकांश अंधविश्वास विरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि दुसर्यांच्या विरोधावर आधारित असल्यामुळे अपेक्षित परिणाम हि मिळत नाही परंतु शत्रू मात्र भरपूर पैदा होतात.

क्रमश:

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

>>समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले

स्वास्थ्य,सुख आणि संपत्ती इत्यादि समस्येचे मूळ कारण शनीचा कोप किंवा मागच्या जन्मीचे पाप अशा प्रकारची कारणे पौराणिक कथा सांगतात. ते कारण चूक आहे हे सांगण्यासाठी त्या कथांमधील मजकूरातील तार्किक दोष दाखवणे हे आवश्यकच आहे. त्याला खिल्ली उडवणे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला.

>> ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे.

त्या गृहस्थांनी टीका केलेले अंधविश्वास 'सनातन धर्माचा' भाग आहेत का? नसतील तर सनातन धर्माने त्या टीकेने अस्वस्थ का व्हावे? भाग असतील तर टीका सनातन धर्माला चिकटणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तार्किक दोष दाखवणे हे आवश्यकच आहे. त्याला खिल्ली उडवणे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला.

थत्ते चाचा, हुच्च भुभुंचे तार्कीक किंवा अतार्कीक कुठलेही दोष दाखवले की "अभ्यास वाढवा/करा" असे म्हणतात त्याला काय संज्ञा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>"अभ्यास वाढवा/करा" असे म्हणतात त्याला काय संज्ञा आहे?

सॉरी. राँग नंबर !!

मी नाही त्यातला !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते साहेब, आपण सामान्य माणसाच्या बुद्धीने विचार करा, तुम्हाला त्याला 'ढोंगी बाबा कडे न जाण्यासाठी समजवायचे आहे. ते सोडून तुम्ही जर पुराणातील वांगी मोजू लागल किंवा तर काय होईल. पुराणातल्या घटना गेल्या युगातील गोष्टी त्या आज होणे नाही. श्रीकृष्ण काही आज सुदर्शन चक्र घेऊन पृथ्वीवर येणार नाही हे अडाणी माणसाला हि माहित असते. त्याच्या श्रद्धास्थांना दुखवून तुम्ही त्याला 'ढोंगी बाबांकडे नका जाऊ हे समजाविण्याचे प्रयत्न करणार तर तो तुमचे का ऐकेल. तुम्हाला त्या माणसाची समस्या काय आहे हे माहित असले पाहिजे. तरच तुम्ही त्याला 'ढोंगी बाबाकडे जायला थांबवू शकतात. पुढच्या भागात तेच लिहिणार आहे.

अनुराव जी, मुंबईला जायचे आहे, आणि चेन्नईचे तिकीट घेतले तर गाडीत बसायला तर मिळेल पण तुम्ही मुंबईला पोहचणार नाही. आता तुम्ही म्हणाल मी तर तिकीट घेतले आहे. अहो पण मुंबईला जाण्यासाठी मुंबईचे तिकीट घ्यायचे असते. याला पण तांत्रिक दोष म्हणतात. हेच आज घडते आहे. एका विशिष्ट संस्थेचे नाव निघाले कि लोक शंका घेतात. का? यावर विचार करायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्हाला त्याला 'ढोंगी बाबा कडे न जाण्यासाठी समजवायचे आहे. ते सोडून तुम्ही जर पुराणातील वांगी मोजू लागल किंवा तर काय होईल. पुराणातल्या घटना गेल्या युगातील गोष्टी त्या आज होणे नाही. श्रीकृष्ण काही आज सुदर्शन चक्र घेऊन पृथ्वीवर येणार नाही हे अडाणी माणसाला हि माहित असते.

पुराणातल्या घटना 'आज होणे नाही' किंवा श्रीकृष्ण 'आज' सुदर्शन चक्र घेऊन येणार नाही असे नसून त्या गोष्टी पूर्वीही कधी घडल्या असणे शक्य नाही हे सांगणे हा उद्देश असतो. ते सांगितले नाही तर तो मनुष्य "तो बाबा ढोंगी असेल पण हा बाबा जेन्युइन आहे" असा गैरसमज करून घेईल.

दुसरे म्हणजे ढोंगीबाबाकडे निघालेल्या माणसाला अंनिस पुराणे आणि धर्म याविषयी सांगत नाही. पुराणे आणि धर्म यांच्याबाबतचे विवेचन ते जनरल भाषणात करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही. धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत.

ये लगा सिक्सर... फिर चँपियन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पण माझ्या सारख्या सामान्य माणसाला वाटते, समाजाच्या विरुद्ध जाऊन आपण समाजात परिवर्तन घडवून आणू शकत नाही.

महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आगरकर अशी काही नावं समाजसुधारणेच्या बाबतीत डोळ्यासमोर तरळून जातात. त्यांनी जर हे मानलं नाही म्हणून ते असामान्य झाले, आणि समाज खरोखरच सुधारला.

तुमच्या वाक्याचा अर्थ 'प्रस्थापित शक्तींच्या विरोधात उभं राहून बदल घडवण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्या कलाकलाने घ्यावं तरच काही बदल पदरात पडू शकतात.' किंवा 'जळात राहून मछलीशी वैर धरू नये' असा जास्त व्यापक घेतला तर शिवाजी महाराज, भगत सिंग वगैरे अनेक नावं पुढे येतात.

अंधविश्वासाच्या फोफावलेल्या वृक्षाच्या फक्त लहानलहान फांद्या छाटा, पण मुळावर घाव घालायला जाऊ नका असा सल्ला मला बार खाली करण्याचा सल्ला वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाज खरोखरच सुधारला.

ह्या बद्दल शंका आहे, बाकी ठीक आहे/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्ही 'मुलगी शिकली प्रगती झाली' हे ऐकलेलं नाहीये का? त्याची सुरूवात ज्योतिबा फुल्यांनी केली. आणि ते महारांना पाणीच नाही तर नोकऱ्या वगैरे देण्याचं काम - ते आंबेडकरांनी केलं म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटले चर्चा अंधश्रद्धा / अंधविश्वास ह्या बाबत चालु आहे. बाकीचे मुद्दे कशाला आणताय?
त्याच्यात काही बदल झाला का बोला. पूर्वीच्या ( १९५०-६०-७० ) च्या काळापेक्षा श्रद्धा हा प्रकार सध्याच्या काळात वाढला आहे असे वाटते का कमी झाला आहे असे वाटते?
४०-५० वर्षापूर्वी जितके महाराज, माताजी, बाबा, सत्संग , पोथ्या वाचणे होते ते कमी झालय का वाढलय ते सांगा ते सुद्धा तुमच्याच आजुबाजुला बघुन.

कदाचित पूर्वी शिक्षण कमी असायचे आणि आता उच्चशिक्ष्रीत लोक हे करतात.

पूर्वी चारचौघात स्वताच्या अंधश्रद्धे बाबत बोलताना ती व्यक्ती जरा वरमुन बोलायची, आता तोंड वर करुन बोलते.

-----------
ह्या वर पूर्वी लोक गणपती नदीत विसर्जन करीत आणि आता काही लोक घरात बादलीत करतात - अश्या टाइप च्या सुधारणा सांगु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय तुम्ही बदललात. मी 'समाजाच्या विरोधात उभं राहून समाज बदलण्याचा प्रयत्न करणारांनी तो बदलला, सुधारला' असं म्हणत होतो. त्यामुळे 'प्रस्थापित व्यवस्थेच्या कलाकलाने घ्यावं' हा मुद्दा बाद ठरतो, इतकंच माझं म्हणणं होतं.

आणि अंधविश्वासांच्या बाबतीत - बाबा, बुवा वगैरे जाऊद्यात. साप चावला की मांत्रिकाकडे नेऊन त्याच्या मंत्रांनी विष उतरतं हा अंधविश्वास होता. तो आता गेलेला आहे. देवीचा रोग म्हणजे देवीचा कोप हा अंधविश्वासच काय, देवीचा रोगही गेलेला आहे. त्यासाठी सरळ व्यवस्थित लशीकरण केलं गेलं. त्या विश्वासाचं लांगुलचालन केलं गेलं नाही. लस टोचली की रोग होत नाही असा धडाकेबाज प्रचार केला गेला. अशी अनेक उदाहरणं देता येतील, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात.

बिनवैद्यकीय क्षेत्रात - महाराचा स्पर्श झाला की विटाळ होतो, त्यामुळे आंघोळ करून पवित्र व्हावं लागतं - हाही अंधविश्वासच होता. तो कायदा करून पद्धतशीरपणे मोडला. इतका मोठा समाज त्यावर विश्वास ठेवतो वगैरेला भीक घातली नाही.

स्त्रियांनी पाळीच्या वेळी देवळात गेलं तर बिच्चारा देव विटाळतो. हाही अंधविश्वासच. तोही आंदोलन करून, कायद्याचा बडगा वापरून मोडला.

अजून किती उदाहरणं हवीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी मते प्युरीटीस्ट आहेत. बायकांना देवळात जाउ नये असे वाटणे म्हणजे अंधविश्वासापासुन मुक्ती आहे. देव विटाळत नाही असे मानणे म्हणजे देव आहे असा विश्वास असणे असे आहे. त्यामुळे मंदीरात परवानगी देणे म्हणजे श्रद्धेच्या दर्जात अजिबात कमतरता झालेली नाहीये. मंदीरे ओस पडतील तेंव्हा मी म्हणीन की आता बदल झाला आहे.

सत्यनारायण करणार्‍यानी सत्यनारायण न करता नुस्ती पोथी वाचली, तर माझ्या द्रूष्टीनी काही फरक पडला असे वाटत नाही. काही काही नुकसान करणार्‍या प्रथा कदाचित कमी झाल्या असतील त्यांची जागा दुसर्‍यांनी घेतलीय ( त्यामागचे कारण स्वार्थ हे आहे बाकी काही नाही ).

महाराचा स्पर्श झाला की विटाळ होतो, त्यामुळे आंघोळ करून पवित्र व्हावं लागतं

हा प्रकार मुद्दामुन केलेला होता वर्चस्व मेंटेन करण्यासाठी. नाहीतर अस्प्रूष्य स्त्री शी संग करायला कोणाची ना नव्हती (पण लपुन छपुन )

---------

आता साप चावला म्हणुन मांत्रीका कडे जात नसतील काही लोक. जेंव्हा जात होती तेंव्हा दुसरा उपायच नव्हता हा मुद्दा ही लक्षात घ्यायला हवा. जेंव्हा अल्टरनेटीव्ह मिळाला तेंव्हा लोकांनी आधीचा मार्ग बदलला, त्याच्याशी अंधश्रद्धे ला जोडणे चुक आहे.

हे म्हणजे २०० वर्षापूर्वी लोक रेल्वे वापरत नव्हती आता वापरतात म्हणण्यासारखे आहे.

आता मांत्रीकांची जागा बुआ आणि माताजींनी घेतली आहे. बरं हे बुआबाज लोक थोडे शहाणे असल्यामुळे अगदी नरबळी द्या, जादुअटोना करा म्हणत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्पृश्यांबाबतचा विश्वास कशासाठीही का पसरवलेला असेना अंधविश्वासच होता ना? त्यापायी कोट्यवधी लोक कायम वाळीत टाकलेल्या अवस्थेत समाजात जगत होते. आता ते राजरोसपणे समाजात वावरून नोकऱ्या करू शकतात. ही सुधारणा नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्पृश्यांबाबतचा विश्वास कशासाठीही का पसरवलेला असेना अंधविश्वासच होता ना

अजिबात नाही, चांगले माहीती होते की काही विटाळ वगैरे होत नाही. चालूपण होता निव्वळ.

In some cases, you can attribute malice even if it looks like stupidity.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुजी

अस्पृश्यांबाबत 'स्पर्श' हा अंधविश्वास नाही. हा वर्गभेदच प्रकार आहे. जसे आता काही वर्षांपासून (मंटेकसिंह अहलुवालिया, योजना आयोग मध्ये प्रथम वेगळे मुत्रालय बांधले होते) प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुत्रालय अलग अलग झाले आहे. कर्मचार्यांनी वरिष्ठस्तराच्या अधिकाऱ्यांचे मुत्रालय वापरू नये म्हणून स्मार्ट उघडणारे मुत्रालयांचे दरवाजे आहेत. अर्थात ग्रुप A अधिकारी = ब्राह्मण बाकी ग्रुप B, C आणि D = हरिजन. मजेदार गोष्ट दरवाजावर लिहिलेले शब्द मंत्री हि वाचत असतील. सामाजिक अधिकारांसाठी झगडणारे मंत्री सुद्धा. पण हि यावर कार्रवाई केली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अस्पृश्यांना स्पर्श केल्यावर काहीतरी वाईट (विटाळ) होतो' असा लोकांच्या मनात समज नव्हता का? माझ्या आजीच्या पिढीतल्या अनेकांकडून हा ठाम समज मनात असल्याचं मी पाहिलेलं आहे. पन्नास शंभर वर्षांपूर्वी शिवाशीव सर्रास पाळली जायची. तो अंधविश्वासच. आणि गंमत म्हणजे धर्माच्या शिकवणुकीतून तो पद्धतशीरपणे पसरवला आणि जोपासला गेला. मनुने ज्या शिक्षा शुद्रांसाठी सांगितल्या त्या वर्गभेद निर्माण व्हावे म्हणून सांगितल्या का?

ए ग्रेड अधिकाऱ्यांना पैसेही बी सी आणि डी ग्रेडपेक्षा जास्त मिळतात. हा वर्गभेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की अधिकार/जबाबदारीनुसार वेतन देण्याचा भाग आहे? वेगळी, स्वच्छ, मोठी बाथरूम हे त्या पोझिशनचे पर्क्स आहेत असं का म्हणता येणार नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्रिकांची जागा आता होमिओपाथी आणि वेगवेगळ्या पॅथींनी घेतली आहे हे दिसत नाही का तुम्हाला.
------
बात्रांची औषधे घेणार्‍यांनी अनिरुद्ध बापुंच्या शिष्यांना हसावे का? हा खरा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांनी शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांना हसु नये अथवा शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांनी ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांना हसु नये. वर वर या गोष्टी दोन वेगळ्या भास्तात पण दोन्ही गोष्टी तितक्याच अंधश्रध्दाळुपणाच्या ध्योतक आहेत. कारण वाचक या दोन्ही मधुन नेमकी एकच गोष्ट अपेक्षित करत असतो आणी ते म्हणजे असे काही सिक्रेट गवसेल की तसे वागुन त्याचे जिवन अमुलाग्र बदलेल.... आणी ह्या दोन्ही पुस्तकांच्या पंख्यांना अशी पुस्तके पध्दशीरपणे काही तरी मोठे हाती गवसुन दिल्याचा भास उत्क्रुश्ट निर्माण करतात पण प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी वाचणारा ना समाधीअवस्थेला पोचतो ना यु कॅण विन वाचुन नवीन अंबानी निर्माण होतो. प्रत्येकाचे बायबल वेगळे.. इतकंच. आणी प्रत्येक गोश्ट अ‍ॅसीड मधे टाकुन सिध्द करु बघणारे तर अजुन मजेशीर.

अंधश्रध्दा हा फार मजेशीर शब्द करुन टाकला आहे सामान्यांनी त्यापेक्षा अनिसं ने याची सर्वोत्कृश्ट व्याख्या केली आहे. जी अतिशय पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

>>ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांनी शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांना हसु नये अथवा शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांनी ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांना हसु नये. वर वर या गोष्टी दोन वेगळ्या भास्तात पण दोन्ही गोष्टी तितक्याच अंधश्रध्दाळुपणाच्या ध्योतक आहेत.<<

डिसक्लेमर : मी ज्ञानेश्वरी किंवा सेल्फ-हेल्प ह्यापैकी काहीही वाचलेलं नाही.

'अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु', किंवा 'काट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना' वगैरेमध्ये नाद, खेळ इत्यादि रसदार घटक आहेत. अश्रद्ध असूनही ते घटक मला समजतात. शिव खेरामध्ये असे रसदार घटक कोणते आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शिव खेरामध्ये असे रसदार घटक कोणते आहेत?

हा पर्सनल चॉइस नाही का चिंज? कोणाला मोठे आवडतात, कोणाला छोटे आवडतात, अपनी अपनी पसंद हाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कसल्याही सेल्फ-हेल्पपेक्षा वेगळं ज्ञानेश्वरीत जे दिसतं ते मी दाखवलं. आणि म्हणूनच विचारलं की शिव खेरा वाचणारा जर ज्ञानेश्वरीच्या वाचकाशी तुल्यबळ मानावा तर त्या खेरामध्ये असं काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा पर्सनल चॉइस नाही का चिंज? कोणाला मोठे आवडतात, कोणाला छोटे आवडतात, अपनी अपनी पसंद हाय.

कोणाला काय आवडतं यातूनच त्यांच्या आवडीनिवडीतले फरक दिसून येतात. ज्ञानेश्वरी अन यु कॅन विन (दोन्ही मी वाचलेले आहेत) एकाच पारड्यात टाकून दोन्ही सारखेच म्हणणे हास्यास्पद आहे. आणि दोन्हीत केवळ अंधश्रद्धा दिसत असेल तर त्या वाचणार्‍याची कमालच म्हणायला हवी.

कारण वाचक या दोन्ही मधुन नेमकी एकच गोष्ट अपेक्षित करत असतो आणी ते म्हणजे असे काही सिक्रेट गवसेल की तसे वागुन त्याचे जिवन अमुलाग्र बदलेल.

हे ज्ञान कुठून झाले? अशी कोणतीही गोष्ट मी (एक वाचक या नात्याने) अपेक्षित नव्हतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोणाला काय आवडतं यातूनच त्यांच्या आवडीनिवडीतले फरक दिसून येतात. ज्ञानेश्वरी अन यु कॅन विन (दोन्ही मी वाचलेले आहेत) एकाच पारड्यात टाकून दोन्ही सारखेच म्हणणे हास्यास्पद आहे.

अतिशय हास्यास्पद वाक्य.
ज्ञानेश्वरी आणी युकॅन विन अशा टाइपचे ग्रंथ शिरोधार्य मानुन जगणार्‍या व्यक्तीच्या मानिसकतेचे अंधश्रेध्देच्या अनुशंगाने मी भाष्य केले होते हे दोन ग्रंथ ( अथवा यासारखे इतर) समान आहेत असे मी म्हणत आहे असा कोणी समज केला असेल तर त्याला नेक्स्ट कपिल शर्मा बनायचे पोटेंशीअल नक्कि आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांनी शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांना हसु नये अथवा शिवखेराचं यु कॅन विन वाचणार्‍यांनी ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांना हसु नये. वर वर या गोष्टी दोन वेगळ्या भास्तात पण दोन्ही गोष्टी तितक्याच अंधश्रध्दाळुपणाच्या ध्योतक आहेत.

हे तुमचं वाक्यं, अधोरेखिता सहीत. माझा प्रतिसाद अंधश्रद्धेच्या अनुषंगानेच होता. दोन्ही गोष्टी अंधश्रद्धेच्या तितक्याच द्योतक कशा आहेत हे सोदाहरण स्पष्ट करण्याचे कष्ट घेतल्यात कदाचीत कळेल. दोन्ही तुम्ही वाचले आहेत असे गृहित धरतो.

ज्ञानेश्वरी आणी युकॅन विन अशा टाइपचे ग्रंथ शिरोधार्य मानुन जगणार्‍या व्यक्तीच्या मानिसकतेचे अंधश्रेध्देच्या अनुशंगाने मी भाष्य केले होते हे दोन ग्रंथ

हे तुमचे सुधारीत वाक्य. वरच्या वाक्यात अन यात बराच फरक आहे, तो तुमच्या ध्यानात येत असेल अशी आशा करतो.

शिवाय, कोणता ग्रंथ शिरोधार्य मानून जगणे बरोबर आहे यावरही भाष्य करावे. (कोणताही एखादा ग्रंथ शिरोधार्य मानून जगणार्‍यांवर हसायला हरकत नाही असे आमचे मत आहे.) अन्यथा केवळ ही दोन पुस्तके (यु कॅन विनला ग्रंथ म्हणायचे म्हणजे जरा अतीच होईल, नाही का?) अशी वेगळी का काढली आहेत हे सांगावे म्हणजे आमुचे अज्ञान दूर होईल.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रेड बुल आणि अनुतैच्या प्रतिसादामुळे विचित्र विचार डोक्यात आला. अजून आठ-नऊशे वर्षांनी एखादं संस्थळ किंवा त्याचं समकक्ष काही निर्माण झालं आहे. त्याला नाव देताना शिव खेराच्या पुस्तकातली एखादी ओळ उचलली आहे.

माझ्या मऱ्हाठीचिये बोल कवतिके।
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परिणामी माझा प्रतिसाद बहुदा मला सोपे करणे भाग आहे असे वाटते. तो केलाही असता जर ते सोपं करणं अजुन उपयोगी पडेल असा विश्वास असता तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

नकाच सोपं करून लिहू! कधी तरी आम्हाला आमचा स्वतंत्र विचार करू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कधी तरी आम्हाला आमचा स्वतंत्र विचार करू द्या.

आम्ही तुमच्या (वैचारीक) स्वातंत्र्याच्या आणि (वैचारीक) स्वैराचाराच्या दुरुनही आड नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अंधविश्वासाच्या फोफावलेल्या वृक्षाच्या फक्त लहानलहान फांद्या छाटा, पण मुळावर घाव घालायला जाऊ नका असा सल्ला मला बार खाली करण्याचा सल्ला वाटतो.

बार खाली करण्याचा सल्ला म्हणजे नेमके काय?
आपल्याकडची आयुधे व शक्ती याचा वापर करुन शक्य ते व तितके करत रहा. डायरेक्ट मूळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करु नका तुमच्या ते आवाक्या बाहेरचे आहे असा सल्ला हितचिंतक देतात त्याच्याशी मी सहमत आहे.
कार्यकर्त्यांना उत्साहाच्या वा उन्मादाच्या भरात ते पट्त नाही वा कमीपणाचे वाटते हे ही अनुभवले आहे. एखाद्या प्रश्नावर सर्वांचे एकमत असणारही नाही. असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शक्तीप्रमाणे काम करणं, अंथरूण पाहून पाय पसरणं वगैरे प्रॅक्टिकल गोष्टी कुठे संपतात आणि 'त्या साधुबाबांवर कोरडे ओढणं ठीक आहे, पण आमच्या देवाधर्माबद्दल बोलाल तर याद राखा..' अशी धमकी कुठे सुरू होते ते सांगता येत नाही. मध्ये मोठ्ठा ग्रे एरिया आहे. त्या ग्रे एरियात बरेच लोक राहातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही. धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत.

ये लगा सिक्सर... फिर चँपियन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

धार्मिक संस्कार आणि अंधश्रद्धा हे अजिबात वेगळे विषय नाहीत. उलट एकमेकांवर पार अवलंबून असणारे विषय आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाइत काकांना मी दिलेला सिक्सरवाला प्रतिसाद उपरोधीक आहे... असे सिक्सर ते नियमीतपणे बिनचुक मारत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बिलकुल न पटलेला आणि कश्याचा कश्याला पत्ता नसलेला लेख.

मूळ समस्या काय आहे, ते सांगता का?

अंधविश्वासविरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि भावना दुखावणारे वाटते कारण धार्मिक विचारात केवळ (संस्कारातून झालेली) सवय आणि भावना या खेरीज काही नसतं. विवेकवादी वइचारांची लॉजिकली प्रतिवाद धार्मिक माणसांना (उघड धार्मिक- ज्यांना मी माझा धार्मिक आहे तर दुसर्^यानं कसं असावं, नसावं या बद्द्ल कसलाही आग्रह नस्तो त्यांचा प्रश्नच नाही ) करता येत नाही म्हणून त्यांची चिडचिड होते आणि भावना दुखावतात.

समाजाला आंजारून गोंजारून विवेकवादाकडे वळवणे हे बिलकुल अशक्य आहे. त्याला गाडगेबाबांसारखे खिल्ली उडवणारेच पाहिजेत, म्हणजे माणसाला आपल्या विचारामधील विरोधाभास लक्षात येतो, नाहीतर 'चलने दो' हाच प्रकार चालू रहातो. आणि श्रद्धा अंधश्रद्धेत रुपांतरीत व्हायला वेळ लागत नाही. अंधश्रदधेमुळे होणारं नुकसान हे दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त असतं.

नुकतेच "माझी अध्यात्मिक वाटचाल गूढातून वास्तवाकडे" हे डॉ रवींद्र टोणगावकरांचं पुस्तक वाचलं. त्यात अजिबात खिल्ली न उडवता या धार्मिकतेला विवेकी आणि अभ्यासपूर्ण नजरेने खोडून काढले आहे. स्वतः डॉ. नी वेद, उपनिषदे, गीता, विपश्यना,योगसूत्रे, धर्मविषयक परिषदा या अनेक प्रकारांचा अनुभव घेतला आहे, अभ्यास केला आहे. जरूर वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद पटला.

>>श्रद्धा अंधश्रद्धेत रुपांतरीत व्हायला वेळ लागत नाही

हे पटलं नाही. श्रद्धा ही अ‍ॅब इनिशिओ अंध असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"श्रद्धा अंधश्रद्धेत रुपांतरीत" हा खरेतर अंनिस नेच सुरु केलेला चावटपणा आहे.

pHILADELPHIA सिनेमात एक संवाद आहे. " FAITH IS BELIEF इन SOMETHING FOR WHICH THERE IS NO EVIDENCE"

थोडक्यात श्रद्धा म्हणजे अंध-विश्वास. मग त्याला आणखी एक "अंध" असे PREFIX लाऊन थेट श्रद्धा ला भिडायचे का टाळता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजाला आंजारून गोंजारून विवेकवादाकडे वळवणे हे बिलकुल अशक्य आहे. त्याला गाडगेबाबांसारखे खिल्ली उडवणारेच पाहिजेत,

दोन्ही वाक्य अगदी मान्य, पण हा समाज बदलणार नाही. असे बाहेरुन बदलायचा प्रयत्न करुन बदलणार नाही. जेनेटीक आहे, कित्येक पिढ्या जर दाबुन ठेवले तर थोडा फरक पडेल. श्रद्धा हा प्रकार तर माझ्याच छोट्या आयुष्याच्या काळात प्रचंड वाढलेला मीच बघते आहे.***

गाडगेबाबा क्रांतीकारीच पण गाडगेबांबांना यश आले नाही समाजबदलण्यात हे नमुद करु इच्छिते. अंधश्रद्धा वगैरे सोडा, गाडगेबाबांचे स्वता कष्ट करुन पैसे मिळवा, स्वच्छता ठेवा इतकी साधी सरळ स्वताच्या वागणुकीतुन दिलेली शिकवण पण लोकांनी अंगीकारली नाही.

-----
*** : केमाल पाशा नी सर्व प्रकार ( सत्ता, जबरदस्ती, लष्कर ) वापरुन लोकांना सुधारण्याचा प्रयत्न केला, थोडा काळ बदल झाल्यासारखे वाटले पण पुन्हा "ये रे माझ्या मागल्या".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रद्धा हा प्रकार तर माझ्याच छोट्या आयुष्याच्या काळात प्रचंड वाढलेला मीच बघते आहे.***

असहमत. तुमचा सँपल सेट काय आहे हे माहीत नाही पण माझ्या छोट्या आयुष्याच्या काळात श्रद्धा हा प्रकार बराच कमी झालेला पाहिला आहे. निव्वळ देवळाबाहेरच्या रांगा यांना श्रद्धा मानत असाल तर वाढलेल्या दिसतात. (याचं कारण शहरातली वाढलेली लोकसंख्या, कमी गर्दीच्या वेळांपेक्षा जास्त गर्दीच्या वेळा लक्षात राहणे वगैरे काहीही असू शकते) मात्र बोकड कापणे, मांजर आडवी जाणे, नवस बोलणे, भगत, मांत्रिक, मूठ मारणे, उपासतापास हे सगळं निश्चितच कमी झालंय. आधी घरातले सगळेच लोक श्रद्धावान/अंधश्रद्ध असत. आता किमान घरटी एक व्यक्ती थोडंसं बंड करताना दिसतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केमाल पाशा हे उदाहरण इथे चपखल आहे असं वाटत नाही. राजकीय पातळीवरून दमन आणि सामाजिक पातळीवर फटकेबाजी ह्यांच्यात गल्लत होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अंतराआनंद ताई, एकदा लेख पुन्हा वाचा. माझा लेख अंधविश्वासावर आहे, अंधश्रद्धेवर नाही. दोन्ही मध्ये फरक आहे. या शिवाय सामाजिक धार्मिक संस्कार हा तिसरा प्रकार. उदा. मुलाचा जन्म झाल्यावर 'नामकरण संस्कार' अर्थात तो तुम्ही घरघुती किंवा समाजात जेवण इत्यादी अर्थात भरपूर पैसा करून खर्च करू शकतात. तुम्ही पुरोगामी/ नास्तिक असाल, 'नामकरण संस्कारावर' विश्वास नसेल. पण तो आनंद तुम्ही आपल्या परिवारात किंवा मित्रासोबत वाटणारच. हॉटेल मध्ये जाऊन पार्टी द्याल. अर्थात समाजाच्या स्तरावर 'संस्कार' बदलत राहतात. नामकरण, लग्न इत्यादीवर समस्या खर्चाची आहे. अंधश्रद्धा किंवा अंधविश्वासाची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केमाल पाशा नी सर्व प्रकार ( सत्ता, जबरदस्ती, लष्कर ) वापरुन लोकांना सुधारण्याचा प्रयत्न केला, थोडा काळ बदल झाल्यासारखे वाटले पण पुन्हा "ये रे माझ्या मागल्या".

कुत्र्याचे शेपूट कायम वाकडेच असते, फक्त भीति वाटल्यावर ते थोडावेळ दोन पायांत जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुत्र्याचे शेपूट कायम वाकडेच असते

त्या विशिष्ट शांतताप्रिय धर्माबद्दल बोलताहात, जपून बरंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या विशिष्ट शांतताप्रिय धर्माबद्दल बोलताहात, जपून बरंका.

नाही. माझे वाक्य केवळ, अंधश्रद्धेला उद्देशून आहे आणि ते सर्वच धर्मांना लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंधश्रद्धा हा धाग्याचा मूळ विषय आहे हे खरं. (त्यातही पटाईत काकांनी अंधश्रद्धा आणि अंधविश्वास अशी रेघ खेचून ठेवलीय. सुपर्स्टिशन आणि ब्लाइंड बिलीफ असं त्यांना म्हणायचं असेल.) पण समाजसुधारणेवर विषय गेला तेव्हा त्या संदर्भात केलं गेलेलं 'समाज सुधारलेलाच नाहीय' हे विधान खूपच धाडसी वाटलं म्हणून हा प्रतिसाद. समाजात पूर्वी असलेल्या प्रथा-परंपरा हा अंधश्रद्धेचा भाग नव्हता असं जर म्हणायचं असेल तर ते साफ चूक आहे. महाराला स्पर्श केल्यावर आंघोळ केली नाही तर कोड उमटतं असा समज होता. सकाळी सकाळी विधवांची तोंडं दिसणं हा मोठा अपशकुन होता. उलट सवाष्ण बाई, त्यातूनही पाण्याची घागर घेतलेली अशी सामोरी येणं हा मोठाच शुभशकुन होता. म.कर्वे यांनी विधवाविवाहाला चालना देऊन हा अशुभाचा कलंक पुसून टाकला. शिवाशीव पाळली नाही तर देवाचा कोप होईल असाही समज होता. घरात कधी संकट आलं तर ते भ्रष्टाचार, सब गोलंकार, विटाळ कालवणं या गोष्टींवर ढकललं जायचं. शिवाय शांति वगैरे करून या पापातून सुटका होऊ शकते असंही मानलं जात असे. यातल्या कितीतरी गोष्टी आज निदान तथाकथित उच्चभ्रू तरी करत नाहीत. बहुजनसमाज देवाधर्माच्या मागे लागलाय असं जे दिसतंय ते याच सुधारणांचा प्राथमिक आणि अल्पकाळ टिकणारा परिणाम आहे. पूर्वी रस्ते नव्हते, वाहनं नव्हती आणि देवदर्शनाचं स्वातंत्र्यही नव्हतं. हे नवस्वातंत्र्य पुरेपूर उपभोगावं असं नवमुक्त समाजाला वाटलं तर नवल नाही. ही मुक्तता भोगून पोट भरलं की तेही यातली डिमिशिंग युटिलिटी जाणून किंवा युटिलिटी कधीच नव्हती हे जाणून त्यापासून दूर होतील.
शिवाय आणखी एक गोष्ट आहे. निदान गेल्या आठदहा वर्षांत आणि निदान ग्रामीण महाराष्ट्रात तरी गावोगावी संघटित आणि राजकीय पाठबळ असणारे भजनाचे फड, भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी सप्ताह थोडी लोकवर्गणी घेऊन भरवले जात आहेत. सदैव दुष्काळग्रस्त आणि हताश, अगतिक लोकांना भजनात गुंगवून ठेवलं जात आहे. प्रायोजित यात्रा आयोजित केल्या जात आहेत. मुंबईतल्या एका एकट्या झोपडपट्टीतून एकावेळी पाचशे/हजार लोकांना अगदीच अल्पदरात देवदर्शन घडवलं जातंय. प्दयात्रांमध्ये फुकट चहा-पाणी-सरबत-नाश्ता-जेवण याद्वारे यात्रिकांची सरबराई केली जात आहे. प्रबोधनाच्या सप्ताहांना अजिबात गर्दी नसते पण हे धार्मिकसप्ताह मात्र धूमधडाक्याने हाय डेसिबल्समध्ये साजरे होतील असं बघितलं जातंय. ही मजबूत पक्षबांधणीची पावलं होती हे आता लक्ष्यात येतंय. तीन चार वर्षांपूर्वी वारकरी लोक आक्रमक आणि हिंसक झाले तेव्हाच खरं तर हे उघड झालं होतं. तर असोच. हा वादग्रस्त ठरणारा विषय इथेच संपू दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुसंख्य लोकांना कुठल्या जगण्यात॑ नशा वाटते हे पक्षांनी अचूक ओळखले आहे. ती नशा दिली की लोक आपली दु:खे विसरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

म्हणजे 'धर्म ही अफूची गोळी आहे' असं कोणी एक प्राणी म्हणून गेला ते खरं आहे की काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्मच काय, संगीत, चित्रकला, वेगवेगळे छंद, ... ज्याच्याज्याच्यात मन रमते ते सर्व अफूच्या गोळीप्रमाणेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0