'काजळमाया' आणि हेन्री डेव्हिड थोरोंचे माझे आयुष्य बदलवणारे वाक्य

आज जुलै १३ २०१६ ला हेन्री डेव्हिड थोरोंचे (१८१७-१८६२) व्दिजन्मशताब्दी वर्ष सुरू होतय...थोरो हे अब्राहम लिंकनांच्या बरोबरीने भारतीयांवर प्रभाव टाकणारे १९व्या शतकातील अमेरिकन आहेत....

त्यांचा परिचय प्रथम जी ए कुलकर्णींच्या 'काजळमाया',१९७२ च्या अर्पणपत्रिकेद्वारे (epigraph) झाला...

If a man does not keep pace with his companions,
perhaps it is because he hears a different drummer.
Thoreau

किती वर्ष हे वाक्य मनात घर करून होत.. किंबहुना कुठेतरी या वाक्याने माझ्या जीवनाची दिशाच बदलून टाकली...इतरांपेक्षा वेगळा विचार असला तर त्याचे कारण आपला 'ड्रमर' वेगळा आहे अशी समजूत स्वतःची काढता आली....जीवनातील कितीतरी निर्णय घेताना हे वाक्य डोक्यात असायचच... उदाहरणार्थ: २००६ पासून नियमित लिहायला लागल्यावर खूप वेगळा मार्ग धरता आला...

अजुनही थोरोंचे एकही पुस्तक वाचल नाहीय....पण त्यांच्याबद्दल जे समोर येत ते वाचतो... उदाहरणार्थ :

दुर्गा भागवत, ("ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी", लेखक : प्रतिभा रानडे, 1998):
"…थोरो म्हणजे गांधी आणि टॉलस्टॉयलाही शिकवणारा, स्फ़ुर्ती देणारा गुरु...गांधीच्या अहिंसेचं मूळही थोरोच्या विचारात दिसतं. त्यांच निसर्गाचं प्रेम मलाही होतंच...तो जंगलात राहायचा. पण कधी पांथस्थ त्याच्याकडे आला, तर तो कौतुकाने त्याचा पाहुणचार करायचा …"

थोरोंबद्दलच्या दोन उत्तम गोष्टी २०१६ मध्ये वाचण्यात आल्या. एक म्हणजे कॅथरिन शुल्ट्झ यांचा दी न्यू यॉर्कर मधला लेख, त्यांच्या वर प्रचंड टीका करणारा, आणि दुसर म्हणजे थोरोंची खूप थट्टा करणार कॉमिक , existentialcomics.com या वेबसाईट वरच... खूप मजा आली दोन्ही वाचून.

मनात आल दुर्गाबाईंनी हे वाचायला, पाहायला पाहिजे होत (आणि त्यानंतर मला त्यांना भेटायची संधी मिळायला पाहिजे होती)!

आणखी एक मजेदार घटना .... दुर्गाबाईंनी आणीबाणीला सक्रिय विरोध केला होता.. खूप चिडल्या होत्या त्या इंदिरा गांधींवरती... इंदिरा गांधींनी थोरोंवरती एक (हायकू टाइप) कविता लिहिली आहे...ज्यावेळी दुर्गाबाईंनी ती पहिली त्यावेळी, त्या म्हणतात, त्यांनी इंदिरा गांधींना माफ करून टाकल!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

थोरो यांचे "वॉल्डन" पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुद्द थोरो आणि 'वॉल्डन'बद्दलचा वेगळा ड्रमबीटः
http://www.newyorker.com/magazine/2015/10/19/pond-scum

Who was this cold-eyed man who saw in loss of life only aesthetic gain, who identified not with the drowned or the bereaved but with the storm? This was Henry David Thoreau, that great partisan of the pond, describing his visit to Cohasset in “Cape Cod.” That book is not particularly well known today, but if Thoreau’s chilly tone in it seems surprising, it is because, in a curious way, “Walden” is not well known, either. Like many canonized works, it is more revered than read*, so it exists for most people only as a dim impression retained from adolescence or as the source of a few famous lines: “I went to the woods because I wished to live deliberately.” “If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them.” “Simplicity, simplicity, simplicity!”

* इथे मार्क ट्वेनची 'क्लासिक' व्याख्या आठवली:
′Classic′ - a book which people praise and don't read.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या ब्लॉग वर वाचलेल्या दुर्गाबाइंवरील एकहुन एक अप्रतिम पोस्ट आठवल्यात हा लेख वाचुन. पुन्हा पुन्हा वाचत बसलो
त्यात कै.श्री मुरली खैरनारांची कॉमेंट असलेली तर...........
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

थँक्स ...बरे वाटले तुम्ही कै. खैरनारांची आठवण काढली...माझी पोस्ट वाचून त्यांनी मला नंबर शोधून फोन केला होता...म्हणाले माझ्या कादंबरीला त्याचा उपयोग झाला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

__/\__ अतिशयच सुंदर सही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्स...कामूच्या मूळच्या वचनाला उद्ध्वस्त करून तयार केली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

एक नंबर सही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थँक्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

किंबहुना कुठेतरी या वाक्याने माझ्या जीवनाची दिशाच बदलून टाकली...इतरांपेक्षा वेगळा विचार असला तर त्याचे कारण आपला 'ड्रमर' वेगळा आहे अशी समजूत स्वतःची काढता आली....

ह्याविषयी अजून सविस्तर लिहा नं! ते इंदिरा गांधी-दुर्गा भागवत वगैरे लिहिण्याऐवजी, तुमच्या जीवनावर ह्याचा काय परिणाम झाला, तुमचा ड्रमर कोणता होता, तुमच्या जीवनाची दिशा कशी बदलली ते लिहा,
वाचायला आवडेल....
(प्लीज, लिंका देऊ नका, इथे लिहा...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला तुमचा आग्रह...पण ते पुन्हा केंव्हातरी, मूड आला तर...सध्या इंदिरा गांधी-दुर्गा भागवत आणि लिंकाच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

सध्या इंदिरा गांधी-दुर्गा भागवत आणि लिंकाच..

बेहद अफसोस.
त्याचं काय आहे की ऐसी अक्षरेवर ह्यानं काय म्हंटलंय, त्याचं काय प्रतिपादन आहे, हयाच्या शुष्क चर्चाच बर्‍याच वेळा वाचायला मिळतात.
मूळ सामर्थ्य तेथे काही नाही अशी अवस्था; सगळा वायफळाचा मळा....
म्हणून आग्रह केला. बघा, सक्ती नाही.....
चूभूद्या घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचा वायफळाचा मळा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

वायफळाचा माळ्यावरून आठवण झाली. चिं. वि. जोशी यांचे त्याच नावाचे एक हसरे पुस्तक आहे. ते केव्हातरी वाचले होते. त्याबद्दल मी माझ्या ब्लॉग वर येथे लिहिले होते. प्रामुख्याने त्यातील मुशियन वाड्मय या प्रकरणावर मी लिहिले आहे. जरूर पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

स्वतःच्या ब्लॉगची जाहिरात थांबवा.
काय विचार मांडायचे असतील तर ते इथेच ऐसी अक्षरे वर लिहा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोपर्यंत तुमचा मुड जमुन आल्यास वा इतर कोणाला रस असु शकेल कदाचित म्हणून त्यांच्या या पोस्ट ची लिंक माझ्यातर्फे देतो. मला वाटत माझ्यापुरत मला आनंद मिळाला म्हणून कोणीतरी वाचाव इतकचं साध फक्त.
जॅक्सन आणि दुर्गा भागवत संदर्भातील दोन पोस्ट इथे.

१-http://searchingforlaugh.blogspot.in/2013/07/coppersmith-barbet-green-ro...

२-http://searchingforlaugh.blogspot.in/2009/12/100-years-after-pandit-m-t-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

धन्यवाद, मारवा जी.
(अवांतरः ते "पिडां सर" टाळा हो! ह्या पिवळ्या डांबिसाला सरकी खायला कायससंच वाटतंय!!!)
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोरोच्या निमित्ताने एक प्रश्न. एका जुन्या दिवाळी अंकात थोरो बद्दल लेख आलेले. त्यात व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली, दुर्गा भागवत यांचे लेख होते. थोरोची ओळख मला तिथुनच झाली. तो अंक जपून ठेवायचा म्हणून इतका जपून ठेवला कि परत कधी सापडलाच नाही. साधारण ८० ९० च्या दशकातला अंक असावा असा अंदाज. (कदाचित त्याहूनही जुना असू शकतो). हा अंक कोणता आहे हे कोणी सांगू शकेल का?
मलाही >>थोरो यांचे "वॉल्डन" पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. दुर्गा भागवतांनी केलेला 'वॉल्डनच्या तळ्याकाठी' हा अनुवादही वाचला पण काहीच कळंलं नाही. खूप क्लिष्ट मराठी वाटली.
सध्यातरी थोरो quotes मधूनच वाचतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादक-महाशय,
माझे सदस्यनाम कृपया डिलीट करावे. मला ते करता येत नाहीये. म्हणून जाहीर विनंती.
मेघना भुस्कुटे यांच्या विनंतीवरून मी पॉर्न विशेषांकासाठी लेख लिहला आणि त्याच वेळी माझे अकाउंट उघडले गेले.
थँक्स आणि शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

इतनी नाराजकी क्यूं?
तुम्ही तुमच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं वगैरे लिहिलंत म्हणून त्याविषयी लिहिण्याची तुम्हाला विनंती केली.
नसेल लिहायचं तर नका लिहू पण आयडी डिलीट करायची विनंती का?

अर्थात तुमच्या ह्या मागणीचा माझ्या विनंतीशी काही संबंध नसेल तर विश यू द बेस्ट फ्यूचर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी च्या गुहेच्या बाहेर फक्त आत जाणार्‍या पावलांचे ठसे दिसतात, बाहेर जाणार्‍या पावलांचे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचे रहस्य गब्बर सिंग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

थोरो चे मला आवडलेले वाक्य -

If I knew for a certainty that a man was coming to my house with the conscious design of doing me good, I should run for my life.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री. अनिल अवचटांच्या , एका दिवाळी अंकातील लेखातून , मला थोरो ही काय चीज आहे ते समजले होते. त्याचे एकच वाक्य माझ्या मनात घर करून बसले आहे. " अती प्रखर प्रकाश, एक प्रकारे आपल्याला आंधळा करीत असतो." पुस्तक वाचन एकदा करून समजले नाही. पुन्हा वाचावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री. अनिल अवचटांच्या , एका दिवाळी अंकातील लेखातून

कोणता दिवाळी अंक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता सध्या मी अमेरिकेत आलेलो आहे. पण माझ्याकडे, घरी मुंबईला, गेल्यावर आपणास मी कोणता दिवाळी अंक होता हे कळविन. जमल्यास छायाप्रत सुद्धा पाठवीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके.. चालेल.. धन्यवाद..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉल्डन पुस्तक मला कंटाळवाणे, रुक्ष वाटले त्यामुळे फारसे वाचवले नाही. थोरोने निसर्सान्निध्यात राहून, अत्यंत साधे आयुष्य जगण्याचा जो प्रयोग केला त्यासंदर्भात ते होते असे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0