एकांतात

एकांतात
विचारशून्य शांततेच्या
भयप्रद अवस्थेत
मी धावलो फेसबुक च्या
निळ्या पांढऱ्या स्क्रीनवर
व्यक्त होण्याच्या तलफेचा
एक डोस घ्यायला
फेकून एक पोस्ट
पित सुटलो लाईक्स
शोषून घेतल्या कमेंट्स
आणि गिळत राहिलो फोटोज
विनोदी रटाळ वैचारिक
ऐतिहासिक राजकीय
सामजिक वगैरे पोस्टी
एकत्र चिवडल्या
आणि खाऊन टाकल्या
आता कसं भरलय डोकं मस्त
अहाहा आता बसलीय जोरात किक

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐतिहासिक राजकीय
सामजिक वगैरे पोस्टी
एकत्र चिवडल्या
आणि खाऊन टाकल्या

आणि पर्सनल गोष्टी
ज्या मेसेज करायच्या
त्या लिहिल्या टाईमलाईनवर
अगदी मोबाईल नंबर सकट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. तिरशिंगरावांची सुचवणीही छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सक्काळी सक्काळी ऐसीची किक बसल्याशिवाय मलाही 'होत' नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0