लोकसाहित्य संशोधक रा. चिं. ढेरे

सुप्रसिद्ध लोकसाहित्य संशोधक, लेखक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. ठिकठिकाणी त्यांच्या बद्दलचे लेख, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे लेख आले आणि अजूनही येत आहेत. त्यांच्याबद्दल मी काही लिहावे असा माझा त्यांचा काही व्यक्तीगत परिचय नव्हता. त्यांचे क्षेत्र वेगळे, माझे तर अतिशय वेगळे. पण ते ज्या क्षेत्रात काम करायचे, तो माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय-भारतविद्या(Indology), लोकसंस्कृती, रुढी परंपरांच्या मागील मतितार्थ तपासणे, मिथकांचा मागोवा घेणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे इत्यादी. ज्याला कोणाला भारतीय संस्कृतीचा(cultural studies), लोकपरंपरेचा(folk traditions, ethnic studies) अभ्यास करायचे आहे, त्या संदर्भात त्यांच्या पुस्तकांचा संबंध न येणे अशक्य.

मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून १०-१२ वर्षांपूर्वी भारतविद्या शिकताना, तेथील ग्रंथालयातून अधून मधून जायचो. ते मुक्त ग्रंथालय होते, त्यावेळेस. असेच पुस्तके शोधता, पाहता, ढेरे यांचे नाथ संप्रदायाचा इतिहास हे पुस्तक हाती लागले. अतिशय अभ्यासपूर्ण असे पुस्तक, जे त्या विषयावरील क्लासिक पुस्तक आहे. तांत्रिक संप्रदाय, अघोर संप्रदायाबद्दलची त्यात आलेली माहिती कितीतरी गोष्टींचा उलगडा कर्ते. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र वादाचा संदर्भातील विठ्ठल(कानडा विठ्ठलु) ह्या देवतेबद्दलचे त्यांचे पुस्तकही क्लासिकच. भारतविद्या शिकता शिकता भारतातील विविध संप्रदायाबद्दल समजावून घेण्याची आवड लागली. त्यातच दत्त-संप्रदायावरील पुस्तक हाती लागले. त्याच तऱ्हेचे दुसरे पुस्तक, म्हणजे शाक्त संप्रदायावरील प्रभुदेसाई यांचा त्रिखंडात्मक देवीकोश. त्यातूनच पुढे लज्जागौरी हे पुस्तक सापडले, आणि आमच्या अभ्यासक्रमाच्या दरम्यान आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा हिंडायला जायचो, तेथे असलेल्या वीरगळ शिल्पं, तसेच देवीच्या, स्त्रीच्या विविध रूपातील प्रतिमांच्या मागील अर्थाचा उलगडा झाला.

पुढे जेव्हा नाटक, नाट्यक्षेत्र इत्यादीचा इतिहास पाहताना, अभ्यासताना, त्यांचे भारतीय रंगभूमीच्या शोधात हे पुस्तक देखील मी अतिशय उत्सुकतेने वाचले होते. मराठी आणि कन्नड रंगभूमी यातील संबंध हा देखील माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पुस्तकातील त्यांनी गोळा केलेले पुरावे(कृष्णपारिजात, कुरवंजी) पाहून, त्याबद्दल आणखीन जाणून घेण्यावेसे वाटले आणि पुढे काही साहित्य मी अनुवादित केले. सह्याद्रीतील किल्ल्यांवर भटकताना, शिवाजी महाराजांबद्दल असलेली उत्सुकता आणखी वाढीस लागली. त्यातच त्यांचे भोसले घराण्याच्या इतिहासावरील पुस्तक मिळाले, जे भोसले घराण्याच्या कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरचा शंभू महादेवावर आहे. भोसले घराण्याचे मूळ कर्नाटकातील होयसळ घराण्यात ते असल्याचे ढेरे यांनी दाखवून दिले. कर्नाटक आणि महाराष्ट्र, कन्नड आणि मराठी दोन्ही मधील संबंधाबद्दल असलेल्या माझ्या आकलनाला आणखीन एक पैलू मिळाला.

२००९ मध्ये गोहराबाई, अमीरबाई कर्नाटकी यांच्या वरील कन्नड लेख/पुस्तकांच्या अनुबदाच्या निमित्ताने कर्नाटकातील रहमत तरीकेरी यांच्याशी परिचय झाला. ते देखील कर्नाटकतील प्रथितयश लेखक, लोकसंस्कृती संशोधक. त्यांची आणि ढेरे यांची संशोधनाच्या निमित्ताने ओळख झालेली. त्याबद्दल ते नेहमी माझ्याशी बोलतात. तरीकेरी यांनी कर्नाटकतील नाथ संप्रदायाचा इतिहास यावर संशोधनपर पुस्तक लिहिले आहे. २०१२ मध्ये ढेरे नृसिंह देवतेच्या संशोधनाच्या निमित्ताने कर्नाटकात गेले असता, ढेरे यांचा तरीकेरी यांनी हम्पी विद्यापीठातर्फे त्यांचा सत्कार केला होता. त्याविषयी माझे आणि तरीकेरी यांच्याबरोबर ईमेल वर पत्र-व्यवहार झाला. तरीकेरी यांची मूळ कन्नड मधील ईमेल पुढे आहे आणि मराठी भाषांतर दिले आहे.

ಪ್ರಿಯ ಪ್ರಶಾಂತ್
ರಾಚಿಂ ಢೇರೆಯವರಿಗೆ ಕನ್ನಡ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದಲೇ ಸನ್ಮಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು.
ಅವರು ಹಂಪಿಗೆ ಬಂದಾಗ, ನನ್ನನ್ನು ಭೇಟಿಮಾಡಲೆಂದು ಬಯಸಿದ್ದರೆಂದು ನನಗೆ ನಂತರ
ತಿಳಿಯಿತು. ನಾನು ಸನ್ಮಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಭಾಷಣ ಮಾಡಿದೆ. ಮುಂದಿನ
ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಾನು ಕನ್ನಡಿಗನಾಗಿ ಹುಟ್ಟುವೆ ಎಂದು ಭಾವುಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಅವರ ಮೂಲ
ಬಿಜಾಪುರವಂತೆ. ಅದ್ಭುತ ಮನುಷ್ಯ. 83 ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಫೀಲ್ಡ ವರ್ಕ ಮಾಡುತ್ತ
ಬಂದಿದ್ದಾರೆ.
ಅಮೀರಬಾಯಿ ಲೇಖನ ಅನುವಾದಿಸುತ್ತಿರುವದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು.
ಫೆಬ್ರವರಿ 8. 9, 10 (2013) ವಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಅಖಿಲಭಾರತ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ
ಸಮ್ಮೇಳನವಿದೆ. ಅಲ್ಲಿ ನನ್ನ
ಆಮೀರಬಾಯಿ ಪುಸ್ತಕದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವ ವಿಚಾರವಿದೆ.
ನಿಮ್ಮ ಪ್ರಿತಿಯನ್ನು ನೆನೆಯುವೆ.
ಧನ್ಯವಾದಗಳು
ಸ್ನೇಹದ
ತರೀಕೆರೆ

मराठी भाषांतर:

प्रिय प्रशांत:

रा. चिं. ढेरे यांचा कन्नड विश्वविद्याल्यातर्फे सत्काराचा कार्यक्रम झाला. ते हंपीला आले असता त्यांना मला भेटायचे आहे असे समजले. मी त्या कार्यक्रमात सत्काराच्या निमित्ताने भाषण केले. त्यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणात, पुढील जन्मात कर्नाटकात जन्म व्हावा अशी भावपूर्व अशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणे मुळचे विजापूरचे. महान व्यक्तिमत्व आहे त्यांचे. ८३व्या वर्षी देखील फिल्ड वर्क करत आहेत…..

धन्यवाद,

तरीकेरी

तर असे रा. चिं. ढेरे. शेवटपर्यंत कार्यरत असणारे, संशोधनाला, लेखनाला वाहून घेतलेले. त्यांनी मराठीत जरी लेखन केले असले तरी, त्यांचे संबंध भारतातील(प्रामुख्याने दक्षिण भारत) वेगवेगळया भागात खूप खोलवर होते. रहमत तरीकेरी सुद्धा त्याच परंपरेतील आहेत. तरीकेरी यांचे कर्नाटकातील नाथ संप्रदायावरील पुस्तक मराठीत आणायचे आहे, तसेच तरीकेरी सध्या कर्नाटकतील शाक्त संप्रदाय यावर पुस्तक लिहीतायेत, ते देखील मराठीत आणायचे. एवढे तरी मी करू शकतो. मी पाहुयात कसे जमते ते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बिजापुर सिस्टर्सचा मराठी अनुवाद मी वाचला आहे. त्याचे अनुवादक आपणच हे कळून आनंद झाला. पुस्तकात विदा खच्चून भरला आहे पण मांडणीतला विस्कळीतपणा खूप जाणवला. इतक्या माहितीपूर्ण अनुवादावर प्रकाशनापूर्वी आणखी एक हात फिरायला हवा होता असे वाटत राहिले. अर्थात तुमच्या हातून झाले ते कामही खूप मोठे आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे निरीक्षण बरोबर आहे. पुढच्या आवृत्तीत सुधारणा करायचा, आणि मूळ पुस्तकातील दुसऱ्या आवृत्तीमधील बदल देखील आणायचा मानस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

रा.चिं.ढेरे ह्यांच्याबद्दलची माझी एक जुनी आठवण नोंदवतो. मी १९६३-६५ ह्या काळात पुणे विद्यापीठात गणित विषयात एम.ए.चा विद्यार्थी होतो आणि रा.चिं. त्याच वेळी मराठीमध्ये एम.ए. करत होते. सर्वसाधारण अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेने ते वयाने दहाएक वर्षांनी मोठे होते. कदाचित योग्य वयात त्यांचे शिक्षण काही कारणाने पूर्ण झाले नसावे म्हणून त्यांनी थोडे उशीरा का होईना पण ते पूर्ण करण्याचे ठरवले असावे. माझा विषय वेगळा असल्याने मित्रमंडळहि वेगळे होते पण रा.चिं. काही संशोधन करतात इतके आम्हाला कळले होते. त्यांच्याबरोबर तीनचार वेळा अन्य मित्रांबरोबर त्यांच्यासह कँटीनमध्ये चहा घेतल्याचे आठवते आणि तेव्हा त्यांच्या बोलण्यातली प्रगल्भता जाणवली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0