इतिहासाच्या पलीकडे (चल रे सख्या)

मुंबई-नूवर्क-USA एकाच झेपेत इतिहास ओलांडून
पलीकडे गेलेले
कमलेश आणि कौसा, अमित आणि अमिता फिरतायेत
"एडिसन" गावात, कमरेत हात घालून: ("आज रात्री ही कंबर माझी आहे!").
पितळी विष्णू आणि चांदीचे गणपती चमकतायत
शिसवी शेल्फात,
आणि पोलादी प्लेट वर लालभडक तंदुरी
चिकन चर्र चर्र करून म्हणत आहे
इतिहास संपला रे संपला
आता फक्त मजा करा! तुमची मुले
आणि त्यांची मुले रोज
तंदुरी चिकन खाऊ शकतील,
उंची वाईन पिऊ शकतील किंवा
चैनीची पुढची व्याख्या करत
हार्वर्ड मध्ये शिकायला जाऊ शकतील, जिथे
त्यांना लिहून ठेवलेले
सापडेल की तुमच्या खापर-खापर पणजोबांना
ब्रिटीश जेलर
रोज चाबकाने मारीत असे.
यावर ते उदगारतील
"Poor Chap !".
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्म्म्म! आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चैनीची पुढची व्याख्यामध्ये हार्वर्डमध्ये शिकणं आल्यामुळे ड्वाले पानावले.

- व्याख्या व्यिख्खी व्युख्खू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आईबापांना वाटतं हो उगाचच ! पोरांना हार्वर्ड हाही त्रासच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

चैनीची पुढची व्याख्यामध्ये हार्वर्डमध्ये शिकणं आल्यामुळे ड्वाले पानावले.

बघा, काय ती प्रगती! एकेकाळी रोज शिक्रण खाण्यापासून, ती आता हार्वर्ड मधे शिकण्यापर्यंत!