कपाळावरच्या आठ्या

करियरचं इतंकं टेंशन का आलंय? नकोश्या असलेल्या या नोकरीतून बाहेर पडायचा काहिच मार्ग का दिसत नाही? नुसतं जर्मन येतं म्हणून या लोकांनी मला नोकरी दिली. टेक्निकल गोष्टी झेपणार आहेत का, किंवा या प्रोफाईलचा आवाका इतका मोठा असेल अशी आयडिया यांनी अगोदर का दिली नाही? किंवा आपल्याही लक्षात हे कसं आलं नाही? पाण्यात पडल्यावर पोहता येतं म्हणतात, मग मला साध्या साध्या गोष्टी शिकण्यात इताका त्रास का होतोय? कोरा कॅनवास मधे लिहीलंय तसं आपल्या मर्यादा ओळखुन नवी सुरुवात करेनही, पण मग पूढे काय? हा मार्ग सोडून दिला म्हणजे ही नोकरी सोडून दिली तर पगाराचं आणि महिन्यांच्या बिलांचं काय? जंगलाचे नियम आपल्यालाही लागू होतातच ना? एक हेल्दी आयुष्य जगण्यासाठी आपण नालायक ठरतोय का? नोकरी जमत नाही, कोणतिही कला हातात नाही, असं असताना काय करायचं? पुलं म्ह्णतात तसं हा बोजा असाच टाकत रहायचा? हेच आयुष्य आहे तर मग जगायचंच कशाला? ईतक्या लवकर आपण दुसर्‍या टोकावर का पोहचतो? की मेहनत करायची इच्छाच नाहीये आणि खूप आळशी आहोत आपण? आयुष्यात आलेल्या या एका फेज मधे आपण इतके कसे आतून बाहेरून ढवळून निघतोय? ऑफिस मधे एखादा प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन न शोधता त्याचा इतका धसका का घेतोय? सोप्या टेक्निकल गोष्टी का समजत नाहीत? प्रोब्लेम्स सॉल्व करताना इतकं का टेंशन येतं की ह्रदयाचे ठोके थाड थाड वाजायला लागतात? ऑक्टोबर मधे सव्विस पुर्ण होउन सत्ताविसावं लागेल. इतक्या कमी वयात बिपीच्या गोळ्या खाव्या लागतील असं का वाटतं? इतक्या लवकर कसंकाय आयुष्याला हरलो आपण? ही फेज जाइलही पण तोपर्यंत ही जिवाची घालमेल अशी किती दिवस\महिने\वर्ष सहन करायची? काही भोग भोगल्या शिवाय सुटका नसते का?
टोकाचे विचार करण्याइतकी ही निगेटिव्हीटी कशीकाय शिरली नसांनसांत? निगेटिव्हीटी इतकी का ⁠⁠⁠अॅट्रॅक्ट करते? व्हिंसेंट, एमिली, मूसबाबा हे लोक का रुतुन बसलेत काळजात? ग्रेसचं वाक्य 'दु:खाला चटावलेली ही माझी ईंद्रीये..' हे सब्काँशस माईंड मधे कधी जाउन बसलं? प्यासा मधला 'जलादो इसे फूंक डालो ये दूनिया..' म्हणणारा गुरुदत्त इतका का आवडतो? काही सांगायचं असलं कि गालिब साहिरच्या कुबड्या का घ्याव्या लागतात? स्वतःचं दु:खही शब्दात निट मांडता येत नाही का? इतके विस्कळीत विचार का येतात मनात?
त्या दिवशी ऑफिस मधून घरी येतांना ४-५ सेकंदाचं एक दृष्य दिसलं. मटन शॉपचा दुकानदार दुकान बंद करत होता. १० बाय १०चं छोटंसं दुकान. आत मधे बकर्‍या दाटिवाटीने करकचून बांधून उभ्या केलेल्या. समोर दिड फुट व्यासाचे ३ फुटी ओंडके ठेवलेले. त्या शेजारी एक प्लॅस्टिकची खुर्ची. तिथे २ महिन्याचं बकरीचं पिल्लू खालून खुर्चीवर उडी, खुर्चीवरुन खाली उडी असं खेळत होतं. हे बघुन आपल्या मेंदू आणि ह्रदयावर सपासप वार होतायत असं का वाटलं? क्षणात आपणच आपल्या झिंज्या ओढाव्यात असं का वाटलं.? हा वेडसर पणाचा अ‍ॅटॅक होता का? इमोशनल शॉक अ‍ॅब्सॉर्बर नाहियेत का आपल्याला? eternal sunshine of the spotless mind सारखं खरंच मेमरी डिलीट करता येईल का? कोणी मला ही मेमरी डिलीट करुन देईल का? ईतक्या प्रश्नांनी डोकं दुखायला लागलं तरी विचार थांबत का नाहियेत? बोकूवर फक्त ३ महिने प्रेम केल्यावर आणि तो नंतर घर सोडून गेल्याने जी भळभळती जखम झालीये तीवर काहिच इलाज नाही का? इतके रँडम विचार एकाच वेळी कसेकाय मनात येतात?
बाबांनी बँकेत ३३ वर्ष नोकरी केली, आपण ३ वर्षात कसं काय हरलो? शेतकरी व्हायची इच्छा असणारे, झाडापानांत फुलांत रमणार्‍या बाबांच्या हळव्या मनाचं बँकेच्या रुक्ष वातावरणात काय झालं असेल? बाबांकडे बघितलं तर ते असे आभाळाइतके मोठे होत जातात आणि मी लहान होतहोत माझं अस्तित्वंच नाहिसं होतं. त्या दिवशी हे सगळं सहन न होऊन बाबांजवळ रडरड रडले. बाबा आता ६० वर्षांचे झाले तरी तेच मला आधार देतात, मी त्यांना कधी आधार देणार? कि ती लायकीच नाही माझी? पिसारा फुलवून नाचत असलेला मोर आपल्याच पायांकडे बघुन रडतो असं म्हणतात, तसं बाबा आपल्याकडे बघुन रडत असतील का?

----
तळटिप :
लेखात Emily Dickinson आणि Keki Moos चा उल्लेख केलाय. (काही लोकांना Emily Brontë पण वाटू शकते म्ह्णुन ही तळटिप.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्वार्टर लाईफ क्रायसिस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तीन शब्दांत तुम्ही म्याटरचा सो़क्षमोक्ष लावलात Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही यातनं गेलो आहे. अगदी याच वयात. तेव्हा जिंदगीला एक जबरदस्त घुमाव आणि जबरदस्त मोड देऊन टाकला. ह्यापी नाऊ.

----
जबरदस्त म्हणजे माझ्यासारखा कारकून देऊ शकतो तितपत जबरदस्त. मुंगी व्याली, शिंगी झाली यातला प्रकार.
जबरदस्त घुमाव आणि मोड ही टर्मिनॉलॉजी माहीत नसेल तर "छोटी सी बात" पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जबरदस्त घुमाव आणि जबरदस्त मोड मीपण देणारे. आत्ताही ह्यापीच आहे. होतं असं कधिकधी.. चलता हय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारिय डोस.ह्विन्सेट वगैरे .एकदम काळ्यानिळ्यातली चित्र! हे बघुन आपल्या मेंदू आणि ह्रदयावर सपासप वार होतायत असं का वाटलं?
अगदी एमिलीय मनगत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचारांची लैच गर्दी झालेली दिसते डोक्यात.
जेव्हा माझं असं होतं ; तेव्हा मी असलच काहीतरी लिहून बसतो --
काय वाट्टेल ते....! Smile
रजा आणि विश्रांती
.
.
जॉब बद्दल झालेल्या विचारांची भाउ गर्दी आणि उत्साहाच्या भरात लिहिलेलं --
सिंदबाद
.
.
डोकं बेफाम विचार करतच सुटलं की कै च्या कै डोक्यात येत राहतं. ते सुसंबद्ध असेलच असं नाही; ते असं --
अभिनव विषयांची सूची

आणि कधी जुन्या गोष्टींवर विचार आले डोक्यात की हे असं होतं --
जखम आणि खपली....
किंवा रिकाम्या वेळात डोक्यात येणार विचार निव्वळ विचार्/कल्पना नसतात; तर प्रश्न येतात डोक्यात . ते हे --
मला पडलेले काही प्रश्न Wink

.
.
सांभाळून रहा.उगा फार विचार कराल तर तुमचाही मनोबा होइल.
( आपल्यासारखाच अजून एक यडछाप बघून मजा वाटतेय खुप.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांभाळून रहा.उगा फार विचार कराल तर तुमचाही मनोबा होइल.

मनोबाचे मस्त चाललय ( त्याच्या रडगाण्याकडे लक्ष देऊ नका ), त्यामुळे मनोबा व्हाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांभाळून रहा.उगा फार विचार कराल तर तुमचाही मनोबा होइल.

काय वाईट आहे त्यात? उगाच मनोबाला नावं ठेऊ नका, हूएव्हर यु आर Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''विचारांची लैच गर्दी झालेली दिसते डोक्यात.'' ती कमी सुद्धा होईल, याचाही अनुभव आहेच. Smile
तुम्ही दिलेल्या लिंका वाचेनच. सिंदबाद लेख वाचलाय अगोदरच. अत्यंत सुंदर लिहीलंय. आपल्यासारखाच अजून एक यडछाप बघून मलाही मजा वाटतेय. Biggrin (जेव्हा वाचलं तेव्हा सदस्य नव्हते म्हणुन प्रतिसाद दिला नव्हता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो सव्वीस वर्षाच्या झालात.
कुणीतरी अनदेखा अनजानासा खयालांत यायची वेळ झालीय.

आता बाबा बाबा करणं सोडा आणि तो कुठे मिळतो का ते पहा.

समजा तो मिळायची/मिळवायची हौस/शक्यता नसेल तर एकदा स्वतःचे व्यवस्थित फिजीकल इव्हॅल्यूएशन करून घ्या.
घर ते ऑफिस, ऑफिस ते घर असं कायम चार भिंतींच्या आत वावरणार्‍या या वयातील मुलींना थायरॉईड, अ‍ॅनेमिया, व्हीट्मिन डी डेफिशीयन्सी असते.

तुमच्या लिखाणावरून तुम्ही व्हेजिटेरियन दिसता (अंदाज हां)
तर व्हेजिटेरियन लोकांना व्हीटॅ बी १२ च्या कमतरतेमुळे असे बरेच न्यूरोसायकिअ‍ॅट्रिक/ अटोनोमिक न्यूरोपथीचे आजार होतात्झ

आणि समजा अशी काहीच कमतरता तुमच्या शरीरात/रक्तात आढळली नाही तर तुम्हाला योग्य त्या सायकिअ‍ट्रिस्टकडे तुमचेफिजीशीयन रेफर करतील.

काही काळजी करू नका.
सगळं व्यवस्थित होईल.
सध्या तुम्ही जे अनुभवताय तो एकप्रकारचा इन्फेरिटी काँप्लेक्सही आहे. आणि अर्ली डिप्रेशन!
यात ज्या गोष्टींनी चांगलं वाटायला हवं त्या गोष्टीमुळेही आपण इनएफिशीयंट आहोत म्हणून रडायला येतं.

म्हणजे मी असते तर मला बाबांसारखं एकाच गोष्टीत /नोकरीत अडकून पडावं लागण्याची गरज नाही, आय कॅन ट्राय न्यूअर अवेन्यूज अ‍ॅट माय विल म्हणून आनंद झाला असता. आमच्या मागच्या पिढीला जे आयुष्य स्वतःसाठी कमवायला अर्धं आयुष्य खर्ची पाडावं लागलं ते तिशीच्या आत मिळतंय म्हणून स्वतःबद्दल अभिमान वाटला असता.
बोका तीन महिने जीव लावूनही सोडून गेला तर स्वतःची कीव न वाटता एकतर बोक्याची कीव वाटली असती किंवा राग आला असता.

आणि हो, तब्ब्येत धडधाकट असेल तर हल्ली पालकांना साठाव्या वर्षी आधार द्यायची गरज नाही.
उगाच त्यांना म्हातारं समजू नका. ते स्वतःचा आधार अजूनही स्वतःच बनू शकतात , आणि लेकीला गरज असेल तेव्हा मानसिक आधारही आरामात देऊ शकतात.

सो, जर हे ललित नसेल आणि खरीखुरी व्यथा असेल तर गेट क्लिनीकली इव्हॅल्यूएटेड युवरसेल्फ बाय अ गुड फिजीशीयन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली 'जात' एक नाही, इतकंच कळंलं मला यातून.

---
जातीचा संदर्भ : 'आपुल्या जातीचा मिळो आम्हा कोणी', इति कुठलेतरी संत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महान संत बसंतीदेवी रामगडवाल्या म्हणून गेल्यात की 'घोडा अगर घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या'
सो, घोडा आणि गवत यांची जात वेगवेगळी असते हे नक्कीच.

आणि सिरीयसली सांगत्येय, आमच्या पेशंटांच्या इतक्याच तीव्र इमोशन्सनी आम्ही त्यांच्या प्रॉब्लेम्सचा विचार केला पेशंट कधीच बरे होऊ शकणार नाहीत.

सो आम्हाला पेशंटांविषयी 'सहानुभुती/सहवेदना' कधीच वाटत नाही.

आमची जात त्यांच्यापेक्षा वेगळीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याही मनात अगदी हेच आलं होतं. पण साती डॉक्टर असल्याने तिने हे सांगणं तिला शोभून दिसतं. आमचं म्हणजे "अधिकाराविना बोल" असं झालं असतं...
सातीने फिजिऑलॉजीबद्दल सांगितलं, मी आता 'फोकस'बद्दल सांगतो. अनुभवातून म्हणून.

तुमचा धागा वाचून बेसिकली तुम्हाला नवीन/ अपरिचित जॉबमुळे स्ट्रेस आलेला आहे असं जाणवलं. अशी परिस्थीती असेल तर बहुतांश लोकांना स्ट्रेस येतो, तुम्हीच काही एकट्या नाही. ह्याचा तुमच्या विशीतल्या वयाशी काहीही संबंध नाही, चाळिशीतला माणूसही जेंव्हा नवीन/ अपरिचित असं काही करायला जातो तेंव्हा त्या वयातही हा स्ट्रेस येतो. मी माझ्या अयुष्यात दोन वेळा करियर बदलल्या आहेत आणि आता पन्नाशीत तिसर्‍या बदलाकडे वाटचाल सुरू आहे. प्रत्येक वेळी हा स्ट्रेस मी अनुभवलेला आहे. त सुरवातीला येतो आणि मग जसजसे तुम्ही स्थिरावता तसा तो निघूनही जातो.
तुम्हाला जॉबचा स्ट्रेस कसा घालवायचा ते सांगतो.
१. पुढले सहा महिने गिव्ह ऑल यू कॅन टू युवर जॉब! भरपूर वाचा, कामावरच्या निष्णात लोकांशी बोला, माहिती मिळवा,तुमच्या कामाची प्रॅक्टिस करा. सध्या अविवाहित आहांत, म्हणजे घरी लवकर जायची तशी काही सक्ती नाही तुम्हाला.
२. दिवसातून एक तास तुमच्या जॉब रिलेटेड प्रॉजेक्टसवर विचार करण्यासाठी घालवा. साथीला एखादी विचार न करता करण्यासारखी अ‍ॅक्टिव्हिटी असू देत. मी बागकाम करतो, तुम्ही ते करा किंवा सरळ तासभर चालायला जा. व्यायामापरी व्यायामही होईल. हं, मात्र त्यावेळेस आयपॉड वगैरे नेऊन रडकी गाणी ऐकणं वगैरे करू नका, विचार करण्यात त्याचं डिस्टृअ‍ॅक्शन येतं.
३. तुमच्या बॉसबरोबर जेंव्हा तुमची १:१ असेल तेंव्हा त्याला/ तिला तुमच्या कामाविषयीच्या नवीन आयडियाज/ प्लान सांगा. अ‍ॅप्रूव्ह झालेले प्लान अंमलात आणा. फक्त दिलेलं काम केलं असं न करता तेच काम अजून जास्त एफिशिंयंट कशा प्रकारे करता येईल ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे अनुभव बॉसबरोबर शेअर करा,
४. कामावर आपण चुका करू की काय ह्याची फार चिंता करू नका. ते तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे तुम्हाला फायर करू शकतात, फाशी देऊ शकत नाहीत (तुम्ही सौदी अरेबिया वगैरे नरकात रहात नसाल तर!)
५. फावल्या वेळात मित्रमैत्रिणी मिळवा. फेसबुक, मराठी संस्थळं ह्यात फार गुंतून पडू नका. ती फक्त एक करमणूक आहे हे लक्षात ठेवा.
आणि शेवटाचं म्हणजे,
६. जर शाकाहारी असाल तर अशी मटणाची वगैरे दुकानं निरखायला जाऊ नका हो! उगाच आत्मपीडन कशाला करून घ्यायचं? Smile

विश यू ऑल द बेस्ट!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.. नवीन/ अपरिचित जॉबमुळे स्ट्रेस आलेला आहेच. खरं सांगते, तुम्ही सांगितलेला प्रत्येक पॉइंट पटलेला आहे. अगदी तंतोतंत. हे सगळं नक्किच अमलात आणेन. खूपखूप धन्यवाद. Angel

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिप्रेशन असणार/ अँग्झायटीही असू शकेल. पण डोंट वरी. हे सर्व सॉल्व्हेबल प्रॉब्लेम्स आहेत. जोवर जवळचं कोणी गचकत नाही तोवर यच्चयावत समस्या सॉल्व्हेबल असतात.
.
सी द सिल्वर लायनिंग. तुमच्याकडे जॉब आहे, तारुण्य आहे, भविष्याची आशा आहे. जॉब अवघड तर जाणारच. नवीनही मिळेल. जर फारच अवघड असेल, किंवा वर्क कल्चरच भेंडी सक्स असं असेल तर, आत्ताच तुमचं एस्केप पॅरॅशूट उघडण्याची तयारी ठेवा. जॉबवर असतानाच, नवीन जॉब शोधायचा असतो.
.
मनात फार विचारांची गर्दी झाल्यास व्यनि करा. सल्ला देऊ शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.. आहेच द सिल्वर लायनिंग. सगळं ठिक आहेच, पण होतं असं कधिकधि, येतं डोळ्यात पाणिबिणी. चालायचंच. जरा low feel होणं यात मला अनैसर्गिक वाटत नाही. व्यनि करेनच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला तूच म्हणते.
.
इथे येतच जा. ऐसी एकदम स्ट्रेस बस्टर आहे, बागडण्याचे मनस्वी मस्त ठिकाण आहे. सोशल सपोर्ट हा लागतोच. तू जसे स्पष्ट लिहीलेस तसे लिहीतच जा. इथे कोणासही आयडेंटिटी माहीत नसल्याने मुक्त बागडता येते, खरे तर लहान होऊन जाता येते.
.
अजुन एक - जोडीदार शोधणे हा समस्येवरचा तोडगा समजू नकोस. तसा तो कधीही नसतो. स्वतःला हँडल केलं तरच विवाह्/डेटींग्/मैत्री हँडल करता येते. एक आहे - इथे कनेक्ट हो. तुझे मित्र-मैत्रिण गोळा कर - तुला समस्यांचा विसर पडेल. उभारी येइल. तू जोमाने उडशील.
.
ते दु:खी साहीत्य जाऊ देत. ते तोंडी लावण्यापुरता ठीक असतं. हे वाच :).... कवयित्री पद्मा गोळे
.
खव/खफ मध्ये तीच तीच गाणी शेअर होतात पण त्यामागचा हेतू हा असतो की ते गाणे आपल्या मित्राने ऐकावे आणि त्याचा मूड त्यादिवशी चीअरफुल व्हावा. तसं तर काय गाणी युट्युबवर सापडतात. मग आपण का आग्रहाने मित्राला गाणे पाठवायचे तर त्यामागे भावना असते "माझा मूड चीर अप झाला आणि तो शेअर करण्याकरता तुझी आठवण आली." हे जे कनेक्ट होणं आहे /असतं ते प्राईसलेस असतं. असो.
-

https://lh3.googleusercontent.com/NAyct48E7LMJJu_hXgHaUrVBpsdd7T4D--MHr9xBcADyEpHpxYhiaHuoCe8e4hlH_x7FP5euu2rkcw=w1920-h1080-rw-no

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी एकदम स्ट्रेस बस्टर आहे.. हे अगदी खरं.. बाकीच्या मुद्दयांशिही 100% सहमत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला....
बरं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्या सगळ्या व्हेजवाल्यांना बी काम्प्लेक्सची काय खोट येतेय?या उगाच अफवा आहेत.हां एक आहे परदेशात नाही मिळणार भरपूर चरायला.बाबांची लाडकी वगैरे असेल तर दूर गेल्याने जरा डौन होत असेल.शिवाय स्वभाव हळवा असावा.लेख टाकल्यावर लगेच कुणी फिरकले नाही म्हणून.पण आता झाले ना समाधान?एखादं मांजर वगैरे प्राणी ठेवा.नाही जमल्यास बर्ड फिडर टांगा खिडकीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मांजर काय परत?
आधीच एक बोका तीन महिने राहून मग पळून गेलाय ना?

बर्ड फीडर इज गुड आयडिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, लोक माझ्याच धाग्यावर फिरकले नाहीत असं नव्हतं म्हणायचं मला. इन जनरलच कोणत्याच धाग्यावर प्रतिसाद नव्हता सलग 3-4 तास. ऐसी वर इतका शुकशुकाट पहिल्यांदाच पाहिला. आणि ⁠⁠⁠दृष्ट लागावी असं आयुष्य चाललंय. ते जरा जॉबचं टेंशन, बाकी काय नाय ओ. बहिणाबाई मनाबद्द्ल म्हणतात 'आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात', तसं माझ मन जरा पाताळ धुंडाळून आलं इतकंच.
मांजर आहे माझ्याकडे. बोकु गेल्यावर त्याच्याच बहिणिला घरी आणलं मी. बाल्कनित बर्ड फिडर आहे. स्केली ब्रेस्टेड मुनिया रोज थव्याने येतात. त्यावर लेख लिहिलेला मी, पण मुक्तपिठीय वाटल्याने इथे टाकला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ ताई मुक्तपिठीय तर मुक्तपिठीय टाका की. इथे सगळे पंतोजीचे चष्मे चढवुन चर्चाळत असतात. जरा ललित येऊ द्या की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवो लईच मुक्तपिठीय लिहीलंय. हापिसच्या लॅपटॉप मधे आहे. सोमवारी टाकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणी इथे सांगितलेले सगळे उपाय थकले तर या गाण्याला राष्ट्रगीत बनवा अन रोज ऐका! सगळे मोटिवेशन वैगेरे येईल-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिवळा डांबिस +
मुनिया येतात? वा। केरसुणीच्या काड्या कुंडीत टोचून ठेवा.काढून नेतात घर करायला.गवत लावा त्याची पाने नेतात.लेख हवाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0