आत्माष्टक/ निर्वाणाष्टक (आदि शंकराचार्यांचे नव्हे तर एका सामान्य मुलीचे)

https://s-media-cache-ak0.pinimg.com/236x/7d/ce/75/7dce759fffde82f19a8b573db8884175.jpg

स्वतःचा परीघ, आसपासचा समाज (आंजा किंवा खराखुरा), प्रियजन, मित्र - मैत्रिण, नातेवाईक आदि यांचे भान असले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.
.
उडदामाजी काळे-गोरे असतातच. सर्व प्रकारचे लोक या जगात आहेत पण आपण कोणाला महत्व द्यायचे, कोणाच्या वारांनी व्यथित व्हायचे, स्तुतीने फुशारुन जायचे याचा नीट अदमासा आला की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.
.
आपण आपल्या जीवनाचे नायक-नायिका असतो पण अन्य लोकांच्या मते एक्स्ट्राज, साईडकिक किंवा एक गर्दीतील चेहरा हे लक्षात आले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.
.
आयुष्य काय लोक काय फक्त काळ्या-पांढर्‍या रंगाच्या चष्म्यातून पाहीले की अपेक्षाभंग हा अटळ असतो, एवढे लक्षात आले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.
.
वहावत जाणे हा कदाचित हट्टी हृदयाचा गुणधर्मच आहे, आणि विषयावर चिंतन करणे हा हट्टी मनाचा, एवढे लक्षात आले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.
.
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः। न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू|चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् - एवढे कणभर जरी पटू लागले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे..
.
"जाईची नवलकहाणी" मध्ये जसे जाईला कळते की सर्वजण निव्वळ पत्ते आहेत, फुंकरीसरशी विखुरणारे, माना मोडून पडणारे- आपण उगाचच घाबरलो, बावरलो, खिदळलो, बहकलो - एवढे जरी पटले तरी
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार फार फारच अवधी लागला पण लक्षात आले आहे.

- नि:संग, नीरीच्छ आणि फायनली शहाणीसुरती एक फॉरेव्हर यंग अ‍ॅट हार्ट मुलगी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

सुंदरच लिहीलं आहे. खरयं, आपण कोण? याचं भान येता येता वयाची बरीच वर्षं खर्ची पडलेली असतात. आणि तरीही भानावर रहातोच असं नाही. आपणच ग्रेट असं वाटेवाटेपर्यंत दाणकन जमिनीवर आदळलेलो असतो. अर्थात हीच आयुष्याची गंमत असते

म्हणून

वहावत जाणे हा कदाचित हट्टी हृदयाचा गुणधर्मच आहे, आणि विषयावर चिंतन करणे हा हट्टी मनाचा, एवढे लक्षात आले की
आपले स्वतःचेही जीवन अन्य लोकांचेही सुसह्य होते.
कळायला फार अवधी लागला पण लक्षात आले आहे.

हे फार आवडलं. चित्रही गोड आहे. "जाईची नवलकहाणी" काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जाईची नवलकहाणी' लुई कॅरॉलच्या 'अॅलिस इन वंडरलँड'चा भा. रा. भागवतांनी केलेला भावानुवाद आहे.

अष्टक आवडले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सॉरी खरं तर अष्टक नाही सप्तक आहे. Sad
___
पण एनकरेजिंग प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0