सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी

(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )

संत कबीर दास यांनी म्हंटले आहे 'माया महा ठगनी हम जानी'. माया निरनिराळे मोहंक रूप घेऊन लोकांना ठगत राहते. सुवर्ण तर मायाचे सर्वात मोहक आणि भयंकर रूप. आपली सीता मैया बेचारी सुवर्ण मृगाच्या मोहात अटकली. बेचार्या रामाने कितीही समजावले तरी तिने ऐकले नाही (बायका कधी नवर्याचे ऐकतात का?). लंकेचा राजा रावण हि सोन्यासारखी सुंदर स्त्री अर्थात सीता मैयाला पाहून मोहित झाला. परिणाम सुवर्ण लंका जाळून खाक झाली. हजारोंच्या संख्येत राक्षस, वानर मारल्या गेले. रामाने हि राक्षसांच्या संहार करून परत मिळविलेल्या सीतेला वनात सोडून दिले. कुणाच्याच हाती काही लागले नाही. झाला फक्त विनाश.

अर्जुन रथारूढ होईन कुरुक्षेत्रच्या मैदानात उतरला. दूरवर पसरलेले शत्रू सैन्य दिसत होते. या सैन्याचा संहार करून अर्जुनाला सुवर्णजडित सिंहासनावर बसायला मिळणार होते. अर्जुनाने बाण धनुष्यावर चढविला, अचानक त्याच्या मनात विचार आला, खरंच सुवर्ण सिंहासन एवढे महत्वपूर्ण आहे कि ज्यासाठी आपल्याला बंधू-बांधव सहित अक्षोहणी सैन्याचा संहार केला पाहिजे. अर्जुनाची सद्विवेक बुद्धी जागृत झाली, तो मोहापासून दूर झाला. त्याने धनुष्य जमिनीवर ठेवले. द्वारकेचा राजा कपटी कृष्ण हा अर्जुनाचा मित्र आणि सल्लागार होता. त्याने अर्जुनाला म्हंटले, राज्य मिळाले तर शरीरावर सुवर्ण हि धारण करायला मिळेल. सुवर्णासाठी आप्त असो वा बंधू त्यांना मारण्यात काहीच गैर नाही. भौतिक जगात सुवर्णच हे सत्य आहे. तू याच सुवर्ण धर्माचे पालन कर आणि पृथ्वीवर राजसी सुख भोग. अर्जुन पुन्हा सुवर्णाच्या मोहात अटकला. आपल्या तीक्ष्ण बाणांनी लक्षावधी शत्रू सैन्याला यमसदनी पाठविले. म्हणतात १८ अक्षोहिणी सैन्य युद्धात मारल्या गेल. शेवटी पांडव सुवर्ण परिधान धारण करून सुवर्णजडित सिंहासनावर आरूढ झाले. सुवर्णाच्या मोहापायी १८ अक्षोहिणी सैन्याचे रक्त पृथ्वीवर सांडले. लाखों स्त्रिया विधवा झाला. एका संपूर्ण पिढीचा विनाश झाला. भारतातील इतिहासातला महाभयंकर विनाश.

रामायण आणि महाभारत काळापासून हजारों वर्ष लोटली, तरीही आपण भारतीय अजूनही सुवर्णाच्या मोहातच अटकलेले आहोत. जगातील सर्वात जास्त सुवर्ण भारतातच आहे. या साचलेल्या सुवर्णापायीच विदेशी लुटेरे भारतात आले. अमानुष अत्याचार येथील जनतेवर केला. जर सुवर्ण नसते, तर लुटेरे इथे कशाला आले असते. एवढे असूनही आपला सुवर्ण मोह काही कमी होत नाही. प्रधान मंत्री म्हणतात, सुवर्ण बँकेत ठेवा, बँक व्याज हि देईल. तरी हि कुणी सुवर्ण बँकेत ठेवायला तैयार नाही. प्रत्येकांनी सुवर्ण आपल्या छातीशी कवटाळून धरले आहे. घरात चिल्ला-पिल्ल्याना प्यायला दूध नसेल, पण शरीरावर सुवर्ण पाहिजे.

रियो ऑलम्पिक मध्ये आपली नेमबाज कुमारी धनुष्यावर बाण चढवून सज्ज होती. नेम भेदला कि सुवर्ण मिळणार. अचानक अर्जुनाप्रमाणे तिची सद्विवेक बुद्धी जागृत झाली. तिच्या मनात प्रश्न आला, खरंच सुवर्ण जिंकणे महत्वपूर्ण आहे का? काय मिळणार हे सुवर्ण पदक जिंकून. आधीच भारतभूमीवर भरपूर सुवर्ण आहे. आणखीन जिंकून काय करायचे. सुवर्णापायीच युद्ध होतात. विनाश होतो. सुवर्ण पदकाच्या मोहात पडले नाही पाहिजे. या कलयुगात तिला पुन्हा सुवर्णाच्या मोहात पाडू शकेल, असा गीतोपदेश देणारा कृष्ण हि नव्हता. सामाजिक न्यायावर विश्वास करणाऱ्या भरतखंडात तिचे लालन पालन झाले होते. तिने विचार केला, या छोट्याश्या सुवर्ण पदकाची आपल्यापेक्षा इतर देशांना जास्त गरज आहे. तिने सुवर्णाचा मोह टाळला. एका स्थितिप्रज्ञ प्रमाणे जय-पराजया पासून ती विरक्त झाली. लोक म्हणतात तिचा नेम चुकला, तिला सुवर्ण पदक मिळाले नाही. तरीही आपली नेमबाज आनंदी होती. अर्जुनाप्रमाणे ती मोहात अटकली नाही. तिचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन, आपल्या स्थितिप्रज्ञ खेळाडूंनी सुवर्ण पदकांचा मोह टाळला. मोह आणि प्रसिद्धीच्या मायावी जाळ्यात ते अटकले नाही. असो.

माया महा ठगनी हम जानी
तिरगुन फांस लिए कर डोले
बोले मधुर बानी.
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

च्यायला त्या दीपीका कुमारीवर काय बळच घसरलात? आपले क्रीडामंत्री, तुम्च्या दिल्लीचे गोयलकाका बरीच गम्मत-जम्मत करतायत की तिकडे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हणूनच "फलाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करा" असं म्हणणे हा केवळ वैचारिक फोलपणा नसून असत्याला सत्य समजणे आहे. पण प्रतिवाद म्हणून अध्यात्मवादी लगेच "यू आर मिसिंग द प्वाईंट", किंवा "तुम्हाला गीता समजलेलीच नैय्ये" वगैरे बकवास सुरु करतात. गीता समजणे हे सुद्धा (गीता समजून घेण्याच्या कर्माचे) कर्मफल आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही ? का लक्षात येऊन सुद्धा लक्षात आलेलेच नाही असे भासवतात ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
तीनचारवेळा वाचला तेव्हा कळला. पण आवडला प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमंत म्हणून वाचा. कुठली सिरीयस चर्चा नको. सहज गीतेवर कृष्ण आणि अर्जुनाचे फोटू पाहून भन्नाट कल्पना डोक्यात आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहलय मज्या आली Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

(लेखाचा उद्देश्य कुणाच्या भावना दुखविण्याचा नाही. निखळ मनोरंजन म्हणून हा लेख वाचवा. )

हल्ली ऐसीवर अभिव्यक्त होताना कीती घाबरावे लागते ना Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेही (ऑफ ऑल द पीपल) हिंदूंच्या भावना दुखावतील म्हणून!

'अच्छे दिन' आले म्हणायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

’खेळाडू मुद्दाम चुका करतात किंवा चटावरलं श्राद्ध उरकून टाकावं तसं खेळतात’, असं म्हणायचंय का तुम्हाला? अजिबात आवडलेला नाही लेख. मैदानी खेळ, मैदाने हे इतिहासजमा करत चाललेल्या या भारतात हे खेळाडू अतिशय मेहनतीने, असुविधांचा डोंगर पार करून ऑलिंपिकच्या पात्रता फेरीत पोहोचतात. आपण केवळ कळफलक बडवण्याची कामगिरी करणार आणि त्यांना नावं ठेवणार. गंमत म्हणून वाचण्याइतकाही लेख आवडलेला नाही. कश्याची गंमत करावी याचंही भान असावं. असा गंमतवजा लेख त्या खेळाडूंच्या जीवावर आपली पोळी भाजून घेणार्‍या क्रिडाअधिकार्‍यांवर टाका की.
पटाईतकाका, खेळाला काहिही महत्व न देणार्‍या आणि खेळाडू जिंकला की त्याला डोक्यावर घेऊन नाचणार्‍या, हरला की पायाखाली तुडवणार्‍या लोकांची खरे खुरे प्रतिनिधी शोभता.
तुमचे लेख बरेचदा आवडत नाहीत पण त्यातला भाबडेपणा जाणवल्याने (उगाच तिखट) प्रतिक्रिया देत नाही पण इथे रहावलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खेळाडू अतिशय मेहनतीने, असुविधांचा डोंगर पार करून ऑलिंपिकच्या पात्रता फेरीत पोहोचतात.

हे अतिअवांतर आहे. तरीपण लिहायला हरकत नाही : हे खेळाडु जे काही करतात ते स्वतासाठी करतात, कोणी त्यांना जबरदस्ती करत नाही. त्यामुळे त्यांनी पदके जिंकली काय किंवा नाही जिंकली काय मला काही फरक पडत नाही. इतकेच काय सरकारी खर्चानी ऑलिंपिक वगैरेत भाग घ्यायला माझा ठाम विरोध आहे. फक्त स्पर्धेत भाग घेण्याबद्दल नाही, पण सरकारी खर्चानी ह्या खेळाडुंचे प्रशिक्षण वगैरे चालते त्याला पण माझा ठाम विरोध आहे.

सरकारनी हे असे पैसे खर्च करण्यापेक्षा बीएसएनल चालवावी तोट्यात, नो इश्यु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकेच काय सरकारी खर्चानी ऑलिंपिक वगैरेत भाग घ्यायला माझा ठाम विरोध आहे.

मग कशावर करायचा म्हणे खर्च ?

त्यांनी पदके जिंकली काय किंवा नाही जिंकली काय मला काही फरक पडत नाही

तुम्हाला कशाने फरक पडतो अथवा नाही , या मूळे कुणालाच काहीच फरक पडत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मग कशावर करायचा म्हणे खर्च ?

हो लिस्ट आहे त्याची पण. पण इथे नको.

----------
समजा पुणे-५२ सिनेमाच्या निर्मात्यांना वाटले की त्यांचा सिनेमा अमेरीकेत किवा ब्राझील मधे प्रदर्शीत करावा आणि त्यासाठी सरकारनी पैसे पुरवावेत तर तुमचे काय मत असेल?

--------
एका बर्‍यापैकी गाणार्‍याला जर असे वाटले की त्याने अमेरीकेत प्रोग्रॅमचा दौरा करावा किंवा नाटक निर्मात्याला त्याचे नाटक अमेरीकेत घेउन जावेसे वाटले तर सरकार नी खेळाडुंसारखी त्यांना पण पैश्याची मदत करावी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणे अथवा चित्रपटाचे ब्राझीलमधे सरकारी खर्चाने सादरीकरण याची तुलना ब्राझीलमध्ये जाउन जागतिक पातळीवर क्रीडास्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करण्याबरोबर ...

कै च्या कै..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे-५२ काय देशाचे प्रतिनिधित्व करत नाही? पुणे-५२ ( किंवा तुम्हाला कोणता आवडेल तो घ्या सिनेमा ) काय जागतीक दर्जाचा नव्हता?
पुणे-५२ च्या निर्माते, दिग्दर्शकांनी काहीच हाल काढले नाहीत? त्यांची कलात्मकता, डेडीकेशन एखाद्या नेमबाजापेक्षा कमी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

गाणे शिकण्यासाठी लोक ७-८ वर्ष ४-५ तास रोज रीयाझ करतात, त्यांना तुम्ही खेळाडुंच्या पेक्षा कमी लेखता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका दगडात किती पक्षी मारताय! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा घ्या अजुन एक पक्षी

खरे तर मनोबा ला जिमनॅस्टीक साठी पाठवले पाहिजे भारताचा प्रतिनिधी म्हणुन. मनोबा नं-१ जिमनॅस्ट ला लाजवेल अस फ्लेक्झीबल आहे. तो कुठल्याही बाजुला कीतीही वाकु शकतो. आणि कोलांट्याउड्या मारण्यात पण मनोबाचा हात कोणी धरु शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथेही जागतिक स्पर्धा असेल आणि पुण ५२ भारतातील इतर चित्रपटांपेक्षा सरस ठरुन तिथे जायला पात्र ठरला तर काहीच हरकत नाही. पण पुणे ५२ च्या निर्मात्याला वाटते म्हणून नाही. सेम विथ गायक/गायिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणे अथवा चित्रपटाचे ब्राझीलमधे सरकारी खर्चाने सादरीकरण याची तुलना ब्राझीलमध्ये जाउन जागतिक पातळीवर क्रीडास्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करण्याबरोबर ...

@बाळसप्रे, ही तुलना नाही उदाहरण (analogy) आहे.

फरक सांगतो -

(१) तुलना केव्हा करतात ? - दोन किंवा जास्त पर्यायांमधे तुलना तेव्हा करतात जेव्हा त्यातील एक पर्याय निवडायचा असतो.

(२) उदाहरण केव्हा देतात ? - जेव्हा एखाद्या परिस्थितीतील मर्म सहजतेने दाखवून देता येत नसेल तर दुसर्‍या परिस्थितीचे उदाहरण देऊन ते विशिष्ठ (insight) मर्म दाखवून देऊन ते मर्म पहिल्या परिस्थितीस लावून पाहण्याचा यत्न केला जातो तेव्हा. ( An example is used to extract a particular insight, which can be applied to the original situation to make a point about that original situation.)

वर अनु ने हेच केलेले आहे. सरकारने कोणते काम करावे व करू नये याबद्दलचे तत्व्/मर्म उदाहरणे देऊन विशद केलेले आहे. तत्व्/मर्म हे आहे की - जर विशिष्ठ कामातून मिळणारा फायदा हा मुख्यत्वे प्रायव्हेट असेल (आणि कॉस्ट्स ह्या इतरांवर लादल्या जात असतील) तर सरकारने ते शक्यतो टाळावे. Privatization of profits and socialization of costs असं त्याला म्हणतात. एखादा गायक शास्त्रोक्त गाण्याच्या मैफीलींच्या दौर्‍याला (परदेशी) जात असेल तर त्यातून मिळणारे लाभ (पैसा, वाहवा) हे मुख्यत्वे/बहुतांश त्या गायकाचे असतात. म्हणून सरकारने त्या दौर्‍याचा खर्च उचलू नये.

तुलना वि उदाहरण ही गल्लत अनेक लोक करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलना म्हणा अथवा उदाहरण.. ते का योग्य नाही याचं स्पष्टीकरण वरच्या प्रतिसादात दिलय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अनुराव, लिंकनची गोष्ट माहितीय का हो तुम्हाला?
एकदा म्हणे लिंकन आणि त्यांचा मित्र यांचा वाद चालला होता. लिंकनचं म्हणणं होतं पूर्ण नि:स्वार्थी असं जगात काही नाहीच. मात्र धार्मिक प्रवृत्तीचा मित्र हे काही मानायला तयार नव्हता. तेवढ्यात ते ज्या घोडागाडीतून निघाले होते तिला हिसका बसला, कारण एक डुकराचं छोटं पिलू गाडीखाली येता येता वाचलेलं. पण बहुधा त्याचा पाय दुखावलेला. लिंकननी खाली उतरून त्या पिलाला कोटात गुंडाळलं. मित्र विजयी मुद्रेनं म्हणाला की बघ तूच तुझं म्हणणं खोटं ठरवलस. त्यावर लिंकन उद्गारले "मी हे स्वार्थासाठीच केलं. ते दुखावलेलं पिलु दुसर्^या कुठल्या गाडीखाली तर नाही सापडणार ना या विचाराने मला रात्रभर झोप लागली नसती"
गोष्ट मला लिंकनची म्हणून माहिती आहे बाकी ती तुमच्याही नावावर खपवता येईल.;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अशा बंडलबाजीचा तीव्र राग येतो.
एकतर बरेचसे खेळाडू अतिशय मेहनतीने इथवर पोचतात. पदक मिळवणं केवळ खेळाडूंनाच मानाचं असतं असं नाही, देशाचा वट सुद्धा वाढतो. असल्या बुळचट टाळकुट्या फिलॉसॉफीने आपली मनोवस्थाच पार रडकी करून टाकली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

, देशाचा वट सुद्धा वाढतो.

हाऊ कम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या दृष्टीने देशातील लोकांच्या शारिरिक क्षमता आणि फिटनेस मोजण्याचं पदकांची कमाई हे अतिशय सोपं एकक आहे.

शिवाय काही परदेशी माध्यमं देखील आपल्या अपयशांची कारणं शोधतात तेव्हा अजून शरम वाटू लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

तुमच्या देशाचा नाही ना वाढत, तुम्हांला कशाला काळजी ओ पुणेकर ब्रिटिशकाकू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भगवान बुद्ध, राजू गाईड्,इरोम शर्मिला, अर्जुन्,राम्,सीता,नेमकुमारी या सगळ्यातील संबंध आणि कार्यकारण भाव शोधा. तसेच त्यांतील किती जणांना सुवर्णाचा मोह पडणे शक्य होते, त्यावर चर्चा करा.
साक्षी मलिकला सोन्याचा मोह न पडता ब्रॉन्झचाच मोह का पडला ते कारणासहित स्पष्ट करा.
साक्षी मलिक, साक्षी महाराज आणि साक्षी तन्वर यांतील साम्ये शोधा.
एवढा गृहपाठ पुरेसा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्यकारणभाव??

तो विषय ऑप्शनल म्हणून सोडून दिला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिने हिरण्य म्हणजे सोने असं समजून त्याचा मोह ठेवला. नंतर समजले की हिरण्य म्हणजे ब्रॉन्झ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/rio...

साक्षी मलिक

साक्षी मलिक हिची हातात तिरंगा घेऊन मॅटभोवती फिरण्याची इच्छा पूर्ण झाली. अभिनंदन!

बिनकामाचे साधू आणि टाळकुटे वारकरी यांच्यासाठी कुंभमेळा-वारीसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी साक्षीसारख्या खेळाडूंना मैदाने, प्रशिक्षणासारख्या सुविधा पुरवल्या तर भारताची कामगिरी नक्की सुधारेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साक्षी मलिकचं पदक हे शोभा डे, अनु राव, पटाईतांसारख्या संवेदनशून्य लोकांना दिलेली सणसणीत चपराक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

गरीबी, शौचालये यांचे प्रश्न बारगळत ठेऊन, संवेदनशीलता बाळगायची? क्रीडा, विलास केव्हा येतो भूक भागल्यावर. पैशाचा विनियोग करताना तारतम्य नको? का परदेशी पत्रकार अब्रू काढतात म्हणून उगाच बळबळंच खेळाडूंवरती खर्च करत बसायचं
घरी आपण वाणीसामान आधी घेतो का क्रिकेट सामन्यांना आधी जातो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी पोटोबा मग विठोबा असे सांगूनही आपल्याकडे विठोबाला का प्राधान्य देतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोटोबाचीच सोय व्हावे या अंधश्रद्धेने. त्यात विठोबाचे महात्म्य फक्त स्वार्थाकरता असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे म्हणजे "तुम्ही भिकारी ना, मग उगाच खेळ वैगेरे कशाला खेळता ? " असे विचारणे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

ज्या देशात कुंभमेळ्यातील बिनकामाच्या साधूंवर देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त खर्च होतो, त्या देशाने खेळाडूकडून पदकाच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्याकडून दूधाची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे

व्हॉट्सऍप वर आलती ही फॉरवर्ड. भावना पटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

साधूंवरती नक्की कोण खर्च करतं?
एक जेन्युइन शंका - हज यात्रेला जसे कन्सेशन का काय असते तसे कुंभमेळ्याला असते का? म्हणण्याचा उद्देश हाच की सूट हज यात्रेला का म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथेही चूकच ! प्रश्नच नाही आणि ती सूट बंद होणार आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

हज यात्रेला काहीही कन्सेशन नाही हो. तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी सोडलेले पिल्लू होते ते. दहाबारा हजारात मिळणारे विमानाचे तिकीट सत्तर हजाराला विकून त्यावर ही तथाकथित 'सवलत' मिळत (असे). आम्हाला णको असे अनेकदा सांगूनही सरकार देतच होते शेवटी कोर्टाने दणका दिल्यावर बंद झाले असे वाटते. आणि हजला जाणारे निदान सवलतीचे का होईना तिकीट काढून जातात. कुंभमेळ्या येणारे साधू विनातिकीटच असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंभमेळ्या येणारे साधू विनातिकीटच असतात.

विनातिकीट रेल्वेने, बसने , विमानाने येतात की पायी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, हज यात्रेवरचा सरकारी खर्च आणि कुंभमेळ्यावरचा सरकारी खर्च यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुंभावरचा खर्च महाप्रचंड असतो. जरी मेळा तीन वर्षांनी आलटून पालटून वेगवेगळ्या ठिकाणी भरत असला तरी दरवर्षी जाणार्‍या हज यात्रेकरूंच्या तिकिटापेक्षा त्याचा खर्च अधिक असतो. नासिक, उज्जयिनी इथला मेळा लहान म्हणजे पंधरावीस लाखांचा असतो पण हरिद्वार, प्रयाग येथे सुमारे एक कोटी लोक जमा होतात. (हे जगातलं सगळ्यात मोठं काँग्रगेशन असतं.) मेळा कमीत कमी दोन आठवडे चालतोच. मुख्य आखाड्यांचे साधू महिना दीड महिना मुक्काम करतात. एक शहरच वसतं तिथे. पाणी, वीज, सुरक्षा, वाहातूक, प्रचंड खर्च असतो. बरे ह्या सुविधा कायमस्वरूपी करून काहीच उपयोग नसतो कारण पुन्हा त्या स्थळी कुंभ बारा वर्षांनी भरणार असतो. मध्ये अर्धकुंभ वगैरे असला तरी तो सुद्धा बर्‍याच काळाने येतो. तोपर्यंत त्या सर्व सुविधा वापराविना पडून राहातात. शौचालये, स्नानगृहांची दारे निघतात. विजेच्या सोयी नादुरुस्त होतात. ध्वनिक्षेपण, टीवी सर्किट्स बंद पडतात. तात्पुरते रस्ते, बराकी, टेलेफोन बूथ्स, वाहनतळ सगळं मोडकळीला येतं.
आणि केवळ कुंभच नव्हे तर पंढरपुर, पुष्कर, कुरुक्षेत्र इथे आणि इतर अनेक ठिकाणी दरवर्षी भरणार्‍या यात्रांना दहापंधरा लाखांची गर्दी सहज असते. तिथेही दरवर्षी सोयी कराव्या लागतात.
ह्या सोयी पुरवणं हे सरकारचं कर्तव्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरी मेळा तीन वर्षांनी आलटून पालटून वेगवेगळ्या ठिकाणी भरत असला तरी दरवर्षी जाणार्‍या हज यात्रेकरूंच्या तिकिटापेक्षा त्याचा खर्च अधिक असतो.

ओह ओके. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या सोयी पुरवणं हे सरकारचं कर्तव्यच आहे.

ह्या सोयी नि:शुल्क पुरवणे हे सरकारचे कर्तव्य नसायला हवे.

ज्यांना तिथे जायचे आहे व जे तिथे जातात त्यांच्याकडून हा पैसा वसूल करून घ्यायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात्रा कर लावता येईल कदाचित. पण तो दुसरा जिझिया ठरेल आणि सरकार औरंगज़ेब. बाकी अन्न पाणी वगैरे सवलतीच्या दरात असलं तरी ते विकत घ्यावं लागतं. कित्येक धार्मिक संस्था, ज्ञातिसंस्था, चॅरिटीज़ हे लोक यात्रेकरूंना काही प्रमाणात मोफत सुविधा, अन्नछत्र वगैरे पुरवतात. पण पायाभूत (इन्फ्रास्ट्रक्चर) खर्चच अवाढव्य असतो. आणि तो सरकार करतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात्रा कर लावता येईल कदाचित. पण तो दुसरा जिझिया ठरेल आणि सरकार औरंगज़ेब.

सगळ्या धर्मीयांच्या यात्रांवर (नेमकेच बोलायचे म्हंजे अशा सर्व काँग्रेगेशन्स वर) लावला तर कर हा जिझिया नाही. विरोधी पक्ष तसे दाखवायचा यत्न जरूर करतील. पण यात्रा कर लावणार्‍या सरकारने व्यवस्थित कम्युनिकेट केलं तर विरोधक यशस्वी होणार नाहीत. विरोधकांच्या बोलण्यातली हवा काढून घेणे हे कौशल्य आहे. दुसर्‍या बाजूला controversy निर्माणच होऊ न देणे हे सरकारला परवडणारे नसते. ( आता लगेच - गब्बर नाईव्ह आहे किंवा नाईव्ह असल्याचं भासवतोय, फारच भाबडेपणा, गब्बरचा - वगैरे डायलॉग्स येतीलच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंढरपूर यात्रेला मोबाईल टॉयलेट्स पुरवण्याचा खर्च सरकार करत... असावं. याचा खर्च कोणी कोणाकडून घ्यावा ? पंढरपूर यात्रे सारखे गरीब ( फडतूस ? ) लोकांच्या यात्रांचा (सरकारी)खर्च कोणाच्या खिशातून काढावा ? का अश्या यात्रा बंदच कराव्यात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इच्छा असली की सगळं करता येतं. कंपन्यांवर वेगवेगळे टॅक्सेस व निर्बंध लावले जातातच ना ? मग यांना का सूट द्यावी घाण करायची ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वारकरी पैसे देणार नाहीत म्हणून मोबाईल टॉयलेट्स न दिल्यास , वारकरी पारंपरिक पध्धतीने सोनखत वाटत जातील , सोनखत प्रसादामुळे वारीमार्गावर आरोग्य प्रश्न निर्माण होतील त्याचे काय करावे बरे ? ( बाकी जाऊ दे , तो खर्च कोणाच्या खिशातून काढायचा ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) वारीच्या दिवसात पंढरपूर कडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर टोल नाका लावायचा. प्रत्येक माणसागणिक काही एक रक्कम प्रवेश फी म्हणून घ्यायची. वारी संपली की टोल काढून टाकायचा.
(२) वारीच्या दिवसांत मंदिरात प्रवेशावरच फी लावायची (हा पोलिटिकली एक्सप्लोझिव्ह पर्याय आहे. यावरून दंगली होऊ शकतील.)
(३-अ) वारीच्या दिवसांत पंढरपूरात जे जे म्हणून काही विकले जाते त्यातल्या काही वस्तूंवर (उदा नारळ, कुंकू) विक्रीकरावर सेस लावायची (हे राबवायला थोडे कठिण आहे). हे इंडायरेक्ट टॅक्स प्रमाणे होईल.
(३-ब) वारीच्या दिवसात जे तिथे व्हेंडर्स असतात (चहावाले, खाण्याचे गाडे वगैरे) त्यांच्या परमिट वर टॅक्स लावायचा. हे इंडायरेक्ट टॅक्स प्रमाणे होईल.

(इंडायरेक्ट टॅक्स हा जीएसटी बरोबर रिकन्साईल करावा लागेल.)

हे काम सरकारद्वारे (मुंबईतून) न करता देवस्थानाच्या विश्वस्त मंडलाकडून करवून घ्यायचे. जो काही टोल, फी, टॅक्स, सेस लावायचा तो लोकल लोकल लोकल लेव्हल च्या लोकांकडूनच जाहीर करवून घ्यायचा. व त्याचा उद्देश सुद्धा थेट जाहीर करवून घ्यायचा की हा टोल्/टॅक्स/सेस फक्त बेसिक सोयीसुविधा पुरवण्यासाठीच आहे. भारतात कोणताही प्रस्ताव "कोण" आणतंय ते महत्वाचं असतं. प्रस्ताव काय आहे याकडे लक्ष कमी (कमी म्हंजे शून्य नव्हे) जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकार पडेल हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अनु राव यांचे पटले आहे. सर्व देश श्रीमंत आहेत. मास्लो पिरॅमिडमधल्या त्यांच्या बर्‍याच गरजा पूर्ण झालेल्या आहेत. आपल्या प्रायॉरिटीज (प्राधान्ये) काय, आपण खर्च कशावर करओ काहीही तारतम्य, ताळमेळ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगलयानाच्या वेळीही लोक असेच मूर्खपणाचे लॉजिक लावत होते असे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सायन्स आणि खेळ या काहीच फरक नाही का? विशिष्ठ खेळाडूंच्या खेळामुळे काय फायदे होतात? सायन्समुळे काय फायदे होतात? - आजचा गृहपाठ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैदानी खेळांचे फायदेः http://www.muhealth.org/services/pediatrics/conditions/adolescent-medici...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशाची लोकसंख्या -मास्लो पिरॅमिडचा बेस -इतका मोठा-पसरट होत चालला आहे की त्या लॉजिकने अन्न -वस्त्र-निवारा -शॉचालय सोडून काहीच करता येणार नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अनुने काहीतरी वेगळा, विचारप्रवर्तक मुद्दा मांडला आहे. मला तरी पटला. तुम्हाला का पटत नाहीये? - अतिरिक्त देशाभिमान?
देशाचा अभिमान केव्हा बाळगायचा - प्रत्येक व्यक्तीस शौचालय असताना का रुळांच्या बाजूला लोकांना बसून देऊन मात्र मारे क्रीडेत सुवर्णपदके मिळवुन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अनुने काहीतरी वेगळा, विचारप्रवर्तक मुद्दा मांडला आहे. मला तरी पटला. तुम्हाला का पटत नाहीये? - अतिरिक्त देशाभिमान?
देशाचा अभिमान केव्हा बाळगायचा - प्रत्येक व्यक्तीस शौचालय असताना का रुळांच्या बाजूला लोकांना बसून देऊन मात्र मारे क्रीडेत सुवर्णपदके मिळवुन?<<

“We are all in the gutter, but some of us are looking at the stars.”― Oscar Wilde

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

looking at the stars अ‍ॅट द कॉस्ट ऑफ स्टेयिंग in the gutter? रियली?
___
खेळाडूंवरती किती खर्च होतो ते मला माहीत नाही. पण १ रुपया जरी खर्च होत असला तरी देशाच्या अन्य गरजा पहाता तो व्यर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळाडूंवरती किती खर्च होतो ते मला माहीत नाही.

विषय संपला! अनेक खेळाडू प्रायवेट प्रायोजक शोधतात. साक्षीला जेएसडब्लू स्टीलने प्रायोजित केलंय. आता लोकांकडे संडास आहे की नाही या मुद्द्यापेक्षा अशी पदकं मिळाल्यामुळे अधिकाधिक प्रायोजक मिळण्याची शक्यता वाढते. बीसीसीआयचा संघ प्रायोजित करण्याची नेहमीच चढाओढ असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://indiatoday.intoday.in/story/olympics-india-medals-invest-3-paise-...
या बातमीनुसार प्रति खेळाडू ३ पैसे खर्च होतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन पैसे प्रति खेळाडू ! तरीही बरेच खेळाडू ऑलिंपिकमध्ये चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारतात. तिथून पुढे किती अटीतटीची लढत असते हे सांगायची गरज नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुने काहीतरी वेगळा, विचारप्रवर्तक मुद्दा मांडला आहे. मला तरी पटला. तुम्हाला का पटत नाहीये? - अतिरिक्त देशाभिमान?

काहीही विचारप्रवर्तक मुद्दा नाहीये. अनु राव यांना भारतीय असल्याची लाज वाटते असे अनेकवेळा दिसले आहे. त्यामुळं ते गांभीर्यानं घेता येत नाही. त्यापेक्षा बस कंडक्टरची मुलगी असलेल्या साक्षीला भारताचा तिरंगा मॅटभोवती फिरवावा असं वाटणं हे मला जास्त विचारप्रवर्तक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं आपण लोकं इन जनरल मुलांना क्रीडेमध्ये/कलेमध्ये जाण्यास प्रोत्साहन का देत नाही? त्यांनी कमवावे या निखळ, विशुद्ध, एकमेव हेतून त्यांना अभ्यासाला का जुंपतो? कारण हेच की बेसिक गरजा पूर्ण करा, जबाबदार व्हा मग लष्कराच्या भाकर्‍या भाजा. हे कौटुंबिक स्तरावर होते तेच व्यापक स्तरावरही लागू पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बेसिक गरजा पूर्ण करा, जबाबदार व्हा मग लष्कराच्या भाकर्‍या भाजा."

असा विचार केनिया , इथियोपिया अश्या ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या गरीब देशांचे लोक का करत नसतील बरं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

केनिया आणि इथिओपिया इथली मुले गरिबीमुळे अनेकदा रोज 10-15 मैल चालत/पळत शाळेला जातात. या देशांची रनिंग मधली मक्तेदारी बंद करायची असेल तर त्यांच्या मुलांना शाळेस जाण्यासाठी बसेस पुरवा असे अमेरिकेत विनोदाने म्हटले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशा यांचे निधन झाले, तेव्हा राष्ट्रीय दुखवटा तर जाहीर केला नाहीच, पण राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, आर्मी चीफ जनरल (सैन्यदलातील सर्वोच्च पद), नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल (नौदलातील सर्वोच्च पद), एअर चीफ मार्शल (वायुदलातील सर्वोच्च पद) यापैकी कुणीही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले नाही. जर भारत देशाला या गोष्टीची लाज वाटत नाही, तर ऑलिंपिकमध्ये पदक न मिळणे तर किस झाड की पत्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशा यांचे निधन झाले, तेव्हा राष्ट्रीय दुखवटा तर जाहीर केला नाहीच, पण राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, आर्मी चीफ जनरल (सैन्यदलातील सर्वोच्च पद), नेव्ही चीफ अ‍ॅडमिरल (नौदलातील सर्वोच्च पद), एअर चीफ मार्शल (वायुदलातील सर्वोच्च पद) यापैकी कुणीही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले नाही. जर भारत देशाला या गोष्टीची लाज वाटत नाही, तर ......

पंतप्रधान, राष्ट्रपति, संरक्षणमंत्री यांनी निवृत्त सेनाधिकार्‍याच्या अंत्यविधीला उपस्थित राहू नये असा शिष्टाचार (प्रोटोकॉल) असू शकेल ... ही शक्यता अवश्य ध्यानात घ्या. असा शिष्टाचार आहे असं मला म्हणायचं नाही पण असू शकतो व त्यामागे एक विशिष्ठ कारण सुद्धा आहे. कारण एक्सप्लेन करणे थोडे कठिण आहे पण तुम्ही आग्रह केलाच तर करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यास हा फार पुढचा भाग झाला ओ. विचार करायचाच नाही असा निर्णय घेतलाय का तुम्ही ?? पटलं नसेल तर तसं सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मते सार्वजनिक स्वच्छता सुधारल्याशिवाय इतर फालतू खर्च थांबवावेत

सर्वाना उपलब्ध सार्वजनिक संडास बांधेपर्यंत काय काय थांबवायचं ( सरकारी खर्चाने)

१. सर्व कला , ज्याला डायरेक्ट किंवा इंडिरेक्ट सरकारी funding मिळते .
२. सरकारी शिक्षण सवलती ( ज्यावर किमान प्राथमिक कमाल IIT सारख्या संस्था चालतात )... ज्यानां परवडतं त्यांनी शिक्षण घ्यावं , बाकी फडतुसांनी संडास बांधणीला लागावं
३. ऑलिंपिक किंवा तत्सम स्पर्धा सहभाग
४. अजून काय काय ?
हे इंटरेस्टिंग होते आहे

काय जरुरी आणि काय जरुरी नाही हे नक्की कोण ठरवणार ?
मला संत श्री माओ यांची फार आठवण येऊन राह्यली या विचारसरणीत !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा, चुकिच्या ठिकानी प्रतिसाद पड्ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे हवा होता हा प्रतिसाद : तुमच्या मते सार्वजनिक स्वच्छता सुधारल्याशिवाय इतर फालतू खर्च थांबवावेत

सर्वाना उपलब्ध सार्वजनिक संडास बांधेपर्यंत काय काय थांबवायचं ( सरकारी खर्चाने)

१. सर्व कला , ज्याला डायरेक्ट किंवा इंडिरेक्ट सरकारी funding मिळते .
२. सरकारी शिक्षण सवलती ( ज्यावर किमान प्राथमिक कमाल IIT सारख्या संस्था चालतात )... ज्यानां परवडतं त्यांनी शिक्षण घ्यावं , बाकी फडतुसांनी संडास बांधणीला लागावं
३. ऑलिंपिक किंवा तत्सम स्पर्धा सहभाग
४. अजून काय काय ?
हे इंटरेस्टिंग होते आहे

काय जरुरी आणि काय जरुरी नाही हे नक्की कोण ठरवणार ?
मला संत श्री माओ यांची फार आठवण येऊन राह्यली या विचारसरणीत !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ह प्रतिसाद शुची यन्च्या कोमेन्ट वर द्ययचा होता .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, अजून एक मेडल नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अदिती अशोक पण आहे ना अजून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. ती आणि योगेश्वर दत्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चला, अजून एक मेडल नक्की!

आपल्या रक्षणाकरता स्त्रिया भावाला राखी बांधतात त्या मुहूर्तावर दोन स्त्रियांनीच देशाची लाज राखली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढकल-संदेश पोटेंशिअल छान आहे या वाक्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्व भारतीय सिंधूला रौप्य पदक तरी नक्की असे म्हणत आहेत. अरेच्च्या! सुवर्ण मिळेल असे का बोलत नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

सुवर्ण (पदक) मोह नसे आम्हासी -माया महा ठगनी हम जानी ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच! (पण याला "Making virtue out of necessity!" असे म्हण्तात!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तिला मिळणार नक्की. कालची मॅच सोपीच होती तिच्यापुढे. बिचारी ओकुहारा नुसत्या हालचालींनीच (मुव्हमेंट्सनेच) घाईला आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पी. व्ही. सिंधू

उपांत्यपूर्व फेरीत अव्वल क्रमांकाच्या वांग यिहानला हरवणाऱ्या सिंधुला सुवर्ण पदकासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अव्वल क्रमांकाच्या वांग यिहानला

कॅरोलिना मरिन ऑलिंपिकमध्ये टॉप सीड आणि जगात सध्या अव्वल क्रमांकावर आहे. फायनल तिच्याशी आहे. वांग यिहान माजी अव्वल नंबर आहे बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पी.व्ही.सिंधु आणि गडकर्‍यांची सिंधु! दोन्ही सिंधुच. पण
एक दारुड्या नवर्‍याचे सगळे अत्याचार सहन करणारी तर दुसरी साक्षात रणरागिणी. मिळालेल्या पॉईंटवर तिखट आनंद व्यक्त करणारी.
एक 'कशी या त्यजु पदाला' म्हणून पुरुषी वर्चस्वाला शरण जाणारी तर एक संधी मिळताच अप्र्तिम बॅकहँड स्मॅश मारुन प्रतिस्पर्ध्याला संपवणारी.
एक मर्यादांचा अतिरेक करणारी तर दुसरी देशवासीय फक्त रजतपदावर खूष असताना सुवर्णपदकाचा ध्यास घेणारी.
असो.
बाकीचा कल्पनाविस्तार या क्षेत्रातील अनुभवी,विवेकी ज्येष्ठांवर सोपवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक 'कशी या त्यजु पदाला' म्हणून पुरुषी वर्चस्वाला शरण जाणारी तर एक संधी मिळताच अप्र्तिम बॅकहँड स्मॅश मारुन प्रतिस्पर्ध्याला संपवणारी.
एक मर्यादांचा अतिरेक करणारी तर

साहेब, आमचा एक कडकडीत सॅल्युट स्वीकारावा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी म्हणतंय की पदकं मिळवणं हेच भारतासाठी अभिमानास्पद आणि टाळकुटे वारकरी / कुंभमेळा / हजयात्री हे लांच्छनास्पद. कोणी म्हणतंय की बेसिक्स सुधारा, ऑलिम्पिक पदक गेलं खड्ड्यात...

आता ही मतं व्यक्त करणारी सगळी मंडळी भारतीय आहेत/होती असं मानलं तर भारतातील विरोधाभासांची कल्पना असूनही इतकी टोकाची मतं येतात याचंच आश्चर्य वाटलं. कुठे गेला ऐसीवरचा सुप्रसिद्ध मध्यममार्ग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर मध्यममार्ग कधी होता ?
प्रत्येक प्रश्नाची 'नवी' बाजू उलगडून दाखवणारे, प्रश्नाला कधीही सरळ 'अनु'मोदन न देता वेगळीच भूमिका मांडणारे, सारखे विदा मागणारे विद्रट, टँजंट कॉमेंटस देणारे.... अशी टोकाचीच मार्ग चोखाळणारी व्यक्तिमत्वे बघितली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ये हुई ना बात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0