ती राधा होती म्हणूनी...

कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.
अनय होणं अवघड आहे. कारण अनय होण्याची वाट कोणी आपणहून निवडत नाही. अनय होण्याची ओढ वाटणं नैसर्गिक नाही. त्याच्या दु:खाचं आकर्षण वाटेल कदाचित पण अनय होण्याचा प्रवास कोणी स्वतःहून निवडणं अशक्यच! आणि लादल्या गेलेल्या गोष्टीइतका त्याचा संघर्षही त्रासदायकच. रोज उठून स्वतःमध्ये ती शक्ती, ते धैर्य निर्माण करणं - समोरच्याच्या डोळ्यात दुसर्‍याच कोणाचंतरी विश्व पहायची.. ज्याचं विश्व आपल्या डोळ्यांत आहे.. ज्याच्या स्वप्नांनी आपले डोळे भरुन गेलेत. हे तो करु शकला म्हणून अनय चं कौतुक. त्याने रोज अंत पाहणार्‍या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्ती रोज विनातक्रार निर्माण केली म्हणून. पण तो पुरुष होता हे ही त्याच्या कौतुकाचं कारण आहे. बाई करत राहिलीच असती तिच्या नवर्‍यावर प्रेम, त्याच्या डोळ्यात तिच्या स्वप्नांना जागा नसती तरी. रोज मरायची शक्ती गोळा करुनच रोज स्वतःला जन्माला घालणं अपेक्षितच असतं बायकांकडून. अनय चं अनय होणं म्हणूनच वेगळं. कारण ते अनपेक्षितच होतं.
सगळ्यांनाच आपलंसं वाटून शेवटी त्याचं कोणाचंच नसणं राधेला उशीरा का होईना समजलं असावं. पण तोवर तरी तिला मिळालेले आयुष्य उधळून टाकावेत असे त्याच्यासोबतचे क्षण. आपल्या डोळ्यांत जसं त्याचं विश्व आहे तसंच त्याच्याही डोळ्यांत आपलंच विश्व आहे असं वाटण्याचे भाबडे क्षण. तेवढ्या संचितावर काढता येत असावं आयुष्य बहुधा. पण अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते, तरी त्याच्या नजरेत कायम तीच राहिली. तिचंच विश्व. तिचीच स्वप्न. 'ती'च बनून राहिला तो तिच्या अस्तित्वाभोवती. तिच्या अस्तित्वात कोणतीही भेसळ करण्याचा प्रयत्न न करता तिला ती राहू दिलं आणि स्वतः बनून गेला तिच्या रंगाचा. जसं प्रेम तिने केलेलं कृष्णावर तसंच अनय ने राधेवर आणि मग राधेला जितका कृष्ण मिळाला तितकीही ती त्याला न मिळाल्याने तिच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अनय झाला तो.
अनयच्या दु:खाचं आकर्षण वाटणारा तू एकटा नाहीस. पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.
------------------------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.

हे मात्र कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी सामजावेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला फक्त एकाच शब्दाचा अर्थ कळला नाही.
मला तर आख्खा लेखच माझ्या डोक्याच्या ३५००० फुटावरुन गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनय - राधेचा नवरा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांना माहीत आहेच पण तरीही अरुणा ढेरे यांची ही कविता -

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

– अरुणा ढेरे

____
एकदम आवंढा येतो ही कविता वाचताना.
____
याच प्रकारची पण जरा वेगळी छटा असलेली. गुरु ग्रहाची गोष्ट. गुरु म्हणजे बृहस्पती हा देवांचा गुरु. चंद्रचाही अर्थातच. चंद्राने गुरुपत्नीगमन केले व त्याला शाप मिळाला. गा सहवासातून चंद्राचा पुत्र म्हणजे बुध जन्मास आला. पण या सर्वात बुधाचा काय दोष म्हणुन गुरुने त्याचा सांभाळ केला.
ही पुराणातील गोष्ट. अत्यंत टोकाचा चांगुलपणा दाखवणारी, गुरु ग्रहाचे मोठे मन (benevolent) दाखविणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्ण- अरुणा ढेरे
तुला नाही सूर्य झाकता आला
आणि घूँघट ओढून अंधार झाला ,असा देखावाही नाही करता आला
राधे ,तुझ्या चेह-यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली - मुकी कासाविस संध्याकाळ.,
आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला ...वणव्याचा केशरी जाल

अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं
बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एक निरोप घेण्यानं..
हात हललेला तू पाहिलास !
रथ चाललेला तू पाहिलास!
पण खिळून राहिलीस ठायिच, नाही धावलीस मागे आवेशानं..

कळलं न तुला
शेवटी मनापासून मन दूर जातं
तेंव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो ..
ना अंगाचा वास ,ना शपथांचा फास
श्वास अडतो की घुसमटतो याचा विचार ही नसतो, जाणा-याच्या मनात .
काल होते हात हातात , आज नाहीत .
संबंधाचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितित .

हवं ते हवं तेंव्हा घेतो तो , मिळवतो , खेळवतो , मालावतो .
त्याच्यातून त्याच्याचसाठी उगवतात स्वीकार ..नकार
जग त्याच्याभोवती तो सहज वळवतो

त्याच्या ओळखी‌आड असते एक अदय अनोळख
तो यमुनेच्या जळात कधी कान्हा हो‌उन हसतो ..
तर कधी कालिया हो‌उन डसतो ..
राधे,, पुरूष असाही असतो ...

-अरुणा ढेरे

हा त्या कवितेचा पूर्वार्ध.

याच्याच पुढचं मागचं काही डोक्यात होतं. अनयाचं दुःख आकर्षक आहे, मलाही तसं वाटायचं ते कधी काळी.त्यामुळे त्याच्या दुःखाला आकर्षक समजणार्या प्रत्येकासाठी त्या शेवटच्या ओळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

निव्वळ सुंदर! ही कविता माहीतच नव्हती.
___
कृष्ण -राधा-अनय हा विषय चाललाच आहे तर लगे हाथ "कुब्जेवरील" कविता देते पण शोधावी लागेल बहुतेक गोविंदाग्रजांची आहे.
___
सापडत नाही आहे. ही कविता इंदिरा संत यांची नव्हे मला जी अपेक्षित आहे तिचा अर्थ काहीसा असा आहे की - कृष्णाबद्दल बातमी आली आहे, सर्वचजण मोठ्या उत्सुकतेने उद्धवास विचारत आहेत की माझी आठवण काढतो का कृष्ण. कुब्जा मात्र तोंड लपवुन रडते आहे कारण तिने असे विचारले तर ती केवळ हास्यास्पद ठरेल. तेव्हा तेही भाग्य तिच्या नशीबी नाही. अशी काहीशी.
___
"मीलनक्षेत्र" - वेडी होते मी ही कविता वाचताना. हा लेखच अप्रतिम आहे- नानांच्या कवितेतील राधा
____
हां सापडली-

दैवाची निर्दयता - गोविंदाग्रज

श्रीहरि मथुरानगरीं गेले, गोकुळ मागें तळमळतें।
प्राणिमात्र नच केवळ, परि तें यमुनेचें जळही जळतें ॥
कळे सकळ हें श्रीगोपाळा कळवळुनी मनि आणि दया ।
धाडुनि दिधला व्रजांत उध्दव प्रियजनसांत्वन करावया ॥
सत्वर हरिचा निरोप घेउनि उध्दव भेटे सकळांते ।
वृत्तश्रवणा क्षणांत जमलें गोकुळ सारे त्याभवतें ॥
हें नंदाला, यशोदेस हें, कोणाला कांही कांही ।
निरोप सांगे सांत्वनपर तो; सुनें कुणी उरलें नाही ॥
या गोपीला, त्या गोपीला, गोड शब्द दे वांटुनिया ।
राधेला तर बहाल केली हरिनें जीवाची दुनिया ॥
प्रेमकथांच्या संस्मरणानें जल सर्वांच्या ये नयनां ।
व्याकुळ विव्हळ झाली राधा, सांवरितां हो पुरे जनां॥
सुखदु:खांच्या मिश्र सागरीं निमग्न गोकुळ सर्व असे ।
परि दुर्दैवी एक जीव तो त्या काळीं त्या स्थळी नसे ॥
अष्टवक्रा, काळी, कुबडी, कुब्जा तेथे नच दिसली ।
दीन बिचारी एकटीच ती कुठें तरी जाऊनि बसली ॥
स्मरण कशाचे तिचें कुणाला जी बघवेना डोळयांनीं ।
गजबजतां जग आनंदाने दुर्दैवी पळती रानीं ॥
तोंड झांकुनी, ओंठ दाबुनी, रडे आंतल्या आंत मनी ।
पुसुनी टाकी झणि पदरानें अश्रू आले जरि नयनीं ॥
'' प्रेमळ देवा, जिवलग देवा, माझ्यी जीवाच्या देवा, ॥
कसे विसरलां दासीला? देवा हो, एकच देवा ! ॥
कशी विचारुं उध्दवजींना क्षेम तुझें या लोकांत ? ।
म्हणेल कोणी काय मला हें त्या न कळे भर आनंदांत?॥
सुंदर गोपी योग्य रडाया जगन्मोहना तुजसाठी ।
परी कुठे मी ? अणि कुठें तूं? लोकसुंदरा जगजेठी ॥
रडायासही मुक्तकंठ हा देवा रे जीवचि लाजे ।
श्रीहरिसाठी कुब्जा रडते हेंच हंसे होईल माझें !'' ॥
अनुष्टुभ्
घडेना कार्य या लोकीं भाग्यावांचूनि कोणतें ।
हंसायातेंच न परी रडायाताह लागतें ॥
असावें लागतें भाग्य हंसायातें न काय तें ।
रडायातेंही जीवाचें या लोकीं भाग्य लागतें ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मिपा असतं तर एव्हाना "तो राघा होता म्हणुनी" हे विडंबन येऊन त्यावर शंभरेक प्रतिसाद आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आज तो कृष्ण होता. पण पूर्वी तो राम होता. तेव्हासुद्धा ती त्याला प्राप्त करुन घेउ शकली नाही...

कारण तेव्हा तो एकपत्नीत्व पालत होता. तेव्हा रुक्मिणी होती सीता. आणि राधा अशीच कुणाच्या स्मृतीतही नसलेली कुणी एक साधी भोळी भक्त.....

किंवा कुणी सांगावं तीच असेल अहिल्या. तीच ती उत्कटता जी राधेच्या कृष्णप्रेमाबद्दल आहे ...ती उत्कटता आणि प्लेटोनिकता अहिल्येच्या रामभक्तीत आहे. तिला शाप दिलेले मुनिवर गौतम... त्यांनाच तर पश्चात्तप होत नसेल ?

त्यांनीच तर आपल्या भाळी लिहून नसेल घेतलं प्रायश्चित्त -- अनय होण्याचं!

किंवा

रामाच्या पदस्पर्शानं अहिल्या पवित्र झाली, हा असेल आपलाच भ्रम. कदाचित तिच्या भक्तीनं आतडी पिळवटून आले असतील प्रभु रामचंद्रच तिच्यासाठी. शोधत शोधत ते आले अहिल्येकडे की अहिल्या गेली त्यांच्याकडे ? उत्कटता त्याही जन्मात होतीच.

कदाचित रामाचा अवतारच घेतला असेल त्या अहिल्येसाठीच. लंकेतलं ते युद्ध, ती वानरसेना, ही देखील शेवटी एका भक्तासाठीच होती ना ? 'रावण' नावाच्या विरोधभक्ती करणार्‍या परमभक्तासाठीच ?
आले असतील की मग ते त्या शिळेच्या... त्या खडकाच्या..त्या गौतमपत्नीच्या व्याकुळतेपुढे नतमस्तक होउन. आणि इतकं होउन त्यांचा जन्म कशासाठी हे ठरवून टाकलं आपणच...परस्पर आपसात.

शेवटी आपल्याही मनात गौतम असतोच कुठेतरी. त्याला अहिल्या आवडत असते. निरतिशय प्रेमही असतं. अनयाचं राधेवर होतं तसच. इतकं की आपल्या ह्या प्रिय व्यक्तीसाठी त्यांनी आपल्या प्रियेच्या प्रियतम्याची वाट पाहिली संयम ठेवून. पण तरी मनात भाव होताच "अहम्"चा. "मी" ह्या अहिल्येचा-राधेचा "त्याग" करतोय ह्याचा.
राधा मात्र ह्या "मी"पणापासून मुक्त होती. मुक्त कसली ? ती नव्हतीच. ती आणी भगवंत एकरुप तर झाले होते ना ? ते वेगळे असे होते कुठे ?

त्यांनी तादात्म्य साधलं होतं. अद्वैताचा अनुभव घेतला होता. गौतम- अहिल्या- श्रीराम वेगळे नाहित. अनय-राधा-कृष्णही एकच आहेत. वेगळेपण जाणवतं ते भौतिक मर्यादांमुळे. जे तसंही असतं क्षणभंगुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखनात अनुभवांची भावव्याकुळ तरल व्यामिश्रता दिसते. जाँ हाल कुत्र आणि व्हॅन खॉक्क यांच्या साहित्य व चित्रांतून दिसणार्‍या प्रतिमासृष्टीच्या विश्रब्ध पार्श्वभूमीवर भारतीय समाजपिंडातही अशाच जडणघडणीचं दृग्गोचर होणं हे चराचर विश्व सकृद्दर्शनी पृथगात्म वाटले तरी मूलतः एकच आहे असं प्रत्यंतर येतं. भौगोलिक स्थितिवाद आणि रचनोत्तरवादाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तरी अशा रोचक ऐक्यानुभवामुळे आधुनिकोत्तर जाणिवेला मोठाच हादरा बसून भंजाळलेपणाची जाणीव अजून तीव्र होईल की काय, हा प्रश्न विचक्षण वाचकाला कायम सतावत राहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोमल भावनांची कमळे निर्दयतेने अतिव निष्ठुरतेने पायदळी तुडवताना, त्यांची पायमल्ली करताना, हत्तींना काही वाटत नसेल पण कोवळ्या कमळांच्या नाजूक मनःपटलावर आघात झाल्यावाचून रहात तर नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ही कमळे मूळ लेखिकेची तर नव्हेत ना.

मूळ लेखावर दिलेला प्रतिसाद बघा की.

http://www.aisiakshare.com/node/5476#comment-138557

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मिती विलोभनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पुणेरी दुकानदार आणि त्याच्या कष्टंबरच्या नात्यावरचं स्फुट आहे.

मी नुकतीच काही पुस्तकं घ्यावीत म्हणून पुण्यातल्या दोन आघाडीच्या पुस्तक-दुकानदारांना फोन केला होता. विशिष्ट दिवशी मी येईन, तेव्हा माल तैयार ठेवा अशी नम्र विनंती केली. (विशिष्ट दिवस वजा फोनचा दिवस >= १५ दिवस.) त्यावर "तुम्ही यायचंय तेव्हा या, त्या दिवशी स्टॉकला असेल तर मिळेल." असं उत्तर मिळालं.

तर या घटनेवरून काय दिसतं? असं दिसतं की "नाही" म्हणणं हा पुणेरी दुकानदाराचा स्थायीभाव आहे. नो-नाही-नहीं-नय असा नन्नाचा पाढा ऐकून थकलेल्या राधारूपी ग्राहकाला "नय् न म्हणणार्‍या (∴ "अनय") दुकानदाराची" आस लागल्यास नवल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॅन खॅाक्क मथुरेत असता तर कशी चित्रं काढली असती?काळा निळा रंग वापरला असता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्यात्म लेखन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनय, भित्रं तिच्यायला!
दोन गालांवर दोन काड्कन मुस्काडीत ठेऊन त्या राधेला घराबाहेर काढायची सरळ! जा म्हणावं इतकं आहे तर र्‍हा त्या किसन्यासोबत!!
थू: त्याच्या जिंदगीवर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

तुम्ही लिहीले ते बरे झाले पिडाकाका. मी असले काही बोलले तर मधमाशांचे पोळेच फुटते एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधमाशांचे पोळेच फुटते एकदम.

कोणतापण स्वाभिमानी पुरुष असेल तर तो जरूर सांगेल की "जा, माझ्याशी रीतसर काडीमोड घे आणि मग काय जे काय करायचं असेल ते कर. रंगव आख्खा गाव! (मराठीत: पेन्ट द टाऊन रेड!!)
पण माझी पोत गळ्यात बांधून हे धंदे करू म्हणशील तर जमायचं नाही."
नायतर मग व्हटावर ह्या मिश्या काय कामाच्या? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरस्करणीय विधान. समस्त स्त्रियाँनी याचा करकचुन धिक्कार करावा अशी अपेक्षा आहे.. लेट्स सी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पण ह्यात पुरुषी अहंभावाचा संबंध नाही. लग्नोत्तर एकनिष्ठता न बाळगण्याच्या विरोधात खंबीर भूमिका घेण्याचा आहे.
जर इथे अनयच्या जागी एखादी रुक्मिणी असती तर तिलाही नवर्‍याला दोन वाजवून घराबाहेर काढ असाच सल्ला दिला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हट्टावर मिशा नसतात...

कृष्णाची मोहीनी नेहमीच त्याच्या अलौकिकतेचा / दिव्यात्वाचा / इश्वरत्वाचा प्रभाव आहे यामधे कुठेही कोणतीही गोपी व्याभिचारकर्म म्हणून कृष्णाकड़े आकर्षित झालेली नाही परिणामी ही भक्ति वा आकर्षण विवाहसंस्थेच्या विरोधी असेल तर जगातील बहुतांश विवाहितान्नी ताबड़तोप घटस्फोट घ्यावेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हे चांगले जस्टीफिकेशन कम एस्क्युज आहे.

मनोबा - आजपासुन डोंट ब्लेम इट ऑन निरोध. ब्लेम इट ऑन मधुराभक्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्णाच्या अलौकिकतेची मोहिनी व्याभिचार ठरवने हां पुर्षी अहमन्यतेचा उत्कृष्ट नमूना आहे.

तसही पति पत्नी नाते हवे असते तर सत्राशे साठ विवाह करायला कृष्णाने मागेपुढे पाहिले नसते प्रॉब्लम हां आहे की आपण कृष्ण नाही ही भावना काही पुरुषांमधे कमीपणाची भावना निर्माण करते आन मग ते कृष्णाला व्याभिचारी थरवून आपल्या पुर्शि अह्न्काराचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरु करतात... जर कृष्ण भक्ति व्याभिचार असेल तर जगातल्या तमाम विवाहित पुरुशानी आपल्या बाय्काना ज्या कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ति करतात त्यांना सोडचिठ्ठी द्यावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ओके. म्हणजे विबासं ज्याच्या/जिच्याबरोबर ठेवायचा आहे ती पार्टी अलौकिक/असामान्य/दिव्य/ईश्वर असेल तर प्रॉब्लेम नाय. सर्वसामान्य असेल तर व्यभिचार.

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अलौकिक/असामान्य/दिव्य/ईश्वर असेल तर प्रॉब्लेम नाय. सर्वसामान्य असेल तर व्यभिचार.

असे नाही आबा. आधी व्यभिचार** करायचा आणि जर पकडले गेलेच तर मग त्या पार्टीला इश्वरी रुप द्यायचे. सोप्पे आहे.

--------
** : मी व्यभिचार वगैरे काही मानत नाही. ज्याचा त्यानी आनंद शोधावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कोणी तुमचा आसाराम बनवू शकणार नाही हे तत्वज्ञान मी मांडत नाही याची समाजमनाने नोंद घ्यावी.

व्याभिचार अन संसारातुन मन उठने या दोन वेगळ्या गोष्टी आहेत इतकेच मी बोलत आहे प्रिज्युडाइस मन नसेल तर हे उमजने अवघड नाही आणि उठसूट ईश्वरावर टिका करयाला घसरण्यापेक्षा पुरुषी अहमन्यता अथवा बेगडी स्त्रीमुक्ति नाकारण्यात लोकांनी प्राधान्य द्यावे असे मी सुच्वेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कृष्ण निघून गेल्यावर अनय-राधेचं उर्वरित जीवन कसं होतं यावर कोणी काल्पनिक प्रकाश टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते

कोण अनया? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0