गंनच भुत

मध्ये कामाची धांदल आणि कामवाली राहु गायब, एक दोन दिवस मी वाट पाहुन तिला फोन लावला तर पलीकडुन माणसाचा आवाज... मी बंद करुन पुन्हा लावला... परत तेच... मग विचारले... राहु..... राहुचाच नंबर ना?
हो
अहो राहु कामाला का येत नाही?
आम्ही गावाकडे आलोय... राहुचा मावसा रचना वरुन पडुन मेला...
काय, गंगामावशीचा नवरा ?
..............
काय काय...नीट ऐकु येईना...
अहो राहुबाई चा मावसा.... परत तेच..

मी अरे बापरे मला पोटात खड्डा पडल्याचा फिल आला... परवाच राहु सांगत होती..मावशी काकांसनी गावाकडे सोडुन आली ...लय तरास दितं.. उगच माराय उठत्यात मावशीला रातसारं झोपु दिनात... कुणाचं बी नाव घीवुन माराय उठायल्यात...तुमच्या सोसायटीनंबी त्यासनी कामावनं काडुन टाकलय..
मग?
मग काय ..मावशी घर काम करतीय...पण ते दारात जाऊन बसतेय कामाच्या...
गंगाबाई आणि त्यांचा नवरा आमच्या सोसायटीत काम करायच्या... लेबर कॅम्पात राहतात सारे... दिवसभर बांधकामाची कामे आणि बाया घरकामे...गंगाबाईंच्या नवर्याला कष्टाचे काम होत नव्हते मग कचरा गोळा करणे आणि माळीकाम एवढी कामे ते करत... गंगाबाई दिवसभर इकडे काम करुन सकाळी रात्री घरकाम... स्वताच्या घराचे काम सकाळी पहाटे उठुन...मध्येच नवरा असे वागु लागल्याने...त्यांना कामावरुन काढले...

कहानी इकडे संपली नाही...
तर गंगाबाईंचा नवरा वरुन पडुन मेला.... एवढे कळाले... पण मला त्याचं भुत दिसु लागलं...
हा तर गंगाबाईंच्या नवर्याच्या भुताला आपण गंनच भुत म्हणु...तशी मी नास्तिक पण हे गंनच भुत माझी पाठ सोडेना... अगोदर अगदी रात्री अडीच तीन वाजता कंपनीतुन आले तरी मला काहीच वाटायचे नाही... infactमीच भुतासारखी रातची इरंची भुतासारखी कंपनीतनं यायचे...
कंपनीने वॉर्न केलय...रात्री कॅब करत जा.. पण दुसर्या दिवशी सकाळी परत जायचे कसे... ते काय कंपनी सोडवत बसणार नाही... म्हणुन मग कंपनीला हजार शिव्या घालत मी गाडीला किक मारायचे... बरोबरची पोरं .. जपुन जा ग...का येवू पोहचवायला विचारत...पण त्यांना माझ्यापेक्षा कितीतर अंतर लांब जायचे...निलेश रोज रात्री कुत्री मागे लागतात म्हणुन कंपनीला आणि indirectly मलाच शिव्या घालायचा... ते जाऊदे... पण माझी गाडी ब्रिज पर्यंत येयीस्तोवर काहीच वाटायचे नाही... पुल ओलांडला की लगेच गंनच भुत
दिसायला लागायचं... दिसायचे म्हणजे नक्की काय ...तर उलट्या पायांचे, आक्राळ विक्राळ भुत कधीच दिसले नाही किंवा भिती दाखवुन मला चिमटीत बिमटीत पकडणारे भुत कधीच दिसले नाही... वॉव मला कोणी चिमटीत पकडतय ही कल्पनाच किती मस्त.. लगेच मला हलकी झाल्याचा भास झाला... पण छे ... एवढे कुठले नशीब... भुत दिसायचे म्हणजे लांब रस्त्यावर शाल पांघरुन चालताना गंनच भुत दिसायच... पण पटकन जाऊन बघु तुझे पाय... बघु हात...असली परीक्षा घ्यायची बुद्धी व्हायचीच नाही.. गंनच भुत चालायच पण मी तर गाडीवर असायचे... मी त्या भुताला नक्की गाठणार पण पुढे येयीस्तोवर ते गायब... मग माझ्या पोटात खड्डा आणि गाडीचा वेग अजुनच वाढणार... कुत्री मागे लागली की अजुन गाडीचा वेग वाढणार... कुत्र्याला भुत दिसल नाही का... त्याला भुंकत नाही आणि माझ्या गाडीच्या मागे मात्र ही कुत्री लागणार..सरासर नाइन्साफी...
घसार लागली की मी पुर्वि गाडीचा वेग कमी करायचे... पण आता तो भयान वाटु लागायचा... सोसायटीच्या आत शिरले की... वेग कमी व्हायचा... परत गार्डन लागली की गंनच भुत मला झाडांना पाणी घालताना तर कधी खुरपताना दिसायचं... बोलायचं मात्र नाही... तसही गंगाबाईंचा नवरा कधी बोलला नाही... म्हणुनच ते गंनच भुत कधी बोलत नसावं...
त्यांचा नवर्याला तर गावाकडे नेले... त्यांची सर्व कुटुंब अजुन परत आलीच नव्हती... भुत मात्र आधिच येवुन पोहचलं. कमाल आहे नै, त्याच्या बायका माणसात राहयच्या ऐवजी ते भुत इथे ते त्याच्या पुर्वीच्या जन्मातल्या कामाच्या जागेवर आले होते.
काम, लेकिचा अभ्यास , रोजचाच ऊशीर... कामवाली राहु नाही... सकाळचा स्वयंपाक करत होते पण रात्री पोरीच्या जेवणाचे हाल.
शेवटी स्वयंपाकाला बाई शोधायला लागले...रोज एक जाड बाई वरच्या राहुलकडे स्वयंपाक करतात ते मला माहित होते...म्हणजे.. राहुल माझ्याच बिल्डींगमध्ये राहतो... पानी गेलेय का , लाईट गेलीय का एवढेच शब्द ...आणि कधीतरी लिफ्ट मधली स्माईल...ह्यापेक्षा जास्त ओळख नाही...
एकदा तो मैत्रीणीला घेवुण आला होता...नेमकी मी तेव्हा लिफ्ट मध्ये... यावेळी मात्र तो दिलखुलास हसला... नेमकी दुसर्या दिवशी परत ते दोघे आणि मी लीफ्ट मध्ये... परत स्माईल देवुन... कहॉ जॉब करते हो ची त्याने विचारणा केली.... मी तेवढाच मौका साधुन स्वयंपाकवाली कशी आहे...किती लोकांचे किती पैसे घेते असे विचारुन घेतले...,( पट्टयाने दिलखुलास आम्ही दोघे राहतो आणि एवढे एवढे पैसे घेते असे सांगुन टाकले...मैत्रीण होती ना बरोबर...)
मी त्या भामाबाईंना यायला सांगितले... त्या चुकन आल्या परत.तर त्यांना मदत करायची असे बरेच काही ठरवुन टाकले
एकुण काय तर दिवसा गंगाबाई आणि रात्री गंनच भुत मला छळु लागले...
दिवस चालले होते...

अजुन एका आठवड्याने भामाबाई परत भेटल्या.... परत आणि माझी गाडी राहु कधी येईल वर घसरली.. भामाबाईंना ते आवडले नसावे... काहीच बोलल्या नाहीत...
मी परत तोच विषय छेडत... सामान न्यायला तर येतीलच की... त्यावर त्या म्हणाल्या राहु च्या मावशीच पोरगं ... ते जरा गिठ्ठु आहे... इथच शाळेत हाय बगा... ते दिसतय आलेलं...कोणाकड राहतय काय की... पण ते तेवढ दिसतय बघा...
मी जरा बुद्धीवर देऊन पाहिला..ह्याच वर्षी गंगाबाईंनी...आपल्या पोराला ह्याच वर्षी इकडे शाळेला घेवुन आल्यात... मी मनात ..बरे झाले

त्यांची माझी तशी गाठ पड्त नसे.... त्या स्वयंपाक उरकुन निघुन जात.. एखदा माझी गाठ पडली...
मी: राहु कधी येयील कोणास ठाऊक.? मला एकटीला सर्व उरकेना...
भामाबाई: ... बहुतेक ते यायचे नाहीत लोक असे वाटतय... त्यांनी बिल्डरकडुन पैसे मागितले...
मी: किती मागितले?
भामाबाई: किती मागितले ते नाही माहीत...पण बिल्डरकडुन त्यांनी 1 लाख मिळवले...
मी: किती...?
त्या ...1 लाख.

मी पुढे काही विचारती झाले नाही...१ लाखात गंगाबाई कशी आयुष्य काढेल? पोरगं आताशी आठवीत शिकतय....पोरगी दुसरीत...वर्षाला लाखभर रुपये पोरगीच्या शाळेची फी भरणार्या मला ती एका लाखात कसे आयुष्य काढेल एवढीच चिंता लागली होती...दिवसभर.मी गंगाबाईची कहानी लोकांना सांगायचे, हळहळायचे...पण माझ्या हळहळण्याने काय होणार? पोराचीच काळजी वाटत होती मला... वडील वारले मग आता पोराचं शिक्षण कसे होणार...
त्यानंतर आठ दिवसांनी भामाबाईंना म्हणाले...एवढ गंगाबाई डोक्यावर परिणाम झालाय नवर्याच्या म्हणुन गावकडं सोडुन आल्या... पण मरायसाठीच परत आला बाबा... वैगेरे वैगेरे
भामाबाई मध्येच तोडत... आवं तुम्ही काय खुळ्या का शान्या... ते खुळं नाय मेलं... उलट ते मेलं असत तर बरं झालतंकीवो... त्या गंगीच्या मागचा ताप तरी गेला असता...
मी ...आॅ काय.. गंगाबाईंचा नवरा..
भामाबाई... जीवंत हाय... तीची अजुन एक बहीण हाय... चांगला बापय मेला... आणि हे खुळं तसच राहीलय...
मी...बापरे... मग गंनच भुत मला दिसत होतं ते?...हे सर्व मी मनातच म्हणाले... नाहीतर भामाबाई म्हणाल्या असत्या..शिकलेली माणसं निव्वळ आडगी आसत्यात...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रयत्न चांगला झालेला आहे. मात्र लिखाण थोडं विस्कळित झालेलं आहे. गंगाबाई आणि तिच्या नवऱ्याचं व्यक्तिचित्रण आहे, की भुताच्या भीतीचं गमतीदार वर्णन आहे हे नक्की कळत नाही. शेवटच्या उलगड्यामुळे एक गंमत निर्माण होते. पण त्याआधी दुर्दैवी कहाणीची वर्णनं आहेत. त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण होतो.

एक सूचना. पूर्णविरामाऐवजी ... वापरणं टाळावं. अनेक ठिकाणी वाक्य अर्धवट सोडून दिल्यासारखं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंतर, हा अनुभव खरा आहे. करुण कहानी पण खरी आणि भुताची भितीही खरी. नीट बांधता आली नाही हे खरेय. पुढे सुचना नक्की आमलात आणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्णविरामाऐवजी ... वापरणं टाळावं.

असं टाळल्यास वाचनसंख्या आणि प्रतिसादसंख्याही वाढण्याची शक्यता असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.