मौलिक पटेलच्या यशाचे रहस्य

त्याने जर्सीत अनेक भणंग पटेल इकडे तिकडे
फिरताना, भारतीय दुकानदारांशी दुधाच्या किमतीवर
वाद घालताना पाहिले .त्यांस इंग्रजी विशेष येत नव्हते पण
सततची तंबाखूची पीक सोडल्यास बाकी ते स्वच्छ होते आणि
वरच्या माणसाशी बोलताना नम्रही. तो मनात म्हणाला की तासाला
एक डॉलर अधिक दिल्यास ही सर्व प्रजा आपल्याकडे येईल
.

मग त्याने अमेरिकेतील सर्वात मोठ्या तीन चेन्सना
औषधे विकू शकेल असा (अर्थातच गोरा) माणूस शोधून काढला
पण तो राहायचा कॅलिफोर्निया मध्ये ,
पन्नाशीचा , टकलू, बहुधा गे ,वर्षाला तीन लाख पगार मागणारा.
त्याला तो म्हणाला की आम्ही तुला फॅमिलीसारखे वागवू आणि
उपाध्यक्ष असे बिरुदही देऊ. लॉस अँजेलीसच्या
एकाकी समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी घालविणारा मॅक यावर खूष झाला .
(पुढे तो स्वामीनारायणपंथीही झाला असे बोलले जाते!)

मुंबईतून तलवारकट मिशावाले हुशार मराठी
तंत्रज्ञ् डझनावारी हजर झाले. मुंबईतून अमेरिकेत आणल्याबद्दल
मौलिकचे आजन्म ऋणी, मरेस्तोवर काम करतात.
डॉलरला पासष्टने गुणतात!

आता शेकडो पटेल मौलिककडे काम करतात . गोळ्या डबीत
भरताना पटेल बायका शेतावरची गाणी गातात
दर शुक्रवारी मौलिक आपला शुद्ध गुजराथी वैष्णव डबा घेऊन
त्यांच्यात येऊन जेवतो .

जेवताना मध्येच त्याला मॅकचा फोन येतो
वॉलमार्टचे एक कोटीचे कॉन्ट्रॅक्ट
वॉलग्रीनचे दोन कोटीचे कॉन्ट्रॅक्ट
सीव्हीएसचे तीन कोटीचे कॉन्ट्रॅक्ट
मिळालेले असते.खूष होऊन मौलिक पटेल शेजारच्या
कामकरी बायकांना आपल्या डब्यातली खीर वाढतो
व त्या खूष होऊन हसतात.

रात्री मौलिक बरोबर चंद्रिका पॅलेस मध्ये
चिकन टिक्का खाताना मॅकलाही
तसेच हसताना अनेकांनी पाहिला आहे .
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अंधुक अंधुक कळली आणि अंधुक अंधुक आवडली म्हणून हार्दिक अभिनंदन.

अंधुक अंधुक कळली

+१

मुंबईतून तलवारकट मिशावाले हुशार मराठी
तंत्रज्ञ् डझनावारी हजर झाले. मुंबईतून अमेरिकेत आणल्याबद्दल
मौलिकचे आजन्म ऋणी, मरेस्तोवर काम करतात.

हे नवीन घातलयत.
.
ह्म्म्म ठीक वाटली.यामध्ये मॅक व पटेल यांचे व्यक्तीचित्रण अजुन फुलवले असते तर मजा आली असती.

OK Madam! Thanks! Will try!

वरच्या दोन 'अंधुक अंधुक कळतेय" या प्रतिक्रियांचे खरे सब-टेक्स्ट "हे तुम्हाला कवितेच्या रूपात का मांडावेसे वाटले?", "ह्याला कविता का म्हणावे?" किंवा "चांगले गद्य तोडून तोडून लिहिले तर त्याची चांगली कविता होतेच असे नाही" या स्वरूपाचे आहे असे मला वाटते (ह्याच कॉमेंट्स/शन्का माझ्याही आहेत ) . एक तर कवितेचा आत्मा जो एक एक ओळ, ती सुंदर करण्याकडे (विशेष ) लक्ष नाही, आणि फारशा प्रतिमा उभ्या न करणाऱ्या साध्यासुध्या नॅरेटिव्हला कविता कशाला म्हणायचे?
पण माझ्या मते यातला "काव्यात्म" भाव इतकाच की अमेरिकेत प्रत्येकाला "कम्युनिटीची" ओढ लागली आहे हे यात थोडेसे सूचित होत आहे, आणि या ना त्या प्रकारे ती ओढ पूर्ण करणारा मनुष्य यशस्वी होणार आहे .

मला तरी असा अर्थ जाणवला नाही. मला जे अंधुक अंधुक जाणवले ते असे की राजा आणि रयत किंवा प्रजा ही भारतातली सरंजामी व्यवस्थाच यातून पुढे नेली जात आहे. फक्त या वेळी 'फॅमिली लाइफ' आणि 'एक डॉलर अधिक पगार' हे आमिष आहे. अधून मधून एखाद तास रयतेबरोबर खीर खात घालवायचा आणि दिलदार किंवा समानतादार असल्याचे भासवायचे किंवा खरोखरच तसे असल्याचे समाधान मिळवायचे. शेतावरच्या मजूरणी निर्भरतेने गाणे गातात 'पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे.' पण खरे तर त्यांचेच काय, सर्वांचेच पंख एक डॉलरच्या सुरीने कापलेले असतात. आणि मग हे पक्षी सोन्याचा पिंजरा पाहून चिकन टिका खाताना हसतात कधीमधी. पिंजरा आहे हे उमगल्यावर स्वामीनारायणीही बनतात पिंजर्‍यातून बाहेर पडण्यासाठी कदाचित.
आणि 'मौलिक पटेल'चा 'हार्दिक पटेल' आणि त्याच्या आंदोलनाशीही सूक्ष्मपणे संबंध जोडला गेला मनातल्या मनात. म्हणून पहिल्या प्रतिसादात 'हार्दिक अभिनंदन' म्हटले होते.
मला थोडी विफलता जाणवली कवितेतून. बाकी आकृतीबंधाविषयी माझे काही विशेष असे मत नाही. ज्याला त्याला रुचेल तो फॉर्म ज्याने त्याने वापरावा.
कुठल्याही कलाकृतीतून स्थलकालसभोवतालानुसार वेगवेगळे अर्थ प्रतीत होणे हे एका परीने त्या कलाकृतीचे यशच आहे.

राजा आणि रयत किंवा प्रजा ही भारतातली सरंजामी व्यवस्थाच यातून पुढे नेली जात आहे. फक्त या वेळी 'फॅमिली लाइफ' आणि 'एक डॉलर अधिक पगार' हे आमिष आहे. अधून मधून एखाद तास रयतेबरोबर खीर खात घालवायचा आणि दिलदार किंवा समानतादार असल्याचे भासवायचे किंवा खरोखरच तसे असल्याचे समाधान मिळवायचे. : Touche'!
(But have a heart, lady! we live under American capitalism!)
: M

बाद वे , 'मौलिक पटेल'व 'हार्दिक पटेल' हे दोघे तरुण शास्त्रज्ञ माझ्याकडे काम करतात! योगायोग!

ह्या कवितेला उत्तर म्हणून ही रचना कोण करु शकेल ? --
.
.

कोंडिबा कसबे ... एक शेतकरी वडिलोपार्जित रानात राब राब राबतो
प्रामाणिक पणे राबतो, सबसिडैझ्ड किंमतीवर घेतलेले बियाणे...खुबीने पेरतो..
मायबाप सरकारने स्वस्त दरात दिलेले कर्ज...वापरून घेतलेला ट्रॅक्टर....
मातीतून सोनं निर्माण करण्याची जिद्द बाळगून...कोंडिबा मोठ्या कुशलतेने वापरतो...
निम्म्या किंमतीत मिळालेल्या वीजेवर चालणार्‍या पंपावर ... शेताला भरपूर पाणी पाजतो...
सुभानराव ओलते-पाटील यांनी मोठ्या चतुराईने शेजारच्या जिल्ह्यातल्या धरणातले वळवलेले पाणी...
कोंडिबा रोज मुबलक वापरतो.... मनातल्या मनात सुभानरावांना मुजरा करत...
गावातली पुतळाबाई, ताईबाई त्याला मदत करायला ... त्याच्या बायकोचा भार हलका करायला येतात...
कोंडीबा त्यांना कष्टाचं महत्व पटवून न देता सुद्धा त्या मनोभावे राबतात...
संध्याकाळी ... त्यांच्या हातावर दोन रुपये टेकवताना कोंडीबा ला मिनिमम वेज ची फिकीर नसते...
त्याला फिकीर असते ती त्या दोघींच्या घरची चूल पेटंल की नाही याचीच....

मस्तच! तुम्हीच लिहा की ही कविता !

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

+१
आणि मग त्यानंतर 'महाराष्ट्रातला ३० लाख ब्रह्मवृंद आणि त्यांच्यावर अवलंबून असलेला '१२५ कोटी फडतुसांच्या देशाचा जीडीपी'' यावर पण एक कविता येऊदे!

ROFL माझ्या देवा...
खरंतर यात 'स्त्रिया आणि त्यांची उत्क्रांती' यापेक्षा जास्त पोटेन्शीअल आहे. पण ते वापरायला ब्राह्मणेतर हवेत. जे मआंजावर फारसे दिसत नाहीत. कदाचीत त्यामुळेच जीडीपीमधे त्यांचं काँट्रीब्युशन शुन्य असणारय!
हा हा हा ही ही ही हो हो हो खु खु खु फिदीफिदी

===
Amazing Amy (◣_◢)

महाराष्ट्रात "जातीने" ब्राम्हण असणारे ३० लाख आणि धर्माचा 'अभ्यास' असणारे / 'अधिकारी" मानले जाणाऱ्या लोकांचा बनलेला "ब्रम्हवृन्द" यात मोठा फरक आहे हे नम्रपणे. शिवाजीला "क्षत्रिय" नसल्यामुळे राज्याभिषेक नाकारणारा पैठणचा तो 'ब्रम्हवृन्द " . हे जितके कमी व दुबळे तितके समाजाला हितकारक .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me